प्रेस्टन: मी स्वत:चं कौतुक करत नाहीये, पण मला पार्कर फार छान येतं. लिझी: चला झोपूया, म्हणजे स्टेसी येईपर्यंत सकाळ झालेली असेल. स्टेसी: लोकहो, मी माईनक्राफ्टच्या ऑफिसमधून परत आलेय, आणि माझ्या गेममधली समस्या कशी सोडवायची ते मला कळलंय, असं वाटतंय. मला वाटतं, मला फंक्शन वापरता येईल. जरा हे उघडते. तर फंक्शन म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी सूचनांचा एक विशिष्ट सेट, एखाद्या पाककृतीसारखा. पुढच्या काही पातळ्यांमध्ये , तुम्हाला फंक्शन्सना प्रवेश मिळेल. ती वापरून तुम्ही कोडी सोडवू शकाल. फंक्शन वर्कस्पेसमध्ये आलं की त्यामधला कोड पहा म्हणजे ते काय करतं आहे, ते कळेल. मग, ते नाव असलेला ब्लॉक टूलबॉक्समध्ये शोधा आणि तो टूलबॉक्समधून ओढून "when run" ब्लॉकमध्ये आणा. लक्षात ठेवा, तुम्ही पूल बांधण्यासारखी एखादी गोष्ट पुन्हा करण्यासाठी तेच फंक्शन वापरू शकता. सगळ्यांना शुभेच्छा, मला माहीत आहे, तुम्हाला हे जमणार आहे!