सर्दी झाल्यावर तुम्ही गोळी अथवा इन्जेक्शन घेता काय होते त्याने तुमच्या जखमा लवकर भरतात का? शस्त्रक्रिया व अपघातानंतर काही आठवडे इस्पितळात रहावे लागते. शस्त्रक्रियेचे डाग व जखमा मागे रहातात. कारण आपण त्या इन्द्रियांची पुनर्निर्मिती करू शकत नाही, याबाबत मी साधने निर्माण करू लागले ज्याने आपल्या प्रतिकार शक्तीस नव्या पेशी निर्माण करण्याच्या सूचना मिळतील. जसे लस प्रतिकार शक्तीस सूचना देत असते. रोगा विरुद्ध लढण्याची अगदी तसेच आपण रोग प्रतिकार शक्तीस सूचना देऊ शकू. जखमा लवकर भरण येण्याबाबत व पेशी निर्मिती बाबत. शून्यातून अवयवाची पुनर्निर्मिती जादू आहे असे वाटेल . पण पृथ्वीवर असे अनेक जीव आहेत जे गमावलेले अवयव पुनर्निर्माण करतात . काही सरडे तुटलेली शेपटी पुन्हा निर्माण करतात. सालामांडरचा तुटलेला हात पुन्हा उगवतो. मानवाचे यकृत असेच आहे . यकृताचा अर्धा भाग गमावल्यानंतरही ते पूर्ववत होऊ शकते. ही जादू घडवून आणण्यासाठी वास्तविकते जवळ जाण्यासाठी शरीर पेशीची निर्मिती व जखमा भरून येणे याची मी माहिती मिळवीत आहे. प्रतिकार शक्तीच्या सूचनांवरआधारित गुढघा दुखी पासून ते सायनसच्या वैताग आणणाऱ्या अवस्थेपर्यंत. रोग प्रतिकारशक्ती आपल्या शरीराचे रोगापासून संरक्षण करते. मी प्रतिकारशक्ती विशारद आहे. शरीराचे बचाव तंत्र ज्ञान जाणून घेतल्याने मला काही रहस्ये कळलीत. जी मला आढळली खरचटल्यावर तसेच त्वचा कापली गेल्यावर. जे साधन मी आज हाताळीत आहे त्याचा विचार केला त्यांच्या स्नायू पुनर्निमितीच्या क्षमतेवर या साधनांचा दुखावलेल्या स्नायूवर वापर करून हे आमच्या गटास आढळले , त्या साधनात आणि सभोवताली मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती पेशी होत्या. या साठी पहा. या पेशी जीवाणूशी लढण्यासाठी संसर्ग स्थानी न धावता, त्या जखमेकडे धावतात. मला त्यात एक विशिष्ट प्रतिकारक पेशी आढळली. तिला मदतनीस टी पेशी म्हणते. जे साधन मी अवयवात टाकले होते त्यात त्या पेशी होत्या. ज्या निर्विवादपणे जखम बऱ्या करणाऱ्या होत्या. जसे लहानपणी तुमच्या पेन्सिलचे टोक जाते तेव्हा तुम्ही ते पुन्हा काढता शार्पनर वापरून. तसेच आपण बरे होऊ शकतो. पण हे काही नियमित बरे होण्यासारखे नाही. तेव्हा जखमेचा डाग रहातो या टी पेशी जेव्हा नसतात तेव्हा स्वस्थ स्नायू ऐवजी, आपले स्नायूत चरबी पेशी आढळतात. जर अश्या चरबी पेशी स्नायूत असतील तर ते मजबूत नसतात. आपली प्रतिकारक प्रणाली वापरून, शरीर पुनर्निर्मिती करते ,डाग मागे न ठेवता. आणि पुन्हा पूर्ववत स्थिती प्राप्त करते. जखमी झाल्यावरही, मी या साधनांची निर्मिती करीत आहे. ज्याने संकेत मिळेल नव्या उती निर्मितीचा. प्रतिकार शक्तीचा प्रतिसाद बदलून. आपण एखादे उपकरण शरीरात स्थापित केल्यावर प्रतिकारशक्ती त्यास प्रतिसाद देते. हे हृदयात बसविलेल्या पेसमेकर पासून इन्सुलिन पंपापर्यंत खरे आहे. तसेच ते खरे ठरते आमच्या उपकरणाबाबत. जेव्हा आम्ही हे शरीरात स्थापित करतो तेव्हा प्रतिकार शक्ती काही पेशी व प्रोटीन निर्माण करतात. स्टेम सेलच्या कामात त्या बदल घडवून आणू शकतात. जसे हवामान तुमच्या शरीरावर व शारीरिक क्रियांवर परिणाम करते. जसे तुम्ही धावताना किवा घरी बसून नेटफ्लिक्स वरील चित्रपट पाहताना तसेच प्रतीकार शक्तीचे पर्यावरण काम करते. स्टेम सेलची वाढ आणि विकास यावर परिणाम करते. जर चुकीचे संकेत मिळाले जसे नेटफ्लिक्स सारखे तर आपल्यात स्नायूऐवजी चरबी पेशी निर्माण होतात. ही स्थापित करावयाची साधने विविध वस्तू पासून बनवितात, प्लास्टिक पासून, नैसर्गिक साधनापासून. विविध जाडीच्या अतिसूक्ष्म फायबर पासून, कमी अधिक सच्छिद् तेच्या स्पन्जापासून विविध काठीण्य पातळीचे जेल वापरून याशिवाय संशोधकांनी शोधलेली साधने या आधारे कालांतराने संकेत मिळतात. थोडक्यात आपण पेशींना हवे तसे नाचवू शकतो. त्यांना योग्य असा रंगमंच ,सूचना देऊन हे विविध पेशी साठी विविध प्रकारे करावे लागते , जसे दिग्दर्शक रंगमंचाचे नेपथ्य करतो. जसे राम विरुद्ध रावण दृश्यात मी काही विशिष्ट संकेत एकत्रित करीत आहे. जे नक्कल करतील पुनर्रचनेच्या प्रतिसादाचा. भविष्यात आपल्याला दिसेल जखमेचा डाग मागे न ठेवणारे बँडेज जखम बरी करणारी लस ,वितळणारा स्मायू भराव पण हे लागलीच घडणार नाही अन्य प्रण्यासामान. पुढील मंगळवार वा अन्य दिवशी पण या प्रगतीने, तसेच प्रतिकार शक्तीच्या पुनर्निर्मिती कार्याची आपल्याला बाजारात साधने भविष्यात मिळू लागतील. जी आपल्या शरीराच्या बचाव तंत्रास व अवयव पुनर्निर्मितीस मदत करतील. एक दिवस असा येईल आपण सालामांडरशी स्पर्धा करु. आभारी आहे. (टाळ्या )