1 00:00:00,000 --> 00:00:02,000 तर मी इथून सुरुवात करेन: 2 00:00:02,000 --> 00:00:04,000 दोन वर्षांपूर्वी एका आयोजकाचा मला फोन आला 3 00:00:04,000 --> 00:00:06,000 कारण मी त्यांच्यासाठी एक भाषण करणार होते 4 00:00:06,000 --> 00:00:08,000 तर फोनवर ती म्हणाली, 5 00:00:08,000 --> 00:00:10,000 "मला कळत नाहीये मी 6 00:00:10,000 --> 00:00:12,000 जाहिरातीत मी तुमच्याविषयी काय लिहू!" 7 00:00:12,000 --> 00:00:14,000 मी विचार केला, " बरं, नक्की काय अडचण आहे?" 8 00:00:14,000 --> 00:00:16,000 तेव्हा ती म्हणली, "हे बघा, मी तुम्हाला ऐकलंय, 9 00:00:16,000 --> 00:00:19,000 आणि मला वाटतं, मी तुम्हाला संशोधक म्हणू शकते, 10 00:00:19,000 --> 00:00:21,000 पण मला भीती वाटते की, तुम्हाला संशोधक म्हटलं तर कोणी येणार नाही, 11 00:00:21,000 --> 00:00:23,000 कारण त्यांना वाटेल की तुम्ही निरस आणि निरुपयोगी बोलाल." 12 00:00:23,000 --> 00:00:25,000 (हशा) 13 00:00:25,000 --> 00:00:27,000 मी म्हटलं, "ठीक आहे." 14 00:00:27,000 --> 00:00:29,000 मग ती म्हणाली, " मला तुमच्या भाषणातली आवडलेली गोष्ट अशी की 15 00:00:29,000 --> 00:00:31,000 तुम्ही एक गोष्ट सांगणाऱ्या आहात. 16 00:00:31,000 --> 00:00:34,000 म्हणून मला वाटतं मी तुम्हाला एक गोष्टी सांगणारी म्हणेन." 17 00:00:34,000 --> 00:00:37,000 आणि अर्थात, माझ्यातला असुरक्षित, बुद्धिवादी जागा झाला, 18 00:00:37,000 --> 00:00:39,000 मी म्हटलं, " तू काय म्हणणार आहेस मला?" 19 00:00:39,000 --> 00:00:42,000 आणि ती म्हणाली, " मी तुम्हाला गोष्ट सांगणारी बाई म्हणणार." 20 00:00:42,000 --> 00:00:45,000 मग मी म्हटलं, बाई गं, त्यापेक्षा सोनपरी कसं वाटेल?" 21 00:00:45,000 --> 00:00:48,000 (हशा) 22 00:00:48,000 --> 00:00:51,000 मी म्हटलं, "मला जरा यावर विचार करू दे." 23 00:00:51,000 --> 00:00:54,000 मी धीराने घ्यायचा प्रयत्न केला. 24 00:00:54,000 --> 00:00:57,000 आणि विचार केला, खरंतर, मी एक गोष्ट सांगणारीच आहे. 25 00:00:57,000 --> 00:00:59,000 मी गुणात्मक संशोधन करते. 26 00:00:59,000 --> 00:01:01,000 गोष्टी गोळा करते; तेच माझं काम आहे. 27 00:01:01,000 --> 00:01:04,000 आणि कदाचित गोष्ट म्हणजे आत्मा असलेली माहिती. 28 00:01:04,000 --> 00:01:06,000 आणि कदाचित मी एक गोष्ट सांगणारीच असेन. 29 00:01:06,000 --> 00:01:08,000 आणि म्हणून मी म्हटले, "असं करुया का? 30 00:01:08,000 --> 00:01:11,000 तू असं सांग की मी एक गोष्टी सांगणारी संशोधक आहे." 31 00:01:11,000 --> 00:01:14,000 त्यावर ती हसू लागली अन् म्हणली, " असं काही नसतंच." 32 00:01:14,000 --> 00:01:16,000 (हशा) 33 00:01:16,000 --> 00:01:18,000 तर, मी एक गोष्टी सांगणारी संशोधक आहे, 34 00:01:18,000 --> 00:01:20,000 आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे -- 35 00:01:20,000 --> 00:01:22,000 आपण बोलतोय जाणीवा विस्तारण्याविषयी -- 36 00:01:22,000 --> 00:01:24,000 आणि म्हणून मला बोलायचंय आणि काही गोष्टी सांगायच्या आहेत 37 00:01:24,000 --> 00:01:27,000 माझ्या एका संशोधन प्रकल्पातल्या 38 00:01:27,000 --> 00:01:30,000 ज्यानी माझ्या जाणीवा मुळापासून विस्तारल्या 39 00:01:30,000 --> 00:01:33,000 आणि माझ्या जगण्याच्या, प्रेमाच्या, कामाच्या आणि पालकत्वाच्या सवयी 40 00:01:33,000 --> 00:01:35,000 खरोखर बदलून टाकल्या. 41 00:01:35,000 --> 00:01:37,000 आणि माझी गोष्ट इथे सुरु होते. 42 00:01:37,000 --> 00:01:40,000 मी जेव्हा एक तरुण, पीएचडी करणारी, विद्यार्थी संशोधक होते, 43 00:01:40,000 --> 00:01:42,000 माझ्या पहिल्या वर्षी मला एक प्राध्यापक होते 44 00:01:42,000 --> 00:01:44,000 ज्यांनी आम्हाला सांगितलं, 45 00:01:44,000 --> 00:01:46,000 "हे बघा, 46 00:01:46,000 --> 00:01:49,000 जर तुम्ही एखादी गोष्ट मोजू शकत नसाल, तर ती गोष्ट अस्तित्वात नसते." 47 00:01:49,000 --> 00:01:52,000 मला वाटलं की ते माझी चेष्टा करत आहेत. 48 00:01:52,000 --> 00:01:55,000 मी म्हटलं, खरंच?" आणि ते म्हणाले, अगदी १००%" 49 00:01:55,000 --> 00:01:57,000 आणि तुमच्या माहितीसाठी 50 00:01:57,000 --> 00:01:59,000 मी समाजशास्त्राची पदवीधर आहे आणि त्यातच पदव्युत्तर शिक्षण घेतलंय, 51 00:01:59,000 --> 00:02:01,000 आणि मी समाजशास्त्रात पीएचडी करत होते, 52 00:02:01,000 --> 00:02:03,000 त्यामुळे माझ्या संपूर्ण शैक्षणिक कारकीर्दीत 53 00:02:03,000 --> 00:02:05,000 माझ्या आजूबाजूला अशी लोकं होती 54 00:02:05,000 --> 00:02:07,000 ज्यांचा विश्वास होता की, 55 00:02:07,000 --> 00:02:10,000 "जगणे गुंतागुंतीचे आहे, त्यावर प्रेम करा." 56 00:02:10,000 --> 00:02:12,000 आणि माझ्यामते, जगणे गुंतागुंतीचे असेल तर 57 00:02:12,000 --> 00:02:15,000 तो गुंता सोडवा, त्याचं वर्गीकरण करा 58 00:02:15,000 --> 00:02:17,000 आणि त्याला खाऊच्या डब्ब्यात ठेवून द्या." 59 00:02:17,000 --> 00:02:19,000 (हशा) 60 00:02:19,000 --> 00:02:22,000 आणि विचार केला तर वाटतं (तेव्हा) मला माझा मार्ग सापडला, 61 00:02:22,000 --> 00:02:25,000 एका अशा करीयरचा पाया रचला गेला ज्यात मी ओढली गेले 62 00:02:25,000 --> 00:02:28,000 खरोखर, समाजशास्त्रातल्या एका मोठ्या विधानानुसार 63 00:02:28,000 --> 00:02:31,000 (जे) आहे, "कामाच्या अवघडलेपणात स्वतःला झोकून द्या." 64 00:02:31,000 --> 00:02:34,000 आणि मी अशी आहे की, अवघड गोष्टीला भिडा 65 00:02:34,000 --> 00:02:36,000 जमिनीवर लोळवा आणि १००% मार्क मिळवा. 66 00:02:36,000 --> 00:02:39,000 हा माझा मंत्र होता. 67 00:02:39,000 --> 00:02:41,000 त्यामुळे मी अतिशय आतुर होते. 68 00:02:41,000 --> 00:02:44,000 आणि मी विचार केला की नक्कीच हे माझं करियर असेल, 69 00:02:44,000 --> 00:02:47,000 कारण मला गुंतागुंतीच्या विषयांमध्ये रस आहे. 70 00:02:47,000 --> 00:02:49,000 पण मला त्यांना सोपे (कमी किचकट) बनवायची इच्छा आहे. 71 00:02:49,000 --> 00:02:51,000 मला ते (विषय) समजून घ्यायचे आहेत. 72 00:02:51,000 --> 00:02:53,000 मला ह्या गोष्टींच्या अंतरंगात शिरायचे आहे 73 00:02:53,000 --> 00:02:55,000 ज्या मला माहित्येय की महत्वाच्या आहेत 74 00:02:55,000 --> 00:02:57,000 आणि मला त्या सर्वांसाठी उलगडून दाखवायच्या आहेत. 75 00:02:57,000 --> 00:03:00,000 तर मी सुरुवात केली नातेसंबंधांपासून. 76 00:03:00,000 --> 00:03:03,000 कारण दहा वर्षं समाजकार्यात घालवल्यावर 77 00:03:03,000 --> 00:03:05,000 तुमच्या लक्षात येतं की 78 00:03:05,000 --> 00:03:08,000 केवळ संबंधांमुळेच आपण इथे आहोत. 79 00:03:08,000 --> 00:03:11,000 त्यामुळेच आपल्या आयुष्याला हेतू आणि अर्थ प्राप्त होतो. 80 00:03:11,000 --> 00:03:13,000 सारे काही याबद्दलच आहे. 81 00:03:13,000 --> 00:03:15,000 याने काही फरक पडत नाही की तुम्ही अशा लोकांशी बोलताय 82 00:03:15,000 --> 00:03:18,000 जे सामाजिक न्यायासाठी काम करतात किंवा मानसिक स्वास्थ्य आणि छळ आणि दुर्लक्ष (यांत), 83 00:03:18,000 --> 00:03:20,000 आपल्याला कळत की नातेसंबंध, 84 00:03:20,000 --> 00:03:23,000 संबंध जोडण्याची क्षमता ही -- 85 00:03:23,000 --> 00:03:26,000 जी आपल्या जैविक संरचनेतच आहे -- 86 00:03:26,000 --> 00:03:28,000 त्यामुळेच आपण इथे आहोत. 87 00:03:28,000 --> 00:03:31,000 तेव्हा मी विचार केला की, चला, मी नाते संबंधांपासूनच सुरुवात करावी. 88 00:03:31,000 --> 00:03:34,000 तर, म्हणजे बघा 89 00:03:34,000 --> 00:03:36,000 जेव्हा तुमच्या बॉसकडून तुमचं मूल्यमापन होतं, 90 00:03:36,000 --> 00:03:39,000 आणि बॉस तुमच्याबद्दल ३७ चांगल्या गोष्टी सांगतो, 91 00:03:39,000 --> 00:03:41,000 आणि एक गोष्ट -- "ज्यात सुधारणेला वाव असतो?" 92 00:03:41,000 --> 00:03:43,000 (हशा) 93 00:03:43,000 --> 00:03:46,000 आणि तुम्ही त्या एकाच गोष्टीचा विचार करीत राहता, खरं ना? 94 00:03:47,000 --> 00:03:50,000 तर, माझ्या कामाच्या बाबतीतही असंच काहीसं झालं, 95 00:03:50,000 --> 00:03:53,000 कारण जेव्हा तुम्ही लोकांना प्रेमाविषयी विचारता, 96 00:03:53,000 --> 00:03:55,000 ते तुम्हाला प्रेमभंगाबद्दल सांगतात. 97 00:03:55,000 --> 00:03:57,000 जेव्हा तुम्ही लोकांना आपलेपणाबद्दल विचारता, 98 00:03:57,000 --> 00:04:00,000 ते तुम्हाला त्यांचे सर्वात वेदनामय असे वगळले 99 00:04:00,000 --> 00:04:02,000 जाण्याचे अनुभव सांगतात. 100 00:04:02,000 --> 00:04:04,000 आणि जेव्हा तुम्ही लोकांना संबंधांविषयी विचारता, 101 00:04:04,000 --> 00:04:07,000 लोकांनी मला तुटलेपणाच्या गोष्टी सांगितल्या. 102 00:04:07,000 --> 00:04:10,000 तर लवकरच -- खरंतर ६ आठवडे संशोधनात घालवल्यावर -- 103 00:04:10,000 --> 00:04:13,000 माझ्यासमोर एक अनामिक गोष्ट आली 104 00:04:13,000 --> 00:04:16,000 जिने नातेसंबंधांना अशाप्रकारे उलगडले 105 00:04:16,000 --> 00:04:19,000 जे मला समजत नव्हते किंवा (जे मी ) पाहिलेही नव्हते. 106 00:04:19,000 --> 00:04:21,000 आणि मग मी माझे काम थांबवले 107 00:04:21,000 --> 00:04:24,000 आणि विचार केला, मला ह्या गोष्टीचा छडा लावायला हवा. 108 00:04:24,000 --> 00:04:27,000 आणि ती गोष्ट निघाली शरम. 109 00:04:27,000 --> 00:04:29,000 आणि शरमेचा सोपा अर्थ होतो 110 00:04:29,000 --> 00:04:31,000 संबंध तुटण्याचे भय: 111 00:04:31,000 --> 00:04:33,000 माझ्याविषयी असे काहीतरी आहे का 112 00:04:33,000 --> 00:04:36,000 जे जर इतरांना कळले वा दिसले तर 113 00:04:36,000 --> 00:04:39,000 मी संबंध ठेवण्यालायक राहणार नाही? 114 00:04:39,000 --> 00:04:41,000 मी शरमेबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगू शकते: 115 00:04:41,000 --> 00:04:43,000 ती वैश्विक आहे; आपल्या सर्वांमध्ये असते. 116 00:04:43,000 --> 00:04:45,000 केवळ तीच लोकं बेशरम असतात 117 00:04:45,000 --> 00:04:47,000 ज्यांची माणुसकी वा नातेसंबंध ठेवण्याची क्षमता नसते. 118 00:04:47,000 --> 00:04:49,000 कोणी तिच्याबद्दल बोलू इच्छित नाही, 119 00:04:49,000 --> 00:04:52,000 आणि जितके कमी बोलाल तितकी ती जास्त वाटत असते. 120 00:04:54,000 --> 00:04:56,000 ह्या शरमेच्या मूळाशी काय असतं 121 00:04:56,000 --> 00:04:58,000 तर, "मी (यासाठी) लायक नाही," -- 122 00:04:58,000 --> 00:05:00,000 ही जाणीव आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे: 123 00:05:00,000 --> 00:05:02,000 " मी तितकासा स्पष्टवक्ता नाही, बारीक नाही, 124 00:05:02,000 --> 00:05:04,000 श्रीमंत नाही, सुंदर नाही, हुशार नाही, 125 00:05:04,000 --> 00:05:06,000 वरचढ नाही." 126 00:05:06,000 --> 00:05:08,000 आणि ह्या साऱ्याच्या मूळाशी होती ती 127 00:05:08,000 --> 00:05:11,000 अत्यंत वेदनादायी अगतिकता, 128 00:05:11,000 --> 00:05:13,000 ही कल्पना की, 129 00:05:13,000 --> 00:05:15,000 जर संबंध जोडायचे असतील तर 130 00:05:15,000 --> 00:05:18,000 आपल्याला लोकांसमोर आपले स्वरूप उघडे करावे लागेल, 131 00:05:18,000 --> 00:05:20,000 खरेखुरे समोर यावे लागेल. 132 00:05:20,000 --> 00:05:23,000 आणि तुम्हाला कळलंच असेल मला अगतिकतेबद्दल काय वाटतं ते. मी तिरस्कार करते अगतिकतेचा 133 00:05:23,000 --> 00:05:25,000 आणि मग मी विचार केलं, ही माझ्यासाठी एक संधी आहे 134 00:05:25,000 --> 00:05:28,000 अगतिकतेला माझ्या फूटपट्टीने हरवण्याची. 135 00:05:28,000 --> 00:05:31,000 मी यात शिरणार, याचा छडा लावणार, 136 00:05:31,000 --> 00:05:34,000 एक वर्ष घालवणार आणि मी शरम (ही गोष्ट) पूर्णपणे उलगडून दाखवणार, 137 00:05:34,000 --> 00:05:36,000 अगतिकता कशी काम करते हे समजून घेऊन, 138 00:05:36,000 --> 00:05:39,000 मी तिच्यावर मात करणार आहे. 139 00:05:39,000 --> 00:05:42,000 तर मी तय्यार होते आणि खूप उत्साहात देखील. 140 00:05:44,000 --> 00:05:46,000 तुम्हाला कळलंच असेल की पुढे काहीतरी अनपेक्षित (वाईट) होणारे. 141 00:05:46,000 --> 00:05:49,000 (हशा) 142 00:05:49,000 --> 00:05:51,000 तुम्हाला माहित्येय. 143 00:05:51,000 --> 00:05:53,000 तर मी शरमेबद्दल खूप काही सांगू शकेन, 144 00:05:53,000 --> 00:05:55,000 पण मला इतरांचा वेळ मागावा लागेल. 145 00:05:55,000 --> 00:05:58,000 पण त्या साऱ्याचे सार जे मी तुम्हाला सांगू शकते ते असे की -- 146 00:05:58,000 --> 00:06:01,000 आणि ही कदाचित माझ्या दहा वर्षांच्या संशोधनातून मी शिकलेली 147 00:06:01,000 --> 00:06:04,000 सर्वांत महत्वाची गोष्ट आहे. 148 00:06:04,000 --> 00:06:06,000 माझ्या एका वर्षाची 149 00:06:06,000 --> 00:06:08,000 सहा वर्षे झाली: 150 00:06:08,000 --> 00:06:10,000 हजारो गोष्टी, 151 00:06:10,000 --> 00:06:13,000 शेकडो दीर्घ मुलाखती, विशेष लक्ष गट. 152 00:06:13,000 --> 00:06:15,000 एका क्षणी, लोकं मला त्यांच्या रोजनिशीची पाने पाठवत होते 153 00:06:15,000 --> 00:06:18,000 आणि त्यांच्या कहाण्या पाठवत होते -- 154 00:06:18,000 --> 00:06:21,000 ६ वर्षांत (जमा झालेली) हजारो तुकड्यांमधली माहिती. 155 00:06:21,000 --> 00:06:23,000 आणि मला त्यावर (विषयावर) पकड आल्यासारखे वाटू लागले. 156 00:06:23,000 --> 00:06:25,000 मला बऱ्यापैकी कल्पना आली की, शरम महणजे काय, 157 00:06:25,000 --> 00:06:27,000 आणि तिचे कार्य कसे चालते. 158 00:06:27,000 --> 00:06:29,000 मी एक पुस्तक लिहिले, 159 00:06:29,000 --> 00:06:31,000 एक सिद्धांत प्रसिद्ध केला, 160 00:06:31,000 --> 00:06:34,000 पण काहीतरी चुकत होते -- 161 00:06:34,000 --> 00:06:36,000 आणि ते असे होते की, 162 00:06:36,000 --> 00:06:38,000 जर मी सर्व मुलाखत घेतलेले लोकं घेतले 163 00:06:38,000 --> 00:06:41,000 आणि त्यांची विभागणी केली 164 00:06:41,000 --> 00:06:44,000 एक ते लोकं ज्यांना स्वतःच्या लायकीबद्दल खात्री होती -- 165 00:06:44,000 --> 00:06:46,000 म्हणजे साऱ्याचं सार शेवटी हेच असतं ना, 166 00:06:46,000 --> 00:06:48,000 स्वत्वाची जाणीव -- 167 00:06:48,000 --> 00:06:51,000 ज्यांना प्रेमाची आणि आपलेपणाची प्रखर जाणीव होती -- 168 00:06:51,000 --> 00:06:53,000 आणि जे लोकं ती मिळवण्यासाठी धडपडत होते, 169 00:06:53,000 --> 00:06:55,000 आणि ते ज्यांना आपल्या लायकीविषयी शंका होती. 170 00:06:55,000 --> 00:06:57,000 त्यांच्यात केवळ एकच फरक होता 171 00:06:57,000 --> 00:06:59,000 जो त्यांना अशा लोकांपासून वेगळ करत होता ज्यांना 172 00:06:59,000 --> 00:07:01,000 प्रेम आणि आपलेपणाची खोलवर जाण होती 173 00:07:01,000 --> 00:07:03,000 आणि जे लोकं ती मिळवण्यासाठी धडपडतात. 174 00:07:03,000 --> 00:07:05,000 आणि तो असा की, ज्या लोकांना 175 00:07:05,000 --> 00:07:07,000 प्रेमाची आणि आपलेपणाची प्रखर जाणीव होती 176 00:07:07,000 --> 00:07:10,000 त्यांचा विश्वास होता की आपण त्यासाठी लायक आहोत. 177 00:07:10,000 --> 00:07:12,000 इतकंच. 178 00:07:12,000 --> 00:07:14,000 त्यांना खात्री होती की ते लायक आहेत. 179 00:07:15,000 --> 00:07:18,000 आणि माझ्यामते, एक कठीण गोष्ट 180 00:07:18,000 --> 00:07:21,000 जी आपल्याला संबंध जोडण्यापासून परावृत्त करते 181 00:07:21,000 --> 00:07:24,000 ती म्हणजे आपण त्यास पात्र नसल्याची भीती, 182 00:07:24,000 --> 00:07:26,000 ती एक गोष्ट होती, जी मला वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या 183 00:07:26,000 --> 00:07:29,000 अधिक खोलवर जाणून घ्यायची गरज भासत होती. 184 00:07:29,000 --> 00:07:32,000 म्हणून मग मी असं केलं की 185 00:07:32,000 --> 00:07:34,000 मी अश्या सगळ्या मुलाखती घेतल्या 186 00:07:34,000 --> 00:07:37,000 जिथे मला स्वत्वाची जाणीव दिसली, जे लोकं त्या जाणीवेने जगत होते, 187 00:07:37,000 --> 00:07:40,000 आणि त्या लोकांकडे पाहू लागले. 188 00:07:40,000 --> 00:07:42,000 या लोकांमध्ये काय समान होतं? 189 00:07:42,000 --> 00:07:44,000 मला जरा स्टेशनरी साहित्याचं व्यसन आहे, 190 00:07:44,000 --> 00:07:47,000 पण तो वेगळ्या भाषणाचा विषय होईल. 191 00:07:47,000 --> 00:07:50,000 तर माझ्या हातात एक फाईल फोल्डर होता आणि एक मार्कर पेन, 192 00:07:50,000 --> 00:07:52,000 आणि मी म्हटलं, या संशोधनाला काय म्हणू मी? 193 00:07:52,000 --> 00:07:54,000 आणि सर्वांत प्रथम माझ्या मनात जो शब्द आला 194 00:07:54,000 --> 00:07:56,000 तो होता सहृदयी. 195 00:07:56,000 --> 00:07:59,000 ही सहृदयी लोकं स्वत्वाच्या सखोल जाणीवेनं जगत असतात. 196 00:07:59,000 --> 00:08:02,000 तेव्हा मी त्या फाईलवर (नाव) लिहिलं, 197 00:08:02,000 --> 00:08:04,000 आणि माहितीकडे बघायला सुरुवात केली. 198 00:08:04,000 --> 00:08:06,000 प्रत्यक्षात मी सुरुवातीचे 199 00:08:06,000 --> 00:08:08,000 चार दिवस 200 00:08:08,000 --> 00:08:11,000 सर्व माहिती पिंजून काढली, 201 00:08:11,000 --> 00:08:14,000 माहितीचा माग घेतला, सर्व मुलाखती बाहेर काढल्या, कहाण्या वाचल्या, अनुभव वाचले. 202 00:08:14,000 --> 00:08:17,000 काय संकल्पना आहे? काय सूत्र/पॅटर्न आहे? 203 00:08:17,000 --> 00:08:20,000 माझा नवरा मुलांना घेऊन बाहेरगावी गेला 204 00:08:20,000 --> 00:08:23,000 कारण मी अशावेळी नेहमीच एका बेभान अवस्थेत जाते, 205 00:08:23,000 --> 00:08:25,000 जेव्हा मी फक्त लिहिते 206 00:08:25,000 --> 00:08:28,000 आणि संशोधन करत असते. 207 00:08:28,000 --> 00:08:30,000 तर मला सापडलं ते असं. 208 00:08:32,000 --> 00:08:34,000 त्यांच्यात समान गोष्ट 209 00:08:34,000 --> 00:08:36,000 होती ती म्हणजे धैर्याची जाण. 210 00:08:36,000 --> 00:08:39,000 आणि इथे तुमच्यासाठी मला धैर्य आणि शौर्य यातील फरक स्पष्ट केला पाहिजे . 211 00:08:39,000 --> 00:08:41,000 धैर्य (करेज), याची मूळ व्याख्या, 212 00:08:41,000 --> 00:08:43,000 जेव्हा हा शब्द पहिल्यांदा इंग्रजी भाषेत आला -- 213 00:08:43,000 --> 00:08:46,000 तो लॅटिन भाषेतल्या 'कर' शब्दावरून ज्याचा अर्थ होतो हृद्य -- 214 00:08:46,000 --> 00:08:48,000 आणि मूळ व्याख्या अशी 215 00:08:48,000 --> 00:08:51,000 होती की तुम्ही कोण आहात हे तुमच्या संपूर्ण हृदयापासून सांगणे. 216 00:08:51,000 --> 00:08:53,000 आणि ह्या साऱ्या लोकांकडे 217 00:08:53,000 --> 00:08:55,000 साध्या शब्दांत, अपरिपूर्ण असण्याचे 218 00:08:55,000 --> 00:08:57,000 धैर्य होते. 219 00:08:58,000 --> 00:09:00,000 त्यांच्याकडे दयाबुद्धी होती 220 00:09:00,000 --> 00:09:03,000 आधी स्वतःशी दयाबुद्धीने वागण्याची आणि मग इतरांशी, 221 00:09:03,000 --> 00:09:06,000 कारण, असं आहे की, आपण दुसऱ्यांशी सहानुभूतीने वागू शकत नाही 222 00:09:06,000 --> 00:09:09,000 जर आपण स्वतःशी दयाबुद्धीने वागलो नाही तर. 223 00:09:09,000 --> 00:09:11,000 आणि शेवटची गोष्ट म्हणजे ते जोडलेले होते, 224 00:09:11,000 --> 00:09:13,000 आणि -- हे कठीण आहे -- 225 00:09:13,000 --> 00:09:16,000 खरं वागल्यामुळे, 226 00:09:16,000 --> 00:09:19,000 त्यांची स्वतःला अपेक्षित स्वप्रतिमा सोडायची तयारी होती (कशासाठी तर) 227 00:09:19,000 --> 00:09:21,000 त्यांच्या खऱ्या स्वरुपात पुढे येण्यासाठी, 228 00:09:21,000 --> 00:09:24,000 आणि जे नातेसंबंध जोडण्यासाठी तुम्हाला 229 00:09:24,000 --> 00:09:26,000 करावंच लागतं. 230 00:09:28,000 --> 00:09:30,000 दुसरी गोष्ट जी त्यांच्यात समान होती 231 00:09:30,000 --> 00:09:32,000 ती म्हणजे: 232 00:09:35,000 --> 00:09:38,000 त्यांनी अगतिकतेचा पूर्णपणे स्वीकार केला होतं. 233 00:09:40,000 --> 00:09:43,000 त्यांचा विश्वास होता 234 00:09:43,000 --> 00:09:46,000 की ज्या गोष्टी त्यांना अगतिक बनवत होत्या 235 00:09:46,000 --> 00:09:48,000 त्या त्यांना सुंदरही बनवत होत्या. 236 00:09:50,000 --> 00:09:52,000 त्यांच्या बोलण्यातून अगतिकता ही 237 00:09:52,000 --> 00:09:54,000 सुखदायी, 238 00:09:54,000 --> 00:09:57,000 किंवा अतिशय वेदनामय असल्याचे येत नव्हते-- 239 00:09:57,000 --> 00:09:59,000 जसं मी आधी शरमेच्या मुलाखतींमध्ये ऐकलं होतं. 240 00:09:59,000 --> 00:10:02,000 त्यांच्यामते अगतिकता गरजेची होती. 241 00:10:03,000 --> 00:10:05,000 त्यांच्या बोलण्यातून (जाणवत होती) ती तयारी 242 00:10:05,000 --> 00:10:08,000 पहिल्यांदा प्रेमाची कबुली देण्याची, 243 00:10:08,000 --> 00:10:11,000 तयारी 244 00:10:11,000 --> 00:10:13,000 अशा गोष्टी करण्याची 245 00:10:13,000 --> 00:10:16,000 जिथे कोणतीही खात्री नसते, 246 00:10:16,000 --> 00:10:18,000 तयारी 247 00:10:18,000 --> 00:10:20,000 तुमच्या मॅमोग्राफीनंतर डॉक्टरांच्या बोलावण्याची 248 00:10:20,000 --> 00:10:22,000 वाट पाहण्याची. 249 00:10:23,000 --> 00:10:26,000 त्यांची अशा नात्यामध्ये गुंतवणूक करायची तयारी होती 250 00:10:26,000 --> 00:10:29,000 जे यशस्वी होईल किंवा होणार नाही. 251 00:10:29,000 --> 00:10:32,000 त्यांच्यामते ही गोष्ट मुलभूत होती. 252 00:10:32,000 --> 00:10:35,000 मला स्वतःला ही दगाबाजी वाटत होती. 253 00:10:35,000 --> 00:10:38,000 माझा विश्वास बसत नव्हता (कारण) मी संशोधनाशी एकनिष्ठतेची 254 00:10:38,000 --> 00:10:40,000 शपथ घेतली होती, जिथे आमचं काम -- 255 00:10:40,000 --> 00:10:42,000 तुम्हाला माहित्येय की संशोधनाची व्याख्या आहे की 256 00:10:42,000 --> 00:10:45,000 नियंत्रण करणे आणि अंदाज बांधणे, तत्वांचा अभ्यास 257 00:10:45,000 --> 00:10:47,000 केवळ एका कारणासाठी 258 00:10:47,000 --> 00:10:49,000 नियंत्रण आणि अंदाज बांधण्यासाठी. 259 00:10:49,000 --> 00:10:51,000 आणि आता माझ्या या नियंत्रित आणि अचूक 260 00:10:51,000 --> 00:10:53,000 अंदाज बांधण्याच्या मोहिमेतून 261 00:10:53,000 --> 00:10:56,000 असे उत्तर मिळाले की अगतिकतेने जगणे हाच खरा मार्ग 262 00:10:56,000 --> 00:10:59,000 आणि नियंत्रित करणे आणि अंदाज बांधणे थांबवा. 263 00:10:59,000 --> 00:11:02,000 याने मला थोडे नैराश्य आले -- 264 00:11:02,000 --> 00:11:06,000 (हशा) 265 00:11:06,000 --> 00:11:09,000 -- जे प्रत्यक्षात हे असे (प्रचंड) दिसत होते. 266 00:11:09,000 --> 00:11:11,000 (हशा) 267 00:11:11,000 --> 00:11:13,000 आणि होते सुद्धा. 268 00:11:13,000 --> 00:11:16,000 मी त्याला नैराश्य म्हणते; माझी समुपदेशक त्याला आध्यात्मिक जागृती म्हणते. 269 00:11:17,000 --> 00:11:19,000 आध्यात्मिक जागृती ऐकायला नैराश्यापेक्षा बरं वाटतं, 270 00:11:19,000 --> 00:11:21,000 पण तुम्हाला सांगते ते नैराश्यच होतं. 271 00:11:21,000 --> 00:11:23,000 आणि मला माझे संशोधन बाजूला ठेवावे लागले आणि समुपदेशक शोधावा लागला. 272 00:11:23,000 --> 00:11:26,000 तुम्हाला म्हणून सांगते: तुम्हाला स्वतःची ओळख होते 273 00:11:26,000 --> 00:11:29,000 जेव्हा तुम्ही मित्रांना फोन करून सांगता, "मला वाटतं मला एक समुपदेशकाची गरज आहे. 274 00:11:29,000 --> 00:11:32,000 तुम्ही कोणाचे नाव सुचवता का?" 275 00:11:32,000 --> 00:11:34,000 कारण माझ्या पाच मित्रांची प्रतिक्रिया होती, 276 00:11:34,000 --> 00:11:36,000 "बाप रे! मला नाही तुझा/तुझी समुपदेशक व्हायचं." 277 00:11:36,000 --> 00:11:39,000 (हशा) 278 00:11:39,000 --> 00:11:41,000 मला असं झालं, "ह्याला काय अर्थ आहे?" 279 00:11:41,000 --> 00:11:44,000 आणि त्यावर त्याचं म्हणणं, "अग, मी सहज म्हटलं. 280 00:11:44,000 --> 00:11:46,000 तुझी ती फूटपट्टी घेऊन येऊ नकोस." 281 00:11:46,000 --> 00:11:49,000 मी म्हटलं, "ठीक आहे." 282 00:11:51,000 --> 00:11:53,000 तर मला समुपदेशक सापडली. 283 00:11:53,000 --> 00:11:56,000 माझी तिच्याबरोबर, डायनाबरोबर पहिली भेट -- 284 00:11:56,000 --> 00:11:58,000 मी सहृदयी लोकं कसे जगतात याची 285 00:11:58,000 --> 00:12:01,000 माझी यादी घेऊन आले होते, आणि मी (तिच्यासमोर) बसले 286 00:12:01,000 --> 00:12:03,000 आणि तिने विचारलं, "कशी आहेस?" 287 00:12:03,000 --> 00:12:06,000 आणि मी म्हटलं, "मी मस्त. मी ठीक आहे." 288 00:12:06,000 --> 00:12:08,000 तिने विचारलं, "काय चालू आहे?" 289 00:12:08,000 --> 00:12:11,000 आणि ही समुपदेशक दुसऱ्या समुपदेशकांवर उपचार करते, 290 00:12:11,000 --> 00:12:13,000 कारण आम्हाला त्यांच्याकडे जायची गरजच असते, 291 00:12:13,000 --> 00:12:16,000 कारण त्यांच्या मुर्खपणा मोजण्याच्या पट्ट्या चांगल्या असतात. 292 00:12:16,000 --> 00:12:18,000 (हशा) 293 00:12:18,000 --> 00:12:20,000 आणि मी म्हटलं, 294 00:12:20,000 --> 00:12:22,000 "हे बघ, मी झगडते आहे." 295 00:12:22,000 --> 00:12:24,000 आणि तिने विचारलं, "काय झगडा आहे?" 296 00:12:24,000 --> 00:12:27,000 मी म्हटलं, " म्हणजे मला अगतिकतेबद्दल प्रश्न आहे." 297 00:12:27,000 --> 00:12:30,000 आणि मला माहित्येय की अगतिकता हे 298 00:12:30,000 --> 00:12:32,000 शरम आणि भीतीचं 299 00:12:32,000 --> 00:12:34,000 आणि स्वत्वासाठीच्या झगड्याचं मूळ आहे. 300 00:12:34,000 --> 00:12:37,000 पण असं दिसतयं की (अगतिकता) हेच 301 00:12:37,000 --> 00:12:40,000 आनंद, सर्जनशीलता, 302 00:12:40,000 --> 00:12:42,000 आपलेपणा, प्रेम यांचं जन्मस्थान आहे. 303 00:12:42,000 --> 00:12:44,000 आणि मला वाटतं मला प्रॉब्लेम आहे, 304 00:12:44,000 --> 00:12:47,000 आणि मला मदतीची गरज आहे. 305 00:12:47,000 --> 00:12:49,000 आणि मी म्हटलं, "पण हे बघ: 306 00:12:49,000 --> 00:12:51,000 इथे काही कौटुंबिक प्रश्न, 307 00:12:51,000 --> 00:12:53,000 लहानपणीच्या (शोषणाच्या) आठवणी हा प्रकार नाही." 308 00:12:53,000 --> 00:12:55,000 (हशा) 309 00:12:55,000 --> 00:12:58,000 "मला फक्त काही उपाय हवे आहेत." 310 00:12:58,000 --> 00:13:02,000 (हशा) 311 00:13:02,000 --> 00:13:05,000 (टाळ्या) 312 00:13:05,000 --> 00:13:07,000 धन्यवाद. 313 00:13:09,000 --> 00:13:12,000 आणि तिने मान डोलावली. 314 00:13:12,000 --> 00:13:14,000 (हशा) 315 00:13:14,000 --> 00:13:17,000 आणि मग मी म्हटलं, " हे वाईट आहे ना?" 316 00:13:17,000 --> 00:13:20,000 आणि (त्यावर) ती म्हणाली, "हे चांगलं ही नाही आणि वाईटही." 317 00:13:20,000 --> 00:13:22,000 (हशा) 318 00:13:22,000 --> 00:13:24,000 "हे आहे हे असं आहे." 319 00:13:24,000 --> 00:13:27,000 आणि मी म्हटलं, "अरे माझ्या देवा! हे फार तापदायक ठरणार असं दिसतंय." 320 00:13:27,000 --> 00:13:30,000 (हशा) 321 00:13:30,000 --> 00:13:32,000 आणि ते ठरलं ही आणि नाही ही. 322 00:13:32,000 --> 00:13:35,000 आणि त्याला एक वर्षं लागलं. 323 00:13:35,000 --> 00:13:37,000 आणि तुम्हाला माहित्येय की अशी काही लोकं असतात , 324 00:13:37,000 --> 00:13:40,000 ज्यांना जेव्हा लक्षात येतं की अगतिकता आणि हळवेपणा गरजेचा आहे, 325 00:13:40,000 --> 00:13:43,000 तेव्हा ते शरण जातात आणि (या गोष्टी) आपल्याशा करतात. 326 00:13:43,000 --> 00:13:45,000 एक: मी ती नव्हे, 327 00:13:45,000 --> 00:13:48,000 आणि दोन: मी असल्या लोकांशी मैत्री देखील करत नाही. 328 00:13:48,000 --> 00:13:51,000 (हशा) 329 00:13:51,000 --> 00:13:54,000 माझ्यासाठी ही वर्षभराची लढाई ठरली. 330 00:13:54,000 --> 00:13:56,000 ती जणू कुस्तीच होती. 331 00:13:56,000 --> 00:13:58,000 अगतिकता मला ढकलत होती आणि मी जोर लावून प्रतिकार करत होते. 332 00:13:58,000 --> 00:14:01,000 मी कुस्ती हारले, 333 00:14:01,000 --> 00:14:03,000 पण माझं आयुष्य परत जिंकले. 334 00:14:03,000 --> 00:14:05,000 आणि मग मी पुन्हा संशोधनाकडे वळले 335 00:14:05,000 --> 00:14:07,000 आणि पुढची दोन वर्ष हे समजून घेण्यात घालवली 336 00:14:07,000 --> 00:14:10,000 की ती , सहृदयी लोकं 337 00:14:10,000 --> 00:14:12,000 कोणते पर्याय निवडतात, 338 00:14:12,000 --> 00:14:14,000 आणि ते 339 00:14:14,000 --> 00:14:16,000 अगतिकतेचा कसा वापर करतात. 340 00:14:16,000 --> 00:14:18,000 आपण अगतिकतेशी इतके का झगडत असतो? 341 00:14:18,000 --> 00:14:21,000 अगतिकतेशी झगडणारी मी एकटीच आहे का? 342 00:14:21,000 --> 00:14:23,000 नाही. 343 00:14:23,000 --> 00:14:25,000 तर मी हे शिकले. 344 00:14:26,000 --> 00:14:29,000 आपण अगतिकतेला बधीर करतो -- 345 00:14:29,000 --> 00:14:31,000 जेव्हा आपण कशाची तरी वाट पहात असतो. 346 00:14:31,000 --> 00:14:33,000 हे मजेशीर आहे, मी ट्विटर आणि फेसबुकवर विचारले 347 00:14:33,000 --> 00:14:35,000 असे की, "तुम्ही अगतिकतेची व्याख्या कशी कराल? 348 00:14:35,000 --> 00:14:37,000 तुम्हाला कशामुळे अगतिक वाटते?" 349 00:14:37,000 --> 00:14:40,000 आणि दीड तासात मला दीडशे प्रतिसाद आले. 350 00:14:40,000 --> 00:14:42,000 कारण मला हे जाणून घ्यायचं होतं की 351 00:14:42,000 --> 00:14:44,000 लोकांना काय वाटतं. 352 00:14:45,000 --> 00:14:47,000 माझ्या नवऱ्याला मदत मागणं 353 00:14:47,000 --> 00:14:50,000 कारण मी आजारी आहे आणि आमचं नवीन लग्न झालंय; 354 00:14:50,000 --> 00:14:53,000 नवऱ्याशी सेक्सला सुरुवात करणं; 355 00:14:53,000 --> 00:14:55,000 बायकोशी सेक्सला सुरुवात करणं; 356 00:14:55,000 --> 00:14:58,000 नकार पचवणं; कोणालातरी डेटसाठी विचारणं; 357 00:14:58,000 --> 00:15:00,000 डॉक्टरच्या निदानाची वाट पाहणे; 358 00:15:00,000 --> 00:15:03,000 नोकरी जाणे; लोकांना कामावरून काढून टाकणे -- 359 00:15:03,000 --> 00:15:05,000 ह्या जगात आपण राहतो. 360 00:15:05,000 --> 00:15:08,000 आपण एका अगतिक (करणाऱ्या)जगात राहतो. 361 00:15:08,000 --> 00:15:10,000 आणि त्याच्याशी जुळवून घेण्याचा एक मार्ग म्हणजे 362 00:15:10,000 --> 00:15:12,000 आपण अगतिकतेला दाबून टाकतो. 363 00:15:12,000 --> 00:15:14,000 आणि मला वाटते याला पुरावा आहे -- 364 00:15:14,000 --> 00:15:16,000 आणि हा पुरावा असण्याचं एकमेक कारण नव्हे, 365 00:15:16,000 --> 00:15:18,000 माझ्या मते हे सर्वात मोठं कारण आहे -- 366 00:15:18,000 --> 00:15:22,000 अमेरिकन इतिहासातली आपली सर्वाधिक कर्जात बुडलेली, 367 00:15:22,000 --> 00:15:25,000 स्थूल, 368 00:15:25,000 --> 00:15:28,000 व्यसनी आणि औषधं खाणारी 369 00:15:28,000 --> 00:15:30,000 वयस्क अमेरिकन पिढी आहे. 370 00:15:33,000 --> 00:15:36,000 आणि प्रॉब्लेम असा आहे -- आणि हे मी संशोधनातून शिकले -- 371 00:15:36,000 --> 00:15:39,000 की तुम्ही भावनांना वेगवेगळया करून बधीर करू शकत नाही. 372 00:15:40,000 --> 00:15:43,000 तुम्ही असं म्हणू शकत नाही की, ह्या साऱ्या वाईट गोष्टी आहेत. 373 00:15:43,000 --> 00:15:45,000 ही अगतिकता, हे दुःख, ही शरम, 374 00:15:45,000 --> 00:15:47,000 ही भीती, ही निराशा. 375 00:15:47,000 --> 00:15:49,000 मला ह्या भावना जाणवायला नको आहेत. 376 00:15:49,000 --> 00:15:52,000 मी दोन ग्लास बीयर पिणार आणि चिकन बिर्याणी खाणार. 377 00:15:52,000 --> 00:15:54,000 (हशा) 378 00:15:54,000 --> 00:15:56,000 मला ह्या भावना जाणवायला नको आहेत. 379 00:15:56,000 --> 00:15:58,000 आणि मला माहित्येय की हे ओळखीचं हसू आहे. 380 00:15:58,000 --> 00:16:01,000 मी तुमच्या आयुष्यांत घुसखोरी करून पोट भरते. 381 00:16:01,000 --> 00:16:03,000 देवा! (हिला कसं कळलं?) 382 00:16:03,000 --> 00:16:05,000 (हशा) 383 00:16:05,000 --> 00:16:08,000 तुम्ही केवळ त्या दुःखद जाणीवा बधीर करू शकत नाही 384 00:16:08,000 --> 00:16:10,000 त्या बरोबर आपल्या भावनाही बधीर होतात. 385 00:16:10,000 --> 00:16:12,000 तुम्ही निवडकपणे असंवेदनशील होऊ शकत नाही. 386 00:16:12,000 --> 00:16:15,000 म्हणून जेव्हा आपण त्या (दुःखद जाणीवा) दडपतो, 387 00:16:15,000 --> 00:16:17,000 तेव्हा आपण आनंद दडपतो, 388 00:16:17,000 --> 00:16:19,000 आपण कृतज्ञता दडपतो, 389 00:16:19,000 --> 00:16:21,000 आपण सुख दडपतो. 390 00:16:21,000 --> 00:16:24,000 मग आपण केविलवाणे होतो, 391 00:16:24,000 --> 00:16:26,000 आणि अर्थ आणि उद्देश शोधू लागतो, 392 00:16:26,000 --> 00:16:28,000 आणि मग आपल्याला अगतिक वाटते, 393 00:16:28,000 --> 00:16:31,000 आणि मग आपण पुन्हा दोन ग्लास बीयर पितो आणि चिकन बिर्याणी हाणतो. 394 00:16:31,000 --> 00:16:34,000 आणि एका दुष्टचक्राची सुरुवात होते. 395 00:16:36,000 --> 00:16:39,000 एक गोष्ट ज्याचा आपण विचार करावा असं मला वाटतं 396 00:16:39,000 --> 00:16:41,000 ती म्हणजे आपण का आणि कसे बधीर होतो. 397 00:16:41,000 --> 00:16:44,000 आणि हे केवळ व्यसन असायला हवं असं नाही. 398 00:16:44,000 --> 00:16:46,000 दुसरी एक गोष्ट आपण करतो 399 00:16:46,000 --> 00:16:49,000 ती म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट नियमित करायला जातो. 400 00:16:50,000 --> 00:16:53,000 धर्म ही एक विश्वास आणि चमत्कारावर असलेली श्रद्धा न राहता 401 00:16:53,000 --> 00:16:55,000 एक पक्की गोष्ट झाली आहे. 402 00:16:55,000 --> 00:16:58,000 मी बरोबर, तू चूक. गप्प बस. 403 00:16:58,000 --> 00:17:00,000 विषय संपला. 404 00:17:00,000 --> 00:17:02,000 अगदी पक्कं. 405 00:17:02,000 --> 00:17:04,000 आपण जितके जास्त भितो, तितके अगतिक होतो, 406 00:17:04,000 --> 00:17:06,000 आणि मग अजून जास्ती भितो. 407 00:17:06,000 --> 00:17:08,000 आजचं राजकारण हे असं दिसतं. 408 00:17:08,000 --> 00:17:10,000 आता कोणी चर्चा करताना दिसत नाही. 409 00:17:10,000 --> 00:17:12,000 कोणताही संवाद नसतो. 410 00:17:12,000 --> 00:17:14,000 असतात ते फक्त दोषारोप. 411 00:17:14,000 --> 00:17:17,000 तुम्हाला माहित्येय संशोधनात आरोपाची व्याख्या कशी करतात? 412 00:17:17,000 --> 00:17:20,000 दुःख आणि अस्वस्थतेला वाट मोकळी करून देण्याचा एक मार्ग. 413 00:17:21,000 --> 00:17:23,000 आपण परिपूर्णतेचा ध्यास घेतो. 414 00:17:23,000 --> 00:17:26,000 जर कोणाला आपलं आयुष्य असं दिसायला हवं असेल तर ते मला, 415 00:17:26,000 --> 00:17:28,000 पण तसं होत नसतं. 416 00:17:28,000 --> 00:17:30,000 कारण आपण काय करतो तर, आपल्या ढुंगणावरची चरबी 417 00:17:30,000 --> 00:17:32,000 काढून आपल्या गालावर चढवायला जातो. 418 00:17:32,000 --> 00:17:35,000 (हशा) 419 00:17:35,000 --> 00:17:37,000 जे माझी इच्छा आहे की १०० वर्षानंतर 420 00:17:37,000 --> 00:17:39,000 लोकं (जेव्हा) मागे वळून बघतील तेव्हा, "वाव." म्हणतील. 421 00:17:39,000 --> 00:17:41,000 (हशा) 422 00:17:41,000 --> 00:17:43,000 आणि सर्वात भयंकर म्हणजे आपण आपल्या मुलांना 423 00:17:43,000 --> 00:17:45,000 परिपूर्ण बनवू पाहतो. 424 00:17:45,000 --> 00:17:47,000 मी सांगते आपल्याला मुलांबद्दल काय वाटतं ते. 425 00:17:47,000 --> 00:17:50,000 जेव्हा ती या जगात येतात तेव्हा संघर्ष करण्यासाठी सक्षम असतात. 426 00:17:50,000 --> 00:17:53,000 आणि जेव्हा तुम्ही त्या परिपूर्ण बाळाला हातात घेता, 427 00:17:53,000 --> 00:17:55,000 तुमचं काम हे म्हणणं नसतं की, "बघा तिच्याकडे, ती परिपूर्ण आहे. 428 00:17:55,000 --> 00:17:57,000 माझं काम आहे तिला परिपूर्ण ठेवणं -- 429 00:17:57,000 --> 00:18:00,000 हे बघणं की कशी ती ५वीत टेनिस टीम मध्ये निवडली जाईल आणि ७वीत गेल्यावर आय आय टी त." 430 00:18:00,000 --> 00:18:02,000 हे आपलं काम नाहीये. 431 00:18:02,000 --> 00:18:04,000 आपलं काम आहे (तिच्याकडे) पाहून म्हणणं की, 432 00:18:04,000 --> 00:18:07,000 "माहित्येय? तू परिपूर्ण नाहीयेस, आणि तुला संघर्षासाठी घडवलंय, 433 00:18:07,000 --> 00:18:09,000 पण प्रेमावर आणि आपलेपणावर तुझा हक्क आहे." 434 00:18:09,000 --> 00:18:11,000 हे आपलं काम आहे. 435 00:18:11,000 --> 00:18:13,000 मला अशी वाढवलेली मुलांची एक पिढी दाखवा, 436 00:18:13,000 --> 00:18:16,000 आणि मला वाटतं आजचे आपले सगळे प्रश्न सुटतील. 437 00:18:16,000 --> 00:18:20,000 आपण सोंग घेतो की आपल्या कृतीचा 438 00:18:20,000 --> 00:18:23,000 इतरांवर काही परिणाम होत नाही. 439 00:18:23,000 --> 00:18:25,000 आपण असे व्यक्तिगत आयुष्यात वागतो. 440 00:18:25,000 --> 00:18:27,000 आणि व्यावसायिक पातळीवरही -- 441 00:18:27,000 --> 00:18:29,000 मग ती आर्थिक मदत असो किंवा तेल गळती, 442 00:18:29,000 --> 00:18:31,000 किंवा (वस्तू) माघारी बोलावणे -- 443 00:18:31,000 --> 00:18:33,000 आपण दाखवतो की आपल्या कृतीमुळे 444 00:18:33,000 --> 00:18:36,000 लोकांवर फार मोठा परिणाम होत नाहीये. 445 00:18:36,000 --> 00:18:39,000 मी कंपन्यांना असं सांगेन की, हे काही तुमचा पहिला प्रदर्शनातला स्टॉल नाहीये. 446 00:18:40,000 --> 00:18:42,000 आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही सच्चाईने आणि सचोटीने वागा 447 00:18:42,000 --> 00:18:44,000 आणि म्हणा, "आम्ही क्षमा मागतो. 448 00:18:44,000 --> 00:18:47,000 आम्ही सर्वं ठीक करू." 449 00:18:50,000 --> 00:18:52,000 पण अजून एक मार्ग आहे, आणि तो सांगून मी थांबेन. 450 00:18:52,000 --> 00:18:54,000 हे, जे मला सापडलंय: 451 00:18:54,000 --> 00:18:56,000 स्वतःला पारदर्शक बनवा, 452 00:18:56,000 --> 00:18:58,000 (लोकांना) आरपार बघू द्या, 453 00:18:58,000 --> 00:19:01,000 तुमच्या अगतिकतेसकट (तुम्हाला) बघू द्या; 454 00:19:01,000 --> 00:19:03,000 संपूर्ण हृदयापासून प्रेम करा, 455 00:19:03,000 --> 00:19:05,000 जरी कशाचीच खात्री नसेल तरीही -- 456 00:19:05,000 --> 00:19:07,000 आणि हे सर्वात अवघड आहे, 457 00:19:07,000 --> 00:19:10,000 एक पालक म्हणून मी तुम्हाला सांगते, हे अत्यंत कठीण आहे -- 458 00:19:12,000 --> 00:19:15,000 त्या क्षणी कृतज्ञ आणि आनंदी राहणं 459 00:19:15,000 --> 00:19:17,000 जेव्हा भीती वाटत असते, 460 00:19:17,000 --> 00:19:19,000 जेव्हा आपल्याला नवल वाटतं, "मी तुझ्यावर एवढं प्रेम करू शकेन का? 461 00:19:19,000 --> 00:19:21,000 यावर इतका गाढ विश्वास ठेवू शकते का? 462 00:19:21,000 --> 00:19:24,000 याबद्दल मी इतकी आग्रही असू शकते का?" 463 00:19:24,000 --> 00:19:26,000 जरा क्षणभर थांबून, विपरीत कल्पनाविलास करण्याऐवजी, 464 00:19:26,000 --> 00:19:29,000 असं म्हणणं, "मी किती आभारी आहे, 465 00:19:29,000 --> 00:19:32,000 कारण मी इतकी/इतका अगतिक आहे याचाच अर्थ मी जिवंत आहे." 466 00:19:33,000 --> 00:19:36,000 आणि शेवटचे आणि माझ्या मते सर्वात महत्वाचे, 467 00:19:36,000 --> 00:19:39,000 मी पुरेशी आहे यावर विश्वास ठेवणे. 468 00:19:39,000 --> 00:19:41,000 कारण जेव्हा आपण मी पुरेशी आहे, 469 00:19:41,000 --> 00:19:44,000 या भावनेने काम सुरु करतो, 470 00:19:45,000 --> 00:19:48,000 तेव्हा आपण आरडाओरड थांबवतो आणि ऐकायला सुरुवात करतो, 471 00:19:49,000 --> 00:19:51,000 आपण आपल्या आजूबाजूच्यांशी अधिक दयाळू आणि सज्जनपणे वागतो, 472 00:19:51,000 --> 00:19:54,000 आणि स्वतःशी ही. 473 00:19:54,000 --> 00:19:56,000 मला एवढेच सांगायचे आहे. धन्यवाद. 474 00:19:56,000 --> 00:19:59,000 (टाळ्या)