Return to Video

खुल्या जागा वातानुकूलित कशा कराव्यात?

  • 0:01 - 0:02
    गुड इव्हिनिंग.
  • 0:02 - 0:04
    इथे आपण या सुरेख, खुल्या
  • 0:04 - 0:06
    अँफीथिएटर मध्ये
  • 0:06 - 0:08
    संध्याकाळच्या
  • 0:08 - 0:10
    सुखद हवेचा
  • 0:10 - 0:11
    आनंद घेत आहोत.
  • 0:11 - 0:15
    पण १० वर्षांनंतर
  • 0:15 - 0:17
    कतार मध्ये जेव्हा
  • 0:17 - 0:19
    फुटबॉल विश्व् करंडक सामने होतील,
  • 0:19 - 0:20
    २०२२ मध्ये,
  • 0:20 - 0:21
    आम्हाला ठाऊक आहे, की
  • 0:21 - 0:25
    तेव्हा खूप खूप ऊन आणि उकाडा असेल.
  • 0:25 - 0:27
    जून आणि जुलै महिन्यांतला कडक उन्हाळा.
  • 0:27 - 0:30
    विश्व् करंडकासाठी जेव्हा
  • 0:30 - 0:31
    कतारची निवड झाली ,
  • 0:31 - 0:33
    तेव्हा जगभरातल्या
  • 0:33 - 0:35
    अनेक लोकांना प्रश्न पडला,
  • 0:35 - 0:37
    या वाळवंटी हवामानात,
  • 0:37 - 0:39
    खेळाडू आपला नेत्रदीपक खेळ
  • 0:39 - 0:40
    कसा खेळणार?
  • 0:40 - 0:42
    इतक्या उकाड्यात,
  • 0:42 - 0:45
    प्रेक्षक खुल्या मैदानांत बसून
  • 0:45 - 0:48
    खेळाचा आनंद कसा लुटणार?
  • 0:48 - 0:51
    हे शक्य आहे का?
  • 0:51 - 0:52
    अल्बर्ट स्पियर अँड पार्टनर
  • 0:52 - 0:54
    यांच्या आर्किटेक्ट्स बरोबर,
  • 0:54 - 0:56
    ट्रान्ससोलर मधले आमचे इंजिनियर्स
  • 0:56 - 0:58
    खुले स्टेडियम्स उभारताहेत.
  • 0:58 - 1:02
    तिथली हवा थंड ठेवण्यासाठी
  • 1:02 - 1:06
    १०० टक्के सौरशक्ती वापरण्यात येत आहे.
  • 1:06 - 1:08
    मी त्याविषयी बोलणार आहे,
  • 1:08 - 1:09
    पण आधी आरामापासून सुरुवात करू.
  • 1:09 - 1:11
    आरामशीर
  • 1:11 - 1:12
    म्हणजे काय ते आधी पाहू.
  • 1:12 - 1:15
    अनेक लोक भोवतालचं तापमान
  • 1:15 - 1:17
    आणि सुखद हवामान
  • 1:17 - 1:19
    यात गल्लत करतात.
  • 1:19 - 1:21
    हे असे तक्ते आम्ही नेहमी पाहतो,
  • 1:21 - 1:23
    आणि ही लाल रेषा दिसते आहे,
  • 1:23 - 1:24
    ती जून आणि जुलै मधलं
  • 1:24 - 1:26
    तापमान दाखवते.
    आणि हो, खरंच,
  • 1:26 - 1:28
    ते ४५ डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचलं आहे.
  • 1:28 - 1:31
    खरंच खूप उकाडा आहे.
  • 1:31 - 1:33
    पण केवळ हवेचं तापमान
    हा एकच निकष वापरून,
  • 1:33 - 1:35
    ती किती सुखद आहे,
  • 1:35 - 1:37
    हे ठरवता येत नाही.
  • 1:37 - 1:39
    माझ्या एका सहकाऱ्याने केलेलं
  • 1:39 - 1:43
    विश्लेषण तुम्हाला दाखवतो.
  • 1:43 - 1:45
    त्याने जगभरातले अनेक फुटबॉल विश्व् करंडक,
  • 1:45 - 1:47
    ऑलिम्पिक सामने विचारात घेतले.
  • 1:47 - 1:48
    तिथल्या
  • 1:48 - 1:50
    प्रेक्षकांना जाणवलेला
  • 1:50 - 1:53
    हवेचा सुखदपणा पाहिला
  • 1:53 - 1:54
    आणि त्याचं विश्लेषण केलं.
  • 1:54 - 1:56
    आपण मेक्सिकोपासून सुरुवात करू.
  • 1:56 - 1:58
    मेक्सिकोतलं तापमान,
  • 1:58 - 1:59
    हवेचं उष्णतामान,
  • 1:59 - 2:02
    साधारण १५ ते ३० डिग्री सेल्सियस
    पर्यंत असे
  • 2:02 - 2:04
    आणि लोक मजेत असत.
  • 2:04 - 2:06
    मेक्सिको सिटीतला सामना
  • 2:06 - 2:08
    लोकांनी आरामात पाहिला.
    हा पहा.
  • 2:08 - 2:11
    ओरलँडो.
    तशाच प्रकारचं
  • 2:11 - 2:13
    खुलं स्टेडियम.
  • 2:13 - 2:16
    लोक तळपत्या उन्हात बसले होते.
  • 2:16 - 2:18
    भरदुपारी, अत्यंत दमट हवेत.
  • 2:18 - 2:19
    ते आरामात बसून
  • 2:19 - 2:21
    सामन्याचा आनंद लुटू शकले नाहीत.
  • 2:21 - 2:23
    या सामन्यांच्या वेळी तापमान जास्त नव्हतं,
  • 2:23 - 2:26
    पण तरीही तिथे आरामात बसता येत नव्हतं.
  • 2:26 - 2:27
    आणि सेऊल?
  • 2:27 - 2:30
    प्रक्षेपण हक्कांच्या सोयीसाठी
  • 2:30 - 2:31
    तिथले सगळे सामने
  • 2:31 - 2:33
    संध्याकाळी उशिरा सुरु होत.
  • 2:33 - 2:35
    सूर्यास्त होऊन गेलेला असल्याने
  • 2:35 - 2:38
    त्यावेळची हवा सुखद वाटे.
  • 2:38 - 2:41
    अथेन्समध्ये काय झालं?
  • 2:41 - 2:43
    भूमध्य प्रदेशातलं हवामान.
  • 2:43 - 2:46
    पण त्या उन्हात हवा आरामदायी भासली नाही.
  • 2:46 - 2:47
    आणि स्पेन मुळे आपण जाणतो,
  • 2:47 - 2:50
    "ऊन आणि सावली".
  • 2:50 - 2:52
    सावलीतलं तिकीट हवं असेल,
  • 2:52 - 2:54
    तर जास्त किंमत द्यावी लागते.
  • 2:54 - 2:56
    कारण तिथली हवा
  • 2:56 - 3:00
    जास्त आरामदायी असते.
  • 3:00 - 3:01
    आणि बीजिंग?
  • 3:01 - 3:03
    पुन्हा, दिवसभर ऊन
  • 3:03 - 3:05
    आणि अतिशय दमट.
  • 3:05 - 3:06
    आणि ते आरामदायी नव्हतं.
  • 3:06 - 3:08
    जर मी हे सगळं एकत्र आणलं,
  • 3:08 - 3:09
    आणि तुम्ही सगळी माहिती एकत्र पाहिली
  • 3:09 - 3:11
    तर असं दिसेल, की
  • 3:11 - 3:14
    हवेचं तापमान साधारण
  • 3:14 - 3:17
    २५ ते ३५ च्या दरम्यान होतं.
  • 3:17 - 3:19
    आणि जर तुम्ही
  • 3:19 - 3:22
    ३० डिग्री सेल्सियसची
  • 3:22 - 3:24
    रेषा पाहिली, तर
  • 3:24 - 3:25
    त्या रेषेवर
  • 3:25 - 3:28
    खुल्या वातावरणातली
  • 3:28 - 3:30
    हवा सुखद भासण्याचे
  • 3:30 - 3:32
    सर्व प्रकार दिसतील.
  • 3:32 - 3:33
    अत्यंत सुखद हवेपासून
  • 3:33 - 3:35
    अगदी खराब हवेपर्यंत.
  • 3:35 - 3:38
    तर असं का?
  • 3:38 - 3:39
    कारण,
  • 3:39 - 3:41
    हवा सुखद भासते ती
  • 3:41 - 3:43
    अनेक घटकांच्या प्रभावामुळे.
  • 3:43 - 3:46
    पहिला घटक आहे सूर्य.
  • 3:46 - 3:48
    प्रत्यक्ष सूर्यप्रकाश आणि ऊन.
  • 3:48 - 3:51
    दुसरा घटक, वारा.
    मंद वारा, जोराचा वारा.
  • 3:51 - 3:53
    तिसरा घटक, हवेची आर्द्रता.
  • 3:53 - 3:55
    चौथा घटक, सभोवतालच्या वातावरणातून
  • 3:55 - 3:58
    प्रसारित होणारं तापमान.
  • 3:58 - 3:59
    आणि हे आहे हवेचं तापमान.
  • 3:59 - 4:00
    आपल्या शरीराला
  • 4:00 - 4:02
    वाटण्याऱ्या सुखद भावनेवर
  • 4:02 - 4:04
    या सगळ्या घटकांचा परिणाम होतो.
  • 4:04 - 4:06
    शास्त्रज्ञांनी एक घटक निर्माण केला आहे,
  • 4:06 - 4:08
    जाणवणारे तापमान.
  • 4:08 - 4:10
    यात हे सर्व घटक येतात.
  • 4:10 - 4:12
    आणि त्यामुळे रचनाकारांना समजतं,
  • 4:12 - 4:15
    की यापैकी
  • 4:15 - 4:17
    नेमक्या कोणत्या घटकामुळे
  • 4:17 - 4:19
    हवा सुखद वाटली
  • 4:19 - 4:20
    किंवा खराब वाटली.
  • 4:20 - 4:22
    नेमका कोणता घटक
  • 4:22 - 4:23
    "जाणवणारे तापमान" ठरवतो?
  • 4:23 - 4:26
    आणि हे हवामानविषयक घटक
  • 4:26 - 4:28
    मानवी चयापचयाशी
  • 4:28 - 4:32
    निगडित आहेत.
  • 4:32 - 4:34
    आपल्या चयापचयामुळे
  • 4:34 - 4:36
    आपण
  • 4:36 - 4:38
    उष्णता निर्माण करतो.
  • 4:38 - 4:39
    मी इथे उत्साहित अवस्थेत आहे,
  • 4:39 - 4:41
    तुमच्याशी बोलतो आहे.
    या क्षणी
  • 4:41 - 4:42
    मी साधारण १५० वँट
  • 4:42 - 4:43
    निर्माण करत असेन.
  • 4:43 - 4:45
    तुम्ही शांत बसून
    मला बघत आहात.
  • 4:45 - 4:46
    तुम्ही प्रत्येकी
  • 4:46 - 4:48
    १०० वँट निर्माण करत असाल.
  • 4:48 - 4:50
    ही ऊर्जा शरीरापासून दूर न्यायला हवी.
  • 4:50 - 4:52
    ती तशी दूर नेणं,
  • 4:52 - 4:53
    ही शारीरिक गरज आहे.
  • 4:53 - 4:55
    ती दूर नेणं जेवढं जास्त कठीण होईल,
  • 4:55 - 4:57
    तेवढा शरीराला वाटणारा
  • 4:57 - 5:00
    आराम कमी होईल.
  • 5:00 - 5:02
    आणि ही ऊर्जा जर
    शरीरापासून दूर
  • 5:02 - 5:03
    गेलीच नाही,
  • 5:03 - 5:05
    तर मरण ओढवेल.
  • 5:05 - 5:09
    फुटबॉल विश्वचषकाच्या वेळी काय घडतं ते
  • 5:09 - 5:11
    आपण जर एकत्रितरीत्या पाहिलं,
  • 5:11 - 5:13
    तर, जून आणि जुलै महिन्यात काय घडेल
  • 5:13 - 5:14
    ते आपण पाहू शकू.
  • 5:14 - 5:16
    हवेचं तापमान बरंच जास्त असेल.
  • 5:16 - 5:17
    पण खेळ आणि सामने
  • 5:17 - 5:20
    दुपारी असतील.
  • 5:20 - 5:22
    त्यामुळे तिथली हवा,
  • 5:22 - 5:23
    खराब ठरवल्या गेलेल्या
  • 5:23 - 5:25
    इतर ठिकाणच्या
  • 5:25 - 5:27
    हवेसारखीच असेल.
  • 5:27 - 5:29
    म्हणून आम्ही एका टीमबरोबर बसून
  • 5:29 - 5:31
    एक ध्येय ठरवलं.
  • 5:31 - 5:34
    खुल्या मैदानात
  • 5:34 - 5:36
    हवेचं उष्णतामान
  • 5:36 - 5:38
    ३२ डिग्री सेल्सियस असताना
  • 5:38 - 5:40
    जे शक्य असेल त्यापैकी
  • 5:40 - 5:43
    सर्वाधिक आरामदायी
  • 5:43 - 5:45
    वाटणारं तापमान
  • 5:45 - 5:47
    मिळवण्याचं ध्येय.
  • 5:47 - 5:50
    खुल्या मोकळ्या वातावरणात
  • 5:50 - 5:52
    लोकांना खरंच खूप छान वाटेल.
  • 5:52 - 5:54
    पण याचा अर्थ काय?
  • 5:54 - 5:56
    इथे नुसतं पहा,
  • 5:56 - 5:58
    तापमान खूप जास्त आहे.
  • 5:58 - 6:01
    कितीही चांगली स्थापत्यशास्त्रीय किंवा
  • 6:01 - 6:02
    हवामानशास्त्रीय रचना वापरली
  • 6:02 - 6:04
    तरीही फारसा फरक पडणार नाही.
  • 6:04 - 6:07
    म्हणजे आपल्याला काहीतरी क्रिया
    घडवून आणली पाहिजे.
  • 6:07 - 6:09
    उदाहरणार्थ, आपल्याला
  • 6:09 - 6:11
    रेडियन्ट कूलिंग टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे.
  • 6:11 - 6:13
    आणि ती तथाकथित सॉफ्ट कँडीशनिंग
  • 6:13 - 6:15
    बरोबर वापरली पाहिजे.
  • 6:15 - 6:16
    तर स्टेडियम मध्ये हे कसं असेल?
  • 6:16 - 6:19
    स्टेडियम मध्ये खुल्या हवेतला
  • 6:19 - 6:20
    आरामशीरपणा वाढवणारे
  • 6:20 - 6:22
    काही घटक असतील.
  • 6:22 - 6:24
    पहिला घटक, सावली.
  • 6:24 - 6:26
    दुसरा घटक,
  • 6:26 - 6:28
    जोरदार गरम वाऱ्यापासून
  • 6:28 - 6:29
    संरक्षण.
  • 6:29 - 6:31
    पण इतकं पुरणार नाही.
  • 6:31 - 6:34
    आपल्याला काहीतरी क्रिया
  • 6:34 - 6:36
    घडवून आणली पाहिजे.
  • 6:36 - 6:38
    थंड वाऱ्याचा झंझावात
  • 6:38 - 6:41
    स्टेडियममध्ये सोडण्याऐवजी
  • 6:41 - 6:42
    आपण उष्णता दूर नेणारं
  • 6:42 - 6:44
    तंत्रज्ञान वापरू शकतो.
  • 6:44 - 6:47
    जमीन गरम ठेवण्यासाठी जसे
  • 6:47 - 6:49
    जमिनीत गाडलेले पाण्याचे पाईप्स वापरतात,
    तसंच.
  • 6:49 - 6:51
    केवळ त्या पाईप्स मधून थंड पाणी सोडून,
  • 6:51 - 6:52
    त्यातून दिवसभरात
  • 6:52 - 6:54
    स्टेडियममध्ये शोषली गेलेली
  • 6:54 - 6:56
    उष्णता आपण बाहेर टाकू शकतो.
  • 6:56 - 6:57
    अशा रीतीने आपण तिथली
  • 6:57 - 6:59
    हवा आरामदायी बनवू शकतो.
  • 6:59 - 7:02
    आणि मग थंड नव्हे,
  • 7:02 - 7:04
    तर कोरडी हवा तिथे सोडल्यावर,
  • 7:04 - 7:06
    प्रत्येक प्रेक्षक आणि खेळाडूला
  • 7:06 - 7:08
    आपापल्या आवडीनुसार
  • 7:08 - 7:10
    आणि ऊर्जेच्या पातळीनुसार
  • 7:10 - 7:12
    हवा सुखद वाटेल.
  • 7:12 - 7:13
    ते त्या वातावरणाला सरावतील
  • 7:13 - 7:16
    आणि आराम अनुभवतील.
  • 7:16 - 7:20
    साधारण १२ स्टेडियम्स
  • 7:20 - 7:22
    बनणार आहेत.
  • 7:22 - 7:25
    आणि ३२ प्रशिक्षण खेळपट्ट्या,
  • 7:25 - 7:26
    जिथे सर्व सहभागी देश
  • 7:26 - 7:27
    प्रशिक्षण घेतील.
  • 7:27 - 7:29
    आम्ही हीच मूळ कल्पना वापरली.
  • 7:29 - 7:32
    प्रशिक्षण खेळपट्टीवर सावली,
  • 7:32 - 7:34
    वाऱ्यापासून बचाव,
  • 7:34 - 7:36
    आणि हिरवळीचा वापर.
  • 7:36 - 7:39
    नैसर्गिकरीत्या पाणी दिलेली हिरवळ,
  • 7:39 - 7:40
    हा उत्तम थंड करणारा घटक आहे.
  • 7:40 - 7:42
    तर, तापमान स्थिर ठेवणे
  • 7:42 - 7:43
    आणि कोरडी हवा तिथे सोडणे,
  • 7:43 - 7:45
    यामुळे हवा सुखद होईल.
  • 7:45 - 7:48
    पण निष्क्रीय रचना उत्तम असली,
  • 7:48 - 7:49
    तरी निरुपयोगी.
  • 7:49 - 7:50
    सक्रिय रचना हवी.
  • 7:50 - 7:51
    आणि हे कसं करायचं?
  • 7:51 - 7:54
    आमची कल्पना होती,
  • 7:54 - 7:55
    १००% सौरशक्तीने हवा थंड करण्याची.
  • 7:55 - 7:57
    त्यामागची कल्पना होती,
  • 7:57 - 7:59
    स्टेडियम्सची छपरं
  • 7:59 - 8:01
    पीव्ही सिस्टिम्सनी
  • 8:01 - 8:03
    झाकून टाकण्याची.
  • 8:03 - 8:05
    आम्ही भूतकाळात बनवलेली ऊर्जा
  • 8:05 - 8:07
    वापरणार नाही.
  • 8:07 - 8:08
    आम्ही खनिज ऊर्जा वापरणार नाही.
  • 8:08 - 8:10
    आमच्या शेजारी देशांची ऊर्जा
  • 8:10 - 8:11
    उधार घेणार नाही.
  • 8:11 - 8:13
    आम्ही तीच ऊर्जा वापरू,
  • 8:13 - 8:16
    जी छपरावर निर्माण करता येईल.
  • 8:16 - 8:18
    आणि प्रशिक्षण खेळपट्टयांवरही,
  • 8:18 - 8:21
    त्यांवर मोठे लवचिक पापुद्रे पसरून.
  • 8:21 - 8:23
    पुढील काही वर्षांत
  • 8:23 - 8:24
    हा उद्योग फोफावेल.
  • 8:24 - 8:26
    लवचिक फोटोव्होल्टाइक्सचा
  • 8:26 - 8:27
    प्रखर उन्हात सावली देण्याची
  • 8:27 - 8:29
    आणि त्याचवेळी
  • 8:29 - 8:31
    विद्युत ऊर्जा निर्माण करण्याची
  • 8:31 - 8:33
    शक्यता असणारा.
  • 8:33 - 8:35
    ही ऊर्जा वर्षभर निर्माण होईल
  • 8:35 - 8:36
    आणि ती विजेच्या ग्रिडमध्ये
  • 8:36 - 8:38
    पाठवली जाईल.
  • 8:38 - 8:40
    ग्रिडमधला खनिज वापर
  • 8:40 - 8:42
    ती कमी करेल.
  • 8:42 - 8:45
    जेव्हा हवा थंड करण्यासाठी
  • 8:45 - 8:47
    ऊर्जेची गरज भासेल,
  • 8:47 - 8:49
    तेव्हा आम्ही ती ग्रिडमधून घेऊ.
  • 8:49 - 8:51
    जी सौर ऊर्जा आम्ही
    ग्रिडमध्ये पाठवली होती,
  • 8:51 - 8:53
    तीच आम्ही गरजेनुसार
  • 8:53 - 8:53
    परत घेऊ.
  • 8:53 - 8:55
    हे आम्ही पहिल्याच वर्षात
  • 8:55 - 8:56
    करू शकतो. आणि
  • 8:56 - 8:57
    पुढल्या १० वर्षांत
  • 8:57 - 8:59
    आम्ही त्याचं संतुलन करू शकतो.
  • 8:59 - 9:02
    आणि विश्वचषक स्पर्धा पार पाडण्यास
  • 9:02 - 9:03
    गरजेची अशी ही ऊर्जा
  • 9:03 - 9:05
    त्यापुढली २० वर्षं
  • 9:05 - 9:08
    कतारच्या ग्रिड मध्ये पाठवली जाईल.
  • 9:08 - 9:09
    (टाळ्या)
  • 9:09 - 9:10
    खूप धन्यवाद. (टाळ्या)
  • 9:10 - 9:13
    हे काही फक्त स्टेडियम्ससाठीच नव्हे.
  • 9:13 - 9:15
    हे आपण खुल्या जागी
  • 9:15 - 9:17
    आणि रस्त्यांसाठी सुद्धा वापरू शकतो.
  • 9:17 - 9:18
    आम्ही मसदरमध्ये
  • 9:18 - 9:20
    "भविष्यातलं शहर" घडवत आहोत.
  • 9:20 - 9:21
    ते आहे संयुक्त अमिरातींमध्ये,
  • 9:21 - 9:22
    अबु धाबी येथे.
    तिथल्या
  • 9:22 - 9:24
    मध्यवर्ती संकुलावर काम करण्याचा
  • 9:24 - 9:26
    आनंद मला लाभला.
  • 9:26 - 9:28
    तिथेही हीच कल्पना वापरली.
  • 9:28 - 9:29
    खुल्या हवेत
  • 9:29 - 9:30
    आरामदायी वाटणारं
  • 9:30 - 9:32
    वातावरण निर्माण केलं.
  • 9:32 - 9:34
    लोक तिथे जास्त खूष असतात.
  • 9:34 - 9:36
    थंड हवा सोडून
    गारेगार केलेल्या
  • 9:36 - 9:37
    मॉलपेक्षाही जास्त.
  • 9:37 - 9:39
    आम्हाला एक खुली जागा बनवायची होती,
  • 9:39 - 9:41
    इतकी आरामदायी,
  • 9:41 - 9:42
    की जिथे लोक
  • 9:42 - 9:44
    भरदुपारी जातील,
  • 9:44 - 9:46
    अगदी कडक उन्हाळ्यातसुद्धा,
  • 9:46 - 9:48
    आणि आपल्या कुटुंबासहित
  • 9:48 - 9:50
    तिथे मजा करतील.
  • 9:50 - 9:51
    (टाळ्या )
  • 9:51 - 9:53
    तीच कल्पना:
  • 9:53 - 9:54
    उन्हापासून सावली,
  • 9:54 - 9:55
    वाऱ्यापासून रक्षण,
  • 9:55 - 9:59
    आणि सौरशक्तीचा वापर.
  • 9:59 - 10:02
    सौरशक्ती वापरून आपल्या
    ऊर्जेच्या वापराची
  • 10:02 - 10:03
    भरपाई.
  • 10:03 - 10:05
    आणि या सुरेख छत्र्या.
  • 10:05 - 10:09
    तर मी सुचवतो,
  • 10:09 - 10:12
    की आज रात्री आणि उद्या
  • 10:12 - 10:13
    आपल्याला भोवतालची हवा
  • 10:13 - 10:14
    किती सुखद वाटते,
  • 10:14 - 10:17
    याकडे लक्ष द्या.
  • 10:17 - 10:19
    जास्त माहितीसाठी आमच्या वेबसाईटला
  • 10:19 - 10:20
    भेट द्यायचं
  • 10:20 - 10:21
    मी आपल्याला आमंत्रण देतो.
  • 10:21 - 10:23
    जाणवणारे तापमान मोजण्यासाठी
  • 10:23 - 10:26
    आम्ही एक सुलभ कॅलक्युलेटर अपलोड केला आहे.
  • 10:26 - 10:27
    त्यामुळे खुली हवा
  • 10:27 - 10:28
    किती सुखद आहे ते मोजता येईल.
  • 10:28 - 10:31
    मला आशा वाटते,
    की तुम्ही आमची कल्पना
  • 10:31 - 10:33
    इतरांना सांगाल.
  • 10:33 - 10:35
    जर इंजिनियर्स आणि रचनाकारांनी
  • 10:35 - 10:36
    हवामानशास्त्रातले
  • 10:36 - 10:38
    हे सगळे घटक वापरले,
  • 10:38 - 10:41
    तर खरोखरच खुल्या जागेतली हवा
  • 10:41 - 10:44
    सुखद आणि आरामदायी करणं शक्य होईल.
  • 10:44 - 10:46
    तसंच खुल्या जागेत
  • 10:46 - 10:49
    शरीराला जाणवणारं
  • 10:49 - 10:51
    तापमान बदलता येईल.
  • 10:51 - 10:53
    हे सर्व
  • 10:53 - 10:55
    एखादी उत्तम
  • 10:55 - 10:57
    निष्क्रीय रचना
  • 10:57 - 11:00
    वापरून करता येईल,
  • 11:00 - 11:03
    तसंच कतारचा ऊर्जास्रोत वापरूनही.
  • 11:03 - 11:04
    म्हणजेच सूर्य.
  • 11:04 - 11:06
    (टाळ्या)
  • 11:06 - 11:08
    खूप खूप धन्यवाद. (टाळ्या)
  • 11:08 - 11:11
    शुक्रन.(टाळ्या)
Title:
खुल्या जागा वातानुकूलित कशा कराव्यात?
Speaker:
वुल्फगँग केसलिंग
Description:

कडक उन्हाळ्याच्या महिन्यांत, खुल्या जागेत एखादा खेळाचा सामना पाहणं किंवा एखादी मैफिल ऐकणं म्हणजे जणु उन्हात भाजून हैराण होणं. त्यावर तोडगा आहे. दोहा मधल्या टेड एक्स संमेलनात, भौतिकशास्त्रज्ञ वुल्फगँग केसलिंग सांगताहेत, नवनिर्मित स्वयंपोषी रचनांबद्दल. त्या वापरून आपण वरून आणि खालून हवा थंड करू शकतो, शिवाय भविष्यात वापरण्यासाठी सौरऊर्जा साठवू शकतो.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
11:35

Marathi subtitles

Revisions