WEBVTT 00:00:00.000 --> 00:00:03.416 मी लिफ्ट मधून बाहेर पडले तेव्हा खूप गोंधळ सुरू होता. 00:00:03.773 --> 00:00:06.638 मी निवासी डॉक्टर म्हणून कामावर परतत होते. 00:00:06.662 --> 00:00:08.857 प्रसूती विभागाचे काम पाहण्यासाठी 00:00:08.881 --> 00:00:12.022 मला फक्त डॉक्टर व परिचारिकांचे झुंडच दिसत होते. 00:00:12.046 --> 00:00:14.484 प्रसूतीगृहातील महिला रूग्णाभोवती घुटमळताना, 00:00:14.508 --> 00:00:17.963 सगळे हताशपणे त्या महिलेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. 00:00:17.987 --> 00:00:19.749 ती महिला रूग्ण शाँकमध्ये होती. 00:00:19.770 --> 00:00:23.700 मी येण्याच्या काही तास आधी तिने एका निरोगी मुलाला जन्म दिला होता. 00:00:24.700 --> 00:00:27.795 अचानक तिची तब्येत ढासळली ,ती प्रतिसाद देत नव्हती. 00:00:27.819 --> 00:00:30.459 तिला प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. 00:00:30.483 --> 00:00:32.205 मी खोलीत जाईपर्यंत, 00:00:32.229 --> 00:00:36.529 तिथे अनेक डॉक्टर व परिचारिका आले होते व ती रूग्ण अचेतन झाली होती. 00:00:36.553 --> 00:00:39.835 पुनरूज्जीवन चमूने तिला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, 00:00:39.859 --> 00:00:41.611 पण प्रत्येकाने अथक प्रयत्न करूनही, 00:00:41.635 --> 00:00:43.084 ती दगावली. 00:00:43.108 --> 00:00:47.279 त्या दिवसाबद्दल मला लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे त्या वडिलांचा आर्त आक्रोश. 00:00:47.303 --> 00:00:50.953 तो माझ्याच नाही तर त्या मजल्यावरील प्रत्येकाच्या ह्रदयाला भेदून गेला. 00:00:50.977 --> 00:00:53.788 हा त्याच्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस असायला हवा होता, 00:00:53.812 --> 00:00:56.616 त्याऐवजी तो सर्वात वाईट दिवस ठरला. NOTE Paragraph 00:00:58.278 --> 00:01:01.847 ही क्वचित घडणारी दुर्दैवी घटना असती तर.. 00:01:01.871 --> 00:01:04.108 पण तसे नाही. 00:01:04.132 --> 00:01:05.977 दरवर्षी युनायटेड स्टेट्स मध्ये, 00:01:06.001 --> 00:01:09.518 जवळ जवळ ७०० ते ९०० स्त्रियांचा मृत्यू होतो, 00:01:09.542 --> 00:01:11.471 गर्भावस्थेशी संबंधित कारणांमुळे. 00:01:11.882 --> 00:01:13.843 धक्कादायक बाब म्हणजे, 00:01:13.867 --> 00:01:17.217 इतर सर्व उच्च उत्पन्न असणाऱ्या देशांपेक्षा 00:01:17.241 --> 00:01:19.662 आपला माता मृत्यू दर अधिक आहे. 00:01:19.686 --> 00:01:22.404 कृष्णवर्णीय स्त्रियांच्या बाबतीत तर हे दर खूपच वाईट आहेत. 00:01:24.003 --> 00:01:28.183 प्रत्यक्षात आपला माता मृत्यू दर मागील दशकात वाढला. 00:01:28.207 --> 00:01:30.879 जेव्हा इतर देशात तो घटला. 00:01:31.380 --> 00:01:33.499 आणि सर्वात मोठा विरोधाभास काय? 00:01:33.523 --> 00:01:37.698 जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा आपण आरोग्य सेवेवर अधिक खर्च करतो. NOTE Paragraph 00:01:38.582 --> 00:01:42.674 या बाळंतीणीने जीव गमावला त्या दरम्यान निवासी सेवेत असताना, 00:01:42.698 --> 00:01:44.696 मी स्वतः आई झाले. 00:01:44.720 --> 00:01:48.090 या क्षेत्रातील माझी पार्श्वभूमी व प्रशिक्षण असूनही, 00:01:48.114 --> 00:01:51.653 मातेला उच्च प्रतीची आरोग्य सेवा देण्याकडे 00:01:51.677 --> 00:01:54.625 फारसे लक्ष दिले जात नाही हे पाहून मी हताश झाले. 00:01:54.649 --> 00:01:57.357 .मी याचा खोलात जाऊन विचार केला, फक्त माझ्यासाठी नाही, 00:01:57.381 --> 00:01:59.362 तर इतर अनेक स्त्रियांसाठी. 00:01:59.781 --> 00:02:03.185 कदाचित माझे वडील नागरी हक्क मुखत्यार होते त्यामुळे 00:02:03.209 --> 00:02:05.464 माझ्या पालकांना सामाजिक जाणिव होती 00:02:05.488 --> 00:02:08.394 योग्य गोष्टींचा आम्ही पाठपुरावा करावा अशी त्यांची इच्छा होती. 00:02:08.394 --> 00:02:10.776 किंवा माझे पालक जमैका मध्ये जन्माला आले, 00:02:10.776 --> 00:02:12.423 नंतर ते युनायटेड स्टेट्स मध्ये आले 00:02:12.423 --> 00:02:15.233 आणि ते अमेरिकन ड्रीम समजून घेण्यासाठी सक्षम होते. 00:02:15.257 --> 00:02:17.407 किंवा माझ्या निवासी प्रशिक्षणामुळे असेल. 00:02:17.431 --> 00:02:19.098 जिथे मी प्रत्यक्ष पाहिलं, 00:02:19.098 --> 00:02:22.626 अल्प-उत्पन्न असणाऱ्या कृष्णवर्णीय महिलांवर आपल्या आरोग्य सेवा प्रणालीद्वारे 00:02:22.626 --> 00:02:24.593 किती असमाधानकारकपणे उपचार केले जातात. 00:02:24.617 --> 00:02:28.377 कारण कोणतेही असो, यासाठी उभे राहणे ही मला माझी जबाबदारी वाटली. 00:02:28.401 --> 00:02:29.855 फक्त माझ्यासाठी नाही, 00:02:29.879 --> 00:02:31.153 तर सर्व स्त्रियांसाठी, 00:02:31.177 --> 00:02:34.734 विशेषतः आपल्या आरोग्य सेवेद्वारे उपेक्षित महिलांसाठी. 00:02:34.758 --> 00:02:39.259 मी माझ्या कारकिर्दीत माता आरोग्य सेवेतील सुधारणेवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले NOTE Paragraph 00:02:40.726 --> 00:02:42.632 तर कशामुळे या माता दगावत आहेत? 00:02:42.656 --> 00:02:45.031 ह्रदय विकार, रक्तस्राव, 00:02:45.055 --> 00:02:48.045 फेफरे व पक्षाघात यांना कारणीभूत ठरणारा उच्च रक्तदाब, 00:02:48.069 --> 00:02:49.608 रक्ताच्या गुठळ्या आणि जंतुसंसर्ग 00:02:49.608 --> 00:02:53.291 ही या देशातील मातामृत्युची काही ठळक कारणे आहेत. 00:02:53.796 --> 00:02:57.333 पण मातेचा मृत्यू हे फक्त हिमनगाचे टोक आहे. 00:02:57.357 --> 00:03:01.643 प्रत्येक मृत्यूमागे, शेकडो स्त्रिया 00:03:01.643 --> 00:03:04.319 गर्भावस्था व प्रसुती संबंधित गंभीर समस्यांशी झगडत असतात. 00:03:04.343 --> 00:03:09.058 परीणामी, दरवर्षी जवळपास ६०,००० स्त्रियांवर यापैकी एखादा प्रसंग ओढवतो. 00:03:09.506 --> 00:03:12.476 या गुंतागुंतीच्या समस्या म्हणजे गंभीर मातृत्वजन्य स्थिती, 00:03:12.500 --> 00:03:16.338 युनायटेड स्टेट्स मध्ये वाढत आहेत आणि त्या जीवन बदलून टाकत आहेत. 00:03:16.362 --> 00:03:20.039 असा अंदाज आहे की या देशात 00:03:20.063 --> 00:03:23.785 दरवर्षी होणाऱ्या ४ दशलक्ष प्रसुतींपैकी 00:03:23.809 --> 00:03:26.519 १.५ ते २ टक्के प्रसुतींमध्ये वरीलपैकी एक प्रसंग उद्भवतो. 00:03:26.539 --> 00:03:32.093 म्हणजे दर तासाला ५वा६ महिलांना रक्ताच्या गुठळ्या, फेफरे, पक्षाघात होतो, 00:03:32.117 --> 00:03:33.936 रक्त द्यावे लागते, 00:03:33.960 --> 00:03:36.855 महत्वाच्या अवयवाना ईजा पोहचते, जसे मूत्रपिंड निकामी होणे, 00:03:36.879 --> 00:03:38.998 किंवा इतर दुर्दैवी घटना. NOTE Paragraph 00:03:40.758 --> 00:03:43.967 आता, या कथेचा अक्षम्य भाग म्हणजे 00:03:43.991 --> 00:03:47.998 ही वस्तुस्थिती की या मृत्यू व गंभीर समस्यांपैकी 00:03:47.998 --> 00:03:50.285 ६० टक्के समस्या टाळता येण्याजोग्या समजल्या जातात. 00:03:50.309 --> 00:03:52.885 जेव्हा मी म्हणते ६० टक्के घटना टाळता येण्याजोग्या आहेत, 00:03:52.885 --> 00:03:56.067 याचा अर्थ,त्यासाठी ठोस पावले व आदर्श कार्यपद्धती आहे. 00:03:56.091 --> 00:03:57.559 तिची आपण अंमलबजावणी करू शकतो. 00:03:57.583 --> 00:04:00.134 त्यामुळे हे वाईट परीणाम टाळता येतील. 00:04:00.158 --> 00:04:01.733 आणि महिलांचा जीव वाचेल. 00:04:02.361 --> 00:04:05.038 आणि यासाठी भपकेबाज नवीन तंत्रज्ञान गरजेचे नाही. 00:04:05.062 --> 00:04:07.170 आपण फक्त आपल्या ज्ञानाचा वापर केला पाहिजे 00:04:07.194 --> 00:04:10.174 आणि इस्पितळांचा दर्जा समान राखला पाहिजे. NOTE Paragraph 00:04:11.260 --> 00:04:15.442 उदाहरणार्थ, प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतीला उच्च रक्तदाब असेल, 00:04:15.466 --> 00:04:18.422 आणि योग्य वेळी आपण रक्तदाब कमी करण्यासाठी 00:04:18.446 --> 00:04:20.028 योग्य औषधोपचार केला, 00:04:20.052 --> 00:04:21.543 तर आपण पक्षाघात टाळू शकतो. 00:04:22.300 --> 00:04:25.519 आपण प्रसूतीकाळात होणाऱ्या रक्तस्त्रावावर अचूक लक्ष ठेवले 00:04:25.543 --> 00:04:29.144 तर आपण अतिरक्तस्त्रावाचे लवकर निदान करून त्या महिलेचा जीव वाचवू शकतो. 00:04:29.700 --> 00:04:34.225 आपण खरोखर भविष्यातील अशा आपत्तीजनक घटनांचा दर कमी करू शकतो, 00:04:34.249 --> 00:04:37.024 पण त्यासाठी आपण सेवेच्या गुणवत्तेचे महत्त्व जाणले पाहिजे. 00:04:37.048 --> 00:04:38.897 जी आपण गर्भवती स्त्रियांना 00:04:38.921 --> 00:04:42.028 गर्भावस्थेपूर्वी तसेच गर्भावस्थेत व प्रसूतीनंतर देतो. 00:04:42.052 --> 00:04:46.873 आपण सर्वत्र सेवेची गुणवत्ता तिच्या मानकानुसार उंचावली तर 00:04:46.897 --> 00:04:50.703 आपण या मृत्यू व गंभीर समस्यांचे दर बरेच खाली आणू शकतो. NOTE Paragraph 00:04:51.695 --> 00:04:53.605 असो, एक आनंदाची बातमी आहे. 00:04:54.403 --> 00:04:56.266 काही यशोगाथा आहेत. 00:04:56.972 --> 00:05:00.080 काही ठिकाणी हा दर्जा राखला गेला आहे 00:05:00.104 --> 00:05:01.859 आणि त्यामुळे बराच बदल जाणवत आहे. 00:05:01.883 --> 00:05:06.214 काही वर्षांपूर्वी, अमेरीकन काँलेज आँफ आँबस्ट्रेटीशिअनस् अँण्ड गायनेकोलाँजीस्टस् 00:05:06.238 --> 00:05:09.002 इतर आरोग्य संस्था,माझ्यासारखे संशोधक 00:05:09.026 --> 00:05:12.339 आणि सामाजिक संस्थांशी जोडले गेले. 00:05:12.363 --> 00:05:15.302 त्यांना दर्जेदार आरोग्य सेवा अंमलात आणायची होती. 00:05:15.326 --> 00:05:18.702 देशभरातील इस्पितळे व आरोग्य संस्थांमध्ये. 00:05:18.726 --> 00:05:21.055 यासाठी त्यांनी वापरलेले माध्यम म्हणजे 00:05:21.079 --> 00:05:25.320 द अलायन्स फाँर इनोव्हेशनस् इन मँटर्नलहेल्थ एम योजना. 00:05:25.344 --> 00:05:30.105 संपूर्ण देशात गुणवत्ता व सुरक्षिततेबाबतीत पावले उचलून 00:05:30.129 --> 00:05:33.330 मातामृत्यू व गंभीर समस्यांचा दर कमी करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. 00:05:33.789 --> 00:05:36.925 या गटाने,मातामृत्यूच्या सहज टाळता येण्याजोग्या कारणांना लक्ष्य करून 00:05:36.949 --> 00:05:40.501 अनेक सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या आहेत. 00:05:41.148 --> 00:05:44.180 सध्या या एम प्रोग्राम मध्ये यू एस मधील 00:05:44.204 --> 00:05:46.517 ५० % प्रसुतींपर्यंत पोहचण्याची क्षमता आहे. NOTE Paragraph 00:05:47.443 --> 00:05:49.436 तर या सुरक्षिततेच्या उपाययोजना काय आहेत? 00:05:49.460 --> 00:05:52.213 अनुभवावर आधारित कार्यपद्धती, कार्यप्रणाली, कृती 00:05:52.237 --> 00:05:53.771 औषधोपचार, साधनसामुग्री 00:05:53.795 --> 00:05:55.969 आणि या परिस्थितीत लागणाऱ्या इतर गोष्टी. 00:05:56.537 --> 00:05:59.136 आपण अतिरक्तस्त्रावातील उपाययोजनांचे उदाहरण घेऊ. 00:05:59.660 --> 00:06:01.580 अतिरक्तस्त्रावामध्ये एक लहान गाडी हवी, 00:06:01.604 --> 00:06:05.181 ज्यावर निकडीच्या प्रसंगी डॉक्टर-परिचारिका यांना आवश्यक अशी सर्व सामग्री असेल 00:06:05.181 --> 00:06:08.748 आय व्ही लाईन, ऑक्सीजन मास्क, औषधे, 00:06:08.772 --> 00:06:10.971 पडताळणी सूची, इतर उपकरणे. 00:06:10.995 --> 00:06:13.155 नंतर रक्तस्राव मोजण्यासाठी काहीतरी हवे. 00:06:13.179 --> 00:06:14.721 स्पंज, कापडाच्या घड्या. 00:06:14.745 --> 00:06:16.578 आणि फक्त पाहण्याऐवजी, 00:06:16.602 --> 00:06:19.585 डॉक्टर व परिचारिका ते स्पंज व घड्या एकत्र करून 00:06:19.609 --> 00:06:21.197 त्यांचे वजन करतात किंवा 00:06:21.221 --> 00:06:25.556 रक्तस्राव अचूकपणे मोजण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरतात. 00:06:28.060 --> 00:06:32.530 अतिरक्तस्त्राव उपाय योजनेत रक्तदानासाठी आणीबाणीच्या कार्यप्रणालीचा अंतर्भाव असतो. 00:06:32.554 --> 00:06:34.749 शिवाय नियमित प्रशिक्षण व पुनरुक्ती शिक्षणाचाही NOTE Paragraph 00:06:34.914 --> 00:06:38.657 आता या उपाययोजनांच्या उपयोगात कॅलिफोर्निया अग्रेसर आहे. 00:06:38.681 --> 00:06:42.027 यामुळेच कॅलिफोर्नियामध्ये पहिल्या वर्षात 00:06:42.027 --> 00:06:44.515 या उपाययोजनांचा अवलंब केलेल्या रूग्णालयांमध्ये 00:06:44.515 --> 00:06:47.570 जीवघेण्या अतिरक्तस्त्रावामध्ये २१टक्के घट झाली. 00:06:48.276 --> 00:06:52.683 पण अजूनही देशभरात या उपाययोजनांचा तुरळक किंवा अभावात्मक वापर होतो. 00:06:52.707 --> 00:06:55.612 जशी ही वस्तुस्थिती आहे की 00:06:55.636 --> 00:06:57.642 अनुभवसिद्ध कार्यपद्धती व सुरक्षेचे महत्त्व 00:06:57.642 --> 00:07:00.166 रूग्णालयागणिक बदलते, 00:07:00.190 --> 00:07:01.900 तशीच सेवेची गुणवत्ता बदलते. NOTE Paragraph 00:07:02.359 --> 00:07:06.501 अमेरिकेत कृष्णवर्णीय स्त्रियांना मिळणार्या सेवेच्या गुणवत्तेत खूप फरक पडतो. 00:07:06.501 --> 00:07:09.228 या देशात प्रसूत होणार्या श्वेतवर्णीय स्त्रियांच्या तुलनेत 00:07:09.252 --> 00:07:13.578 कृष्णवर्णीय स्त्रियांमध्ये गर्भावस्थेशी संबंधित मृत्यूचे प्रमाण 00:07:13.602 --> 00:07:14.978 तीन ते चार पट अधिक आहे. 00:07:15.649 --> 00:07:19.657 ही सांख्यिकी या देशात प्रसूत होणार्या सर्व कृष्णवर्णीय स्त्रियांसाठी सत्य आहे. 00:07:19.657 --> 00:07:21.996 मग त्यांचा जन्म अमेरिकेत झालेला असो 00:07:21.996 --> 00:07:23.236 वा इतर देशात. 00:07:23.823 --> 00:07:27.512 अनेकजण विचार करतात की ही विषमता उत्पन्नातील फरकामुळे आहे. 00:07:27.536 --> 00:07:29.424 पण ती वर्गापलिकडची विषमता आहे. 00:07:29.833 --> 00:07:32.469 एका महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या 00:07:32.493 --> 00:07:35.474 कृष्णवर्णीय स्त्रीच्या मृत्यूची शक्यता 00:07:35.474 --> 00:07:38.826 माध्यमिक शिक्षणही न घेतलेल्या श्वेतवर्णीय स्त्रीच्या तुलनेत दुप्पट आहे. 00:07:38.826 --> 00:07:44.354 आणि तिला प्रसुती दरम्यान गंभीर समस्या निर्माण होण्याची 00:07:44.378 --> 00:07:45.809 दोन ते तीन पट अधिक शक्यता आहे. NOTE Paragraph 00:07:46.407 --> 00:07:50.628 मला नेहमीच असा विचार करायला शिकवले गेले की शिक्षण आमचे पापविमोचन आहे. 00:07:50.652 --> 00:07:53.237 पण या बाबतीत,ते साफ खोटे आहे. 00:07:54.271 --> 00:07:56.381 सीडीसी नुसार, 00:07:56.405 --> 00:07:58.137 सार्वजनिक प्रसुती आरोग्यासाठी 00:07:58.161 --> 00:08:00.593 उपाययोजना करताना 00:08:00.617 --> 00:08:02.663 काळे-गोरे हा भेदाभेद सर्वात मोठी विषमता आहे. 00:08:02.990 --> 00:08:05.210 आपल्या काही शहरात 00:08:05.234 --> 00:08:06.752 हे भेदाभेद ठळकपणे जाणवतात. 00:08:06.776 --> 00:08:08.930 उदाहरणार्थ, न्यूयॉर्क शहर. 00:08:08.954 --> 00:08:12.357 कृष्णवर्णीय स्त्रीला गर्भधारणेसंबंधित कारणाने मृत्यू होण्याचा धोका 00:08:12.381 --> 00:08:15.806 श्वेतवर्णीय स्त्रीपेक्षा आठ ते बारा पट जास्त आहे. NOTE Paragraph 00:08:16.822 --> 00:08:19.239 मला वाटते आपल्यापैकी अनेकांना कदाचित 00:08:19.263 --> 00:08:21.860 डॉ.शॅलोन आयर्विंगची ह्रदय द्रावक कथा माहित असेल. 00:08:21.884 --> 00:08:25.869 सीडीसीच्या साथरोग विशेषज्ञ ज्यांचा प्रसुतीपश्चात मृत्यू झाला. 00:08:25.893 --> 00:08:29.477 काही महिन्यांपूर्वी त्यांची कथा 00:08:29.501 --> 00:08:31.410 प्रोपब्लिका व एनपीआर मध्ये नोंदवली गेली. 00:08:31.434 --> 00:08:33.106 अलिकडेच मी एका परिषदेत होते 00:08:33.130 --> 00:08:35.773 आणि त्यांच्या आईचे बोलणे ऐकण्याची मला संधी मिळाली. 00:08:35.797 --> 00:08:38.517 त्यांच्या भाषणाने श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. 00:08:38.909 --> 00:08:41.165 शॅलोन एक हुशार साथरोग विशेषज्ञ होती. 00:08:41.189 --> 00:08:44.450 आरोग्य सेवेतील वांशिक भेदभावाच्या अभ्यासाशी वचनबद्ध. 00:08:44.474 --> 00:08:47.624 ती ३६ वर्षीय होती, तिचे हे पहिलेच बाळ होते. 00:08:47.648 --> 00:08:49.485 आणि ती अफ्रीकी- अमेरिकन होती. NOTE Paragraph 00:08:50.070 --> 00:08:53.097 शॅलोनची गर्भधारणा गुंतागुंतीची होती. 00:08:53.121 --> 00:08:57.100 पण तिने सुदृढ मुलीला जन्म दिला व तिला रूग्णालयातून सोडण्यात आले. 00:08:57.710 --> 00:09:02.091 तीन आठवड्यांनंतर उच्च रक्तदाबामुळे गुंतागुंतीची समस्येमुळे मृत्यू झाला. 00:09:02.864 --> 00:09:07.144 या तीन आठवड्यात शॅलोनला आरोग्य सेवा तज्ञांनी 00:09:07.168 --> 00:09:08.716 चार ते पाचवेळा तपासले. 00:09:08.740 --> 00:09:10.389 तिचे कोणीही ऐकले नाही, 00:09:10.413 --> 00:09:13.671 आणि तिच्या परिस्थितीचे गांभीर्य कोणाला जाणवले नाही. NOTE Paragraph 00:09:15.169 --> 00:09:18.169 शॅलोन ची गोष्ट ही युनायटेड स्टेट्स मधील, 00:09:18.193 --> 00:09:21.607 आरोग्य सेवेतल्या वांशिक भेदभावाच्या अनेक गोष्टींपैकी फक्त एक 00:09:21.631 --> 00:09:23.321 गोष्ट आहे. 00:09:23.345 --> 00:09:27.713 अशी वाढती मान्यता आहे की 00:09:27.737 --> 00:09:32.040 वंशवाद, दारिद्रय,शिक्षण,विभक्त कुटुंब हे आरोग्याशी संबंधित सामाजिक निर्धारक 00:09:32.064 --> 00:09:33.963 विषमतेत भर घालतात. 00:09:34.419 --> 00:09:38.504 पण शॅलोनची गोष्ट आणखी एका मूलभूत कारणावर प्रकाश टाकते: 00:09:38.528 --> 00:09:40.003 सेवेची गुणवत्ता. 00:09:40.027 --> 00:09:43.043 प्रसुतीपश्चात सेवेतील दर्ज्याचा अभाव. 00:09:43.067 --> 00:09:46.355 त्या तीन आठवड्यात चिकित्सकांकडून अनेकदा शॅलोनची तपासणी केली गेली. 00:09:46.379 --> 00:09:48.276 आणि तरीही तिचा मृत्यू झाला. 00:09:48.300 --> 00:09:51.001 युनायटेड स्टेट्स मधील, 00:09:51.025 --> 00:09:54.268 मातामृत्यू व मातृत्वजन्य जटील समस्येतील वांशिक व सांस्कृतीक विषमतेचे 00:09:54.292 --> 00:09:57.110 प्रसुतीसाठीच्या सुसज्जेची ची गुणवत्ता 00:09:57.134 --> 00:09:58.306 हे मूलभूत कारण आहे. 00:09:58.330 --> 00:10:00.608 याची आपण आत्ता दखल घेऊ शकतो. NOTE Paragraph 00:10:02.073 --> 00:10:04.220 आमच्या गटाच्या व इतरांच्या संशोधनानुसार, 00:10:04.244 --> 00:10:06.778 विविध कारणांमुळे, 00:10:06.802 --> 00:10:10.274 कृष्णवर्णीय स्त्रियांचा प्रसुतीसाठी ठराविक रूग्णालयात जाण्याकडे कल असतो. 00:10:10.298 --> 00:10:14.454 कृष्ण व श्वेतवर्णीय दोन्ही स्त्रियांमध्ये या रूग्णालयांचा निकाल अत्यंत वाईट असतो. 00:10:14.478 --> 00:10:16.932 मग रूग्णाची स्थिती धोकादायक असो वा नसो. 00:10:17.379 --> 00:10:19.935 हे पूर्ण युनायटेड स्टेट्स मधील वास्तव आहे 00:10:19.959 --> 00:10:22.204 जिथे तीन चतुर्थांश कृष्णवर्णीय स्त्रिया 00:10:22.228 --> 00:10:24.518 ठराविक रूग्णालयात प्रसूत होतात, 00:10:24.542 --> 00:10:28.320 त्याच रूग्णालयात एक पंचमांशापेक्षाही कमी श्वेतवर्णीय स्त्रिया प्रसूत होतात. 00:10:28.850 --> 00:10:31.952 न्यूयॉर्क शहरात, 00:10:31.952 --> 00:10:34.091 प्रसुतीकाळात होणाऱ्या जीवघेण्या समस्यांचा धोका 00:10:34.115 --> 00:10:37.825 रूग्णालयागणिक सहा पटींनी वाढतो. 00:10:37.849 --> 00:10:41.919 साहजिकच कृष्णवर्णीय स्त्रियांची या अत्यंत वाईट निकाल असणाऱ्या रूग्णालयात 00:10:41.943 --> 00:10:43.547 प्रसुती होण्याची दाट शक्यता असते. 00:10:43.571 --> 00:10:45.644 खरं तर, रूग्णालयातील हे फरक 00:10:45.668 --> 00:10:48.071 जवळपास अर्धी कृष्ण-श्वेत विषमता स्पष्ट करतात. NOTE Paragraph 00:10:49.597 --> 00:10:52.405 जर या देशात आपल्याला खरंच न्याय्य आरोग्य सेवेकडे जायचे असेल, 00:10:52.429 --> 00:10:56.342 तर या सामाजिक निर्धारकांची दखल घेतलीच पाहिजे. 00:10:56.366 --> 00:11:00.105 यापैकी बरेच खोल रूजलेले आहेत आणि त्यांना दूर करण्यास वेळ लागेल. 00:11:00.129 --> 00:11:03.002 मधल्या काळात,आपल्याला सेवेची गुणवत्ता हाताळता येईल. 00:11:03.373 --> 00:11:07.384 अखंड सेवेच्या पलिकडे उच्च दर्जाची सेवा पुरवणे 00:11:07.408 --> 00:11:10.929 म्हणजे स्त्रियांच्या संपूर्ण पुनरूत्पादन काळात 00:11:10.953 --> 00:11:13.391 सुरक्षित व विश्वसनीय गर्भनिरोधके उपलब्ध करणे. 00:11:13.801 --> 00:11:18.529 गर्भधारणे आधी, गर्भधारणा पूर्व काळजी घेणे, 00:11:18.553 --> 00:11:21.709 जेणेकरून जुनाट आजार नियंत्रित ठेवून आरोग्य सांभाळता येईल. 00:11:22.081 --> 00:11:26.239 यात गर्भावस्थेत उच्च दर्जाच्या प्रसूतीपूर्व व प्रसुतीसेवेचा समावेश होतो. 00:11:26.263 --> 00:11:29.099 म्हणजे आपण सुदृढ आई व बाळ निर्माण करू शकतो. 00:11:29.123 --> 00:11:34.449 आणि शेवटी, गर्भधारणेनंतर, प्रसुतीपश्चात व दोन गर्भधारणांमधील काळजीचा अंतर्भाव होतो. 00:11:34.473 --> 00:11:37.694 अशाप्रकारे आपण मातांना पुढील सुदृढ बाळासाठी 00:11:37.694 --> 00:11:39.414 तसेच निरोगी जीवनासाठी तयार करू शकतो. NOTE Paragraph 00:11:39.414 --> 00:11:42.468 आणि हा शब्दश: जीवन आणि मृत्यु मधला फरक सांगू शकतो. 00:11:42.492 --> 00:11:44.455 जसं मारियाच्या बाबतीत झालं, 00:11:44.479 --> 00:11:47.572 जी तपासणी भेटीदरम्यान 00:11:47.572 --> 00:11:49.629 रक्तदाब वाढल्यावर रूग्णालयात दाखल झाली. 00:11:49.653 --> 00:11:52.467 ४० वर्षीय मारियाची ही दुसरी गर्भधारणा होती 00:11:53.044 --> 00:11:56.620 दोन वर्षांपूर्वीच्या मारियाच्या पहिल्या गर्भावस्थेत सुद्धा, 00:11:56.644 --> 00:12:00.031 शेवटचे काही आठवडे तिला बरे वाटत नव्हते 00:12:00.055 --> 00:12:02.426 आणि तिचा रक्तदाब काही वेळा वाढला. 00:12:02.450 --> 00:12:04.773 पण कोणीही लक्ष दिले नाही. 00:12:04.797 --> 00:12:07.264 ते म्हणाले, "मारिया, काळजी करू नको, तू ठीक आहेस. 00:12:07.288 --> 00:12:09.983 ही तुझी पहिली गर्भधारणा आहे. तू थोडी चिंताग्रस्त आहेस. 00:12:10.007 --> 00:12:12.443 पण मागील वेळी मारियासाठी याचा शेवट चांगला झाला नाही. 00:12:12.467 --> 00:12:14.383 प्रसुती दरम्यान तिला फेफरे आले. NOTE Paragraph 00:12:14.910 --> 00:12:17.344 यावेळी तिच्या गटाने खरंच तिचे ऐकले. 00:12:17.368 --> 00:12:19.785 त्यांनी चलाख व शोधक प्रश्न विचारले. 00:12:19.809 --> 00:12:23.713 डॉक्टरांनी तिचे प्रिएक्ल्म्पशियाच्या लक्षणांसंबंधी समुपदेशन केले. 00:12:23.737 --> 00:12:25.973 आणि स्पष्ट केले की तिला बरे वाटत नसेल तर 00:12:25.997 --> 00:12:27.721 तिला येऊन तपासून घ्यावे लागेल. 00:12:28.065 --> 00:12:30.055 आणि या वेळी मारिया आली, 00:12:30.079 --> 00:12:32.695 तिच्या डॉक्टरांनी तिला तातडीने रुग्णालयात पाठवले. 00:12:33.418 --> 00:12:37.355 रूग्णालयात तिच्या डॉक्टरांनी तातडीने रक्ताच्या तपासण्या करण्याचे आदेश दिले. 00:12:37.379 --> 00:12:39.816 तिच्या शरीराला नानाविध मॉनिटर जोडले. 00:12:39.840 --> 00:12:41.538 आणि तिच्या रक्तदाबाकडे 00:12:41.538 --> 00:12:44.030 तसेच गर्भाच्या ह्रदयाच्या ठोक्यांकडे विशेष लक्ष दिले. 00:12:44.030 --> 00:12:47.014 तिला फेफरे येऊ नये म्हणून शिरेतून औषधे दिली. 00:12:47.038 --> 00:12:51.020 आणि जेव्हा मारियाचा रक्तदाब खूप वाढून पक्षाघाताचा धोका निर्माण झाला, 00:12:51.044 --> 00:12:53.601 तिचे डॉक्टर व परिचारिका सतर्कतेने कामाला लागले. 00:12:53.625 --> 00:12:55.795 त्यांनी दर १५ मिनिटाला तिचा रक्तदाब मोजला. 00:12:55.819 --> 00:12:57.979 रक्तदाबजन्य आणीबाणी घोषित केली. 00:12:58.003 --> 00:13:02.198 त्यांनी नवीनतम अचूक कार्यप्रणालीनुसार तिला शिरेवाटे योग्य औषध दिले. 00:13:02.222 --> 00:13:05.180 त्यांनी समन्वित संघ म्हणून एकत्र येऊन सहजतेने काम केले. 00:13:05.204 --> 00:13:07.685 आणि यशस्वीरित्या तिचा रक्तदाब कमी केला. NOTE Paragraph 00:13:09.246 --> 00:13:12.976 परीणामी, शोकांतिका न ठरता ती यशोगाथा बनली. 00:13:13.000 --> 00:13:15.238 मारियाची घातक लक्षणे नियंत्रित केली गेली 00:13:15.262 --> 00:13:17.847 आणि तिने एका निरोगी मुलीला जन्म दिला. 00:13:18.489 --> 00:13:21.020 मारियाला रूग्णालयातून सोडण्याआधी 00:13:21.044 --> 00:13:24.105 तिच्या डॉक्टरांनी प्रिएक्ल्म्पशियाच्या लक्षणे, 00:13:24.105 --> 00:13:27.629 प्रसुतीपश्चात पहिल्या आठवड्यात रक्तदाब तपासण्याचे महत्त्व 00:13:27.653 --> 00:13:29.848 याविषयी तिचे पुन्हा एकदा समुपदेशन केले. 00:13:29.872 --> 00:13:34.189 त्यांनी तिला प्रसुतीपश्चात आरोग्य आणि काय अपेक्षित आहे याचे शिक्षण दिले. 00:13:34.213 --> 00:13:36.290 त्या आठवड्यांमध्ये व पुढील महिन्यात 00:13:36.314 --> 00:13:37.786 मारियाच्या बालरोगतज्ज्ञांसोबत 00:13:37.786 --> 00:13:41.119 बाळाच्या आरोग्यासंदर्भात भेटी झाल्या. 00:13:41.119 --> 00:13:42.689 पण या भेटी तितक्याच महत्त्वाच्या, 00:13:42.713 --> 00:13:45.385 जितक्या तिच्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडे 00:13:45.409 --> 00:13:47.830 तिचे आरोग्य, रक्तदाब, 00:13:47.854 --> 00:13:50.858 नवीन आई म्हणून शंकाकुशंका विचारण्यासाठी झालेल्या भेटी. NOTE Paragraph 00:13:50.882 --> 00:13:54.721 अशी दिसते अखंड सेवेच्या पलिकची उच्च दर्जाची सेवा. 00:13:54.745 --> 00:13:56.647 आणि अशाप्रकारे ती दिसू शकते. 00:13:56.671 --> 00:13:59.249 जर प्रत्येक समुदायातील प्रत्येक गर्भवतीला 00:13:59.273 --> 00:14:02.449 अशी उच्च दर्जाची सेवा मिळाली 00:14:02.473 --> 00:14:06.099 आणि दर्जेदार कार्यपद्धतीचा वापर केलेल्या सुविधा दिल्या गेल्या 00:14:06.123 --> 00:14:10.325 तर आपले मातामृत्यू व मातृत्वजन्य समस्यांचे दर वेगाने खाली येतील. 00:14:10.349 --> 00:14:13.913 त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील आपला क्रमांक लाजिरवाणा नसेल. NOTE Paragraph 00:14:13.937 --> 00:14:18.756 पण सत्य हे आहे की, अनेक दशकांपासून 00:14:18.780 --> 00:14:23.526 हे मातामृत्यू व प्रसूतीकाळातील समस्यांचे अस्विकारार्ह उच्च दर आहेत. 00:14:23.550 --> 00:14:28.668 अनेक दशकांपासून माता, बाळं व कुटूंबे विनाशकारी परीणाम भोगत आहेत. 00:14:28.692 --> 00:14:30.834 तरीही आपण कृती करण्यास सरसावलो नाही. NOTE Paragraph 00:14:31.336 --> 00:14:35.174 सध्याच्या माध्यमांचे आपल्या मातामृत्यूवरील वाईट कामगिरीकडे लक्ष असल्याने 00:14:35.198 --> 00:14:37.532 सामान्य माणसाला हे समजण्यास मदत झाली की 00:14:37.556 --> 00:14:40.557 उच्च दर्जाची मातृत्व आरोग्य सेवा आपल्या आवाक्यात आहे. 00:14:40.581 --> 00:14:41.786 प्रश्न असा आहे: 00:14:41.810 --> 00:14:47.018 आपण समाज म्हणून प्रत्येक समुदायातील गर्भवतीला महत्त्व देण्यास तयार आहोत का? NOTE Paragraph 00:14:47.042 --> 00:14:51.713 माझ्या वतीने,मला शक्य ते सर्व मी करत आहे, या खात्री ने की जेव्हा आपण तयार होऊ 00:14:51.737 --> 00:14:54.829 तेव्हा पुढे जाण्यासाठी आपल्याकडे 00:14:54.834 --> 00:14:56.856 ती उपकरणे व अनुभवसिद्ध पाया आधीच तयार असेल. NOTE Paragraph 00:14:57.001 --> 00:14:58.183 धन्यवाद NOTE Paragraph 00:14:58.207 --> 00:15:03.206 (टाळ्या)