1 00:00:01,430 --> 00:00:02,474 गुड इव्हिनिंग. 2 00:00:02,474 --> 00:00:04,409 इथे आपण या सुरेख, खुल्या 3 00:00:04,409 --> 00:00:06,289 अँफीथिएटर मध्ये 4 00:00:06,289 --> 00:00:08,043 संध्याकाळच्या 5 00:00:08,043 --> 00:00:09,745 सुखद हवेचा 6 00:00:09,745 --> 00:00:11,033 आनंद घेत आहोत. 7 00:00:11,033 --> 00:00:15,350 पण १० वर्षांनंतर 8 00:00:15,350 --> 00:00:16,892 कतार मध्ये जेव्हा 9 00:00:16,892 --> 00:00:18,737 फुटबॉल विश्व् करंडक सामने होतील, 10 00:00:18,737 --> 00:00:20,209 २०२२ मध्ये, 11 00:00:20,209 --> 00:00:21,441 आम्हाला ठाऊक आहे, की 12 00:00:21,441 --> 00:00:25,089 तेव्हा खूप खूप ऊन आणि उकाडा असेल. 13 00:00:25,089 --> 00:00:27,433 जून आणि जुलै महिन्यांतला कडक उन्हाळा. 14 00:00:27,433 --> 00:00:29,746 विश्व् करंडकासाठी जेव्हा 15 00:00:29,746 --> 00:00:31,377 कतारची निवड झाली , 16 00:00:31,377 --> 00:00:33,278 तेव्हा जगभरातल्या 17 00:00:33,278 --> 00:00:34,629 अनेक लोकांना प्रश्न पडला, 18 00:00:34,629 --> 00:00:36,852 या वाळवंटी हवामानात, 19 00:00:36,852 --> 00:00:39,013 खेळाडू आपला नेत्रदीपक खेळ 20 00:00:39,013 --> 00:00:40,218 कसा खेळणार? 21 00:00:40,218 --> 00:00:41,749 इतक्या उकाड्यात, 22 00:00:41,749 --> 00:00:44,644 प्रेक्षक खुल्या मैदानांत बसून 23 00:00:44,644 --> 00:00:47,636 खेळाचा आनंद कसा लुटणार? 24 00:00:47,636 --> 00:00:50,845 हे शक्य आहे का? 25 00:00:50,845 --> 00:00:52,486 अल्बर्ट स्पियर अँड पार्टनर 26 00:00:52,486 --> 00:00:54,428 यांच्या आर्किटेक्ट्स बरोबर, 27 00:00:54,428 --> 00:00:56,284 ट्रान्ससोलर मधले आमचे इंजिनियर्स 28 00:00:56,284 --> 00:00:58,068 खुले स्टेडियम्स उभारताहेत. 29 00:00:58,068 --> 00:01:01,731 तिथली हवा थंड ठेवण्यासाठी 30 00:01:01,731 --> 00:01:06,165 १०० टक्के सौरशक्ती वापरण्यात येत आहे. 31 00:01:06,165 --> 00:01:07,572 मी त्याविषयी बोलणार आहे, 32 00:01:07,572 --> 00:01:09,236 पण आधी आरामापासून सुरुवात करू. 33 00:01:09,236 --> 00:01:10,547 आरामशीर 34 00:01:10,547 --> 00:01:12,253 म्हणजे काय ते आधी पाहू. 35 00:01:12,253 --> 00:01:15,275 अनेक लोक भोवतालचं तापमान 36 00:01:15,275 --> 00:01:17,429 आणि सुखद हवामान 37 00:01:17,429 --> 00:01:19,157 यात गल्लत करतात. 38 00:01:19,157 --> 00:01:20,685 हे असे तक्ते आम्ही नेहमी पाहतो, 39 00:01:20,685 --> 00:01:22,676 आणि ही लाल रेषा दिसते आहे, 40 00:01:22,676 --> 00:01:24,028 ती जून आणि जुलै मधलं 41 00:01:24,028 --> 00:01:25,510 तापमान दाखवते. आणि हो, खरंच, 42 00:01:25,510 --> 00:01:27,781 ते ४५ डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचलं आहे. 43 00:01:27,781 --> 00:01:30,621 खरंच खूप उकाडा आहे. 44 00:01:30,621 --> 00:01:33,140 पण केवळ हवेचं तापमान हा एकच निकष वापरून, 45 00:01:33,140 --> 00:01:34,741 ती किती सुखद आहे, 46 00:01:34,741 --> 00:01:37,154 हे ठरवता येत नाही. 47 00:01:37,154 --> 00:01:39,045 माझ्या एका सहकाऱ्याने केलेलं 48 00:01:39,045 --> 00:01:42,573 विश्लेषण तुम्हाला दाखवतो. 49 00:01:42,573 --> 00:01:45,149 त्याने जगभरातले अनेक फुटबॉल विश्व् करंडक, 50 00:01:45,149 --> 00:01:47,061 ऑलिम्पिक सामने विचारात घेतले. 51 00:01:47,061 --> 00:01:48,357 तिथल्या 52 00:01:48,357 --> 00:01:49,788 प्रेक्षकांना जाणवलेला 53 00:01:49,788 --> 00:01:52,588 हवेचा सुखदपणा पाहिला 54 00:01:52,588 --> 00:01:54,292 आणि त्याचं विश्लेषण केलं. 55 00:01:54,292 --> 00:01:56,141 आपण मेक्सिकोपासून सुरुवात करू. 56 00:01:56,141 --> 00:01:57,710 मेक्सिकोतलं तापमान, 57 00:01:57,710 --> 00:01:59,414 हवेचं उष्णतामान, 58 00:01:59,414 --> 00:02:02,461 साधारण १५ ते ३० डिग्री सेल्सियस पर्यंत असे 59 00:02:02,461 --> 00:02:04,237 आणि लोक मजेत असत. 60 00:02:04,237 --> 00:02:06,109 मेक्सिको सिटीतला सामना 61 00:02:06,109 --> 00:02:08,404 लोकांनी आरामात पाहिला. हा पहा. 62 00:02:08,404 --> 00:02:10,837 ओरलँडो. तशाच प्रकारचं 63 00:02:10,837 --> 00:02:13,398 खुलं स्टेडियम. 64 00:02:13,398 --> 00:02:16,142 लोक तळपत्या उन्हात बसले होते. 65 00:02:16,142 --> 00:02:17,989 भरदुपारी, अत्यंत दमट हवेत. 66 00:02:17,989 --> 00:02:19,104 ते आरामात बसून 67 00:02:19,104 --> 00:02:20,910 सामन्याचा आनंद लुटू शकले नाहीत. 68 00:02:20,910 --> 00:02:22,877 या सामन्यांच्या वेळी तापमान जास्त नव्हतं, 69 00:02:22,877 --> 00:02:25,725 पण तरीही तिथे आरामात बसता येत नव्हतं. 70 00:02:25,725 --> 00:02:27,420 आणि सेऊल? 71 00:02:27,420 --> 00:02:29,852 प्रक्षेपण हक्कांच्या सोयीसाठी 72 00:02:29,852 --> 00:02:31,157 तिथले सगळे सामने 73 00:02:31,157 --> 00:02:32,684 संध्याकाळी उशिरा सुरु होत. 74 00:02:32,684 --> 00:02:35,077 सूर्यास्त होऊन गेलेला असल्याने 75 00:02:35,077 --> 00:02:37,637 त्यावेळची हवा सुखद वाटे. 76 00:02:37,637 --> 00:02:40,501 अथेन्समध्ये काय झालं? 77 00:02:40,501 --> 00:02:42,790 भूमध्य प्रदेशातलं हवामान. 78 00:02:42,790 --> 00:02:45,516 पण त्या उन्हात हवा आरामदायी भासली नाही. 79 00:02:45,516 --> 00:02:47,157 आणि स्पेन मुळे आपण जाणतो, 80 00:02:47,157 --> 00:02:49,669 "ऊन आणि सावली". 81 00:02:49,669 --> 00:02:51,837 सावलीतलं तिकीट हवं असेल, 82 00:02:51,837 --> 00:02:53,549 तर जास्त किंमत द्यावी लागते. 83 00:02:53,549 --> 00:02:55,757 कारण तिथली हवा 84 00:02:55,757 --> 00:02:59,518 जास्त आरामदायी असते. 85 00:02:59,518 --> 00:03:00,797 आणि बीजिंग? 86 00:03:00,797 --> 00:03:03,461 पुन्हा, दिवसभर ऊन 87 00:03:03,461 --> 00:03:05,189 आणि अतिशय दमट. 88 00:03:05,189 --> 00:03:06,452 आणि ते आरामदायी नव्हतं. 89 00:03:06,452 --> 00:03:07,732 जर मी हे सगळं एकत्र आणलं, 90 00:03:07,732 --> 00:03:09,421 आणि तुम्ही सगळी माहिती एकत्र पाहिली 91 00:03:09,421 --> 00:03:11,340 तर असं दिसेल, की 92 00:03:11,340 --> 00:03:13,596 हवेचं तापमान साधारण 93 00:03:13,596 --> 00:03:17,430 २५ ते ३५ च्या दरम्यान होतं. 94 00:03:17,430 --> 00:03:19,334 आणि जर तुम्ही 95 00:03:19,334 --> 00:03:22,093 ३० डिग्री सेल्सियसची 96 00:03:22,093 --> 00:03:23,542 रेषा पाहिली, तर 97 00:03:23,542 --> 00:03:25,195 त्या रेषेवर 98 00:03:25,195 --> 00:03:27,716 खुल्या वातावरणातली 99 00:03:27,716 --> 00:03:29,949 हवा सुखद भासण्याचे 100 00:03:29,949 --> 00:03:31,758 सर्व प्रकार दिसतील. 101 00:03:31,758 --> 00:03:32,943 अत्यंत सुखद हवेपासून 102 00:03:32,943 --> 00:03:34,814 अगदी खराब हवेपर्यंत. 103 00:03:34,814 --> 00:03:37,663 तर असं का? 104 00:03:37,663 --> 00:03:39,359 कारण, 105 00:03:39,359 --> 00:03:41,446 हवा सुखद भासते ती 106 00:03:41,446 --> 00:03:43,352 अनेक घटकांच्या प्रभावामुळे. 107 00:03:43,352 --> 00:03:45,745 पहिला घटक आहे सूर्य. 108 00:03:45,745 --> 00:03:48,233 प्रत्यक्ष सूर्यप्रकाश आणि ऊन. 109 00:03:48,233 --> 00:03:50,921 दुसरा घटक, वारा. मंद वारा, जोराचा वारा. 110 00:03:50,921 --> 00:03:53,207 तिसरा घटक, हवेची आर्द्रता. 111 00:03:53,207 --> 00:03:55,436 चौथा घटक, सभोवतालच्या वातावरणातून 112 00:03:55,436 --> 00:03:57,543 प्रसारित होणारं तापमान. 113 00:03:57,543 --> 00:03:59,224 आणि हे आहे हवेचं तापमान. 114 00:03:59,224 --> 00:04:00,203 आपल्या शरीराला 115 00:04:00,203 --> 00:04:02,257 वाटण्याऱ्या सुखद भावनेवर 116 00:04:02,257 --> 00:04:03,890 या सगळ्या घटकांचा परिणाम होतो. 117 00:04:03,890 --> 00:04:06,243 शास्त्रज्ञांनी एक घटक निर्माण केला आहे, 118 00:04:06,243 --> 00:04:07,746 जाणवणारे तापमान. 119 00:04:07,746 --> 00:04:09,871 यात हे सर्व घटक येतात. 120 00:04:09,871 --> 00:04:12,127 आणि त्यामुळे रचनाकारांना समजतं, 121 00:04:12,127 --> 00:04:15,034 की यापैकी 122 00:04:15,034 --> 00:04:17,168 नेमक्या कोणत्या घटकामुळे 123 00:04:17,168 --> 00:04:18,800 हवा सुखद वाटली 124 00:04:18,800 --> 00:04:20,279 किंवा खराब वाटली. 125 00:04:20,279 --> 00:04:21,912 नेमका कोणता घटक 126 00:04:21,912 --> 00:04:23,264 "जाणवणारे तापमान" ठरवतो? 127 00:04:23,264 --> 00:04:25,924 आणि हे हवामानविषयक घटक 128 00:04:25,924 --> 00:04:27,592 मानवी चयापचयाशी 129 00:04:27,592 --> 00:04:31,752 निगडित आहेत. 130 00:04:31,752 --> 00:04:33,991 आपल्या चयापचयामुळे 131 00:04:33,991 --> 00:04:35,944 आपण 132 00:04:35,944 --> 00:04:37,584 उष्णता निर्माण करतो. 133 00:04:37,584 --> 00:04:39,099 मी इथे उत्साहित अवस्थेत आहे, 134 00:04:39,099 --> 00:04:40,745 तुमच्याशी बोलतो आहे. या क्षणी 135 00:04:40,745 --> 00:04:41,856 मी साधारण १५० वँट 136 00:04:41,856 --> 00:04:43,192 निर्माण करत असेन. 137 00:04:43,192 --> 00:04:44,880 तुम्ही शांत बसून मला बघत आहात. 138 00:04:44,880 --> 00:04:46,227 तुम्ही प्रत्येकी 139 00:04:46,227 --> 00:04:48,161 १०० वँट निर्माण करत असाल. 140 00:04:48,161 --> 00:04:50,160 ही ऊर्जा शरीरापासून दूर न्यायला हवी. 141 00:04:50,160 --> 00:04:51,911 ती तशी दूर नेणं, 142 00:04:51,911 --> 00:04:53,413 ही शारीरिक गरज आहे. 143 00:04:53,413 --> 00:04:55,384 ती दूर नेणं जेवढं जास्त कठीण होईल, 144 00:04:55,384 --> 00:04:57,464 तेवढा शरीराला वाटणारा 145 00:04:57,464 --> 00:04:59,703 आराम कमी होईल. 146 00:04:59,703 --> 00:05:02,019 आणि ही ऊर्जा जर शरीरापासून दूर 147 00:05:02,019 --> 00:05:03,161 गेलीच नाही, 148 00:05:03,161 --> 00:05:04,600 तर मरण ओढवेल. 149 00:05:04,600 --> 00:05:08,952 फुटबॉल विश्वचषकाच्या वेळी काय घडतं ते 150 00:05:08,952 --> 00:05:11,200 आपण जर एकत्रितरीत्या पाहिलं, 151 00:05:11,200 --> 00:05:12,969 तर, जून आणि जुलै महिन्यात काय घडेल 152 00:05:12,969 --> 00:05:13,896 ते आपण पाहू शकू. 153 00:05:13,896 --> 00:05:15,776 हवेचं तापमान बरंच जास्त असेल. 154 00:05:15,776 --> 00:05:17,432 पण खेळ आणि सामने 155 00:05:17,432 --> 00:05:19,952 दुपारी असतील. 156 00:05:19,952 --> 00:05:21,785 त्यामुळे तिथली हवा, 157 00:05:21,785 --> 00:05:23,432 खराब ठरवल्या गेलेल्या 158 00:05:23,432 --> 00:05:24,928 इतर ठिकाणच्या 159 00:05:24,928 --> 00:05:26,639 हवेसारखीच असेल. 160 00:05:26,639 --> 00:05:28,783 म्हणून आम्ही एका टीमबरोबर बसून 161 00:05:28,783 --> 00:05:31,113 एक ध्येय ठरवलं. 162 00:05:31,113 --> 00:05:33,888 खुल्या मैदानात 163 00:05:33,888 --> 00:05:35,847 हवेचं उष्णतामान 164 00:05:35,847 --> 00:05:38,490 ३२ डिग्री सेल्सियस असताना 165 00:05:38,490 --> 00:05:40,161 जे शक्य असेल त्यापैकी 166 00:05:40,161 --> 00:05:43,364 सर्वाधिक आरामदायी 167 00:05:43,364 --> 00:05:44,985 वाटणारं तापमान 168 00:05:44,985 --> 00:05:47,145 मिळवण्याचं ध्येय. 169 00:05:47,145 --> 00:05:49,738 खुल्या मोकळ्या वातावरणात 170 00:05:49,738 --> 00:05:51,632 लोकांना खरंच खूप छान वाटेल. 171 00:05:51,632 --> 00:05:53,591 पण याचा अर्थ काय? 172 00:05:53,591 --> 00:05:55,640 इथे नुसतं पहा, 173 00:05:55,640 --> 00:05:57,751 तापमान खूप जास्त आहे. 174 00:05:57,751 --> 00:06:00,544 कितीही चांगली स्थापत्यशास्त्रीय किंवा 175 00:06:00,544 --> 00:06:02,008 हवामानशास्त्रीय रचना वापरली 176 00:06:02,008 --> 00:06:04,111 तरीही फारसा फरक पडणार नाही. 177 00:06:04,111 --> 00:06:06,832 म्हणजे आपल्याला काहीतरी क्रिया घडवून आणली पाहिजे. 178 00:06:06,832 --> 00:06:08,702 उदाहरणार्थ, आपल्याला 179 00:06:08,702 --> 00:06:10,798 रेडियन्ट कूलिंग टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. 180 00:06:10,798 --> 00:06:12,687 आणि ती तथाकथित सॉफ्ट कँडीशनिंग 181 00:06:12,687 --> 00:06:14,904 बरोबर वापरली पाहिजे. 182 00:06:14,904 --> 00:06:16,340 तर स्टेडियम मध्ये हे कसं असेल? 183 00:06:16,340 --> 00:06:18,668 स्टेडियम मध्ये खुल्या हवेतला 184 00:06:18,668 --> 00:06:20,413 आरामशीरपणा वाढवणारे 185 00:06:20,413 --> 00:06:21,655 काही घटक असतील. 186 00:06:21,655 --> 00:06:23,891 पहिला घटक, सावली. 187 00:06:23,891 --> 00:06:26,205 दुसरा घटक, 188 00:06:26,205 --> 00:06:27,869 जोरदार गरम वाऱ्यापासून 189 00:06:27,869 --> 00:06:29,068 संरक्षण. 190 00:06:29,068 --> 00:06:30,707 पण इतकं पुरणार नाही. 191 00:06:30,707 --> 00:06:33,718 आपल्याला काहीतरी क्रिया 192 00:06:33,718 --> 00:06:35,887 घडवून आणली पाहिजे. 193 00:06:35,887 --> 00:06:38,327 थंड वाऱ्याचा झंझावात 194 00:06:38,327 --> 00:06:40,702 स्टेडियममध्ये सोडण्याऐवजी 195 00:06:40,702 --> 00:06:42,450 आपण उष्णता दूर नेणारं 196 00:06:42,450 --> 00:06:44,484 तंत्रज्ञान वापरू शकतो. 197 00:06:44,484 --> 00:06:46,684 जमीन गरम ठेवण्यासाठी जसे 198 00:06:46,684 --> 00:06:49,067 जमिनीत गाडलेले पाण्याचे पाईप्स वापरतात, तसंच. 199 00:06:49,067 --> 00:06:50,885 केवळ त्या पाईप्स मधून थंड पाणी सोडून, 200 00:06:50,885 --> 00:06:52,213 त्यातून दिवसभरात 201 00:06:52,213 --> 00:06:53,869 स्टेडियममध्ये शोषली गेलेली 202 00:06:53,869 --> 00:06:55,949 उष्णता आपण बाहेर टाकू शकतो. 203 00:06:55,949 --> 00:06:57,186 अशा रीतीने आपण तिथली 204 00:06:57,186 --> 00:06:59,069 हवा आरामदायी बनवू शकतो. 205 00:06:59,069 --> 00:07:01,629 आणि मग थंड नव्हे, 206 00:07:01,629 --> 00:07:03,861 तर कोरडी हवा तिथे सोडल्यावर, 207 00:07:03,861 --> 00:07:05,743 प्रत्येक प्रेक्षक आणि खेळाडूला 208 00:07:05,743 --> 00:07:08,076 आपापल्या आवडीनुसार 209 00:07:08,076 --> 00:07:09,853 आणि ऊर्जेच्या पातळीनुसार 210 00:07:09,853 --> 00:07:11,509 हवा सुखद वाटेल. 211 00:07:11,509 --> 00:07:13,486 ते त्या वातावरणाला सरावतील 212 00:07:13,486 --> 00:07:15,861 आणि आराम अनुभवतील. 213 00:07:15,861 --> 00:07:20,317 साधारण १२ स्टेडियम्स 214 00:07:20,317 --> 00:07:22,277 बनणार आहेत. 215 00:07:22,277 --> 00:07:24,596 आणि ३२ प्रशिक्षण खेळपट्ट्या, 216 00:07:24,596 --> 00:07:26,293 जिथे सर्व सहभागी देश 217 00:07:26,293 --> 00:07:27,477 प्रशिक्षण घेतील. 218 00:07:27,477 --> 00:07:29,374 आम्ही हीच मूळ कल्पना वापरली. 219 00:07:29,374 --> 00:07:31,604 प्रशिक्षण खेळपट्टीवर सावली, 220 00:07:31,604 --> 00:07:34,444 वाऱ्यापासून बचाव, 221 00:07:34,444 --> 00:07:36,333 आणि हिरवळीचा वापर. 222 00:07:36,333 --> 00:07:38,853 नैसर्गिकरीत्या पाणी दिलेली हिरवळ, 223 00:07:38,853 --> 00:07:40,332 हा उत्तम थंड करणारा घटक आहे. 224 00:07:40,332 --> 00:07:41,549 तर, तापमान स्थिर ठेवणे 225 00:07:41,549 --> 00:07:43,485 आणि कोरडी हवा तिथे सोडणे, 226 00:07:43,485 --> 00:07:44,564 यामुळे हवा सुखद होईल. 227 00:07:44,564 --> 00:07:48,438 पण निष्क्रीय रचना उत्तम असली, 228 00:07:48,438 --> 00:07:49,184 तरी निरुपयोगी. 229 00:07:49,184 --> 00:07:50,194 सक्रिय रचना हवी. 230 00:07:50,194 --> 00:07:51,244 आणि हे कसं करायचं? 231 00:07:51,244 --> 00:07:53,612 आमची कल्पना होती, 232 00:07:53,612 --> 00:07:55,349 १००% सौरशक्तीने हवा थंड करण्याची. 233 00:07:55,349 --> 00:07:57,444 त्यामागची कल्पना होती, 234 00:07:57,444 --> 00:07:59,084 स्टेडियम्सची छपरं 235 00:07:59,084 --> 00:08:01,027 पीव्ही सिस्टिम्सनी 236 00:08:01,027 --> 00:08:02,619 झाकून टाकण्याची. 237 00:08:02,619 --> 00:08:05,179 आम्ही भूतकाळात बनवलेली ऊर्जा 238 00:08:05,179 --> 00:08:06,603 वापरणार नाही. 239 00:08:06,603 --> 00:08:08,396 आम्ही खनिज ऊर्जा वापरणार नाही. 240 00:08:08,396 --> 00:08:10,212 आमच्या शेजारी देशांची ऊर्जा 241 00:08:10,212 --> 00:08:11,268 उधार घेणार नाही. 242 00:08:11,268 --> 00:08:13,388 आम्ही तीच ऊर्जा वापरू, 243 00:08:13,388 --> 00:08:16,148 जी छपरावर निर्माण करता येईल. 244 00:08:16,148 --> 00:08:18,235 आणि प्रशिक्षण खेळपट्टयांवरही, 245 00:08:18,235 --> 00:08:20,907 त्यांवर मोठे लवचिक पापुद्रे पसरून. 246 00:08:20,907 --> 00:08:22,620 पुढील काही वर्षांत 247 00:08:22,620 --> 00:08:24,324 हा उद्योग फोफावेल. 248 00:08:24,324 --> 00:08:25,507 लवचिक फोटोव्होल्टाइक्सचा 249 00:08:25,507 --> 00:08:27,132 प्रखर उन्हात सावली देण्याची 250 00:08:27,132 --> 00:08:28,909 आणि त्याचवेळी 251 00:08:28,909 --> 00:08:30,589 विद्युत ऊर्जा निर्माण करण्याची 252 00:08:30,589 --> 00:08:33,084 शक्यता असणारा. 253 00:08:33,084 --> 00:08:34,795 ही ऊर्जा वर्षभर निर्माण होईल 254 00:08:34,795 --> 00:08:36,427 आणि ती विजेच्या ग्रिडमध्ये 255 00:08:36,427 --> 00:08:37,995 पाठवली जाईल. 256 00:08:37,995 --> 00:08:39,980 ग्रिडमधला खनिज वापर 257 00:08:39,980 --> 00:08:42,131 ती कमी करेल. 258 00:08:42,131 --> 00:08:45,028 जेव्हा हवा थंड करण्यासाठी 259 00:08:45,028 --> 00:08:46,845 ऊर्जेची गरज भासेल, 260 00:08:46,845 --> 00:08:49,212 तेव्हा आम्ही ती ग्रिडमधून घेऊ. 261 00:08:49,212 --> 00:08:51,284 जी सौर ऊर्जा आम्ही ग्रिडमध्ये पाठवली होती, 262 00:08:51,284 --> 00:08:52,572 तीच आम्ही गरजेनुसार 263 00:08:52,572 --> 00:08:53,404 परत घेऊ. 264 00:08:53,404 --> 00:08:54,827 हे आम्ही पहिल्याच वर्षात 265 00:08:54,827 --> 00:08:55,875 करू शकतो. आणि 266 00:08:55,875 --> 00:08:57,179 पुढल्या १० वर्षांत 267 00:08:57,179 --> 00:08:59,044 आम्ही त्याचं संतुलन करू शकतो. 268 00:08:59,044 --> 00:09:01,667 आणि विश्वचषक स्पर्धा पार पाडण्यास 269 00:09:01,667 --> 00:09:03,366 गरजेची अशी ही ऊर्जा 270 00:09:03,366 --> 00:09:05,325 त्यापुढली २० वर्षं 271 00:09:05,325 --> 00:09:07,906 कतारच्या ग्रिड मध्ये पाठवली जाईल. 272 00:09:07,906 --> 00:09:09,119 (टाळ्या) 273 00:09:09,119 --> 00:09:10,223 खूप धन्यवाद. (टाळ्या) 274 00:09:10,223 --> 00:09:12,904 हे काही फक्त स्टेडियम्ससाठीच नव्हे. 275 00:09:12,904 --> 00:09:14,879 हे आपण खुल्या जागी 276 00:09:14,879 --> 00:09:17,288 आणि रस्त्यांसाठी सुद्धा वापरू शकतो. 277 00:09:17,288 --> 00:09:18,471 आम्ही मसदरमध्ये 278 00:09:18,471 --> 00:09:19,840 "भविष्यातलं शहर" घडवत आहोत. 279 00:09:19,840 --> 00:09:21,227 ते आहे संयुक्त अमिरातींमध्ये, 280 00:09:21,227 --> 00:09:22,487 अबु धाबी येथे. तिथल्या 281 00:09:22,487 --> 00:09:24,199 मध्यवर्ती संकुलावर काम करण्याचा 282 00:09:24,199 --> 00:09:25,503 आनंद मला लाभला. 283 00:09:25,503 --> 00:09:27,638 तिथेही हीच कल्पना वापरली. 284 00:09:27,638 --> 00:09:29,344 खुल्या हवेत 285 00:09:29,344 --> 00:09:30,495 आरामदायी वाटणारं 286 00:09:30,495 --> 00:09:31,751 वातावरण निर्माण केलं. 287 00:09:31,751 --> 00:09:33,951 लोक तिथे जास्त खूष असतात. 288 00:09:33,951 --> 00:09:35,720 थंड हवा सोडून गारेगार केलेल्या 289 00:09:35,720 --> 00:09:36,904 मॉलपेक्षाही जास्त. 290 00:09:36,904 --> 00:09:38,983 आम्हाला एक खुली जागा बनवायची होती, 291 00:09:38,983 --> 00:09:40,520 इतकी आरामदायी, 292 00:09:40,520 --> 00:09:42,487 की जिथे लोक 293 00:09:42,487 --> 00:09:44,064 भरदुपारी जातील, 294 00:09:44,064 --> 00:09:46,188 अगदी कडक उन्हाळ्यातसुद्धा, 295 00:09:46,188 --> 00:09:48,180 आणि आपल्या कुटुंबासहित 296 00:09:48,180 --> 00:09:49,526 तिथे मजा करतील. 297 00:09:49,526 --> 00:09:51,332 (टाळ्या ) 298 00:09:51,332 --> 00:09:52,679 तीच कल्पना: 299 00:09:52,679 --> 00:09:54,116 उन्हापासून सावली, 300 00:09:54,116 --> 00:09:55,387 वाऱ्यापासून रक्षण, 301 00:09:55,387 --> 00:09:59,211 आणि सौरशक्तीचा वापर. 302 00:09:59,211 --> 00:10:01,924 सौरशक्ती वापरून आपल्या ऊर्जेच्या वापराची 303 00:10:01,924 --> 00:10:03,019 भरपाई. 304 00:10:03,019 --> 00:10:05,028 आणि या सुरेख छत्र्या. 305 00:10:05,028 --> 00:10:09,316 तर मी सुचवतो, 306 00:10:09,316 --> 00:10:11,684 की आज रात्री आणि उद्या 307 00:10:11,684 --> 00:10:13,348 आपल्याला भोवतालची हवा 308 00:10:13,348 --> 00:10:14,395 किती सुखद वाटते, 309 00:10:14,395 --> 00:10:17,084 याकडे लक्ष द्या. 310 00:10:17,084 --> 00:10:18,891 जास्त माहितीसाठी आमच्या वेबसाईटला 311 00:10:18,891 --> 00:10:20,013 भेट द्यायचं 312 00:10:20,013 --> 00:10:21,292 मी आपल्याला आमंत्रण देतो. 313 00:10:21,292 --> 00:10:23,436 जाणवणारे तापमान मोजण्यासाठी 314 00:10:23,436 --> 00:10:25,548 आम्ही एक सुलभ कॅलक्युलेटर अपलोड केला आहे. 315 00:10:25,548 --> 00:10:26,540 त्यामुळे खुली हवा 316 00:10:26,540 --> 00:10:27,955 किती सुखद आहे ते मोजता येईल. 317 00:10:27,955 --> 00:10:31,427 मला आशा वाटते, की तुम्ही आमची कल्पना 318 00:10:31,427 --> 00:10:32,749 इतरांना सांगाल. 319 00:10:32,749 --> 00:10:34,755 जर इंजिनियर्स आणि रचनाकारांनी 320 00:10:34,755 --> 00:10:36,267 हवामानशास्त्रातले 321 00:10:36,267 --> 00:10:38,228 हे सगळे घटक वापरले, 322 00:10:38,228 --> 00:10:41,235 तर खरोखरच खुल्या जागेतली हवा 323 00:10:41,235 --> 00:10:44,324 सुखद आणि आरामदायी करणं शक्य होईल. 324 00:10:44,324 --> 00:10:45,604 तसंच खुल्या जागेत 325 00:10:45,604 --> 00:10:48,733 शरीराला जाणवणारं 326 00:10:48,733 --> 00:10:50,611 तापमान बदलता येईल. 327 00:10:50,611 --> 00:10:52,699 हे सर्व 328 00:10:52,699 --> 00:10:55,091 एखादी उत्तम 329 00:10:55,091 --> 00:10:56,955 निष्क्रीय रचना 330 00:10:56,955 --> 00:11:00,131 वापरून करता येईल, 331 00:11:00,131 --> 00:11:03,115 तसंच कतारचा ऊर्जास्रोत वापरूनही. 332 00:11:03,115 --> 00:11:03,969 म्हणजेच सूर्य. 333 00:11:03,969 --> 00:11:06,485 (टाळ्या) 334 00:11:06,485 --> 00:11:08,010 खूप खूप धन्यवाद. (टाळ्या) 335 00:11:08,010 --> 00:11:10,714 शुक्रन.(टाळ्या)