Return to Video

Getting vaccines, medicines and tests ready for emergency use

  • 0:06 - 0:08
    रोगावरील लस, परीक्षणे आणि औषधे
    उपलब्ध करून देण्यास
  • 0:09 - 0:10
    खूप वेळ लागतो.
  • 0:10 - 0:13
    कोव्हिड-19 सारखी
    महामारी समोर असताना सुद्धा.
  • 0:14 - 0:16
    सर्वांना लगेच उपचार मिळावा यासाठी
  • 0:16 - 0:19
    डब्ल्यूएचओ यांनी आपत्कालीन वापर लिस्टिंग
    म्हणजेच आवालि तयार केले आहे.
  • 0:20 - 0:22
    तर पाहूया आवालि किंवा ईयूएल कसे काम करते.
  • 0:24 - 0:28
    लसी, औषधे आणि नैदिनिक चाचण्या
    लोकांसाठी सुलभ होतात त्या आधी
  • 0:28 - 0:30
    त्यांचे परीक्षण करणे गरजेचे असते
    ज्यामुळे हे कळते की
  • 0:30 - 0:34
    त्यांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि
    प्रभावकारकता योग्य पातळीची आहे.
  • 0:35 - 0:37
    अशाने संभाव्य इजेपासून लोकांचा बचाव होतो
  • 0:37 - 0:40
    आणि याची खात्री होते की
    ही उत्पादने त्यांचे काम चोख करतात :
  • 0:40 - 0:43
    आजारांवर प्रतिबंध करणे,
    चाचणी करणे आणि इलाज करणे.
  • 0:44 - 0:47
    पण अनेक देशांमध्ये
    ही महत्त्वाची कामे करण्यासाठी
  • 0:47 - 0:48
    पाहिजे तेवढी संसाधने नाहीत.
  • 0:48 - 0:51
    त्यामुळे जीवन-रक्षक उत्पादने
    अशा लोकांपर्यंत पोहोचण्यास
  • 0:51 - 0:53
    उशीर लागू शकतो ज्यांना त्यांची गरज असते.
  • 0:54 - 0:56
    नवीन आजारांच्या बाबतीत
    हे आव्हान जास्त कठीण होते,
  • 0:56 - 0:58
    जसे कोव्हिड-19 साठी.
  • 0:58 - 1:01
    नवीन कोव्हिड-19 उत्पादनांची
    योग्य चाचणी करावी लागते,
  • 1:01 - 1:02
    संपूर्णपणे आणि लवकर,
  • 1:02 - 1:04
    ती प्रभावी आणि सुरक्षित आहेत
    याची खात्री करण्यासाठी
  • 1:06 - 1:07
    हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी
  • 1:07 - 1:11
    डब्ल्यूएचओ यांनी
    ईयूएल याची स्थापना केली आहे
  • 1:11 - 1:14
    ज्याने आरोग्य-विषयक उत्पादनांचे मूल्यांकन
  • 1:14 - 1:16
    जोखीम आणि फायदे यासाठी केले जाते.
  • 1:17 - 1:18
    चाचणींसाठी,
  • 1:18 - 1:21
    आम्ही गुणवत्ता, सुरक्षितता आणि
    प्रदर्शनाची उपलब्ध आकडेवारी तपासतो
  • 1:21 - 1:22
    स्वतंत्र तज्ज्ञ हे करतात.
  • 1:23 - 1:26
    कोव्हिड-19 च्या अनेक चाचण्या
    आमच्या नियमांप्रमाणे आहेत
  • 1:27 - 1:28
    आणि त्यांना वापराची परवानगी आहे.
  • 1:29 - 1:31
    लसी आणि औषधांसाठी
  • 1:31 - 1:33
    आम्ही सुरक्षितते संबंधी, प्रभाव आणि
  • 1:33 - 1:36
    गुणवत्ते संबंधी
    नैदानिक चाचण्यांची आकडेवारी तपासतो.
  • 1:36 - 1:39
    आम्ही तपासणीसाठी
    राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणांतून
  • 1:39 - 1:40

    तज्ज्ञांना सुद्धा बोलावतो.
  • 1:40 - 1:42
    एखादी लस, औषध किंवा चाचणी
  • 1:43 - 1:45
    आपत्कालीन वापरासाठी लिस्ट झाल्यावर आम्ही
  • 1:45 - 1:48
    त्यांचे फायदे समजावून सांगण्यासाठी
    आणि निरनिराळ्या देशांमध्ये त्यांना
  • 1:48 - 1:51
    मंजुरी मिळण्यासाठी आमचे भागीदार
    आणि तज्ज्ञांसोबत काम करतो.
  • 1:52 - 1:54
    आमचे काम एवढेच नाही.
  • 1:54 - 1:58
    डब्ल्यूएचओ सर्व उत्पादनांच्या गुणवत्तेचे
    नियमित परीक्षण करीत राहणार.
  • 1:59 - 1:59
    आमचे उद्दिष्ट :
  • 1:59 - 2:02
    संपूर्ण जगातील देशांना उच्च गुणवत्तेच्या,
  • 2:02 - 2:03
    सुरक्षित आणि प्रभावी लसी,
  • 2:03 - 2:06
    चाचण्या आणि औषधे पुरवण्यासाठी
  • 2:06 - 2:08
    शक्य तेवढी आणि शक्य तेवढ्या लवकर मदत करणे.
Title:
Getting vaccines, medicines and tests ready for emergency use
Description:

more » « less
Video Language:
English
Team:
Amplifying Voices
Project:
COVID-19 Pandemic
Duration:
02:19

Marathi subtitles

Revisions Compare revisions