1 00:00:00,000 --> 00:00:03,416 मी लिफ्ट मधून बाहेर पडले तेव्हा खूप गोंधळ सुरू होता. 2 00:00:03,773 --> 00:00:06,638 मी निवासी डॉक्टर म्हणून कामावर परतत होते. 3 00:00:06,662 --> 00:00:08,857 प्रसूती विभागाचे काम पाहण्यासाठी 4 00:00:08,881 --> 00:00:12,022 मला फक्त डॉक्टर व परिचारिकांचे झुंडच दिसत होते. 5 00:00:12,046 --> 00:00:14,484 प्रसूतीगृहातील महिला रूग्णाभोवती घुटमळताना, 6 00:00:14,508 --> 00:00:17,963 सगळे हताशपणे त्या महिलेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. 7 00:00:17,987 --> 00:00:19,749 ती महिला रूग्ण शाँकमध्ये होती. 8 00:00:19,770 --> 00:00:23,700 मी येण्याच्या काही तास आधी तिने एका निरोगी मुलाला जन्म दिला होता. 9 00:00:24,700 --> 00:00:27,795 अचानक तिची तब्येत ढासळली ,ती प्रतिसाद देत नव्हती. 10 00:00:27,819 --> 00:00:30,459 तिला प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. 11 00:00:30,483 --> 00:00:32,205 मी खोलीत जाईपर्यंत, 12 00:00:32,229 --> 00:00:36,529 तिथे अनेक डॉक्टर व परिचारिका आले होते व ती रूग्ण अचेतन झाली होती. 13 00:00:36,553 --> 00:00:39,835 पुनरूज्जीवन चमूने तिला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, 14 00:00:39,859 --> 00:00:41,611 पण प्रत्येकाने अथक प्रयत्न करूनही, 15 00:00:41,635 --> 00:00:43,084 ती दगावली. 16 00:00:43,108 --> 00:00:47,279 त्या दिवसाबद्दल मला लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे त्या वडिलांचा आर्त आक्रोश. 17 00:00:47,303 --> 00:00:50,953 तो माझ्याच नाही तर त्या मजल्यावरील प्रत्येकाच्या ह्रदयाला भेदून गेला. 18 00:00:50,977 --> 00:00:53,788 हा त्याच्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस असायला हवा होता, 19 00:00:53,812 --> 00:00:56,616 त्याऐवजी तो सर्वात वाईट दिवस ठरला. 20 00:00:58,278 --> 00:01:01,847 ही क्वचित घडणारी दुर्दैवी घटना असती तर.. 21 00:01:01,871 --> 00:01:04,108 पण तसे नाही. 22 00:01:04,132 --> 00:01:05,977 दरवर्षी युनायटेड स्टेट्स मध्ये, 23 00:01:06,001 --> 00:01:09,518 जवळ जवळ ७०० ते ९०० स्त्रियांचा मृत्यू होतो, 24 00:01:09,542 --> 00:01:11,471 गर्भावस्थेशी संबंधित कारणांमुळे. 25 00:01:11,882 --> 00:01:13,843 धक्कादायक बाब म्हणजे, 26 00:01:13,867 --> 00:01:17,217 इतर सर्व उच्च उत्पन्न असणाऱ्या देशांपेक्षा 27 00:01:17,241 --> 00:01:19,662 आपला माता मृत्यू दर अधिक आहे. 28 00:01:19,686 --> 00:01:22,404 कृष्णवर्णीय स्त्रियांच्या बाबतीत तर हे दर खूपच वाईट आहेत. 29 00:01:24,003 --> 00:01:28,183 प्रत्यक्षात आपला माता मृत्यू दर मागील दशकात वाढला. 30 00:01:28,207 --> 00:01:30,879 जेव्हा इतर देशात तो घटला. 31 00:01:31,380 --> 00:01:33,499 आणि सर्वात मोठा विरोधाभास काय? 32 00:01:33,523 --> 00:01:37,698 जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा आपण आरोग्य सेवेवर अधिक खर्च करतो. 33 00:01:38,582 --> 00:01:42,674 या बाळंतीणीने जीव गमावला त्या दरम्यान निवासी सेवेत असताना, 34 00:01:42,698 --> 00:01:44,696 मी स्वतः आई झाले. 35 00:01:44,720 --> 00:01:48,090 या क्षेत्रातील माझी पार्श्वभूमी व प्रशिक्षण असूनही, 36 00:01:48,114 --> 00:01:51,653 मातेला उच्च प्रतीची आरोग्य सेवा देण्याकडे 37 00:01:51,677 --> 00:01:54,625 फारसे लक्ष दिले जात नाही हे पाहून मी हताश झाले. 38 00:01:54,649 --> 00:01:57,357 .मी याचा खोलात जाऊन विचार केला, फक्त माझ्यासाठी नाही, 39 00:01:57,381 --> 00:01:59,362 तर इतर अनेक स्त्रियांसाठी. 40 00:01:59,781 --> 00:02:03,185 कदाचित माझे वडील नागरी हक्क मुखत्यार होते त्यामुळे 41 00:02:03,209 --> 00:02:05,464 माझ्या पालकांना सामाजिक जाणिव होती 42 00:02:05,488 --> 00:02:08,394 योग्य गोष्टींचा आम्ही पाठपुरावा करावा अशी त्यांची इच्छा होती. 43 00:02:08,394 --> 00:02:10,776 किंवा माझे पालक जमैका मध्ये जन्माला आले, 44 00:02:10,776 --> 00:02:12,423 नंतर ते युनायटेड स्टेट्स मध्ये आले 45 00:02:12,423 --> 00:02:15,233 आणि ते अमेरिकन ड्रीम समजून घेण्यासाठी सक्षम होते. 46 00:02:15,257 --> 00:02:17,407 किंवा माझ्या निवासी प्रशिक्षणामुळे असेल. 47 00:02:17,431 --> 00:02:19,098 जिथे मी प्रत्यक्ष पाहिलं, 48 00:02:19,098 --> 00:02:22,626 अल्प-उत्पन्न असणाऱ्या कृष्णवर्णीय महिलांवर आपल्या आरोग्य सेवा प्रणालीद्वारे 49 00:02:22,626 --> 00:02:24,593 किती असमाधानकारकपणे उपचार केले जातात. 50 00:02:24,617 --> 00:02:28,377 कारण कोणतेही असो, यासाठी उभे राहणे ही मला माझी जबाबदारी वाटली. 51 00:02:28,401 --> 00:02:29,855 फक्त माझ्यासाठी नाही, 52 00:02:29,879 --> 00:02:31,153 तर सर्व स्त्रियांसाठी, 53 00:02:31,177 --> 00:02:34,734 विशेषतः आपल्या आरोग्य सेवेद्वारे उपेक्षित महिलांसाठी. 54 00:02:34,758 --> 00:02:39,259 मी माझ्या कारकिर्दीत माता आरोग्य सेवेतील सुधारणेवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले 55 00:02:40,726 --> 00:02:42,632 तर कशामुळे या माता दगावत आहेत? 56 00:02:42,656 --> 00:02:45,031 ह्रदय विकार, रक्तस्राव, 57 00:02:45,055 --> 00:02:48,045 फेफरे व पक्षाघात यांना कारणीभूत ठरणारा उच्च रक्तदाब, 58 00:02:48,069 --> 00:02:49,608 रक्ताच्या गुठळ्या आणि जंतुसंसर्ग 59 00:02:49,608 --> 00:02:53,291 ही या देशातील मातामृत्युची काही ठळक कारणे आहेत. 60 00:02:53,796 --> 00:02:57,333 पण मातेचा मृत्यू हे फक्त हिमनगाचे टोक आहे. 61 00:02:57,357 --> 00:03:01,643 प्रत्येक मृत्यूमागे, शेकडो स्त्रिया 62 00:03:01,643 --> 00:03:04,319 गर्भावस्था व प्रसुती संबंधित गंभीर समस्यांशी झगडत असतात. 63 00:03:04,343 --> 00:03:09,058 परीणामी, दरवर्षी जवळपास ६०,००० स्त्रियांवर यापैकी एखादा प्रसंग ओढवतो. 64 00:03:09,506 --> 00:03:12,476 या गुंतागुंतीच्या समस्या म्हणजे गंभीर मातृत्वजन्य स्थिती, 65 00:03:12,500 --> 00:03:16,338 युनायटेड स्टेट्स मध्ये वाढत आहेत आणि त्या जीवन बदलून टाकत आहेत. 66 00:03:16,362 --> 00:03:20,039 असा अंदाज आहे की या देशात 67 00:03:20,063 --> 00:03:23,785 दरवर्षी होणाऱ्या ४ दशलक्ष प्रसुतींपैकी 68 00:03:23,809 --> 00:03:26,519 १.५ ते २ टक्के प्रसुतींमध्ये वरीलपैकी एक प्रसंग उद्भवतो. 69 00:03:26,539 --> 00:03:32,093 म्हणजे दर तासाला ५वा६ महिलांना रक्ताच्या गुठळ्या, फेफरे, पक्षाघात होतो, 70 00:03:32,117 --> 00:03:33,936 रक्त द्यावे लागते, 71 00:03:33,960 --> 00:03:36,855 महत्वाच्या अवयवाना ईजा पोहचते, जसे मूत्रपिंड निकामी होणे, 72 00:03:36,879 --> 00:03:38,998 किंवा इतर दुर्दैवी घटना. 73 00:03:40,758 --> 00:03:43,967 आता, या कथेचा अक्षम्य भाग म्हणजे 74 00:03:43,991 --> 00:03:47,998 ही वस्तुस्थिती की या मृत्यू व गंभीर समस्यांपैकी 75 00:03:47,998 --> 00:03:50,285 ६० टक्के समस्या टाळता येण्याजोग्या समजल्या जातात. 76 00:03:50,309 --> 00:03:52,885 जेव्हा मी म्हणते ६० टक्के घटना टाळता येण्याजोग्या आहेत, 77 00:03:52,885 --> 00:03:56,067 याचा अर्थ,त्यासाठी ठोस पावले व आदर्श कार्यपद्धती आहे. 78 00:03:56,091 --> 00:03:57,559 तिची आपण अंमलबजावणी करू शकतो. 79 00:03:57,583 --> 00:04:00,134 त्यामुळे हे वाईट परीणाम टाळता येतील. 80 00:04:00,158 --> 00:04:01,733 आणि महिलांचा जीव वाचेल. 81 00:04:02,361 --> 00:04:05,038 आणि यासाठी भपकेबाज नवीन तंत्रज्ञान गरजेचे नाही. 82 00:04:05,062 --> 00:04:07,170 आपण फक्त आपल्या ज्ञानाचा वापर केला पाहिजे 83 00:04:07,194 --> 00:04:10,174 आणि इस्पितळांचा दर्जा समान राखला पाहिजे. 84 00:04:11,260 --> 00:04:15,442 उदाहरणार्थ, प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतीला उच्च रक्तदाब असेल, 85 00:04:15,466 --> 00:04:18,422 आणि योग्य वेळी आपण रक्तदाब कमी करण्यासाठी 86 00:04:18,446 --> 00:04:20,028 योग्य औषधोपचार केला, 87 00:04:20,052 --> 00:04:21,543 तर आपण पक्षाघात टाळू शकतो. 88 00:04:22,300 --> 00:04:25,519 आपण प्रसूतीकाळात होणाऱ्या रक्तस्त्रावावर अचूक लक्ष ठेवले 89 00:04:25,543 --> 00:04:29,144 तर आपण अतिरक्तस्त्रावाचे लवकर निदान करून त्या महिलेचा जीव वाचवू शकतो. 90 00:04:29,700 --> 00:04:34,225 आपण खरोखर भविष्यातील अशा आपत्तीजनक घटनांचा दर कमी करू शकतो, 91 00:04:34,249 --> 00:04:37,024 पण त्यासाठी आपण सेवेच्या गुणवत्तेचे महत्त्व जाणले पाहिजे. 92 00:04:37,048 --> 00:04:38,897 जी आपण गर्भवती स्त्रियांना 93 00:04:38,921 --> 00:04:42,028 गर्भावस्थेपूर्वी तसेच गर्भावस्थेत व प्रसूतीनंतर देतो. 94 00:04:42,052 --> 00:04:46,873 आपण सर्वत्र सेवेची गुणवत्ता तिच्या मानकानुसार उंचावली तर 95 00:04:46,897 --> 00:04:50,703 आपण या मृत्यू व गंभीर समस्यांचे दर बरेच खाली आणू शकतो. 96 00:04:51,695 --> 00:04:53,605 असो, एक आनंदाची बातमी आहे. 97 00:04:54,403 --> 00:04:56,266 काही यशोगाथा आहेत. 98 00:04:56,972 --> 00:05:00,080 काही ठिकाणी हा दर्जा राखला गेला आहे 99 00:05:00,104 --> 00:05:01,859 आणि त्यामुळे बराच बदल जाणवत आहे. 100 00:05:01,883 --> 00:05:06,214 काही वर्षांपूर्वी, अमेरीकन काँलेज आँफ आँबस्ट्रेटीशिअनस् अँण्ड गायनेकोलाँजीस्टस् 101 00:05:06,238 --> 00:05:09,002 इतर आरोग्य संस्था,माझ्यासारखे संशोधक 102 00:05:09,026 --> 00:05:12,339 आणि सामाजिक संस्थांशी जोडले गेले. 103 00:05:12,363 --> 00:05:15,302 त्यांना दर्जेदार आरोग्य सेवा अंमलात आणायची होती. 104 00:05:15,326 --> 00:05:18,702 देशभरातील इस्पितळे व आरोग्य संस्थांमध्ये. 105 00:05:18,726 --> 00:05:21,055 यासाठी त्यांनी वापरलेले माध्यम म्हणजे 106 00:05:21,079 --> 00:05:25,320 द अलायन्स फाँर इनोव्हेशनस् इन मँटर्नलहेल्थ एम योजना. 107 00:05:25,344 --> 00:05:30,105 संपूर्ण देशात गुणवत्ता व सुरक्षिततेबाबतीत पावले उचलून 108 00:05:30,129 --> 00:05:33,330 मातामृत्यू व गंभीर समस्यांचा दर कमी करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. 109 00:05:33,789 --> 00:05:36,925 या गटाने,मातामृत्यूच्या सहज टाळता येण्याजोग्या कारणांना लक्ष्य करून 110 00:05:36,949 --> 00:05:40,501 अनेक सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या आहेत. 111 00:05:41,148 --> 00:05:44,180 सध्या या एम प्रोग्राम मध्ये यू एस मधील 112 00:05:44,204 --> 00:05:46,517 ५० % प्रसुतींपर्यंत पोहचण्याची क्षमता आहे. 113 00:05:47,443 --> 00:05:49,436 तर या सुरक्षिततेच्या उपाययोजना काय आहेत? 114 00:05:49,460 --> 00:05:52,213 अनुभवावर आधारित कार्यपद्धती, कार्यप्रणाली, कृती 115 00:05:52,237 --> 00:05:53,771 औषधोपचार, साधनसामुग्री 116 00:05:53,795 --> 00:05:55,969 आणि या परिस्थितीत लागणाऱ्या इतर गोष्टी. 117 00:05:56,537 --> 00:05:59,136 आपण अतिरक्तस्त्रावातील उपाययोजनांचे उदाहरण घेऊ. 118 00:05:59,660 --> 00:06:01,580 अतिरक्तस्त्रावामध्ये एक लहान गाडी हवी, 119 00:06:01,604 --> 00:06:05,181 ज्यावर निकडीच्या प्रसंगी डॉक्टर-परिचारिका यांना आवश्यक अशी सर्व सामग्री असेल 120 00:06:05,181 --> 00:06:08,748 आय व्ही लाईन, ऑक्सीजन मास्क, औषधे, 121 00:06:08,772 --> 00:06:10,971 पडताळणी सूची, इतर उपकरणे. 122 00:06:10,995 --> 00:06:13,155 नंतर रक्तस्राव मोजण्यासाठी काहीतरी हवे. 123 00:06:13,179 --> 00:06:14,721 स्पंज, कापडाच्या घड्या. 124 00:06:14,745 --> 00:06:16,578 आणि फक्त पाहण्याऐवजी, 125 00:06:16,602 --> 00:06:19,585 डॉक्टर व परिचारिका ते स्पंज व घड्या एकत्र करून 126 00:06:19,609 --> 00:06:21,197 त्यांचे वजन करतात किंवा 127 00:06:21,221 --> 00:06:25,556 रक्तस्राव अचूकपणे मोजण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरतात. 128 00:06:28,060 --> 00:06:32,530 अतिरक्तस्त्राव उपाय योजनेत रक्तदानासाठी आणीबाणीच्या कार्यप्रणालीचा अंतर्भाव असतो. 129 00:06:32,554 --> 00:06:34,749 शिवाय नियमित प्रशिक्षण व पुनरुक्ती शिक्षणाचाही 130 00:06:34,914 --> 00:06:38,657 आता या उपाययोजनांच्या उपयोगात कॅलिफोर्निया अग्रेसर आहे. 131 00:06:38,681 --> 00:06:42,027 यामुळेच कॅलिफोर्नियामध्ये पहिल्या वर्षात 132 00:06:42,027 --> 00:06:44,515 या उपाययोजनांचा अवलंब केलेल्या रूग्णालयांमध्ये 133 00:06:44,515 --> 00:06:47,570 जीवघेण्या अतिरक्तस्त्रावामध्ये २१टक्के घट झाली. 134 00:06:48,276 --> 00:06:52,683 पण अजूनही देशभरात या उपाययोजनांचा तुरळक किंवा अभावात्मक वापर होतो. 135 00:06:52,707 --> 00:06:55,612 जशी ही वस्तुस्थिती आहे की 136 00:06:55,636 --> 00:06:57,642 अनुभवसिद्ध कार्यपद्धती व सुरक्षेचे महत्त्व 137 00:06:57,642 --> 00:07:00,166 रूग्णालयागणिक बदलते, 138 00:07:00,190 --> 00:07:01,900 तशीच सेवेची गुणवत्ता बदलते. 139 00:07:02,359 --> 00:07:06,501 अमेरिकेत कृष्णवर्णीय स्त्रियांना मिळणार्या सेवेच्या गुणवत्तेत खूप फरक पडतो. 140 00:07:06,501 --> 00:07:09,228 या देशात प्रसूत होणार्या श्वेतवर्णीय स्त्रियांच्या तुलनेत 141 00:07:09,252 --> 00:07:13,578 कृष्णवर्णीय स्त्रियांमध्ये गर्भावस्थेशी संबंधित मृत्यूचे प्रमाण 142 00:07:13,602 --> 00:07:14,978 तीन ते चार पट अधिक आहे. 143 00:07:15,649 --> 00:07:19,657 ही सांख्यिकी या देशात प्रसूत होणार्या सर्व कृष्णवर्णीय स्त्रियांसाठी सत्य आहे. 144 00:07:19,657 --> 00:07:21,996 मग त्यांचा जन्म अमेरिकेत झालेला असो 145 00:07:21,996 --> 00:07:23,236 वा इतर देशात. 146 00:07:23,823 --> 00:07:27,512 अनेकजण विचार करतात की ही विषमता उत्पन्नातील फरकामुळे आहे. 147 00:07:27,536 --> 00:07:29,424 पण ती वर्गापलिकडची विषमता आहे. 148 00:07:29,833 --> 00:07:32,469 एका महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या 149 00:07:32,493 --> 00:07:35,474 कृष्णवर्णीय स्त्रीच्या मृत्यूची शक्यता 150 00:07:35,474 --> 00:07:38,826 माध्यमिक शिक्षणही न घेतलेल्या श्वेतवर्णीय स्त्रीच्या तुलनेत दुप्पट आहे. 151 00:07:38,826 --> 00:07:44,354 आणि तिला प्रसुती दरम्यान गंभीर समस्या निर्माण होण्याची 152 00:07:44,378 --> 00:07:45,809 दोन ते तीन पट अधिक शक्यता आहे. 153 00:07:46,407 --> 00:07:50,628 मला नेहमीच असा विचार करायला शिकवले गेले की शिक्षण आमचे पापविमोचन आहे. 154 00:07:50,652 --> 00:07:53,237 पण या बाबतीत,ते साफ खोटे आहे. 155 00:07:54,271 --> 00:07:56,381 सीडीसी नुसार, 156 00:07:56,405 --> 00:07:58,137 सार्वजनिक प्रसुती आरोग्यासाठी 157 00:07:58,161 --> 00:08:00,593 उपाययोजना करताना 158 00:08:00,617 --> 00:08:02,663 काळे-गोरे हा भेदाभेद सर्वात मोठी विषमता आहे. 159 00:08:02,990 --> 00:08:05,210 आपल्या काही शहरात 160 00:08:05,234 --> 00:08:06,752 हे भेदाभेद ठळकपणे जाणवतात. 161 00:08:06,776 --> 00:08:08,930 उदाहरणार्थ, न्यूयॉर्क शहर. 162 00:08:08,954 --> 00:08:12,357 कृष्णवर्णीय स्त्रीला गर्भधारणेसंबंधित कारणाने मृत्यू होण्याचा धोका 163 00:08:12,381 --> 00:08:15,806 श्वेतवर्णीय स्त्रीपेक्षा आठ ते बारा पट जास्त आहे. 164 00:08:16,822 --> 00:08:19,239 मला वाटते आपल्यापैकी अनेकांना कदाचित 165 00:08:19,263 --> 00:08:21,860 डॉ.शॅलोन आयर्विंगची ह्रदय द्रावक कथा माहित असेल. 166 00:08:21,884 --> 00:08:25,869 सीडीसीच्या साथरोग विशेषज्ञ ज्यांचा प्रसुतीपश्चात मृत्यू झाला. 167 00:08:25,893 --> 00:08:29,477 काही महिन्यांपूर्वी त्यांची कथा 168 00:08:29,501 --> 00:08:31,410 प्रोपब्लिका व एनपीआर मध्ये नोंदवली गेली. 169 00:08:31,434 --> 00:08:33,106 अलिकडेच मी एका परिषदेत होते 170 00:08:33,130 --> 00:08:35,773 आणि त्यांच्या आईचे बोलणे ऐकण्याची मला संधी मिळाली. 171 00:08:35,797 --> 00:08:38,517 त्यांच्या भाषणाने श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. 172 00:08:38,909 --> 00:08:41,165 शॅलोन एक हुशार साथरोग विशेषज्ञ होती. 173 00:08:41,189 --> 00:08:44,450 आरोग्य सेवेतील वांशिक भेदभावाच्या अभ्यासाशी वचनबद्ध. 174 00:08:44,474 --> 00:08:47,624 ती ३६ वर्षीय होती, तिचे हे पहिलेच बाळ होते. 175 00:08:47,648 --> 00:08:49,485 आणि ती अफ्रीकी- अमेरिकन होती. 176 00:08:50,070 --> 00:08:53,097 शॅलोनची गर्भधारणा गुंतागुंतीची होती. 177 00:08:53,121 --> 00:08:57,100 पण तिने सुदृढ मुलीला जन्म दिला व तिला रूग्णालयातून सोडण्यात आले. 178 00:08:57,710 --> 00:09:02,091 तीन आठवड्यांनंतर उच्च रक्तदाबामुळे गुंतागुंतीची समस्येमुळे मृत्यू झाला. 179 00:09:02,864 --> 00:09:07,144 या तीन आठवड्यात शॅलोनला आरोग्य सेवा तज्ञांनी 180 00:09:07,168 --> 00:09:08,716 चार ते पाचवेळा तपासले. 181 00:09:08,740 --> 00:09:10,389 तिचे कोणीही ऐकले नाही, 182 00:09:10,413 --> 00:09:13,671 आणि तिच्या परिस्थितीचे गांभीर्य कोणाला जाणवले नाही. 183 00:09:15,169 --> 00:09:18,169 शॅलोन ची गोष्ट ही युनायटेड स्टेट्स मधील, 184 00:09:18,193 --> 00:09:21,607 आरोग्य सेवेतल्या वांशिक भेदभावाच्या अनेक गोष्टींपैकी फक्त एक 185 00:09:21,631 --> 00:09:23,321 गोष्ट आहे. 186 00:09:23,345 --> 00:09:27,713 अशी वाढती मान्यता आहे की 187 00:09:27,737 --> 00:09:32,040 वंशवाद, दारिद्रय,शिक्षण,विभक्त कुटुंब हे आरोग्याशी संबंधित सामाजिक निर्धारक 188 00:09:32,064 --> 00:09:33,963 विषमतेत भर घालतात. 189 00:09:34,419 --> 00:09:38,504 पण शॅलोनची गोष्ट आणखी एका मूलभूत कारणावर प्रकाश टाकते: 190 00:09:38,528 --> 00:09:40,003 सेवेची गुणवत्ता. 191 00:09:40,027 --> 00:09:43,043 प्रसुतीपश्चात सेवेतील दर्ज्याचा अभाव. 192 00:09:43,067 --> 00:09:46,355 त्या तीन आठवड्यात चिकित्सकांकडून अनेकदा शॅलोनची तपासणी केली गेली. 193 00:09:46,379 --> 00:09:48,276 आणि तरीही तिचा मृत्यू झाला. 194 00:09:48,300 --> 00:09:51,001 युनायटेड स्टेट्स मधील, 195 00:09:51,025 --> 00:09:54,268 मातामृत्यू व मातृत्वजन्य जटील समस्येतील वांशिक व सांस्कृतीक विषमतेचे 196 00:09:54,292 --> 00:09:57,110 प्रसुतीसाठीच्या सुसज्जेची ची गुणवत्ता 197 00:09:57,134 --> 00:09:58,306 हे मूलभूत कारण आहे. 198 00:09:58,330 --> 00:10:00,608 याची आपण आत्ता दखल घेऊ शकतो. 199 00:10:02,073 --> 00:10:04,220 आमच्या गटाच्या व इतरांच्या संशोधनानुसार, 200 00:10:04,244 --> 00:10:06,778 विविध कारणांमुळे, 201 00:10:06,802 --> 00:10:10,274 कृष्णवर्णीय स्त्रियांचा प्रसुतीसाठी ठराविक रूग्णालयात जाण्याकडे कल असतो. 202 00:10:10,298 --> 00:10:14,454 कृष्ण व श्वेतवर्णीय दोन्ही स्त्रियांमध्ये या रूग्णालयांचा निकाल अत्यंत वाईट असतो. 203 00:10:14,478 --> 00:10:16,932 मग रूग्णाची स्थिती धोकादायक असो वा नसो. 204 00:10:17,379 --> 00:10:19,935 हे पूर्ण युनायटेड स्टेट्स मधील वास्तव आहे 205 00:10:19,959 --> 00:10:22,204 जिथे तीन चतुर्थांश कृष्णवर्णीय स्त्रिया 206 00:10:22,228 --> 00:10:24,518 ठराविक रूग्णालयात प्रसूत होतात, 207 00:10:24,542 --> 00:10:28,320 त्याच रूग्णालयात एक पंचमांशापेक्षाही कमी श्वेतवर्णीय स्त्रिया प्रसूत होतात. 208 00:10:28,850 --> 00:10:31,952 न्यूयॉर्क शहरात, 209 00:10:31,952 --> 00:10:34,091 प्रसुतीकाळात होणाऱ्या जीवघेण्या समस्यांचा धोका 210 00:10:34,115 --> 00:10:37,825 रूग्णालयागणिक सहा पटींनी वाढतो. 211 00:10:37,849 --> 00:10:41,919 साहजिकच कृष्णवर्णीय स्त्रियांची या अत्यंत वाईट निकाल असणाऱ्या रूग्णालयात 212 00:10:41,943 --> 00:10:43,547 प्रसुती होण्याची दाट शक्यता असते. 213 00:10:43,571 --> 00:10:45,644 खरं तर, रूग्णालयातील हे फरक 214 00:10:45,668 --> 00:10:48,071 जवळपास अर्धी कृष्ण-श्वेत विषमता स्पष्ट करतात. 215 00:10:49,597 --> 00:10:52,405 जर या देशात आपल्याला खरंच न्याय्य आरोग्य सेवेकडे जायचे असेल, 216 00:10:52,429 --> 00:10:56,342 तर या सामाजिक निर्धारकांची दखल घेतलीच पाहिजे. 217 00:10:56,366 --> 00:11:00,105 यापैकी बरेच खोल रूजलेले आहेत आणि त्यांना दूर करण्यास वेळ लागेल. 218 00:11:00,129 --> 00:11:03,002 मधल्या काळात,आपल्याला सेवेची गुणवत्ता हाताळता येईल. 219 00:11:03,373 --> 00:11:07,384 अखंड सेवेच्या पलिकडे उच्च दर्जाची सेवा पुरवणे 220 00:11:07,408 --> 00:11:10,929 म्हणजे स्त्रियांच्या संपूर्ण पुनरूत्पादन काळात 221 00:11:10,953 --> 00:11:13,391 सुरक्षित व विश्वसनीय गर्भनिरोधके उपलब्ध करणे. 222 00:11:13,801 --> 00:11:18,529 गर्भधारणे आधी, गर्भधारणा पूर्व काळजी घेणे, 223 00:11:18,553 --> 00:11:21,709 जेणेकरून जुनाट आजार नियंत्रित ठेवून आरोग्य सांभाळता येईल. 224 00:11:22,081 --> 00:11:26,239 यात गर्भावस्थेत उच्च दर्जाच्या प्रसूतीपूर्व व प्रसुतीसेवेचा समावेश होतो. 225 00:11:26,263 --> 00:11:29,099 म्हणजे आपण सुदृढ आई व बाळ निर्माण करू शकतो. 226 00:11:29,123 --> 00:11:34,449 आणि शेवटी, गर्भधारणेनंतर, प्रसुतीपश्चात व दोन गर्भधारणांमधील काळजीचा अंतर्भाव होतो. 227 00:11:34,473 --> 00:11:37,694 अशाप्रकारे आपण मातांना पुढील सुदृढ बाळासाठी 228 00:11:37,694 --> 00:11:39,414 तसेच निरोगी जीवनासाठी तयार करू शकतो. 229 00:11:39,414 --> 00:11:42,468 आणि हा शब्दश: जीवन आणि मृत्यु मधला फरक सांगू शकतो. 230 00:11:42,492 --> 00:11:44,455 जसं मारियाच्या बाबतीत झालं, 231 00:11:44,479 --> 00:11:47,572 जी तपासणी भेटीदरम्यान 232 00:11:47,572 --> 00:11:49,629 रक्तदाब वाढल्यावर रूग्णालयात दाखल झाली. 233 00:11:49,653 --> 00:11:52,467 ४० वर्षीय मारियाची ही दुसरी गर्भधारणा होती 234 00:11:53,044 --> 00:11:56,620 दोन वर्षांपूर्वीच्या मारियाच्या पहिल्या गर्भावस्थेत सुद्धा, 235 00:11:56,644 --> 00:12:00,031 शेवटचे काही आठवडे तिला बरे वाटत नव्हते 236 00:12:00,055 --> 00:12:02,426 आणि तिचा रक्तदाब काही वेळा वाढला. 237 00:12:02,450 --> 00:12:04,773 पण कोणीही लक्ष दिले नाही. 238 00:12:04,797 --> 00:12:07,264 ते म्हणाले, "मारिया, काळजी करू नको, तू ठीक आहेस. 239 00:12:07,288 --> 00:12:09,983 ही तुझी पहिली गर्भधारणा आहे. तू थोडी चिंताग्रस्त आहेस. 240 00:12:10,007 --> 00:12:12,443 पण मागील वेळी मारियासाठी याचा शेवट चांगला झाला नाही. 241 00:12:12,467 --> 00:12:14,383 प्रसुती दरम्यान तिला फेफरे आले. 242 00:12:14,910 --> 00:12:17,344 यावेळी तिच्या गटाने खरंच तिचे ऐकले. 243 00:12:17,368 --> 00:12:19,785 त्यांनी चलाख व शोधक प्रश्न विचारले. 244 00:12:19,809 --> 00:12:23,713 डॉक्टरांनी तिचे प्रिएक्ल्म्पशियाच्या लक्षणांसंबंधी समुपदेशन केले. 245 00:12:23,737 --> 00:12:25,973 आणि स्पष्ट केले की तिला बरे वाटत नसेल तर 246 00:12:25,997 --> 00:12:27,721 तिला येऊन तपासून घ्यावे लागेल. 247 00:12:28,065 --> 00:12:30,055 आणि या वेळी मारिया आली, 248 00:12:30,079 --> 00:12:32,695 तिच्या डॉक्टरांनी तिला तातडीने रुग्णालयात पाठवले. 249 00:12:33,418 --> 00:12:37,355 रूग्णालयात तिच्या डॉक्टरांनी तातडीने रक्ताच्या तपासण्या करण्याचे आदेश दिले. 250 00:12:37,379 --> 00:12:39,816 तिच्या शरीराला नानाविध मॉनिटर जोडले. 251 00:12:39,840 --> 00:12:41,538 आणि तिच्या रक्तदाबाकडे 252 00:12:41,538 --> 00:12:44,030 तसेच गर्भाच्या ह्रदयाच्या ठोक्यांकडे विशेष लक्ष दिले. 253 00:12:44,030 --> 00:12:47,014 तिला फेफरे येऊ नये म्हणून शिरेतून औषधे दिली. 254 00:12:47,038 --> 00:12:51,020 आणि जेव्हा मारियाचा रक्तदाब खूप वाढून पक्षाघाताचा धोका निर्माण झाला, 255 00:12:51,044 --> 00:12:53,601 तिचे डॉक्टर व परिचारिका सतर्कतेने कामाला लागले. 256 00:12:53,625 --> 00:12:55,795 त्यांनी दर १५ मिनिटाला तिचा रक्तदाब मोजला. 257 00:12:55,819 --> 00:12:57,979 रक्तदाबजन्य आणीबाणी घोषित केली. 258 00:12:58,003 --> 00:13:02,198 त्यांनी नवीनतम अचूक कार्यप्रणालीनुसार तिला शिरेवाटे योग्य औषध दिले. 259 00:13:02,222 --> 00:13:05,180 त्यांनी समन्वित संघ म्हणून एकत्र येऊन सहजतेने काम केले. 260 00:13:05,204 --> 00:13:07,685 आणि यशस्वीरित्या तिचा रक्तदाब कमी केला. 261 00:13:09,246 --> 00:13:12,976 परीणामी, शोकांतिका न ठरता ती यशोगाथा बनली. 262 00:13:13,000 --> 00:13:15,238 मारियाची घातक लक्षणे नियंत्रित केली गेली 263 00:13:15,262 --> 00:13:17,847 आणि तिने एका निरोगी मुलीला जन्म दिला. 264 00:13:18,489 --> 00:13:21,020 मारियाला रूग्णालयातून सोडण्याआधी 265 00:13:21,044 --> 00:13:24,105 तिच्या डॉक्टरांनी प्रिएक्ल्म्पशियाच्या लक्षणे, 266 00:13:24,105 --> 00:13:27,629 प्रसुतीपश्चात पहिल्या आठवड्यात रक्तदाब तपासण्याचे महत्त्व 267 00:13:27,653 --> 00:13:29,848 याविषयी तिचे पुन्हा एकदा समुपदेशन केले. 268 00:13:29,872 --> 00:13:34,189 त्यांनी तिला प्रसुतीपश्चात आरोग्य आणि काय अपेक्षित आहे याचे शिक्षण दिले. 269 00:13:34,213 --> 00:13:36,290 त्या आठवड्यांमध्ये व पुढील महिन्यात 270 00:13:36,314 --> 00:13:37,786 मारियाच्या बालरोगतज्ज्ञांसोबत 271 00:13:37,786 --> 00:13:41,119 बाळाच्या आरोग्यासंदर्भात भेटी झाल्या. 272 00:13:41,119 --> 00:13:42,689 पण या भेटी तितक्याच महत्त्वाच्या, 273 00:13:42,713 --> 00:13:45,385 जितक्या तिच्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडे 274 00:13:45,409 --> 00:13:47,830 तिचे आरोग्य, रक्तदाब, 275 00:13:47,854 --> 00:13:50,858 नवीन आई म्हणून शंकाकुशंका विचारण्यासाठी झालेल्या भेटी. 276 00:13:50,882 --> 00:13:54,721 अशी दिसते अखंड सेवेच्या पलिकची उच्च दर्जाची सेवा. 277 00:13:54,745 --> 00:13:56,647 आणि अशाप्रकारे ती दिसू शकते. 278 00:13:56,671 --> 00:13:59,249 जर प्रत्येक समुदायातील प्रत्येक गर्भवतीला 279 00:13:59,273 --> 00:14:02,449 अशी उच्च दर्जाची सेवा मिळाली 280 00:14:02,473 --> 00:14:06,099 आणि दर्जेदार कार्यपद्धतीचा वापर केलेल्या सुविधा दिल्या गेल्या 281 00:14:06,123 --> 00:14:10,325 तर आपले मातामृत्यू व मातृत्वजन्य समस्यांचे दर वेगाने खाली येतील. 282 00:14:10,349 --> 00:14:13,913 त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील आपला क्रमांक लाजिरवाणा नसेल. 283 00:14:13,937 --> 00:14:18,756 पण सत्य हे आहे की, अनेक दशकांपासून 284 00:14:18,780 --> 00:14:23,526 हे मातामृत्यू व प्रसूतीकाळातील समस्यांचे अस्विकारार्ह उच्च दर आहेत. 285 00:14:23,550 --> 00:14:28,668 अनेक दशकांपासून माता, बाळं व कुटूंबे विनाशकारी परीणाम भोगत आहेत. 286 00:14:28,692 --> 00:14:30,834 तरीही आपण कृती करण्यास सरसावलो नाही. 287 00:14:31,336 --> 00:14:35,174 सध्याच्या माध्यमांचे आपल्या मातामृत्यूवरील वाईट कामगिरीकडे लक्ष असल्याने 288 00:14:35,198 --> 00:14:37,532 सामान्य माणसाला हे समजण्यास मदत झाली की 289 00:14:37,556 --> 00:14:40,557 उच्च दर्जाची मातृत्व आरोग्य सेवा आपल्या आवाक्यात आहे. 290 00:14:40,581 --> 00:14:41,786 प्रश्न असा आहे: 291 00:14:41,810 --> 00:14:47,018 आपण समाज म्हणून प्रत्येक समुदायातील गर्भवतीला महत्त्व देण्यास तयार आहोत का? 292 00:14:47,042 --> 00:14:51,713 माझ्या वतीने,मला शक्य ते सर्व मी करत आहे, या खात्री ने की जेव्हा आपण तयार होऊ 293 00:14:51,737 --> 00:14:54,829 तेव्हा पुढे जाण्यासाठी आपल्याकडे 294 00:14:54,834 --> 00:14:56,856 ती उपकरणे व अनुभवसिद्ध पाया आधीच तयार असेल. 295 00:14:57,001 --> 00:14:58,183 धन्यवाद 296 00:14:58,207 --> 00:15:03,206 (टाळ्या)