1 00:00:08,380 --> 00:00:09,561 धन्यवाद. 2 00:00:16,270 --> 00:00:21,200 भारतात एक राजा होता, महाराजा, आणि त्याच्या वाढदिवसानिमीत्त एक फर्मान निघालं 3 00:00:21,200 --> 00:00:24,200 कि सर्व मुख्याधिशांनी राजाला साजेशी अशी भेटवस्तू आणावी. 4 00:00:24,400 --> 00:00:28,370 काहींनी उंची तलम वस्र आणली, काहींनी आकर्षक तलवारी आणल्या, 5 00:00:28,370 --> 00:00:29,490 काहींनी सोनं आणलं. 6 00:00:29,490 --> 00:00:32,659 रांगेत सर्वांत शेवटी एक अतिवृद्ध माणूस चालत आला 7 00:00:32,659 --> 00:00:36,630 जो त्याच्या खेड्यापासून समुद्रमार्गे अनेक दिवसांचा प्रवास करून आला होता. 8 00:00:36,630 --> 00:00:41,150 आणि तो पुढे येताच राजपुत्राने विचारले, "तुम्ही महाराजांसाठी काय आणलं आहे?" 9 00:00:41,457 --> 00:00:44,750 आणि त्या वृद्ध माणसाने हळूच त्याची मूठ उघडून दाखवली त्यात एक 10 00:00:44,750 --> 00:00:49,600 अतिसुंदर शिंपला होता ज्यावर जांभळ्या पिवळ्या लाल आणि निळ्या रंगांची नक्षी होती 11 00:00:50,160 --> 00:00:51,380 आणि राजपुत्र म्हणाला, 12 00:00:51,460 --> 00:00:54,400 "महाराजांसाठीची हि भेटवस्तू नव्हे! हि अशी काय भेटवस्तू आणलीत?" 13 00:00:54,600 --> 00:00:57,400 वृद्ध माणसाने हळुवारपणे त्याच्याकडे वर पाहिलं आणि म्हणाला, 14 00:00:57,590 --> 00:01:00,750 "दूरचा प्रवास...भेटवस्तूचाच एक भाग." 15 00:01:01,060 --> 00:01:02,560 (हशा) 16 00:01:02,900 --> 00:01:05,970 काही क्षणांत मी आपल्याला एक भेट देणार आहे, 17 00:01:05,970 --> 00:01:08,270 अशी भेट कि जी मला वाटतं सर्वदूर पसरण्यायोग्य आहे. 18 00:01:08,290 --> 00:01:10,050 पण तत्पूर्वी, मला आपल्याला माझ्या लांब 19 00:01:10,050 --> 00:01:11,960 प्रवासाची सफर घडवायची आहे. 20 00:01:12,160 --> 00:01:13,740 आपल्यापैकी बऱ्याच जणांसारखंच, मी 21 00:01:13,740 --> 00:01:15,320 आयुष्य लहान मूल म्हणून सुरु केलं. 22 00:01:15,320 --> 00:01:17,460 आपल्यापैकी किती जणांनी आयुष्य लहान मूल म्हणून 23 00:01:17,460 --> 00:01:18,510 सुरु केलंय? तरुणच 24 00:01:18,740 --> 00:01:20,500 जन्मलात? साधारण निम्मे जण...ठीक आहे.. 25 00:01:20,570 --> 00:01:21,590 (हशा) 26 00:01:21,820 --> 00:01:24,910 आणि आपल्यातील उर्वरित, काय? आपण प्रौढ म्हणूनच जन्मलात? 27 00:01:25,060 --> 00:01:27,640 बाप रे, मला तुमच्या आईला भेटायचंय! 28 00:01:27,820 --> 00:01:29,460 अशक्य गोष्टींबद्दल बोलू या! 29 00:01:30,560 --> 00:01:34,740 एक लहान मूल म्हणून मला अशक्य गोष्टी करण्याचे नेहमी कुतूहल होते. 30 00:01:35,620 --> 00:01:38,880 आजच्या दिवसाची मी गेली अनेक वर्षं वाट पाहत होतो, 31 00:01:38,880 --> 00:01:41,000 कारण आजच्या दिवशी मी प्रयत्न करणार आहे 32 00:01:41,020 --> 00:01:43,620 अशक्य गोष्ट करण्याचा अगदी आपल्या डोळ्यांदेखत, 33 00:01:43,620 --> 00:01:45,460 इथे TEDx मास्ट्रीटमधे. 34 00:01:45,800 --> 00:01:48,160 मी सुरुवात करणार आहे 35 00:01:48,760 --> 00:01:50,880 शेवटचा खुलासा करून: आणि मी 36 00:01:51,220 --> 00:01:52,640 आपल्याला सिद्ध करून दाखवणार 37 00:01:52,640 --> 00:01:54,940 आहे कि अशक्य हे अशक्य नसतं. 38 00:01:55,300 --> 00:01:58,210 आणि मी सर्वदूर पसरवण्यायोग्य अशी भेट आपल्याला देऊन थांबणार आहे 39 00:01:58,210 --> 00:02:01,350 मी आपल्याला दाखवणार कि आपण आपल्या आयुष्यात असाध्य गोष्टी करू शकता 40 00:02:02,660 --> 00:02:05,420 अशक्य गोष्टी करण्याच्या माझ्या शोधकार्यात मला असं आढळलं कि 41 00:02:05,420 --> 00:02:08,230 जगातील सगळ्याच लोकांमध्ये दोन गोष्टी सामान्यतः असतात. 42 00:02:08,230 --> 00:02:09,870 प्रत्येकाला भीती असते, 43 00:02:09,870 --> 00:02:11,640 आणि प्रत्येकाची स्वप्नं असतात. 44 00:02:12,900 --> 00:02:17,560 असाध्याचा शोध घेताना मला तीन गोष्टी आढळल्या 45 00:02:17,560 --> 00:02:20,100 ज्या मी माझ्या आयुष्यात केल्या ज्यांनी मला 46 00:02:20,110 --> 00:02:23,290 एक प्रकारे असाध्य करायला भाग पाडलं: 47 00:02:24,200 --> 00:02:26,900 डॉजबॉल, किंवा ज्याला आपण "ट्रेफबॉल" म्हणता 48 00:02:27,290 --> 00:02:28,360 सुपरमॅन, 49 00:02:28,460 --> 00:02:29,460 आणि डास. ते 50 00:02:29,460 --> 00:02:30,810 माझे तीन महत्वाचे शब्द आहेत. 51 00:02:30,810 --> 00:02:33,500 आता आपल्याला कळलं असेल मी आयुष्यात असाध्य ते का करतो. 52 00:02:33,610 --> 00:02:36,220 मी आपल्याला माझ्या दूरच्या यात्रेचं दर्शन घडवणार आहे 53 00:02:36,320 --> 00:02:38,680 भयाकडून स्वप्नांकडे, 54 00:02:38,740 --> 00:02:40,980 शब्दांकडून तलवारींकडे, 55 00:02:41,160 --> 00:02:42,740 डॉजबॉलकडून 56 00:02:42,850 --> 00:02:44,020 सुपरमॅनकडे 57 00:02:44,020 --> 00:02:45,340 ते डासाकडे. 58 00:02:45,800 --> 00:02:47,360 आणि मी आपल्याला दाखवून देऊ 59 00:02:47,360 --> 00:02:49,900 इच्छितो कि आपण आपल्या आयुष्यात असाध्य ते साध्य कसं करू 60 00:02:52,480 --> 00:02:54,934 शकता. ४ ऑक्टोबर, २००७. 61 00:02:55,840 --> 00:02:58,120 माझं हृदय धडधडत होतं, पाय लटपटत होते 62 00:02:58,120 --> 00:02:59,340 जसा मी मंचावर गेलो 63 00:02:59,340 --> 00:03:00,930 सँडर्स थिएटरच्या 64 00:03:01,040 --> 00:03:03,240 हार्वर्ड विद्यापीठातील २००७ वर्षीचं 65 00:03:03,240 --> 00:03:06,160 वैद्यकशास्त्रातील इग नोबेल पारितोषिक स्वीकारण्यासाठी 66 00:03:06,160 --> 00:03:08,660 मी सहलेखन केलेल्या एका वैद्यकीय शोधनिबंधाबद्दल 67 00:03:08,660 --> 00:03:10,270 ज्याचं शीर्षक होतं "तलवार गिळंकृत 68 00:03:10,420 --> 00:03:11,740 करणे...आणि त्याचे परिणाम". 69 00:03:11,870 --> 00:03:13,275 (हशा) 70 00:03:13,840 --> 00:03:17,880 तो एका छोट्या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला होता जे मी पूर्वी कधी वाचलंही नव्हतं, 71 00:03:18,460 --> 00:03:20,419 ब्रिटिश मेडिकल जर्नल. 72 00:03:21,360 --> 00:03:24,740 आणि माझ्यासाठी ती असाध्य स्वप्नपूर्ती होती, 73 00:03:24,900 --> 00:03:28,120 माझ्यासारख्यासाठी ते एक अनपेक्षित आश्चर्य होतं, 74 00:03:28,130 --> 00:03:31,459 तो सन्मान मी कधीच विसरू शकणार नाही. 75 00:03:31,459 --> 00:03:34,539 पण माझ्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय क्षण तो नव्हता. 76 00:03:35,540 --> 00:03:37,640 ४ ऑक्टोबर, १९६७ रोजी 77 00:03:38,020 --> 00:03:40,260 हा घाबरलेला, लाजाळू, बारीक, दुबळा मुलगा 78 00:03:41,100 --> 00:03:43,120 प्रचंड भयाने ग्रासला होता. 79 00:03:43,460 --> 00:03:45,579 जसा तो मंचावर जाण्यासाठी तयार झाला, 80 00:03:45,579 --> 00:03:47,234 त्याचं हृदय धडधडत होतं, 81 00:03:47,500 --> 00:03:49,162 त्याचे पाय लटपटत होते. 82 00:03:49,780 --> 00:03:52,120 बोलण्यासाठी त्याने त्याचे तोंड उघडले, 83 00:03:56,490 --> 00:03:58,130 शब्द फुटतच नव्हते. 84 00:03:58,130 --> 00:04:00,040 तो थरथरत अश्रू ढाळत उभा राहिला. 85 00:04:00,630 --> 00:04:02,360 तो तीव्र भीतीने दुबळा पडला होता, 86 00:04:02,360 --> 00:04:03,760 भयाने गोठला होता. 87 00:04:03,960 --> 00:04:06,130 या घाबरलेल्या, लाजाळू, बारीक, दुबळ्या मुलाला 88 00:04:06,130 --> 00:04:08,142 अतिभयाने ग्रासलं होतं. 89 00:04:08,649 --> 00:04:10,330 त्याला अंधाराची भीती होती, 90 00:04:10,520 --> 00:04:11,640 उंचीची भीती होती, 91 00:04:11,640 --> 00:04:13,040 कोळ्यांची व सापांची भीती होती 92 00:04:13,040 --> 00:04:15,140 आपल्यापैकी कोणी कोळ्यांना व सापांना भीतं का? 93 00:04:15,280 --> 00:04:16,660 आहेत, काही जण आहेत... 94 00:04:16,660 --> 00:04:19,079 त्याला पाण्याची आणि शार्क माशांची भीती होती... 95 00:04:19,079 --> 00:04:21,939 डॉक्टर्स, परिचारिका आणि दंतवैद्यकांची भीती होती, 96 00:04:21,939 --> 00:04:24,680 आणि सुया आणि अणकुचीदार वस्तूंची भीती होती. 97 00:04:24,680 --> 00:04:27,380 पण सर्वांत जास्त भीती होती ती 98 00:04:27,470 --> 00:04:28,470 लोकांची. 99 00:04:29,380 --> 00:04:31,530 तो घाबरलेला, लाजाळू, बारीक, दुबळा मुलगा 100 00:04:31,540 --> 00:04:32,570 मी होतो. 101 00:04:33,320 --> 00:04:35,997 मला अपयशाची आणि नकाराची भीती होती, 102 00:04:37,300 --> 00:04:39,520 कमी स्वाभिमान आणि न्यूनगंड होता, 103 00:04:39,520 --> 00:04:42,840 आणि असं काहीतरी जे आपल्याला तेव्हा ठाऊकही नव्हतं: 104 00:04:42,840 --> 00:04:44,660 समाजात वावरण्याची विवंचना. 105 00:04:44,955 --> 00:04:48,610 मला भीती असल्या कारणाने गुंड मला छेडायचे आणि मारायचे. 106 00:04:48,610 --> 00:04:52,240 ते मला हसायचे आणि चिडवायचे, ते मला कधीच त्यांच्या रेनडियर खेळांमध्ये 107 00:04:52,300 --> 00:04:54,260 खेळू देत नसत. 108 00:04:55,020 --> 00:04:58,056 हा, एक खेळ होता ज्यात ते मला खेळू द्यायचे... 109 00:04:58,100 --> 00:04:59,427 डॉजबॉल - 110 00:04:59,500 --> 00:05:01,443 आणि मी चांगला डॉजर नव्हतो. 111 00:05:01,760 --> 00:05:03,500 गुंड मुलं मला हाक मारायची, 112 00:05:03,500 --> 00:05:05,970 आणि मी वर मान करायचो आणि हे लाल डॉजबॉल्स बघायचो 113 00:05:05,970 --> 00:05:08,200 माझ्या चेहऱ्याकडे अतिवेगाने फेकलेले 114 00:05:08,210 --> 00:05:09,950 बॅम, बॅम, बॅम! 115 00:05:10,580 --> 00:05:13,220 आणि मला शाळेतून घरी परतत असतानाचे दिवस आठवतात, 116 00:05:13,300 --> 00:05:18,180 माझा चेहरा लाल व्हायचा आणि दुखायचा, माझे कान लाल व्हायचे आणि वाजायचे. 117 00:05:18,180 --> 00:05:21,140 माझ्या डोळ्यांतून गरम अश्रु वाहायचे, 118 00:05:21,180 --> 00:05:23,515 आणि त्यांचे शब्द माझे कान जाळायचे. 119 00:05:23,740 --> 00:05:25,000 आणि ज्यांनी कोणी म्हणलंय, 120 00:05:25,020 --> 00:05:28,660 "लाठ्या आणि दगड माझी हाडं मोडू शकतात, पण शब्द मला कधीच इजा पोहोचवू शकत नाहीत" 121 00:05:28,880 --> 00:05:30,131 ते मिथ्या आहे. 122 00:05:30,310 --> 00:05:31,980 शब्द सुरीसारखे कापू शकतात. 123 00:05:31,980 --> 00:05:34,030 शब्द तलवारीसारखे भोसकू शकतात. 124 00:05:34,210 --> 00:05:36,040 शब्द इतक्या खोलवर जखमा करू शकतात कि 125 00:05:36,040 --> 00:05:37,780 त्या दिसू शकत नाहीत. 126 00:05:38,150 --> 00:05:41,070 तर मला भीती होती. आणि शब्द माझे कट्टर शत्रू होते. 127 00:05:41,260 --> 00:05:42,491 अजूनही आहेत. 128 00:05:43,355 --> 00:05:45,300 पण माझी स्वप्नंही होती. 129 00:05:45,300 --> 00:05:47,980 मी घरी जायचो आणि सुपरमॅनच्या पुस्तकांत रमायचो 130 00:05:47,980 --> 00:05:49,774 आणि मी सुपरमॅनची पुस्तकं वाचायचो 131 00:05:49,774 --> 00:05:53,440 आणि मी सुपरमॅनसारखा महानायक होण्याचं स्वप्न बघितलं. 132 00:05:53,480 --> 00:05:56,240 मला सत्य आणि न्यायासाठी लढायचं होतं, 133 00:05:56,240 --> 00:05:58,680 मला खलनायकांविरुद्ध लढायचं होतं, 134 00:05:58,680 --> 00:06:02,895 मला जगभर उडत उडत अचाट कामगिरी करायची होती आणि आयुष्यं वाचवायची होती. 135 00:06:03,400 --> 00:06:05,850 मला खऱ्याखुऱ्या गोष्टींचंही प्रचंड कुतुहल होतं. मी 136 00:06:05,860 --> 00:06:09,460 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् व रिप्लिज बिलिव्ह इट वर नॉट हि पुस्तकं वाचायचो 137 00:06:09,460 --> 00:06:13,080 आपल्यापैकी कोणी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् किंवा रिप्लिज वाचलं आहे का? 138 00:06:13,100 --> 00:06:14,390 मला ती पुस्तकं आवडतात! मी 139 00:06:14,390 --> 00:06:16,270 खऱ्या माणसांना अचाट गोष्टी करताना पाहिलं 140 00:06:16,270 --> 00:06:17,790 आणि मी म्हणलं, मला ते करायचंय. 141 00:06:17,790 --> 00:06:19,330 जर गुंड मुलं मला खेळू देत नसतील 142 00:06:19,330 --> 00:06:21,030 त्यांच्या कुठल्याच खेळांमध्ये तर मग, 143 00:06:21,030 --> 00:06:23,335 मला खरी जादू करायची आहे, खऱ्या अचाट गोष्टी. 144 00:06:23,335 --> 00:06:26,659 मला खरंच काहीतरी उल्लेखनीय करायचं आहे जे ते गुंड करू शकत नाहीत. मला 145 00:06:26,659 --> 00:06:28,609 माझा हेतु आणि तीव्र इच्छा शोधायच्या आहेत. 146 00:06:28,609 --> 00:06:30,729 माझ्या आयुष्याला अर्थ आहे हे जाणून घ्यायचंय. 147 00:06:30,729 --> 00:06:33,320 जगपरिवर्तनासाठी मला काहीतरी अविश्वसनीय करायचं आहे; 148 00:06:33,320 --> 00:06:36,960 मला सिद्ध करायचं आहे कि असाध्य हे असाध्य नसतं. 149 00:06:38,340 --> 00:06:40,240 १० वर्षांनंतर - 150 00:06:40,240 --> 00:06:42,706 माझ्या २१ व्या वाढदिवसाआधीचा तो आठवडा होता. 151 00:06:42,819 --> 00:06:46,799 एकाच दिवशी दोन गोष्टी घटना घडल्या ज्यांनी माझं आयुष्य कायमचं बदलवून टाकलं. 152 00:06:47,040 --> 00:06:49,391 मी दक्षिण भारतातल्या तामिळनाडूमध्ये राहात होतो 153 00:06:49,540 --> 00:06:51,020 मी तिथे एक धर्मप्रसारक होतो, 154 00:06:51,020 --> 00:06:53,090 आणि माझ्या मार्गदर्शक मित्राने मला विचारलं, 155 00:06:53,090 --> 00:06:54,720 "डॅनियल, तुला स्वच्छंदी ध्येयं 156 00:06:54,720 --> 00:06:57,440 आहेत?" आणि मी म्हणलं," स्वच्छंदी ध्येयं? ती काय असतात? 157 00:06:57,440 --> 00:07:00,490 ते म्हणाले, "स्वच्छंदी ध्येयं आयुष्यातील महत्वाची ध्येयं असतात. 158 00:07:00,490 --> 00:07:04,630 ते म्हणजे स्वप्नं आणि ध्येयांचं एकत्रीकरण होय, जसं तू तुला हवं ते करू शकलास, 159 00:07:04,630 --> 00:07:07,240 जिथे जावंसं वाटतं तिथे जाऊ शकलास जे व्हावंसं वाटतं 160 00:07:07,240 --> 00:07:08,479 ते होऊ शकलास, 161 00:07:08,479 --> 00:07:10,356 तर कुठे जाशील? काय करशील? 162 00:07:10,356 --> 00:07:11,280 काय होशील? मी 163 00:07:11,280 --> 00:07:14,500 म्हणलं "मला ते शक्य नाही! मी खूप भित्रा आहे! मला खूप गोष्टींची भीती 164 00:07:14,500 --> 00:07:17,800 आहे!" त्या रात्री मी माझी चटई बंगल्याच्या गच्चीवर नेली, 165 00:07:17,810 --> 00:07:19,259 चांदण्यांत पसरली, 166 00:07:19,259 --> 00:07:21,869 आणि वटवाघळांना डासांकडे झेपावताना पाहात राहिलो. 167 00:07:21,869 --> 00:07:26,200 आणि मी विचार करत राहिलो तो केवळ स्वच्छंदी ध्येयांचा, स्वप्नांचा आणि ध्येयांचा, 168 00:07:26,200 --> 00:07:28,360 आणि डॉजबॉल घेतलेल्या त्या गुंड मुलांचा. 169 00:07:28,760 --> 00:07:30,730 काही तासांनी मला जाग आली. 170 00:07:31,220 --> 00:07:33,940 माझं हृदय धडधडत होतं, माझे पाय लटपटत होते. 171 00:07:34,080 --> 00:07:36,020 यावेळी भयाने नव्हे. 172 00:07:36,420 --> 00:07:38,395 माझं पूर्ण शरीर थरथरत होतं. 173 00:07:38,500 --> 00:07:40,180 आणि पुढचे पाच दिवस 174 00:07:40,330 --> 00:07:44,199 माझी शुद्ध सारखी हरपत होती आणि मी मृत्युशय्येवर जगण्यासाठी धडपडत होतो. 175 00:07:44,199 --> 00:07:48,239 १०५ डिग्रीच्या मलेरियाच्या तापाने माझा मेंदू फणफणत होता. आणि 176 00:07:48,390 --> 00:07:51,600 मी शुद्धीवर असताना फक्त स्वच्छंदी ध्येयांचाच विचार करत होतो. 177 00:07:51,600 --> 00:07:53,820 मी विचार केला, "मला माझ्या आयुष्याचं काय 178 00:07:53,950 --> 00:07:56,380 करायचंय?" शेवटी माझ्या २१ व्या वाढदिवसाच्या आदल्या 179 00:07:56,380 --> 00:07:58,030 रात्री सुस्पष्टतेच्या क्षणात, 180 00:07:58,030 --> 00:07:59,639 मला जाणीव झाली: 181 00:07:59,639 --> 00:08:02,100 मला जाणवलं कि छोटा डास, 182 00:08:02,620 --> 00:08:05,020 अनोफिलीस स्टिफेन्सी, 183 00:08:05,280 --> 00:08:06,610 तो छोटा डास 184 00:08:06,610 --> 00:08:08,390 ज्याचं वजन ५ मायक्रोग्राम पेक्षाही 185 00:08:08,390 --> 00:08:09,810 कमी होतं मीठाच्या कणाहूनही 186 00:08:09,810 --> 00:08:12,780 कमी, जर तो डास एका १७० पौंडाच्या, ८० किलो वजनाच्या माणसाला बाद 187 00:08:12,780 --> 00:08:14,860 करू शकतो, तर तो माझा खलनायक होय. 188 00:08:14,860 --> 00:08:17,150 मग मला उमगलं, तो डास नव्हे, तर त्या डासातील 189 00:08:17,150 --> 00:08:19,480 सूक्ष्म परजीवी, 190 00:08:19,480 --> 00:08:23,160 प्लाजमोडियम फॅल्सीपॅरम, तो दरवर्षी दहा लाखांच्यावर लोकांचे प्राण घेतो. 191 00:08:23,509 --> 00:08:25,999 मग मला कळलं, ते त्याहूनही लहान आहे, 192 00:08:25,999 --> 00:08:28,550 पण मला ते खूप मोठं वाटतंय. 193 00:08:28,550 --> 00:08:29,640 मला जाणवलं, 194 00:08:29,640 --> 00:08:31,270 भय हा माझा खलनायक होता, 195 00:08:31,270 --> 00:08:32,140 माझा परजीवी, 196 00:08:32,140 --> 00:08:34,990 ज्याने मला आयुष्यभर पंगू आणि ठप्प केलं होतं. 197 00:08:35,200 --> 00:08:38,080 असं बघा, धोका आणि भय यांमध्ये फरक आहे. 198 00:08:38,109 --> 00:08:39,699 धोका हा खरा असतो. 199 00:08:39,990 --> 00:08:42,010 भय हा विकल्प आहे. 200 00:08:42,080 --> 00:08:44,309 आणि मला समजलं कि माझ्याकडे विकल्प होता: 201 00:08:44,309 --> 00:08:48,180 एकतर मी भीतीने जगेन आणि अपयशात त्या रात्री मरून जाईन, 202 00:08:49,070 --> 00:08:52,080 किंवा मी माझ्या भीतीचा शेवट कारेन आणि मी 203 00:08:52,080 --> 00:08:56,060 स्वप्नांच्या दिशेने झेपावेन, मी आयुष्य जगण्याचे धाडस करेन. 204 00:08:56,680 --> 00:08:59,560 आणि असं बघा, मृत्युशय्येवर असणं आणि मृत्यूला सामोरं जाणं 205 00:08:59,560 --> 00:09:04,080 म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं असतं जे तुम्हाला जगण्यास अधिक प्रवृत्त करतं. 206 00:09:04,180 --> 00:09:07,140 मला कळलं कि प्रत्येकजण मृत्यु पावतो पण प्रत्येकजण जगत नाही. 207 00:09:08,040 --> 00:09:09,890 आपण मृत्युतच जगत असतो. 208 00:09:09,890 --> 00:09:11,580 हे बघा, जेव्हा तुम्ही मृत्युला 209 00:09:11,580 --> 00:09:13,070 स्वीकारता तेव्हाच तुम्ही खरोखर 210 00:09:13,070 --> 00:09:15,140 जगायला शिकता. मग त्या रात्री मी बदलायची 211 00:09:15,140 --> 00:09:16,420 ठरवली माझी आयुष्यागाथा. 212 00:09:16,915 --> 00:09:18,230 मला मरायचं नव्हतं. 213 00:09:18,230 --> 00:09:20,010 मग मी एक छोटीशी प्रार्थना केली, मी 214 00:09:20,010 --> 00:09:22,230 म्हणलं, "देवा, जर तू मला माझ्या २१ व्या 215 00:09:22,230 --> 00:09:24,544 वाढदिवसापर्यंत जगवलंस तर मी भयाला माझ्या आयुष्यात 216 00:09:24,670 --> 00:09:26,520 थारा देणार नाही. मी माझ्या भयाचा अंत 217 00:09:26,520 --> 00:09:29,530 करेन, माझ्या स्वप्नांकडे मी झेपावेन, 218 00:09:29,530 --> 00:09:31,270 मला माझी वृत्ती बदलायची आहे, 219 00:09:31,270 --> 00:09:33,540 मला आयुष्यात काहीतरी अलौकिक करायचं आहे, 220 00:09:33,540 --> 00:09:35,550 मला आयुष्याचं ध्येय शोधायचं आहे, 221 00:09:35,550 --> 00:09:38,632 मला जाणून घ्यायचं आहे कि असाध्य हे असाध्य नसतं." 222 00:09:38,780 --> 00:09:42,820 मी त्या रात्री जगलो कि नाही हे मी आपल्याला सांगणार नाही; ते आपणच ठरवावं. 223 00:09:42,850 --> 00:09:43,978 (हशा) 224 00:09:43,978 --> 00:09:47,100 पण त्या रात्री मी माझ्या पहिल्या १० स्वच्छंदी ध्येयांची यादी बनवली 225 00:09:47,100 --> 00:09:50,210 मी ठरवलं मला जगातील महत्वाच्या खंडांना भेट द्यायची आहे 226 00:09:50,210 --> 00:09:51,820 जगातील ७ आश्चर्ये पाहायची आहेत 227 00:09:51,820 --> 00:09:53,410 काही भाषा शिकायच्या आहेत, 228 00:09:53,410 --> 00:09:54,940 निर्मनुष्य बेटावर राहायचं आहे, 229 00:09:54,940 --> 00:09:56,480 महासागरातील बोटीवर राहायचं आहे, 230 00:09:56,480 --> 00:09:58,650 अमॅझॉनमधील आदिवासींबरोबर राहायचं आहे, 231 00:09:58,650 --> 00:10:01,210 स्वीडनमधील सर्वांत उंच पर्वतशिखरावर चढायचं आहे, मला 232 00:10:01,210 --> 00:10:03,180 सूर्योदयाच्या वेळी माउंट एव्हरेस्ट बघायचाय 233 00:10:03,190 --> 00:10:05,390 नॅशव्हिलमधे मला संगीतक्षेत्रात काम करायचं आहे, 234 00:10:05,400 --> 00:10:07,060 मला सर्कसमधे काम करायचं आहे, 235 00:10:07,080 --> 00:10:09,120 आणि मला उडत्या विमानातून उडी मारायची आहे. 236 00:10:09,120 --> 00:10:12,380 पुढच्या वीस वर्षांत, मी त्यांपैकी बरीचशी ध्येयं पूर्ण केली. 237 00:10:12,410 --> 00:10:14,650 दरवेळी एक ध्येय पूर्ण केल्यावर मी ५ किंवा 238 00:10:14,650 --> 00:10:18,190 १० ध्येयांची भर माझ्या यादीत घालत असे आणि माझी यादी वाढतच राहिली. 239 00:10:18,800 --> 00:10:23,280 पुढची सात वर्षं, मी बहामाजमधील एका छोट्या बेटावर राहिलो 240 00:10:23,320 --> 00:10:25,360 जवळजवळ सात वर्षं 241 00:10:25,370 --> 00:10:27,274 एका छोट्या झोपडीत, 242 00:10:29,480 --> 00:10:33,820 अन्नासाठी शार्कसारख्या माशांची शिकार करत, बेटावर एकाकी, 243 00:10:33,820 --> 00:10:36,249 लंगोट घातलेला, 244 00:10:36,680 --> 00:10:39,160 आणि संकटांशी सामना करायला शिकलो. 245 00:10:39,160 --> 00:10:40,980 आणि तिथून मी मेक्सिकोला गेलो, 246 00:10:40,980 --> 00:10:45,000 आणि नंतर इक्वाडोरमधील अमॅझॉन नदीच्या पात्राजवळ गेलो, 247 00:10:45,241 --> 00:10:48,100 प्युजो पोंगो इक्वाडोर, तिथल्या स्थानिकांसोबत राहिलो, 248 00:10:48,100 --> 00:10:52,180 आणि थोडं थोडं करत माझ्या ध्येयांमुळेच माझा आत्मविश्वास वाढत गेला. 249 00:10:52,180 --> 00:10:55,100 मी नॅशव्हिलमधे संगीतक्षेत्रातील व्यवसाय केला, आणि मग स्वीडनला 250 00:10:55,110 --> 00:10:57,870 गेलो, स्टॉकहोममधे संगीताचा व्यवसाय केला, 251 00:10:57,870 --> 00:11:01,920 जिथे मी माउंट केबनेकेजच्या शिखरावर चढलो आर्क्टिक वर्तुळाच्यावर 252 00:11:03,300 --> 00:11:04,750 मी विदूषक झालो, 253 00:11:04,750 --> 00:11:05,860 करामती केल्या, 254 00:11:05,860 --> 00:11:07,480 काठीवर चालायला शिकलो, 255 00:11:07,480 --> 00:11:10,440 एकचाकी सायकल शिकलो, विस्तव गिळायला, काच खायला शिकलो. 256 00:11:10,450 --> 00:11:13,620 १९९७ मधे माझ्या ऐकिवात आलं तलवार गिळणारे एक डझनाहूनही कमी लोक उरलेत 257 00:11:13,620 --> 00:11:15,410 आणि मी म्हणालो, "मला ते केलंच पाहिजे! 258 00:11:15,420 --> 00:11:18,290 मी तलवार गिळणाऱ्या एकाला भेटलो आणि काही क्लुप्त्या विचारल्या. 259 00:11:18,290 --> 00:11:20,190 तो म्हणाला, "हो, मी तुला २ गोष्टी सांगतो 260 00:11:20,190 --> 00:11:21,926 क्रमांक १: ते खूप धोकादायक आहे, 261 00:11:21,926 --> 00:11:23,948 हे करताना लोकांचा जीव गेला आहे. 262 00:11:23,948 --> 00:11:24,953 क्रमांक २: 263 00:11:24,953 --> 00:11:26,206 त्याचा प्रयत्न करू नकोस!" 264 00:11:26,206 --> 00:11:27,520 (हशा) 265 00:11:27,540 --> 00:11:29,540 मग मी त्याचा समावेश माझ्या ध्येयांच्या 266 00:11:30,440 --> 00:11:33,320 यादीत केला. आणि मी दररोज १० ते १२ वेळा सराव केला 267 00:11:33,660 --> 00:11:35,160 चार वर्षं. 268 00:11:35,209 --> 00:11:36,709 आता मी ते मोजलं... 269 00:11:36,709 --> 00:11:40,020 ४ x ३६५ [x १२] 270 00:11:40,020 --> 00:11:42,660 जवळजवळ १३,००० अयशस्वी प्रयत्नांनंतर मी 271 00:11:42,660 --> 00:11:45,420 २००१ मधे पहिल्यांदा तलवार घशाखाली उतरवू शकलो. 272 00:11:46,002 --> 00:11:47,630 त्यादरम्यान मी ध्येय ठरवलं 273 00:11:47,630 --> 00:11:50,940 तलवार गिळण्याची क्षेत्रातील जगातील अग्रणी तज्ज्ञ होण्याचं. 274 00:11:50,970 --> 00:11:53,820 मी प्रत्येक पुस्तक, नियतकालिक, वर्तमानपत्रातील लेख शोधला, 275 00:11:53,820 --> 00:11:57,670 प्रत्येक वैद्यकीय अहवाल, मी शरीरशास्त्राच्या अभ्यास केला 276 00:11:57,676 --> 00:11:59,719 मी डॉक्टरांशी आणि परिचारिकांशी बोललो, 277 00:11:59,719 --> 00:12:01,760 सगळ्या तलवार गिळणाऱ्या लोकांना एकत्र करून 278 00:12:01,760 --> 00:12:04,250 स्वोर्ड स्वॅलोवर्स असोसिएशन इंटरनॅशनलची स्थापना केली, 279 00:12:04,250 --> 00:12:06,450 आणि २ वर्षं एका वैद्यकीय शोधनिबंधावर काम केलं 280 00:12:06,450 --> 00:12:08,580 तलवार गिळणे आणि त्याचे परिणाम या नावाने 281 00:12:08,580 --> 00:12:10,980 जो ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाला. 282 00:12:10,980 --> 00:12:11,840 (हशा) 283 00:12:11,840 --> 00:12:12,940 धन्यवाद. 284 00:12:12,960 --> 00:12:17,748 (टाळ्या) 285 00:12:18,200 --> 00:12:21,570 आणि तलवार गिळण्याबाबतच्या काही अदभूत गोष्टी मी शिकलो. 286 00:12:21,571 --> 00:12:25,260 मी शर्त लावतो काही गोष्टींचा आपण यापूर्वी विचार केला नसेल पण आजनंतर कराल. 287 00:12:25,260 --> 00:12:28,550 पुढच्या वेळी जेव्हा आपण घरी जाल आणि मांस सुऱ्याने, 288 00:12:28,550 --> 00:12:31,759 तलवारीने किंवा तुमच्या "बेस्टेकने" कापाल तुम्ही याचा विचार कराल... 289 00:12:34,257 --> 00:12:36,589 मला कळलं कि तलवार गिळण्याची सुरुवात भारतात झाली - 290 00:12:36,589 --> 00:12:39,889 अगदी तिथेच जिथे मी ते प्रथम पाहिलं २० वर्षांचा असताना - 291 00:12:39,889 --> 00:12:42,290 जवळजवळ ४००० वर्षांपूर्वी, इ.स. २००० मधे. 292 00:12:42,290 --> 00:12:45,580 गेल्या १५० वर्षांत, तलवारी गिळणाऱ्यांचा उपयोग, 293 00:12:45,590 --> 00:12:47,400 शास्त्र आणि वैद्यकशास्त्रात केला गेला 294 00:12:47,480 --> 00:12:51,160 आहे १८६८ मधे शरीरातील अवयव पाहण्याचे कणखर उपकरण तयार करण्यासाठी 295 00:12:51,160 --> 00:12:53,820 फ्रायबर्ग जर्मनीस्थित डॉ. एडॉल्फ कुसमौल यांकडून. 296 00:12:53,880 --> 00:12:56,639 १९०६ साली, वेल्समध्ये ECG द्वारे, 297 00:12:56,639 --> 00:13:00,240 गिळण्याच्या आणि पचनाच्या विकारांचा अभ्यास करण्यासाठी, श्वासनलिका 298 00:13:00,240 --> 00:13:01,860 तपासण्याच्या उपकरणांसाठी वगैरे. 299 00:13:01,860 --> 00:13:03,840 पण गेल्या १५० वर्षांत झालेल्या, 300 00:13:03,840 --> 00:13:07,860 शेकडो दुखापती आणि डझनावारी मृत्यु आपल्याला माहिती आहेत... 301 00:13:07,880 --> 00:13:14,560 हे बघा डॉ. एडॉल्फ कुसमौलनी बनवलेलं शरीरातील अवयव पाहण्याचं कणखर उपकरण. 302 00:13:14,740 --> 00:13:18,679 पण आम्हांला कळलं कि गेल्या १५० वर्षांत २९ मृत्यु झाले आहेत 303 00:13:18,679 --> 00:13:22,462 ज्यात लंडनमधील एकाचा समावेश आहे ज्याने त्याच्या हृदयात तलवार खुपसली. 304 00:13:23,142 --> 00:13:25,340 आम्हांला हेही कळलं कि ३ ते ८ भीषण 305 00:13:25,340 --> 00:13:27,780 दुखापती तलवार गिळताना दरवर्षी होतात. 306 00:13:27,780 --> 00:13:29,880 मला माहिती आहे कारण मला फोन येतात. 307 00:13:29,880 --> 00:13:31,150 नुकतेच मला दोन फोन आले होते 308 00:13:31,150 --> 00:13:34,320 एक स्वीडनहून आणि एक ऑरलँडोहून नुकतेच गेल्या काही आठवड्यांपूर्वी 309 00:13:34,320 --> 00:13:37,019 दुखापतींमुळे तलवार गिळणारे हॉस्पिटलमधे असल्याचे 310 00:13:37,019 --> 00:13:38,769 तर ते अत्यंत धोकादायक आहे. 311 00:13:38,769 --> 00:13:41,629 दुसरी गोष्टी जी मी शिकलो ती म्हणजे तलवार गिळायला 312 00:13:41,629 --> 00:13:44,320 २ ते १० वर्षं लागतात 313 00:13:44,320 --> 00:13:45,610 बऱ्याच लोकांना. 314 00:13:45,610 --> 00:13:48,020 पण सर्वांत चित्तवेधक शोध मला लागला तो याचा 315 00:13:48,020 --> 00:13:51,360 कि तलवार गिळणारे ती असाध्य गोष्ट कशी शिकतात. 316 00:13:51,460 --> 00:13:53,460 आणि मी आपल्याला एक गुपित सांगणार आहे: 317 00:13:53,520 --> 00:13:57,580 ९९.९% जे अशक्य आहे त्यावर लक्ष केंद्रित करू नका. 318 00:13:57,580 --> 00:14:02,030 शक्य असलेल्या .१% वर लक्ष केंद्रित करा आणि ते साध्य कसं करता येईल ते पाहा. 319 00:14:02,817 --> 00:14:06,140 आता मी आपल्याला तलवार गिळणाऱ्या व्यक्तीच्या मनाची सफर घडवतो. 320 00:14:06,140 --> 00:14:09,479 तलवार गिळण्यासाठी, मनाचं चिंतन लागतं, 321 00:14:09,479 --> 00:14:12,270 प्रचंड एकाग्रता, कमालीची अचूकता लागते शरीराच्या आतले अवयव 322 00:14:12,270 --> 00:14:15,670 बाजूला सारण्यासाठी व स्वयंचलित शारीरिक प्रतिक्षेपांवर विजय मिळवण्यासाठी 323 00:14:15,710 --> 00:14:20,370 मेंदूच्या प्रबलित रुपरेषेद्वारे, स्नायूंच्या पुनरावृत्त स्मृतीद्वारे 324 00:14:20,450 --> 00:14:23,720 १०,००० हूनही अधिक वेळा केलेल्या जाणीवपूर्वक सरावाने. 325 00:14:24,020 --> 00:14:28,090 आता मी आपल्याला तलवार गिळणाऱ्याच्या शरीराची एक छोटी सफर घडवतो. 326 00:14:28,310 --> 00:14:30,130 तलवार गिळण्यासाठी, 327 00:14:30,130 --> 00:14:32,250 मला पातं जिभेवरून ढकलावं लागतं, 328 00:14:32,250 --> 00:14:34,780 घशाचा प्रतिक्षेप दाबून अन्ननलिकेद्वारे, 329 00:14:34,780 --> 00:14:37,740 ९० अंशाचे वळण घेऊन अधिस्वर द्वारात खाली, 330 00:14:38,240 --> 00:14:41,040 UES झडपेतून, 331 00:14:41,060 --> 00:14:42,600 आंत्रपुरस्सरण प्रतिक्षेपाला दाबून 332 00:14:42,600 --> 00:14:44,380 छातीच्या पोकळीत पातं सरकवावं लागतं 333 00:14:44,380 --> 00:14:45,960 फुफ्फुसांच्यामध्ये. 334 00:14:46,080 --> 00:14:48,349 इथे मला 335 00:14:48,399 --> 00:14:50,389 खरंतर माझं हृदय सरकावावं लागतं. 336 00:14:50,389 --> 00:14:51,720 जर आपण नीट पाहिलंत, 337 00:14:51,720 --> 00:14:53,860 माझं हृदय तालवारीसोबत धडधडताना दिसेल 338 00:14:53,860 --> 00:14:55,859 कारण ती हृदयाला टेकून आहे 339 00:14:55,859 --> 00:14:58,809 अन्ननलिकेपासून जवळजवळ इंचाच्या एक अष्टमांश इतक्या अंतरावर आहे. 340 00:14:58,809 --> 00:15:00,580 हे असं आहे ज्यात खोटेपणाला वाव नाही. 341 00:15:00,580 --> 00:15:02,710 मग मला ते छातीच्या हाडापुढे ढकलावं लागतं, 342 00:15:02,710 --> 00:15:05,540 अन्ननलिकेच्या संकोचातून खाली पोटात, 343 00:15:05,540 --> 00:15:09,020 पोटातील ताणाचा प्रतीक्षेत दाबून खाली आद्यांत्रापर्यंत. 344 00:15:09,020 --> 00:15:09,750 अगदी सोपं आहे. 345 00:15:09,750 --> 00:15:10,930 (हशा) 346 00:15:10,930 --> 00:15:12,880 जर मला त्याहून पुढे जायचं झालं, 347 00:15:12,880 --> 00:15:17,720 मी माझ्या अंडवाहिन्यांपर्यंत जाईन. 348 00:15:17,720 --> 00:15:20,980 मित्रांनो आपल्या पत्नींना त्याबाबत नंतर विचारा ... 349 00:15:22,160 --> 00:15:23,900 लोक मला विचारतात, म्हणतात, 350 00:15:23,900 --> 00:15:26,740 "आयुष्य धोक्यात घालायला, हृदय हलवायला 351 00:15:26,740 --> 00:15:28,800 आणि तलवार गिळायला खूप धैर्य लागत असेल..." 352 00:15:28,800 --> 00:15:30,500 नाही. खरं धैर्य आहे ते 353 00:15:30,500 --> 00:15:33,020 त्या भित्र्या, लाजाळू, बारीक, दुबळ्या मुलाने 354 00:15:33,080 --> 00:15:35,620 अपयश आणि नकाराच्या विरुद्ध जाण्याचं, 355 00:15:35,620 --> 00:15:37,040 त्याच्या मनाची कवाडं उघडण्याचं 356 00:15:37,040 --> 00:15:38,240 व त्याचा अभिमान गिळण्याचं 357 00:15:38,240 --> 00:15:41,060 आणि इथे अनोळखी व्यक्तींसमोर उभं राहण्याचं 358 00:15:41,060 --> 00:15:43,670 आणि त्याच्या भयाची आणि स्वप्नांची कथा ऐकवण्याचं 359 00:15:43,680 --> 00:15:47,580 मुक्तपणे, बिनधास्तपणे संवाद साधण्याचं. 360 00:15:48,280 --> 00:15:49,450 असं बघा - धन्यवाद. 361 00:15:49,450 --> 00:15:53,720 (टाळ्या) 362 00:15:53,850 --> 00:15:56,250 असं बघा, खरी अदभूत गोष्ट अशी आहे कि मला माझ्या 363 00:15:56,250 --> 00:15:58,650 आयुष्यात नेहमीच काहीतरी उल्लेखनीय करायचं होतं 364 00:15:58,650 --> 00:15:59,780 आणि आता मी आहे. 365 00:15:59,780 --> 00:16:02,880 पण खरी उल्लेखनीय गोष्ट हि नाही कि मी २१ तलवारी 366 00:16:02,880 --> 00:16:05,170 एकावेळेस गिळू शकतो, किंवा 367 00:16:07,640 --> 00:16:10,500 २० फुट पाण्याखाली एका टाकीत ८८ शार्क माशांसोबत गिळू शकतो 368 00:16:10,500 --> 00:16:12,307 रिप्लिजच्या बिलिव्ह इट ऑर नॉट साठी, 369 00:16:13,840 --> 00:16:17,600 किंवा स्टॅन लीज सुपरह्युमन्ससाठी १५०० डिग्री लाल तळपती गिळू शकतो 370 00:16:17,610 --> 00:16:19,470 "पोलादी पुरुष" म्हणून 371 00:16:19,520 --> 00:16:21,574 आणि ती गरम होती! 372 00:16:22,460 --> 00:16:24,920 किंवा रिप्लिजसाठी किंवा गिनेजसाठी तलवारीने 373 00:16:24,930 --> 00:16:26,290 गाडी ओढणे 374 00:16:26,290 --> 00:16:28,760 किंवा अमेरिका हॅज गॉट टॅलेंटच्या अंतिम फेरीत जाणे 375 00:16:28,820 --> 00:16:31,540 किंवा २००७ चं वैद्यकशास्त्राच इग नोबेल पारितोषिक जिंकणं. 376 00:16:31,550 --> 00:16:33,900 नाही, ती खरी उल्लेखनीय गोष्ट नाही. 377 00:16:33,900 --> 00:16:36,350 तसं लोकांना वाटतं. नाही नाही. ते खरं नाही. 378 00:16:36,350 --> 00:16:37,800 खरी उल्लेखनीय गोष्ट हि आहे 379 00:16:37,800 --> 00:16:40,660 कि देव त्या भित्र्या, लाजाळू, बारीक, दुबळ्या मुलाला घेऊ शकला 380 00:16:40,660 --> 00:16:42,200 जो घाबरायचा उंचीला, 381 00:16:42,200 --> 00:16:43,890 पाण्याला व शार्क माशांना 382 00:16:43,890 --> 00:16:46,370 व डॉक्टर्सना, परिचारिकांना सुयांना व तीक्ष्ण वस्तूंना 383 00:16:46,370 --> 00:16:47,640 आणि लोकांशी बोलायला 384 00:16:47,640 --> 00:16:49,800 आणि आता त्यानेच मला जगभर फिरवलं 385 00:16:49,800 --> 00:16:51,320 ३०,००० फूट उंचीवरती 386 00:16:51,320 --> 00:16:53,900 शार्क माशांच्या तलावात तीक्ष्ण वस्तू गिळायची ताकद दिली, 387 00:16:53,900 --> 00:16:57,430 डॉक्टर्स, नर्सेस आणि आपल्यासारख्या जगभरातील श्रोत्यांसमोर बोलायचं बाळ दिलं. 388 00:16:57,430 --> 00:16:59,580 ती माझ्यासाठी खरी उल्लेखनीय गोष्ट आहे. 389 00:16:59,580 --> 00:17:01,450 मला नेहमी असाध्य काहीतरी करायचं होतं - 390 00:17:01,450 --> 00:17:02,380 धन्यवाद. 391 00:17:02,380 --> 00:17:03,760 (टाळ्या) 392 00:17:03,760 --> 00:17:05,220 धन्यवाद. 393 00:17:05,660 --> 00:17:09,040 (टाळ्या) 394 00:17:09,700 --> 00:17:12,569 मला नेहमी काहीतरी असाध्य करायचं होतं आणि आता मी आहे. 395 00:17:12,569 --> 00:17:15,858 मला जगपरिवर्तनासाठी माझ्या आयुष्यात काहीतरी उल्लेखनीय करायचं होतं 396 00:17:15,858 --> 00:17:16,899 आणि आता मी आहे. 397 00:17:16,899 --> 00:17:19,819 मला नेहमी जगभर फिरायचं होतं महानायकी कृत्य करत 398 00:17:19,819 --> 00:17:21,379 आणि आयुष्य वाचवत, आणि आता मी आहे 399 00:17:21,379 --> 00:17:22,720 आणि आपल्याला ठाऊक आहे का? 400 00:17:22,720 --> 00:17:25,569 त्या लहान मुलाच्या मोठ्या स्वप्नातील एक छोटा भाग अजूनही आहे 401 00:17:25,569 --> 00:17:27,291 खोल हृदयात. 402 00:17:30,320 --> 00:17:36,197 (हशा) (टाळ्या) 403 00:17:37,000 --> 00:17:40,240 आणि हे बघा, मला नेहमी माझं ध्येय शोधायचं होतं 404 00:17:40,270 --> 00:17:41,530 आणि आता मला ते सापडलं आहे. 405 00:17:41,540 --> 00:17:42,920 पण माहिती आहे का? तुम्ही 406 00:17:42,920 --> 00:17:46,230 विचार करत असल्याप्रमाणे ते तालवारींत नाही, माझ्या बलस्थानांत नाही 407 00:17:46,230 --> 00:17:48,510 ते खरंतर माझ्यातील उणीवेत आहे, माझ्या शब्दांत. 408 00:17:48,510 --> 00:17:51,090 माझं ध्येय हे जगपरिवर्तनाचं आहे 409 00:17:51,090 --> 00:17:52,390 भयच्छेद करून 410 00:17:52,390 --> 00:17:54,910 एकवेळी एक तलवार, एकावेळी एक शब्द, 411 00:17:55,070 --> 00:17:57,450 एकावेळी एक सुरी, एकावेळी एक आयुष्य, 412 00:17:57,540 --> 00:17:59,700 लोकांना महानायक होण्यास आणि त्यांच्या 413 00:17:59,700 --> 00:18:01,860 आयुष्यात असाध्य ते साध्य करण्यास प्रेरित करणे. 414 00:18:02,060 --> 00:18:04,680 माझं ध्येय इतरांना त्यांचं शोधण्यासाठी मदत करणे हे आहे 415 00:18:04,680 --> 00:18:05,680 तुमचं काय आहे? 416 00:18:05,680 --> 00:18:06,960 तुमचं उद्दिष्ट काय आहे? 417 00:18:06,960 --> 00:18:08,960 तुम्ही इथे काय करण्यासाठी आला आहात? 418 00:18:09,260 --> 00:18:11,590 मला वाटतं आपण सर्वजण महानायक होण्यासाठी आलो आहोत. 419 00:18:12,160 --> 00:18:14,260 तुमची अदभुत शक्ती कोणती? 420 00:18:14,560 --> 00:18:17,990 जगाच्या ७ अब्ज लोकसंख्येपैकी, 421 00:18:17,990 --> 00:18:20,250 काही थोडकेच तलवार गिळणारे 422 00:18:20,250 --> 00:18:21,661 आज जिवंत आहेत, 423 00:18:21,661 --> 00:18:22,940 पण तुम्ही एकमेव आहात. 424 00:18:22,940 --> 00:18:24,070 तुम्ही अद्वितीय आहात. 425 00:18:24,070 --> 00:18:25,540 तुमची गाथा काय? 426 00:18:25,540 --> 00:18:27,760 तुमचं वेगळेपण काय? 427 00:18:27,760 --> 00:18:29,180 तुमची कथा सांगा, 428 00:18:29,180 --> 00:18:31,721 जरी तुमचा आवाज बारीक आणि थरथरता असला तरी. 429 00:18:31,900 --> 00:18:33,340 तुमची स्वच्छंदी ध्येयं कोणती? 430 00:18:33,340 --> 00:18:35,850 जर तुम्ही काहीही करू शकलात, कोणीही बनू शकलात, कुठेही 431 00:18:35,850 --> 00:18:37,430 जाऊ शकलात - तुम्ही काय कराल? 432 00:18:37,430 --> 00:18:38,480 तुम्ही कोठे जाल? काय 433 00:18:38,480 --> 00:18:40,340 कराल? आयुष्यात तुम्हाला काय करायचंय? 434 00:18:40,340 --> 00:18:41,760 तुमची मोठी स्वप्नं कोणती? 435 00:18:41,760 --> 00:18:44,450 लहानपणी तुमची मोठी स्वप्नं काय होती? विचार करा. 436 00:18:44,450 --> 00:18:46,240 मी शर्त लावतो, हे ते नव्हतं, होतं का? 437 00:18:46,483 --> 00:18:47,880 तुमची सर्वांत विचित्र स्वप्नं 438 00:18:47,880 --> 00:18:50,450 कोणती होती जी तुम्हाला वेगळी आणि अस्पष्ट वाटली? 439 00:18:50,450 --> 00:18:54,040 मी शर्त लावतो हे पाहिल्यावर तुमची स्वप्नं तुम्हाला विचित्र वाटणार नाहीत, 440 00:18:55,370 --> 00:18:57,050 नाही का? तुमची तलवार कोणती? 441 00:18:57,050 --> 00:18:58,650 आपल्यापैकी प्रत्येकाकडे एक तलवार 442 00:18:58,650 --> 00:19:00,600 आहे, एक दुधारी तलवार भयाची आणि स्वप्नांची 443 00:19:00,600 --> 00:19:03,520 तुमची तलवार गिळा, कशीही असली तरी. 444 00:19:03,890 --> 00:19:05,870 श्रोतेहो, तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. 445 00:19:05,870 --> 00:19:08,900 तुम्हाला जे व्हायचं होतं ते होण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. 446 00:19:09,720 --> 00:19:12,920 डॉजबॉल खेळणाऱ्या त्या गुंड मुलांना ज्यांना वाटलं 447 00:19:12,920 --> 00:19:14,916 कि मी असाध्य कधीही करू शकणार नाही, 448 00:19:15,060 --> 00:19:17,645 मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे: 449 00:19:17,645 --> 00:19:18,841 धन्यवाद. 450 00:19:18,940 --> 00:19:22,220 कारण जर खलनायक नसते तर आपण महानायक झालो नसतो. 451 00:19:23,020 --> 00:19:27,237 असाध्य ते असाध्य नाही हे सिद्ध करण्यासाठी मी इथे आलो आहे. 452 00:19:28,300 --> 00:19:32,310 हे खूप धोकादायक आहे. ते माझा जीव घेऊ शकतं. 453 00:19:32,340 --> 00:19:33,720 मी आशा करतो तुम्हाला ते आवडेल 454 00:19:33,720 --> 00:19:35,260 (हशा) 455 00:19:36,350 --> 00:19:38,700 हे करण्यासाठी मला आपली मदत लागेल. 456 00:19:46,731 --> 00:19:48,405 श्रोते: दोन, तीन. 457 00:19:48,405 --> 00:19:52,100 डॅन मेयर: नाही नाही. मला मोजण्यासाठी तुम्हां सगळ्यांची मदत हवी आहे, ठीक आहे? 458 00:19:52,100 --> 00:19:53,210 (हशा) 459 00:19:53,210 --> 00:19:55,840 जर तुम्हांला शब्द माहीत असतील तर? ठीक? माझ्यासोबत मोजा. 460 00:19:55,870 --> 00:19:56,964 तयार? एक. 461 00:19:56,964 --> 00:19:58,150 दोन. 462 00:19:58,170 --> 00:19:58,980 तीन. 463 00:19:58,980 --> 00:20:00,920 नाही ते २ आहे, पण तुम्हांला समजलंय आता. 464 00:20:06,760 --> 00:20:07,780 श्रोते: एक. 465 00:20:07,840 --> 00:20:08,750 दोन. 466 00:20:08,800 --> 00:20:10,010 तीन. 467 00:20:11,260 --> 00:20:13,280 (धापा टाकत) 468 00:20:14,360 --> 00:20:15,940 (टाळ्या) 469 00:20:16,251 --> 00:20:17,450 डॅमे: हा! 470 00:20:17,450 --> 00:20:23,100 (टाळ्या) (कडकडाट) 471 00:20:23,100 --> 00:20:24,820 आपला खूप आभारी आहे. 472 00:20:25,450 --> 00:20:28,800 धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. अगदी मनापासून धन्यवाद. 473 00:20:28,800 --> 00:20:31,290 खरंतर अगदी पोटापासून धन्यवाद. मी आपल्याला सांगितलं 474 00:20:31,880 --> 00:20:35,020 होतं मी इथे असाध्य ते करण्यासाठी आलो आहे आणि आता मी ते केलं आहे. 475 00:20:35,030 --> 00:20:37,730 पण हे अशक्य नव्हतं. हे मी रोज करतो. 476 00:20:37,800 --> 00:20:42,800 असाध्य गोष्ट त्या भित्र्या, लाजाळू, बारीक दुबळ्या मुलासाठी होती भयाला सामोरं 477 00:20:42,840 --> 00:20:44,600 जाण्याची, इथे [TEDx ] मंचावर उभं 478 00:20:44,600 --> 00:20:47,100 राहण्याची आणि जग बदलण्याची, एकावेळी एक शब्द, 479 00:20:47,100 --> 00:20:49,080 एकावेळी एक तलवार, एकावेळी एक आयुष्य. 480 00:20:49,080 --> 00:20:52,060 जर मी आपल्याला नवीन मार्गांनी विचार करायला भाग पाडलंय, जर मी 481 00:20:52,060 --> 00:20:54,460 आपल्याला असाध्य ते असाध्य नसतं हे मानायला लावलंय 482 00:20:54,460 --> 00:20:57,960 जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अशक्य गोष्टी करू शकता याची जाणीव मी करून देऊ 483 00:20:58,120 --> 00:21:01,020 शकलो आहे तर माझं काम झालंय आणि तुमचं नुकतंच सुरु झालंय. 484 00:21:01,020 --> 00:21:04,100 स्वप्नं बघणं कधी थांबवू नका. विश्वास ठेवणं कधी थांबवू नका. 485 00:21:04,820 --> 00:21:06,350 माझ्यावरील विश्वासाबद्दल आभारी 486 00:21:06,350 --> 00:21:08,250 आहे आणि माझ्या स्वप्नातील सहभागाबद्दल 487 00:21:08,250 --> 00:21:09,550 धन्यवाद. आणि हि माझी भेट: 488 00:21:09,550 --> 00:21:11,486 असाध्य ते असाध्य... 489 00:21:11,486 --> 00:21:12,920 श्रोते: नसतं . 490 00:21:12,920 --> 00:21:14,920 माझा प्रवास हा भेटीचाच भाग. 491 00:21:15,100 --> 00:21:19,560 (टाळ्या) 492 00:21:19,560 --> 00:21:21,020 धन्यवाद. 493 00:21:21,060 --> 00:21:25,360 (टाळ्या) 494 00:21:25,580 --> 00:21:27,560 (कडकडाट) 495 00:21:27,780 --> 00:21:30,240 यजमान: वा, डॅन मेयर, धन्यवाद!