0:00:00.000,0:00:03.416 मी लिफ्ट मधून बाहेर पडले [br]तेव्हा खूप गोंधळ सुरू होता. 0:00:03.773,0:00:06.638 मी निवासी डॉक्टर म्हणून कामावर परतत होते. 0:00:06.662,0:00:08.857 प्रसूती विभागाचे काम पाहण्यासाठी 0:00:08.881,0:00:12.022 मला फक्त डॉक्टर व परिचारिकांचे [br]झुंडच दिसत होते. 0:00:12.046,0:00:14.484 प्रसूतीगृहातील महिला रूग्णाभोवती[br]घुटमळताना, 0:00:14.508,0:00:17.963 सगळे हताशपणे त्या महिलेचा[br]जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. 0:00:17.987,0:00:19.749 ती महिला रूग्ण शाँकमध्ये होती. 0:00:19.770,0:00:23.700 मी येण्याच्या काही तास आधी[br]तिने एका निरोगी मुलाला जन्म दिला होता. 0:00:24.700,0:00:27.795 अचानक तिची तब्येत ढासळली[br],ती प्रतिसाद देत नव्हती. 0:00:27.819,0:00:30.459 तिला प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. 0:00:30.483,0:00:32.205 मी खोलीत जाईपर्यंत, 0:00:32.229,0:00:36.529 तिथे अनेक डॉक्टर व परिचारिका आले होते[br]व ती रूग्ण अचेतन झाली होती. 0:00:36.553,0:00:39.835 पुनरूज्जीवन चमूने [br]तिला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, 0:00:39.859,0:00:41.611 पण प्रत्येकाने अथक प्रयत्न करूनही, 0:00:41.635,0:00:43.084 ती दगावली. 0:00:43.108,0:00:47.279 त्या दिवसाबद्दल मला लक्षात राहिलेली [br]गोष्ट म्हणजे त्या वडिलांचा आर्त आक्रोश. 0:00:47.303,0:00:50.953 तो माझ्याच नाही तर त्या मजल्यावरील[br]प्रत्येकाच्या ह्रदयाला भेदून गेला. 0:00:50.977,0:00:53.788 हा त्याच्या जीवनातील[br]सर्वात आनंदाचा दिवस असायला हवा होता, 0:00:53.812,0:00:56.616 त्याऐवजी तो सर्वात वाईट दिवस ठरला. 0:00:58.278,0:01:01.847 ही क्वचित घडणारी दुर्दैवी घटना असती तर.. 0:01:01.871,0:01:04.108 पण तसे नाही. 0:01:04.132,0:01:05.977 दरवर्षी युनायटेड स्टेट्स मध्ये, 0:01:06.001,0:01:09.518 जवळ जवळ ७०० ते ९०० स्त्रियांचा[br]मृत्यू होतो, 0:01:09.542,0:01:11.471 गर्भावस्थेशी संबंधित कारणांमुळे. 0:01:11.882,0:01:13.843 धक्कादायक बाब म्हणजे, 0:01:13.867,0:01:17.217 इतर सर्व उच्च उत्पन्न असणाऱ्या देशांपेक्षा 0:01:17.241,0:01:19.662 आपला माता मृत्यू दर अधिक आहे. 0:01:19.686,0:01:22.404 कृष्णवर्णीय स्त्रियांच्या बाबतीत तर [br]हे दर खूपच वाईट आहेत. 0:01:24.003,0:01:28.183 प्रत्यक्षात आपला माता मृत्यू दर [br]मागील दशकात वाढला. 0:01:28.207,0:01:30.879 जेव्हा इतर देशात तो घटला. 0:01:31.380,0:01:33.499 आणि सर्वात मोठा विरोधाभास काय? 0:01:33.523,0:01:37.698 जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा[br]आपण आरोग्य सेवेवर अधिक खर्च करतो. 0:01:38.582,0:01:42.674 या बाळंतीणीने जीव गमावला त्या दरम्यान[br]निवासी सेवेत असताना, 0:01:42.698,0:01:44.696 मी स्वतः आई झाले. 0:01:44.720,0:01:48.090 या क्षेत्रातील माझी[br]पार्श्वभूमी व प्रशिक्षण असूनही, 0:01:48.114,0:01:51.653 मातेला उच्च प्रतीची आरोग्य सेवा देण्याकडे 0:01:51.677,0:01:54.625 फारसे लक्ष दिले जात नाही [br]हे पाहून मी हताश झाले. 0:01:54.649,0:01:57.357 .मी याचा खोलात जाऊन विचार केला,[br]फक्त माझ्यासाठी नाही, 0:01:57.381,0:01:59.362 तर इतर अनेक स्त्रियांसाठी. 0:01:59.781,0:02:03.185 कदाचित माझे वडील[br]नागरी हक्क मुखत्यार होते त्यामुळे 0:02:03.209,0:02:05.464 माझ्या पालकांना सामाजिक जाणिव होती 0:02:05.488,0:02:08.394 योग्य गोष्टींचा आम्ही पाठपुरावा करावा [br]अशी त्यांची इच्छा होती. 0:02:08.394,0:02:10.776 किंवा माझे पालक जमैका मध्ये जन्माला आले, 0:02:10.776,0:02:12.423 नंतर ते युनायटेड स्टेट्स मध्ये आले 0:02:12.423,0:02:15.233 आणि ते अमेरिकन ड्रीम [br]समजून घेण्यासाठी सक्षम होते. 0:02:15.257,0:02:17.407 किंवा माझ्या निवासी प्रशिक्षणामुळे असेल. 0:02:17.431,0:02:19.098 जिथे मी प्रत्यक्ष पाहिलं, 0:02:19.098,0:02:22.626 अल्प-उत्पन्न असणाऱ्या कृष्णवर्णीय महिलांवर[br]आपल्या आरोग्य सेवा प्रणालीद्वारे 0:02:22.626,0:02:24.593 किती असमाधानकारकपणे उपचार केले जातात. 0:02:24.617,0:02:28.377 कारण कोणतेही असो, यासाठी उभे राहणे[br]ही मला माझी जबाबदारी वाटली. 0:02:28.401,0:02:29.855 फक्त माझ्यासाठी नाही, 0:02:29.879,0:02:31.153 तर सर्व स्त्रियांसाठी, 0:02:31.177,0:02:34.734 विशेषतः आपल्या आरोग्य सेवेद्वारे [br]उपेक्षित महिलांसाठी. 0:02:34.758,0:02:39.259 मी माझ्या कारकिर्दीत माता आरोग्य सेवेतील[br]सुधारणेवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले 0:02:40.726,0:02:42.632 तर कशामुळे या माता दगावत आहेत? 0:02:42.656,0:02:45.031 ह्रदय विकार, रक्तस्राव, 0:02:45.055,0:02:48.045 फेफरे व पक्षाघात यांना कारणीभूत ठरणारा[br]उच्च रक्तदाब, 0:02:48.069,0:02:49.608 रक्ताच्या गुठळ्या आणि जंतुसंसर्ग 0:02:49.608,0:02:53.291 ही या देशातील मातामृत्युची[br]काही ठळक कारणे आहेत. 0:02:53.796,0:02:57.333 पण मातेचा मृत्यू हे फक्त हिमनगाचे टोक आहे. 0:02:57.357,0:03:01.643 प्रत्येक मृत्यूमागे, शेकडो स्त्रिया [br] 0:03:01.643,0:03:04.319 गर्भावस्था व प्रसुती संबंधित [br]गंभीर समस्यांशी झगडत असतात. 0:03:04.343,0:03:09.058 परीणामी, दरवर्षी जवळपास ६०,००० स्त्रियांवर[br]यापैकी एखादा प्रसंग ओढवतो. 0:03:09.506,0:03:12.476 या गुंतागुंतीच्या समस्या म्हणजे[br]गंभीर मातृत्वजन्य स्थिती, 0:03:12.500,0:03:16.338 युनायटेड स्टेट्स मध्ये वाढत आहेत[br]आणि त्या जीवन बदलून टाकत आहेत. 0:03:16.362,0:03:20.039 असा अंदाज आहे की या देशात 0:03:20.063,0:03:23.785 दरवर्षी होणाऱ्या ४ दशलक्ष प्रसुतींपैकी 0:03:23.809,0:03:26.519 १.५ ते २ टक्के प्रसुतींमध्ये [br]वरीलपैकी एक प्रसंग उद्भवतो. 0:03:26.539,0:03:32.093 म्हणजे दर तासाला ५वा६ महिलांना[br]रक्ताच्या गुठळ्या, फेफरे, पक्षाघात होतो, 0:03:32.117,0:03:33.936 रक्त द्यावे लागते, 0:03:33.960,0:03:36.855 महत्वाच्या अवयवाना ईजा पोहचते,[br]जसे मूत्रपिंड निकामी होणे, 0:03:36.879,0:03:38.998 किंवा इतर दुर्दैवी घटना. 0:03:40.758,0:03:43.967 आता, या कथेचा अक्षम्य भाग म्हणजे 0:03:43.991,0:03:47.998 ही वस्तुस्थिती की[br]या मृत्यू व गंभीर समस्यांपैकी 0:03:47.998,0:03:50.285 ६० टक्के समस्या[br]टाळता येण्याजोग्या समजल्या जातात. 0:03:50.309,0:03:52.885 जेव्हा मी म्हणते ६० टक्के घटना[br]टाळता येण्याजोग्या आहेत, 0:03:52.885,0:03:56.067 याचा अर्थ,त्यासाठी[br]ठोस पावले व आदर्श कार्यपद्धती आहे. 0:03:56.091,0:03:57.559 तिची आपण अंमलबजावणी करू शकतो. 0:03:57.583,0:04:00.134 त्यामुळे हे वाईट परीणाम टाळता येतील. 0:04:00.158,0:04:01.733 आणि महिलांचा जीव वाचेल. 0:04:02.361,0:04:05.038 आणि यासाठी भपकेबाज नवीन तंत्रज्ञान[br]गरजेचे नाही. 0:04:05.062,0:04:07.170 आपण फक्त आपल्या ज्ञानाचा वापर केला पाहिजे 0:04:07.194,0:04:10.174 आणि इस्पितळांचा दर्जा समान राखला पाहिजे. 0:04:11.260,0:04:15.442 उदाहरणार्थ, प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवतीला [br]उच्च रक्तदाब असेल, 0:04:15.466,0:04:18.422 आणि योग्य वेळी आपण रक्तदाब कमी करण्यासाठी 0:04:18.446,0:04:20.028 योग्य औषधोपचार केला, 0:04:20.052,0:04:21.543 तर आपण पक्षाघात टाळू शकतो. 0:04:22.300,0:04:25.519 आपण प्रसूतीकाळात होणाऱ्या रक्तस्त्रावावर[br]अचूक लक्ष ठेवले 0:04:25.543,0:04:29.144 तर आपण अतिरक्तस्त्रावाचे लवकर निदान करून [br]त्या महिलेचा जीव वाचवू शकतो. 0:04:29.700,0:04:34.225 आपण खरोखर भविष्यातील अशा आपत्तीजनक घटनांचा[br]दर कमी करू शकतो, 0:04:34.249,0:04:37.024 पण त्यासाठी आपण[br]सेवेच्या गुणवत्तेचे महत्त्व जाणले पाहिजे. 0:04:37.048,0:04:38.897 जी आपण गर्भवती स्त्रियांना 0:04:38.921,0:04:42.028 गर्भावस्थेपूर्वी[br]तसेच गर्भावस्थेत व प्रसूतीनंतर देतो. 0:04:42.052,0:04:46.873 आपण सर्वत्र सेवेची गुणवत्ता [br]तिच्या मानकानुसार उंचावली तर 0:04:46.897,0:04:50.703 आपण या मृत्यू व गंभीर समस्यांचे दर[br]बरेच खाली आणू शकतो. 0:04:51.695,0:04:53.605 असो, एक आनंदाची बातमी आहे. 0:04:54.403,0:04:56.266 काही यशोगाथा आहेत. 0:04:56.972,0:05:00.080 काही ठिकाणी हा दर्जा राखला गेला आहे 0:05:00.104,0:05:01.859 आणि त्यामुळे बराच बदल जाणवत आहे. 0:05:01.883,0:05:06.214 काही वर्षांपूर्वी, अमेरीकन काँलेज आँफ [br]आँबस्ट्रेटीशिअनस् अँण्ड गायनेकोलाँजीस्टस् 0:05:06.238,0:05:09.002 इतर आरोग्य संस्था,माझ्यासारखे संशोधक[br] 0:05:09.026,0:05:12.339 आणि सामाजिक संस्थांशी जोडले गेले. 0:05:12.363,0:05:15.302 त्यांना दर्जेदार आरोग्य सेवा[br]अंमलात आणायची होती. 0:05:15.326,0:05:18.702 देशभरातील इस्पितळे व आरोग्य संस्थांमध्ये. 0:05:18.726,0:05:21.055 यासाठी त्यांनी वापरलेले माध्यम म्हणजे 0:05:21.079,0:05:25.320 द अलायन्स फाँर इनोव्हेशनस् इन मँटर्नलहेल्थ[br]एम योजना. 0:05:25.344,0:05:30.105 संपूर्ण देशात गुणवत्ता व सुरक्षिततेबाबतीत[br]पावले उचलून 0:05:30.129,0:05:33.330 मातामृत्यू व गंभीर समस्यांचा दर कमी करणे[br]हे त्यांचे उद्दिष्ट आहे. 0:05:33.789,0:05:36.925 या गटाने,मातामृत्यूच्या सहज[br]टाळता येण्याजोग्या कारणांना लक्ष्य करून 0:05:36.949,0:05:40.501 अनेक सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या आहेत. 0:05:41.148,0:05:44.180 सध्या या एम प्रोग्राम मध्ये यू एस मधील 0:05:44.204,0:05:46.517 ५० % प्रसुतींपर्यंत पोहचण्याची क्षमता आहे. 0:05:47.443,0:05:49.436 तर या सुरक्षिततेच्या उपाययोजना काय आहेत? 0:05:49.460,0:05:52.213 अनुभवावर आधारित कार्यपद्धती,[br]कार्यप्रणाली, कृती 0:05:52.237,0:05:53.771 औषधोपचार, साधनसामुग्री 0:05:53.795,0:05:55.969 आणि या परिस्थितीत लागणाऱ्या इतर गोष्टी. 0:05:56.537,0:05:59.136 आपण अतिरक्तस्त्रावातील उपाययोजनांचे[br]उदाहरण घेऊ. 0:05:59.660,0:06:01.580 अतिरक्तस्त्रावामध्ये एक लहान गाडी हवी, 0:06:01.604,0:06:05.181 ज्यावर निकडीच्या प्रसंगी डॉक्टर-परिचारिका[br]यांना आवश्यक अशी सर्व सामग्री असेल 0:06:05.181,0:06:08.748 आय व्ही लाईन, ऑक्सीजन मास्क, औषधे, 0:06:08.772,0:06:10.971 पडताळणी सूची, इतर उपकरणे. 0:06:10.995,0:06:13.155 नंतर रक्तस्राव मोजण्यासाठी काहीतरी हवे. 0:06:13.179,0:06:14.721 स्पंज, कापडाच्या घड्या. 0:06:14.745,0:06:16.578 आणि फक्त पाहण्याऐवजी, 0:06:16.602,0:06:19.585 डॉक्टर व परिचारिका[br]ते स्पंज व घड्या एकत्र करून 0:06:19.609,0:06:21.197 त्यांचे वजन करतात किंवा 0:06:21.221,0:06:25.556 रक्तस्राव अचूकपणे मोजण्यासाठी[br]नवीन तंत्रज्ञान वापरतात. 0:06:28.060,0:06:32.530 अतिरक्तस्त्राव उपाय योजनेत रक्तदानासाठी[br]आणीबाणीच्या कार्यप्रणालीचा अंतर्भाव असतो. 0:06:32.554,0:06:34.749 शिवाय नियमित प्रशिक्षण व [br]पुनरुक्ती शिक्षणाचाही 0:06:34.914,0:06:38.657 आता या उपाययोजनांच्या उपयोगात[br]कॅलिफोर्निया अग्रेसर आहे. 0:06:38.681,0:06:42.027 यामुळेच कॅलिफोर्नियामध्ये पहिल्या वर्षात 0:06:42.027,0:06:44.515 या उपाययोजनांचा अवलंब [br]केलेल्या रूग्णालयांमध्ये 0:06:44.515,0:06:47.570 जीवघेण्या अतिरक्तस्त्रावामध्ये[br]२१टक्के घट झाली. 0:06:48.276,0:06:52.683 पण अजूनही देशभरात या उपाययोजनांचा [br]तुरळक किंवा अभावात्मक वापर होतो. 0:06:52.707,0:06:55.612 जशी ही वस्तुस्थिती आहे की 0:06:55.636,0:06:57.642 अनुभवसिद्ध कार्यपद्धती व सुरक्षेचे महत्त्व 0:06:57.642,0:07:00.166 रूग्णालयागणिक बदलते, 0:07:00.190,0:07:01.900 तशीच सेवेची गुणवत्ता बदलते. 0:07:02.359,0:07:06.501 अमेरिकेत कृष्णवर्णीय स्त्रियांना [br]मिळणार्या सेवेच्या गुणवत्तेत खूप फरक पडतो. 0:07:06.501,0:07:09.228 या देशात प्रसूत होणार्या [br]श्वेतवर्णीय स्त्रियांच्या तुलनेत 0:07:09.252,0:07:13.578 कृष्णवर्णीय स्त्रियांमध्ये गर्भावस्थेशी [br]संबंधित मृत्यूचे प्रमाण 0:07:13.602,0:07:14.978 तीन ते चार पट अधिक आहे. 0:07:15.649,0:07:19.657 ही सांख्यिकी या देशात प्रसूत होणार्या [br]सर्व कृष्णवर्णीय स्त्रियांसाठी सत्य आहे. 0:07:19.657,0:07:21.996 मग त्यांचा जन्म अमेरिकेत झालेला असो 0:07:21.996,0:07:23.236 वा इतर देशात. 0:07:23.823,0:07:27.512 अनेकजण विचार करतात की ही विषमता [br]उत्पन्नातील फरकामुळे आहे. 0:07:27.536,0:07:29.424 पण ती वर्गापलिकडची विषमता आहे. 0:07:29.833,0:07:32.469 एका महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या 0:07:32.493,0:07:35.474 कृष्णवर्णीय स्त्रीच्या मृत्यूची शक्यता 0:07:35.474,0:07:38.826 माध्यमिक शिक्षणही न घेतलेल्या[br]श्वेतवर्णीय स्त्रीच्या तुलनेत दुप्पट आहे. 0:07:38.826,0:07:44.354 आणि तिला प्रसुती दरम्यान गंभीर समस्या[br]निर्माण होण्याची 0:07:44.378,0:07:45.809 दोन ते तीन पट अधिक शक्यता आहे. 0:07:46.407,0:07:50.628 मला नेहमीच असा विचार करायला शिकवले गेले की[br]शिक्षण आमचे पापविमोचन आहे. 0:07:50.652,0:07:53.237 पण या बाबतीत,ते साफ खोटे आहे. 0:07:54.271,0:07:56.381 सीडीसी नुसार, 0:07:56.405,0:07:58.137 सार्वजनिक प्रसुती आरोग्यासाठी 0:07:58.161,0:08:00.593 उपाययोजना करताना 0:08:00.617,0:08:02.663 काळे-गोरे हा भेदाभेद[br]सर्वात मोठी विषमता आहे. 0:08:02.990,0:08:05.210 आपल्या काही शहरात 0:08:05.234,0:08:06.752 हे भेदाभेद ठळकपणे जाणवतात. 0:08:06.776,0:08:08.930 उदाहरणार्थ, न्यूयॉर्क शहर. 0:08:08.954,0:08:12.357 कृष्णवर्णीय स्त्रीला गर्भधारणेसंबंधित [br]कारणाने मृत्यू होण्याचा धोका 0:08:12.381,0:08:15.806 श्वेतवर्णीय स्त्रीपेक्षा[br]आठ ते बारा पट जास्त आहे. 0:08:16.822,0:08:19.239 मला वाटते आपल्यापैकी अनेकांना कदाचित 0:08:19.263,0:08:21.860 डॉ.शॅलोन आयर्विंगची[br]ह्रदय द्रावक कथा माहित असेल. 0:08:21.884,0:08:25.869 सीडीसीच्या साथरोग विशेषज्ञ [br]ज्यांचा प्रसुतीपश्चात मृत्यू झाला. 0:08:25.893,0:08:29.477 काही महिन्यांपूर्वी त्यांची कथा [br] 0:08:29.501,0:08:31.410 प्रोपब्लिका व एनपीआर मध्ये नोंदवली गेली. 0:08:31.434,0:08:33.106 अलिकडेच मी एका परिषदेत होते 0:08:33.130,0:08:35.773 आणि त्यांच्या आईचे बोलणे ऐकण्याची[br]मला संधी मिळाली. 0:08:35.797,0:08:38.517 त्यांच्या भाषणाने [br]श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. 0:08:38.909,0:08:41.165 शॅलोन एक हुशार साथरोग विशेषज्ञ होती. 0:08:41.189,0:08:44.450 आरोग्य सेवेतील[br]वांशिक भेदभावाच्या अभ्यासाशी वचनबद्ध. 0:08:44.474,0:08:47.624 ती ३६ वर्षीय होती,[br]तिचे हे पहिलेच बाळ होते. 0:08:47.648,0:08:49.485 आणि ती अफ्रीकी- अमेरिकन होती. 0:08:50.070,0:08:53.097 शॅलोनची गर्भधारणा गुंतागुंतीची होती. 0:08:53.121,0:08:57.100 पण तिने सुदृढ मुलीला जन्म दिला[br]व तिला रूग्णालयातून सोडण्यात आले. 0:08:57.710,0:09:02.091 तीन आठवड्यांनंतर उच्च रक्तदाबामुळे [br]गुंतागुंतीची समस्येमुळे मृत्यू झाला. 0:09:02.864,0:09:07.144 या तीन आठवड्यात शॅलोनला [br]आरोग्य सेवा तज्ञांनी 0:09:07.168,0:09:08.716 चार ते पाचवेळा तपासले. 0:09:08.740,0:09:10.389 तिचे कोणीही ऐकले नाही, 0:09:10.413,0:09:13.671 आणि तिच्या परिस्थितीचे गांभीर्य [br]कोणाला जाणवले नाही. 0:09:15.169,0:09:18.169 शॅलोन ची गोष्ट ही युनायटेड स्टेट्स मधील, 0:09:18.193,0:09:21.607 आरोग्य सेवेतल्या वांशिक भेदभावाच्या [br]अनेक गोष्टींपैकी फक्त एक 0:09:21.631,0:09:23.321 गोष्ट आहे. 0:09:23.345,0:09:27.713 अशी वाढती मान्यता आहे की 0:09:27.737,0:09:32.040 वंशवाद, दारिद्रय,शिक्षण,विभक्त कुटुंब[br]हे आरोग्याशी संबंधित सामाजिक निर्धारक 0:09:32.064,0:09:33.963 विषमतेत भर घालतात. 0:09:34.419,0:09:38.504 पण शॅलोनची गोष्ट [br]आणखी एका मूलभूत कारणावर प्रकाश टाकते: 0:09:38.528,0:09:40.003 सेवेची गुणवत्ता. 0:09:40.027,0:09:43.043 प्रसुतीपश्चात सेवेतील दर्ज्याचा अभाव. 0:09:43.067,0:09:46.355 त्या तीन आठवड्यात चिकित्सकांकडून [br]अनेकदा शॅलोनची तपासणी केली गेली. 0:09:46.379,0:09:48.276 आणि तरीही तिचा मृत्यू झाला. 0:09:48.300,0:09:51.001 युनायटेड स्टेट्स मधील, 0:09:51.025,0:09:54.268 मातामृत्यू व मातृत्वजन्य जटील समस्येतील [br]वांशिक व सांस्कृतीक विषमतेचे 0:09:54.292,0:09:57.110 प्रसुतीसाठीच्या सुसज्जेची ची गुणवत्ता 0:09:57.134,0:09:58.306 हे मूलभूत कारण आहे. 0:09:58.330,0:10:00.608 याची आपण आत्ता दखल घेऊ शकतो. 0:10:02.073,0:10:04.220 आमच्या गटाच्या व इतरांच्या संशोधनानुसार, 0:10:04.244,0:10:06.778 विविध कारणांमुळे, 0:10:06.802,0:10:10.274 कृष्णवर्णीय स्त्रियांचा प्रसुतीसाठी [br]ठराविक रूग्णालयात जाण्याकडे कल असतो. 0:10:10.298,0:10:14.454 कृष्ण व श्वेतवर्णीय दोन्ही स्त्रियांमध्ये[br]या रूग्णालयांचा निकाल अत्यंत वाईट असतो. 0:10:14.478,0:10:16.932 मग रूग्णाची स्थिती धोकादायक असो वा नसो. 0:10:17.379,0:10:19.935 हे पूर्ण युनायटेड स्टेट्स मधील वास्तव आहे 0:10:19.959,0:10:22.204 जिथे तीन चतुर्थांश कृष्णवर्णीय स्त्रिया 0:10:22.228,0:10:24.518 ठराविक रूग्णालयात प्रसूत होतात, 0:10:24.542,0:10:28.320 त्याच रूग्णालयात एक पंचमांशापेक्षाही कमी [br]श्वेतवर्णीय स्त्रिया प्रसूत होतात. 0:10:28.850,0:10:31.952 न्यूयॉर्क शहरात, 0:10:31.952,0:10:34.091 प्रसुतीकाळात होणाऱ्या[br]जीवघेण्या समस्यांचा धोका 0:10:34.115,0:10:37.825 रूग्णालयागणिक सहा पटींनी वाढतो. 0:10:37.849,0:10:41.919 साहजिकच कृष्णवर्णीय स्त्रियांची [br]या अत्यंत वाईट निकाल असणाऱ्या रूग्णालयात 0:10:41.943,0:10:43.547 प्रसुती होण्याची दाट शक्यता असते. 0:10:43.571,0:10:45.644 खरं तर, रूग्णालयातील हे फरक 0:10:45.668,0:10:48.071 जवळपास अर्धी कृष्ण-श्वेत विषमता[br]स्पष्ट करतात. 0:10:49.597,0:10:52.405 जर या देशात आपल्याला[br]खरंच न्याय्य आरोग्य सेवेकडे जायचे असेल, 0:10:52.429,0:10:56.342 तर या सामाजिक निर्धारकांची [br]दखल घेतलीच पाहिजे. 0:10:56.366,0:11:00.105 यापैकी बरेच खोल रूजलेले आहेत[br]आणि त्यांना दूर करण्यास वेळ लागेल. 0:11:00.129,0:11:03.002 मधल्या काळात,आपल्याला सेवेची[br]गुणवत्ता हाताळता येईल. 0:11:03.373,0:11:07.384 अखंड सेवेच्या पलिकडे [br]उच्च दर्जाची सेवा पुरवणे 0:11:07.408,0:11:10.929 म्हणजे[br]स्त्रियांच्या संपूर्ण पुनरूत्पादन काळात 0:11:10.953,0:11:13.391 सुरक्षित व विश्वसनीय गर्भनिरोधके [br]उपलब्ध करणे. 0:11:13.801,0:11:18.529 गर्भधारणे आधी, गर्भधारणा पूर्व काळजी घेणे, 0:11:18.553,0:11:21.709 जेणेकरून जुनाट आजार नियंत्रित ठेवून [br]आरोग्य सांभाळता येईल. 0:11:22.081,0:11:26.239 यात गर्भावस्थेत उच्च दर्जाच्या [br]प्रसूतीपूर्व व प्रसुतीसेवेचा समावेश होतो. 0:11:26.263,0:11:29.099 म्हणजे आपण सुदृढ आई व बाळ[br]निर्माण करू शकतो. 0:11:29.123,0:11:34.449 आणि शेवटी, गर्भधारणेनंतर, प्रसुतीपश्चात व [br]दोन गर्भधारणांमधील काळजीचा अंतर्भाव होतो. 0:11:34.473,0:11:37.694 अशाप्रकारे आपण मातांना[br]पुढील सुदृढ बाळासाठी 0:11:37.694,0:11:39.414 तसेच निरोगी जीवनासाठी तयार करू शकतो. 0:11:39.414,0:11:42.468 आणि हा शब्दश:[br]जीवन आणि मृत्यु मधला फरक सांगू शकतो. 0:11:42.492,0:11:44.455 जसं मारियाच्या बाबतीत झालं, 0:11:44.479,0:11:47.572 जी तपासणी भेटीदरम्यान 0:11:47.572,0:11:49.629 रक्तदाब वाढल्यावर रूग्णालयात दाखल झाली. 0:11:49.653,0:11:52.467 ४० वर्षीय मारियाची ही दुसरी गर्भधारणा होती 0:11:53.044,0:11:56.620 दोन वर्षांपूर्वीच्या[br]मारियाच्या पहिल्या गर्भावस्थेत सुद्धा,[br] 0:11:56.644,0:12:00.031 शेवटचे काही आठवडे तिला बरे वाटत नव्हते 0:12:00.055,0:12:02.426 आणि तिचा रक्तदाब काही वेळा वाढला. 0:12:02.450,0:12:04.773 पण कोणीही लक्ष दिले नाही. 0:12:04.797,0:12:07.264 ते म्हणाले,[br]"मारिया, काळजी करू नको, तू ठीक आहेस. 0:12:07.288,0:12:09.983 ही तुझी पहिली गर्भधारणा आहे.[br]तू थोडी चिंताग्रस्त आहेस. 0:12:10.007,0:12:12.443 पण मागील वेळी मारियासाठी[br]याचा शेवट चांगला झाला नाही. 0:12:12.467,0:12:14.383 प्रसुती दरम्यान तिला फेफरे आले. 0:12:14.910,0:12:17.344 यावेळी तिच्या गटाने खरंच तिचे ऐकले. 0:12:17.368,0:12:19.785 त्यांनी चलाख व शोधक प्रश्न विचारले. 0:12:19.809,0:12:23.713 डॉक्टरांनी तिचे प्रिएक्ल्म्पशियाच्या [br]लक्षणांसंबंधी समुपदेशन केले. 0:12:23.737,0:12:25.973 आणि स्पष्ट केले की तिला बरे वाटत नसेल तर 0:12:25.997,0:12:27.721 तिला येऊन तपासून घ्यावे लागेल. 0:12:28.065,0:12:30.055 आणि या वेळी मारिया आली, 0:12:30.079,0:12:32.695 तिच्या डॉक्टरांनी तिला [br]तातडीने रुग्णालयात पाठवले. 0:12:33.418,0:12:37.355 रूग्णालयात तिच्या डॉक्टरांनी तातडीने[br]रक्ताच्या तपासण्या करण्याचे आदेश दिले. 0:12:37.379,0:12:39.816 तिच्या शरीराला नानाविध मॉनिटर जोडले. 0:12:39.840,0:12:41.538 आणि तिच्या रक्तदाबाकडे 0:12:41.538,0:12:44.030 तसेच गर्भाच्या ह्रदयाच्या ठोक्यांकडे[br]विशेष लक्ष दिले. 0:12:44.030,0:12:47.014 तिला फेफरे येऊ नये म्हणून[br]शिरेतून औषधे दिली. 0:12:47.038,0:12:51.020 आणि जेव्हा मारियाचा रक्तदाब खूप वाढून [br]पक्षाघाताचा धोका निर्माण झाला, 0:12:51.044,0:12:53.601 तिचे डॉक्टर व परिचारिका[br]सतर्कतेने कामाला लागले. 0:12:53.625,0:12:55.795 त्यांनी दर १५ मिनिटाला तिचा रक्तदाब मोजला. 0:12:55.819,0:12:57.979 रक्तदाबजन्य आणीबाणी घोषित केली. 0:12:58.003,0:13:02.198 त्यांनी नवीनतम अचूक कार्यप्रणालीनुसार[br]तिला शिरेवाटे योग्य औषध दिले. 0:13:02.222,0:13:05.180 त्यांनी समन्वित संघ म्हणून[br]एकत्र येऊन सहजतेने काम केले. 0:13:05.204,0:13:07.685 आणि यशस्वीरित्या तिचा रक्तदाब कमी केला. 0:13:09.246,0:13:12.976 परीणामी, शोकांतिका न ठरता ती यशोगाथा बनली. 0:13:13.000,0:13:15.238 मारियाची घातक लक्षणे नियंत्रित केली गेली 0:13:15.262,0:13:17.847 आणि तिने एका निरोगी मुलीला जन्म दिला. 0:13:18.489,0:13:21.020 मारियाला रूग्णालयातून सोडण्याआधी 0:13:21.044,0:13:24.105 तिच्या डॉक्टरांनी [br]प्रिएक्ल्म्पशियाच्या लक्षणे, 0:13:24.105,0:13:27.629 प्रसुतीपश्चात पहिल्या आठवड्यात[br]रक्तदाब तपासण्याचे महत्त्व 0:13:27.653,0:13:29.848 याविषयी तिचे पुन्हा एकदा समुपदेशन केले. 0:13:29.872,0:13:34.189 त्यांनी तिला प्रसुतीपश्चात आरोग्य [br]आणि काय अपेक्षित आहे याचे शिक्षण दिले. 0:13:34.213,0:13:36.290 त्या आठवड्यांमध्ये व पुढील महिन्यात 0:13:36.314,0:13:37.786 मारियाच्या बालरोगतज्ज्ञांसोबत 0:13:37.786,0:13:41.119 बाळाच्या आरोग्यासंदर्भात भेटी झाल्या. 0:13:41.119,0:13:42.689 पण या भेटी तितक्याच महत्त्वाच्या, 0:13:42.713,0:13:45.385 जितक्या तिच्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडे 0:13:45.409,0:13:47.830 तिचे आरोग्य, रक्तदाब, 0:13:47.854,0:13:50.858 नवीन आई म्हणून[br]शंकाकुशंका विचारण्यासाठी झालेल्या भेटी. 0:13:50.882,0:13:54.721 अशी दिसते[br]अखंड सेवेच्या पलिकची उच्च दर्जाची सेवा. 0:13:54.745,0:13:56.647 आणि अशाप्रकारे ती दिसू शकते. 0:13:56.671,0:13:59.249 जर प्रत्येक समुदायातील प्रत्येक गर्भवतीला 0:13:59.273,0:14:02.449 अशी उच्च दर्जाची सेवा मिळाली 0:14:02.473,0:14:06.099 आणि दर्जेदार कार्यपद्धतीचा वापर केलेल्या[br]सुविधा दिल्या गेल्या 0:14:06.123,0:14:10.325 तर आपले मातामृत्यू व मातृत्वजन्य समस्यांचे[br]दर वेगाने खाली येतील. 0:14:10.349,0:14:13.913 त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील[br]आपला क्रमांक लाजिरवाणा नसेल. 0:14:13.937,0:14:18.756 पण सत्य हे आहे की, अनेक दशकांपासून 0:14:18.780,0:14:23.526 हे मातामृत्यू व प्रसूतीकाळातील समस्यांचे[br]अस्विकारार्ह उच्च दर आहेत. 0:14:23.550,0:14:28.668 अनेक दशकांपासून माता, बाळं व कुटूंबे[br]विनाशकारी परीणाम भोगत आहेत. 0:14:28.692,0:14:30.834 तरीही आपण कृती करण्यास सरसावलो नाही. 0:14:31.336,0:14:35.174 सध्याच्या माध्यमांचे आपल्या मातामृत्यूवरील[br]वाईट कामगिरीकडे लक्ष असल्याने 0:14:35.198,0:14:37.532 सामान्य माणसाला हे समजण्यास मदत झाली की 0:14:37.556,0:14:40.557 उच्च दर्जाची मातृत्व आरोग्य सेवा[br]आपल्या आवाक्यात आहे. 0:14:40.581,0:14:41.786 प्रश्न असा आहे: 0:14:41.810,0:14:47.018 आपण समाज म्हणून प्रत्येक समुदायातील[br]गर्भवतीला महत्त्व देण्यास तयार आहोत का? 0:14:47.042,0:14:51.713 माझ्या वतीने,मला शक्य ते सर्व मी करत आहे, [br]या खात्री ने की जेव्हा आपण तयार होऊ 0:14:51.737,0:14:54.829 तेव्हा पुढे जाण्यासाठी आपल्याकडे 0:14:54.834,0:14:56.856 ती उपकरणे व अनुभवसिद्ध पाया[br]आधीच तयार असेल. 0:14:57.001,0:14:58.183 धन्यवाद 0:14:58.207,0:15:03.206 (टाळ्या)