या धड्याला टॅनग्रॅम अल्गोरीदम्स असं म्हणतात. टॅनग्रॅम हे सात तुकडयांचं एक कोडं आहे, ते एकत्र करून इतर आकार बनवता येतात. तुम्ही तुमच्या पार्टनरला हे कोडं कसं सोडवायचं हे समजावून सांगण्यासाठी अल्गोरीदम वापराल. अल्गोरीदम म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठीच्या पायऱ्यांची एक यादी. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात ती वापरतो, उदाहरण द्यायचं तर खरेदीच्या याद्या आणि पाककृती. जर तुम्ही अल्गोरीदम सोपा ठेवलात तर त्याचे अनेक अर्थ काढता येतात आणि जो कोणी तो अल्गोरीदम वापरतो आहे, त्याला तुम्हाला जो हवाय तो परिणाम मिळणार नाही. जर प्रत्येकालाच तो परिणाम मिळावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा अल्गोरीदम तपशीलवार आणि अतिशय ठराविक असला पाहिजे. मी आज चित्र पूर्ण करण्यासाठी अल्गोरीदम वापरत आहे. मला काही लांडग्यांचं चित्र रंगवायचा प्रयत्न करायचा होता, पण मी फार चांगली चित्रकार नाहीये. सुदैवानं माझ्यासारख्या लोकांसाठी, पेंट बाय नंबर्स आहे. इथे चाळीस रंग आहेत आणि यात लहान अक्षरं आणि संख्या आहेत आणि प्रत्येक भाग कोणत्या रंगानं रंगवायचा आहे ते तुम्हाला त्यातून कळतं. पेंट बाय नंबर्स मला कोणता रंग कुठे वापरायचा हे सांगतं. ते अतिशय ठरलेले आहे, त्यामुळे मी सूचनांचे पालन करू शकते आणि चित्र तयार होईल. हा एक छान अल्गोरीदम आहे. जर सूचना इतक्या अचूक नसत्या तर माझे लांडगे इतके चांगले दिसले नसते. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट अगदी तुमच्या नियोजनानुसार व्हायला हवी असते तेव्हा ती अतिशय अचूक असलेली उत्तम,