0:00:00.000,0:00:02.000 तर मी इथून सुरुवात करेन: 0:00:02.000,0:00:04.000 दोन वर्षांपूर्वी एका आयोजकाचा मला फोन आला 0:00:04.000,0:00:06.000 कारण मी त्यांच्यासाठी एक भाषण करणार होते 0:00:06.000,0:00:08.000 तर फोनवर ती म्हणाली, 0:00:08.000,0:00:10.000 "मला कळत नाहीये मी 0:00:10.000,0:00:12.000 जाहिरातीत मी तुमच्याविषयी काय लिहू!" 0:00:12.000,0:00:14.000 मी विचार केला, " बरं, नक्की काय अडचण आहे?" 0:00:14.000,0:00:16.000 तेव्हा ती म्हणली, "हे बघा, मी तुम्हाला ऐकलंय, 0:00:16.000,0:00:19.000 आणि मला वाटतं, मी तुम्हाला संशोधक म्हणू शकते, 0:00:19.000,0:00:21.000 पण मला भीती वाटते की, तुम्हाला संशोधक म्हटलं तर कोणी येणार नाही, 0:00:21.000,0:00:23.000 कारण त्यांना वाटेल की तुम्ही निरस आणि निरुपयोगी बोलाल." 0:00:23.000,0:00:25.000 (हशा) 0:00:25.000,0:00:27.000 मी म्हटलं, "ठीक आहे." 0:00:27.000,0:00:29.000 मग ती म्हणाली, " मला तुमच्या भाषणातली आवडलेली गोष्ट अशी की 0:00:29.000,0:00:31.000 तुम्ही एक गोष्ट सांगणाऱ्या आहात. 0:00:31.000,0:00:34.000 म्हणून मला वाटतं मी तुम्हाला एक गोष्टी सांगणारी म्हणेन." 0:00:34.000,0:00:37.000 आणि अर्थात, माझ्यातला असुरक्षित, बुद्धिवादी जागा झाला, 0:00:37.000,0:00:39.000 मी म्हटलं, " तू काय म्हणणार आहेस मला?" 0:00:39.000,0:00:42.000 आणि ती म्हणाली, " मी तुम्हाला गोष्ट सांगणारी बाई म्हणणार." 0:00:42.000,0:00:45.000 मग मी म्हटलं, बाई गं, त्यापेक्षा सोनपरी कसं वाटेल?" 0:00:45.000,0:00:48.000 (हशा) 0:00:48.000,0:00:51.000 मी म्हटलं, "मला जरा यावर विचार करू दे." 0:00:51.000,0:00:54.000 मी धीराने घ्यायचा प्रयत्न केला. 0:00:54.000,0:00:57.000 आणि विचार केला, खरंतर, मी एक गोष्ट सांगणारीच आहे. 0:00:57.000,0:00:59.000 मी गुणात्मक संशोधन करते. 0:00:59.000,0:01:01.000 गोष्टी गोळा करते; तेच माझं काम आहे. 0:01:01.000,0:01:04.000 आणि कदाचित गोष्ट म्हणजे आत्मा असलेली माहिती. 0:01:04.000,0:01:06.000 आणि कदाचित मी एक गोष्ट सांगणारीच असेन. 0:01:06.000,0:01:08.000 आणि म्हणून मी म्हटले, "असं करुया का? 0:01:08.000,0:01:11.000 तू असं सांग की मी एक गोष्टी सांगणारी संशोधक आहे." 0:01:11.000,0:01:14.000 त्यावर ती हसू लागली अन् म्हणली, " असं काही नसतंच." 0:01:14.000,0:01:16.000 (हशा) 0:01:16.000,0:01:18.000 तर, मी एक गोष्टी सांगणारी संशोधक आहे, 0:01:18.000,0:01:20.000 आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे -- 0:01:20.000,0:01:22.000 आपण बोलतोय जाणीवा विस्तारण्याविषयी -- 0:01:22.000,0:01:24.000 आणि म्हणून मला बोलायचंय आणि काही गोष्टी सांगायच्या आहेत 0:01:24.000,0:01:27.000 माझ्या एका संशोधन प्रकल्पातल्या 0:01:27.000,0:01:30.000 ज्यानी माझ्या जाणीवा मुळापासून विस्तारल्या 0:01:30.000,0:01:33.000 आणि माझ्या जगण्याच्या, प्रेमाच्या, कामाच्या आणि पालकत्वाच्या सवयी 0:01:33.000,0:01:35.000 खरोखर बदलून टाकल्या. 0:01:35.000,0:01:37.000 आणि माझी गोष्ट इथे सुरु होते. 0:01:37.000,0:01:40.000 मी जेव्हा एक तरुण, पीएचडी करणारी, विद्यार्थी संशोधक होते, 0:01:40.000,0:01:42.000 माझ्या पहिल्या वर्षी मला एक प्राध्यापक होते 0:01:42.000,0:01:44.000 ज्यांनी आम्हाला सांगितलं, 0:01:44.000,0:01:46.000 "हे बघा, 0:01:46.000,0:01:49.000 जर तुम्ही एखादी गोष्ट मोजू शकत नसाल, तर ती गोष्ट अस्तित्वात नसते." 0:01:49.000,0:01:52.000 मला वाटलं की ते माझी चेष्टा करत आहेत. 0:01:52.000,0:01:55.000 मी म्हटलं, खरंच?" आणि ते म्हणाले, अगदी १००%" 0:01:55.000,0:01:57.000 आणि तुमच्या माहितीसाठी 0:01:57.000,0:01:59.000 मी समाजशास्त्राची पदवीधर आहे आणि त्यातच पदव्युत्तर शिक्षण घेतलंय, 0:01:59.000,0:02:01.000 आणि मी समाजशास्त्रात पीएचडी करत होते, 0:02:01.000,0:02:03.000 त्यामुळे माझ्या संपूर्ण शैक्षणिक कारकीर्दीत 0:02:03.000,0:02:05.000 माझ्या आजूबाजूला अशी लोकं होती 0:02:05.000,0:02:07.000 ज्यांचा विश्वास होता की, 0:02:07.000,0:02:10.000 "जगणे गुंतागुंतीचे आहे, त्यावर प्रेम करा." 0:02:10.000,0:02:12.000 आणि माझ्यामते, जगणे गुंतागुंतीचे असेल तर 0:02:12.000,0:02:15.000 तो गुंता सोडवा, त्याचं वर्गीकरण करा 0:02:15.000,0:02:17.000 आणि त्याला खाऊच्या डब्ब्यात ठेवून द्या." 0:02:17.000,0:02:19.000 (हशा) 0:02:19.000,0:02:22.000 आणि विचार केला तर वाटतं (तेव्हा) मला माझा मार्ग सापडला, 0:02:22.000,0:02:25.000 एका अशा करीयरचा पाया रचला गेला ज्यात मी ओढली गेले 0:02:25.000,0:02:28.000 खरोखर, समाजशास्त्रातल्या एका मोठ्या विधानानुसार 0:02:28.000,0:02:31.000 (जे) आहे, "कामाच्या अवघडलेपणात स्वतःला झोकून द्या." 0:02:31.000,0:02:34.000 आणि मी अशी आहे की, अवघड गोष्टीला भिडा 0:02:34.000,0:02:36.000 जमिनीवर लोळवा आणि १००% मार्क मिळवा. 0:02:36.000,0:02:39.000 हा माझा मंत्र होता. 0:02:39.000,0:02:41.000 त्यामुळे मी अतिशय आतुर होते. 0:02:41.000,0:02:44.000 आणि मी विचार केला की नक्कीच हे माझं करियर असेल, 0:02:44.000,0:02:47.000 कारण मला गुंतागुंतीच्या विषयांमध्ये रस आहे. 0:02:47.000,0:02:49.000 पण मला त्यांना सोपे (कमी किचकट) बनवायची इच्छा आहे. 0:02:49.000,0:02:51.000 मला ते (विषय) समजून घ्यायचे आहेत. 0:02:51.000,0:02:53.000 मला ह्या गोष्टींच्या अंतरंगात शिरायचे आहे 0:02:53.000,0:02:55.000 ज्या मला माहित्येय की महत्वाच्या आहेत 0:02:55.000,0:02:57.000 आणि मला त्या सर्वांसाठी उलगडून दाखवायच्या आहेत. 0:02:57.000,0:03:00.000 तर मी सुरुवात केली नातेसंबंधांपासून. 0:03:00.000,0:03:03.000 कारण दहा वर्षं समाजकार्यात घालवल्यावर 0:03:03.000,0:03:05.000 तुमच्या लक्षात येतं की 0:03:05.000,0:03:08.000 केवळ संबंधांमुळेच आपण इथे आहोत. 0:03:08.000,0:03:11.000 त्यामुळेच आपल्या आयुष्याला हेतू आणि अर्थ प्राप्त होतो. 0:03:11.000,0:03:13.000 सारे काही याबद्दलच आहे. 0:03:13.000,0:03:15.000 याने काही फरक पडत नाही की तुम्ही अशा लोकांशी बोलताय 0:03:15.000,0:03:18.000 जे सामाजिक न्यायासाठी काम करतात किंवा मानसिक स्वास्थ्य आणि छळ आणि दुर्लक्ष (यांत), 0:03:18.000,0:03:20.000 आपल्याला कळत की नातेसंबंध, 0:03:20.000,0:03:23.000 संबंध जोडण्याची क्षमता ही -- 0:03:23.000,0:03:26.000 जी आपल्या जैविक संरचनेतच आहे -- 0:03:26.000,0:03:28.000 त्यामुळेच आपण इथे आहोत. 0:03:28.000,0:03:31.000 तेव्हा मी विचार केला की, चला, मी नाते संबंधांपासूनच सुरुवात करावी. 0:03:31.000,0:03:34.000 तर, म्हणजे बघा 0:03:34.000,0:03:36.000 जेव्हा तुमच्या बॉसकडून तुमचं मूल्यमापन होतं, 0:03:36.000,0:03:39.000 आणि बॉस तुमच्याबद्दल ३७ चांगल्या गोष्टी सांगतो, 0:03:39.000,0:03:41.000 आणि एक गोष्ट -- "ज्यात सुधारणेला वाव असतो?" 0:03:41.000,0:03:43.000 (हशा) 0:03:43.000,0:03:46.000 आणि तुम्ही त्या एकाच गोष्टीचा विचार करीत राहता, खरं ना? 0:03:47.000,0:03:50.000 तर, माझ्या कामाच्या बाबतीतही असंच काहीसं झालं, 0:03:50.000,0:03:53.000 कारण जेव्हा तुम्ही लोकांना प्रेमाविषयी विचारता, 0:03:53.000,0:03:55.000 ते तुम्हाला प्रेमभंगाबद्दल सांगतात. 0:03:55.000,0:03:57.000 जेव्हा तुम्ही लोकांना आपलेपणाबद्दल विचारता, 0:03:57.000,0:04:00.000 ते तुम्हाला त्यांचे सर्वात वेदनामय असे वगळले 0:04:00.000,0:04:02.000 जाण्याचे अनुभव सांगतात. 0:04:02.000,0:04:04.000 आणि जेव्हा तुम्ही लोकांना संबंधांविषयी विचारता, 0:04:04.000,0:04:07.000 लोकांनी मला तुटलेपणाच्या गोष्टी सांगितल्या. 0:04:07.000,0:04:10.000 तर लवकरच -- खरंतर ६ आठवडे संशोधनात घालवल्यावर -- 0:04:10.000,0:04:13.000 माझ्यासमोर एक अनामिक गोष्ट आली 0:04:13.000,0:04:16.000 जिने नातेसंबंधांना अशाप्रकारे उलगडले 0:04:16.000,0:04:19.000 जे मला समजत नव्हते किंवा (जे मी ) पाहिलेही नव्हते. 0:04:19.000,0:04:21.000 आणि मग मी माझे काम थांबवले 0:04:21.000,0:04:24.000 आणि विचार केला, मला ह्या गोष्टीचा छडा लावायला हवा. 0:04:24.000,0:04:27.000 आणि ती गोष्ट निघाली शरम. 0:04:27.000,0:04:29.000 आणि शरमेचा सोपा अर्थ होतो 0:04:29.000,0:04:31.000 संबंध तुटण्याचे भय: 0:04:31.000,0:04:33.000 माझ्याविषयी असे काहीतरी आहे का 0:04:33.000,0:04:36.000 जे जर इतरांना कळले वा दिसले तर 0:04:36.000,0:04:39.000 मी संबंध ठेवण्यालायक राहणार नाही? 0:04:39.000,0:04:41.000 मी शरमेबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगू शकते: 0:04:41.000,0:04:43.000 ती वैश्विक आहे; आपल्या सर्वांमध्ये असते. 0:04:43.000,0:04:45.000 केवळ तीच लोकं बेशरम असतात 0:04:45.000,0:04:47.000 ज्यांची माणुसकी वा नातेसंबंध ठेवण्याची क्षमता नसते. 0:04:47.000,0:04:49.000 कोणी तिच्याबद्दल बोलू इच्छित नाही, 0:04:49.000,0:04:52.000 आणि जितके कमी बोलाल तितकी ती जास्त वाटत असते. 0:04:54.000,0:04:56.000 ह्या शरमेच्या मूळाशी काय असतं 0:04:56.000,0:04:58.000 तर, "मी (यासाठी) लायक नाही," -- 0:04:58.000,0:05:00.000 ही जाणीव आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे: 0:05:00.000,0:05:02.000 " मी तितकासा स्पष्टवक्ता नाही, बारीक नाही, 0:05:02.000,0:05:04.000 श्रीमंत नाही, सुंदर नाही, हुशार नाही, 0:05:04.000,0:05:06.000 वरचढ नाही." 0:05:06.000,0:05:08.000 आणि ह्या साऱ्याच्या मूळाशी होती ती 0:05:08.000,0:05:11.000 अत्यंत वेदनादायी अगतिकता, 0:05:11.000,0:05:13.000 ही कल्पना की, 0:05:13.000,0:05:15.000 जर संबंध जोडायचे असतील तर 0:05:15.000,0:05:18.000 आपल्याला लोकांसमोर आपले स्वरूप उघडे करावे लागेल, 0:05:18.000,0:05:20.000 खरेखुरे समोर यावे लागेल. 0:05:20.000,0:05:23.000 आणि तुम्हाला कळलंच असेल मला अगतिकतेबद्दल काय वाटतं ते. मी तिरस्कार करते अगतिकतेचा 0:05:23.000,0:05:25.000 आणि मग मी विचार केलं, ही माझ्यासाठी एक संधी आहे 0:05:25.000,0:05:28.000 अगतिकतेला माझ्या फूटपट्टीने हरवण्याची. 0:05:28.000,0:05:31.000 मी यात शिरणार, याचा छडा लावणार, 0:05:31.000,0:05:34.000 एक वर्ष घालवणार आणि मी शरम (ही गोष्ट) पूर्णपणे उलगडून दाखवणार, 0:05:34.000,0:05:36.000 अगतिकता कशी काम करते हे समजून घेऊन, 0:05:36.000,0:05:39.000 मी तिच्यावर मात करणार आहे. 0:05:39.000,0:05:42.000 तर मी तय्यार होते आणि खूप उत्साहात देखील. 0:05:44.000,0:05:46.000 तुम्हाला कळलंच असेल की पुढे काहीतरी अनपेक्षित (वाईट) होणारे. 0:05:46.000,0:05:49.000 (हशा) 0:05:49.000,0:05:51.000 तुम्हाला माहित्येय. 0:05:51.000,0:05:53.000 तर मी शरमेबद्दल खूप काही सांगू शकेन, 0:05:53.000,0:05:55.000 पण मला इतरांचा वेळ मागावा लागेल. 0:05:55.000,0:05:58.000 पण त्या साऱ्याचे सार जे मी तुम्हाला सांगू शकते ते असे की -- 0:05:58.000,0:06:01.000 आणि ही कदाचित माझ्या दहा वर्षांच्या संशोधनातून मी शिकलेली 0:06:01.000,0:06:04.000 सर्वांत महत्वाची गोष्ट आहे. 0:06:04.000,0:06:06.000 माझ्या एका वर्षाची 0:06:06.000,0:06:08.000 सहा वर्षे झाली: 0:06:08.000,0:06:10.000 हजारो गोष्टी, 0:06:10.000,0:06:13.000 शेकडो दीर्घ मुलाखती, विशेष लक्ष गट. 0:06:13.000,0:06:15.000 एका क्षणी, लोकं मला त्यांच्या रोजनिशीची पाने पाठवत होते 0:06:15.000,0:06:18.000 आणि त्यांच्या कहाण्या पाठवत होते -- 0:06:18.000,0:06:21.000 ६ वर्षांत (जमा झालेली) हजारो तुकड्यांमधली माहिती. 0:06:21.000,0:06:23.000 आणि मला त्यावर (विषयावर) पकड आल्यासारखे वाटू लागले. 0:06:23.000,0:06:25.000 मला बऱ्यापैकी कल्पना आली की, शरम महणजे काय, 0:06:25.000,0:06:27.000 आणि तिचे कार्य कसे चालते. 0:06:27.000,0:06:29.000 मी एक पुस्तक लिहिले, 0:06:29.000,0:06:31.000 एक सिद्धांत प्रसिद्ध केला, 0:06:31.000,0:06:34.000 पण काहीतरी चुकत होते -- 0:06:34.000,0:06:36.000 आणि ते असे होते की, 0:06:36.000,0:06:38.000 जर मी सर्व मुलाखत घेतलेले लोकं घेतले 0:06:38.000,0:06:41.000 आणि त्यांची विभागणी केली 0:06:41.000,0:06:44.000 एक ते लोकं ज्यांना स्वतःच्या लायकीबद्दल खात्री होती -- 0:06:44.000,0:06:46.000 म्हणजे साऱ्याचं सार शेवटी हेच असतं ना, 0:06:46.000,0:06:48.000 स्वत्वाची जाणीव -- 0:06:48.000,0:06:51.000 ज्यांना प्रेमाची आणि आपलेपणाची प्रखर जाणीव होती -- 0:06:51.000,0:06:53.000 आणि जे लोकं ती मिळवण्यासाठी धडपडत होते, 0:06:53.000,0:06:55.000 आणि ते ज्यांना आपल्या लायकीविषयी शंका होती. 0:06:55.000,0:06:57.000 त्यांच्यात केवळ एकच फरक होता 0:06:57.000,0:06:59.000 जो त्यांना अशा लोकांपासून वेगळ करत होता ज्यांना 0:06:59.000,0:07:01.000 प्रेम आणि आपलेपणाची खोलवर जाण होती 0:07:01.000,0:07:03.000 आणि जे लोकं ती मिळवण्यासाठी धडपडतात. 0:07:03.000,0:07:05.000 आणि तो असा की, ज्या लोकांना 0:07:05.000,0:07:07.000 प्रेमाची आणि आपलेपणाची प्रखर जाणीव होती 0:07:07.000,0:07:10.000 त्यांचा विश्वास होता की आपण त्यासाठी लायक आहोत. 0:07:10.000,0:07:12.000 इतकंच. 0:07:12.000,0:07:14.000 त्यांना खात्री होती की ते लायक आहेत. 0:07:15.000,0:07:18.000 आणि माझ्यामते, एक कठीण गोष्ट 0:07:18.000,0:07:21.000 जी आपल्याला संबंध जोडण्यापासून परावृत्त करते 0:07:21.000,0:07:24.000 ती म्हणजे आपण त्यास पात्र नसल्याची भीती, 0:07:24.000,0:07:26.000 ती एक गोष्ट होती, जी मला वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या 0:07:26.000,0:07:29.000 अधिक खोलवर जाणून घ्यायची गरज भासत होती. 0:07:29.000,0:07:32.000 म्हणून मग मी असं केलं की 0:07:32.000,0:07:34.000 मी अश्या सगळ्या मुलाखती घेतल्या 0:07:34.000,0:07:37.000 जिथे मला स्वत्वाची जाणीव दिसली, जे लोकं त्या जाणीवेने जगत होते, 0:07:37.000,0:07:40.000 आणि त्या लोकांकडे पाहू लागले. 0:07:40.000,0:07:42.000 या लोकांमध्ये काय समान होतं? 0:07:42.000,0:07:44.000 मला जरा स्टेशनरी साहित्याचं व्यसन आहे, 0:07:44.000,0:07:47.000 पण तो वेगळ्या भाषणाचा विषय होईल. 0:07:47.000,0:07:50.000 तर माझ्या हातात एक फाईल फोल्डर होता आणि एक मार्कर पेन, 0:07:50.000,0:07:52.000 आणि मी म्हटलं, या संशोधनाला काय म्हणू मी? 0:07:52.000,0:07:54.000 आणि सर्वांत प्रथम माझ्या मनात जो शब्द आला 0:07:54.000,0:07:56.000 तो होता सहृदयी. 0:07:56.000,0:07:59.000 ही सहृदयी लोकं स्वत्वाच्या सखोल जाणीवेनं जगत असतात. 0:07:59.000,0:08:02.000 तेव्हा मी त्या फाईलवर (नाव) लिहिलं, 0:08:02.000,0:08:04.000 आणि माहितीकडे बघायला सुरुवात केली. 0:08:04.000,0:08:06.000 प्रत्यक्षात मी सुरुवातीचे 0:08:06.000,0:08:08.000 चार दिवस 0:08:08.000,0:08:11.000 सर्व माहिती पिंजून काढली, 0:08:11.000,0:08:14.000 माहितीचा माग घेतला, सर्व मुलाखती बाहेर काढल्या, कहाण्या वाचल्या, अनुभव वाचले. 0:08:14.000,0:08:17.000 काय संकल्पना आहे? काय सूत्र/पॅटर्न आहे? 0:08:17.000,0:08:20.000 माझा नवरा मुलांना घेऊन बाहेरगावी गेला 0:08:20.000,0:08:23.000 कारण मी अशावेळी नेहमीच एका बेभान अवस्थेत जाते, 0:08:23.000,0:08:25.000 जेव्हा मी फक्त लिहिते 0:08:25.000,0:08:28.000 आणि संशोधन करत असते. 0:08:28.000,0:08:30.000 तर मला सापडलं ते असं. 0:08:32.000,0:08:34.000 त्यांच्यात समान गोष्ट 0:08:34.000,0:08:36.000 होती ती म्हणजे धैर्याची जाण. 0:08:36.000,0:08:39.000 आणि इथे तुमच्यासाठी मला धैर्य आणि शौर्य यातील फरक स्पष्ट केला पाहिजे . 0:08:39.000,0:08:41.000 धैर्य (करेज), याची मूळ व्याख्या, 0:08:41.000,0:08:43.000 जेव्हा हा शब्द पहिल्यांदा इंग्रजी भाषेत आला -- 0:08:43.000,0:08:46.000 तो लॅटिन भाषेतल्या 'कर' शब्दावरून ज्याचा अर्थ होतो हृद्य -- 0:08:46.000,0:08:48.000 आणि मूळ व्याख्या अशी 0:08:48.000,0:08:51.000 होती की तुम्ही कोण आहात हे तुमच्या संपूर्ण हृदयापासून सांगणे. 0:08:51.000,0:08:53.000 आणि ह्या साऱ्या लोकांकडे 0:08:53.000,0:08:55.000 साध्या शब्दांत, अपरिपूर्ण असण्याचे 0:08:55.000,0:08:57.000 धैर्य होते. 0:08:58.000,0:09:00.000 त्यांच्याकडे दयाबुद्धी होती 0:09:00.000,0:09:03.000 आधी स्वतःशी दयाबुद्धीने वागण्याची आणि मग इतरांशी, 0:09:03.000,0:09:06.000 कारण, असं आहे की, आपण दुसऱ्यांशी सहानुभूतीने वागू शकत नाही 0:09:06.000,0:09:09.000 जर आपण स्वतःशी दयाबुद्धीने वागलो नाही तर. 0:09:09.000,0:09:11.000 आणि शेवटची गोष्ट म्हणजे ते जोडलेले होते, 0:09:11.000,0:09:13.000 आणि -- हे कठीण आहे -- 0:09:13.000,0:09:16.000 खरं वागल्यामुळे, 0:09:16.000,0:09:19.000 त्यांची स्वतःला अपेक्षित स्वप्रतिमा सोडायची तयारी होती (कशासाठी तर) 0:09:19.000,0:09:21.000 त्यांच्या खऱ्या स्वरुपात पुढे येण्यासाठी, 0:09:21.000,0:09:24.000 आणि जे नातेसंबंध जोडण्यासाठी तुम्हाला 0:09:24.000,0:09:26.000 करावंच लागतं. 0:09:28.000,0:09:30.000 दुसरी गोष्ट जी त्यांच्यात समान होती 0:09:30.000,0:09:32.000 ती म्हणजे: 0:09:35.000,0:09:38.000 त्यांनी अगतिकतेचा पूर्णपणे स्वीकार केला होतं. 0:09:40.000,0:09:43.000 त्यांचा विश्वास होता 0:09:43.000,0:09:46.000 की ज्या गोष्टी त्यांना अगतिक बनवत होत्या 0:09:46.000,0:09:48.000 त्या त्यांना सुंदरही बनवत होत्या. 0:09:50.000,0:09:52.000 त्यांच्या बोलण्यातून अगतिकता ही 0:09:52.000,0:09:54.000 सुखदायी, 0:09:54.000,0:09:57.000 किंवा अतिशय वेदनामय असल्याचे येत नव्हते-- 0:09:57.000,0:09:59.000 जसं मी आधी शरमेच्या मुलाखतींमध्ये ऐकलं होतं. 0:09:59.000,0:10:02.000 त्यांच्यामते अगतिकता गरजेची होती. 0:10:03.000,0:10:05.000 त्यांच्या बोलण्यातून (जाणवत होती) ती तयारी 0:10:05.000,0:10:08.000 पहिल्यांदा प्रेमाची कबुली देण्याची, 0:10:08.000,0:10:11.000 तयारी 0:10:11.000,0:10:13.000 अशा गोष्टी करण्याची 0:10:13.000,0:10:16.000 जिथे कोणतीही खात्री नसते, 0:10:16.000,0:10:18.000 तयारी 0:10:18.000,0:10:20.000 तुमच्या मॅमोग्राफीनंतर डॉक्टरांच्या बोलावण्याची 0:10:20.000,0:10:22.000 वाट पाहण्याची. 0:10:23.000,0:10:26.000 त्यांची अशा नात्यामध्ये गुंतवणूक करायची तयारी होती 0:10:26.000,0:10:29.000 जे यशस्वी होईल किंवा होणार नाही. 0:10:29.000,0:10:32.000 त्यांच्यामते ही गोष्ट मुलभूत होती. 0:10:32.000,0:10:35.000 मला स्वतःला ही दगाबाजी वाटत होती. 0:10:35.000,0:10:38.000 माझा विश्वास बसत नव्हता (कारण) मी संशोधनाशी एकनिष्ठतेची 0:10:38.000,0:10:40.000 शपथ घेतली होती, जिथे आमचं काम -- 0:10:40.000,0:10:42.000 तुम्हाला माहित्येय की संशोधनाची व्याख्या आहे की 0:10:42.000,0:10:45.000 नियंत्रण करणे आणि अंदाज बांधणे, तत्वांचा अभ्यास 0:10:45.000,0:10:47.000 केवळ एका कारणासाठी 0:10:47.000,0:10:49.000 नियंत्रण आणि अंदाज बांधण्यासाठी. 0:10:49.000,0:10:51.000 आणि आता माझ्या या नियंत्रित आणि अचूक 0:10:51.000,0:10:53.000 अंदाज बांधण्याच्या मोहिमेतून 0:10:53.000,0:10:56.000 असे उत्तर मिळाले की अगतिकतेने जगणे हाच खरा मार्ग 0:10:56.000,0:10:59.000 आणि नियंत्रित करणे आणि अंदाज बांधणे थांबवा. 0:10:59.000,0:11:02.000 याने मला थोडे नैराश्य आले -- 0:11:02.000,0:11:06.000 (हशा) 0:11:06.000,0:11:09.000 -- जे प्रत्यक्षात हे असे (प्रचंड) दिसत होते. 0:11:09.000,0:11:11.000 (हशा) 0:11:11.000,0:11:13.000 आणि होते सुद्धा. 0:11:13.000,0:11:16.000 मी त्याला नैराश्य म्हणते; माझी समुपदेशक त्याला आध्यात्मिक जागृती म्हणते. 0:11:17.000,0:11:19.000 आध्यात्मिक जागृती ऐकायला नैराश्यापेक्षा बरं वाटतं, 0:11:19.000,0:11:21.000 पण तुम्हाला सांगते ते नैराश्यच होतं. 0:11:21.000,0:11:23.000 आणि मला माझे संशोधन बाजूला ठेवावे लागले आणि समुपदेशक शोधावा लागला. 0:11:23.000,0:11:26.000 तुम्हाला म्हणून सांगते: तुम्हाला स्वतःची ओळख होते 0:11:26.000,0:11:29.000 जेव्हा तुम्ही मित्रांना फोन करून सांगता, "मला वाटतं मला एक समुपदेशकाची गरज आहे. 0:11:29.000,0:11:32.000 तुम्ही कोणाचे नाव सुचवता का?" 0:11:32.000,0:11:34.000 कारण माझ्या पाच मित्रांची प्रतिक्रिया होती, 0:11:34.000,0:11:36.000 "बाप रे! मला नाही तुझा/तुझी समुपदेशक व्हायचं." 0:11:36.000,0:11:39.000 (हशा) 0:11:39.000,0:11:41.000 मला असं झालं, "ह्याला काय अर्थ आहे?" 0:11:41.000,0:11:44.000 आणि त्यावर त्याचं म्हणणं, "अग, मी सहज म्हटलं. 0:11:44.000,0:11:46.000 तुझी ती फूटपट्टी घेऊन येऊ नकोस." 0:11:46.000,0:11:49.000 मी म्हटलं, "ठीक आहे." 0:11:51.000,0:11:53.000 तर मला समुपदेशक सापडली. 0:11:53.000,0:11:56.000 माझी तिच्याबरोबर, डायनाबरोबर पहिली भेट -- 0:11:56.000,0:11:58.000 मी सहृदयी लोकं कसे जगतात याची 0:11:58.000,0:12:01.000 माझी यादी घेऊन आले होते, आणि मी (तिच्यासमोर) बसले 0:12:01.000,0:12:03.000 आणि तिने विचारलं, "कशी आहेस?" 0:12:03.000,0:12:06.000 आणि मी म्हटलं, "मी मस्त. मी ठीक आहे." 0:12:06.000,0:12:08.000 तिने विचारलं, "काय चालू आहे?" 0:12:08.000,0:12:11.000 आणि ही समुपदेशक दुसऱ्या समुपदेशकांवर उपचार करते, 0:12:11.000,0:12:13.000 कारण आम्हाला त्यांच्याकडे जायची गरजच असते, 0:12:13.000,0:12:16.000 कारण त्यांच्या मुर्खपणा मोजण्याच्या पट्ट्या चांगल्या असतात. 0:12:16.000,0:12:18.000 (हशा) 0:12:18.000,0:12:20.000 आणि मी म्हटलं, 0:12:20.000,0:12:22.000 "हे बघ, मी झगडते आहे." 0:12:22.000,0:12:24.000 आणि तिने विचारलं, "काय झगडा आहे?" 0:12:24.000,0:12:27.000 मी म्हटलं, " म्हणजे मला अगतिकतेबद्दल प्रश्न आहे." 0:12:27.000,0:12:30.000 आणि मला माहित्येय की अगतिकता हे 0:12:30.000,0:12:32.000 शरम आणि भीतीचं 0:12:32.000,0:12:34.000 आणि स्वत्वासाठीच्या झगड्याचं मूळ आहे. 0:12:34.000,0:12:37.000 पण असं दिसतयं की (अगतिकता) हेच 0:12:37.000,0:12:40.000 आनंद, सर्जनशीलता, 0:12:40.000,0:12:42.000 आपलेपणा, प्रेम यांचं जन्मस्थान आहे. 0:12:42.000,0:12:44.000 आणि मला वाटतं मला प्रॉब्लेम आहे, 0:12:44.000,0:12:47.000 आणि मला मदतीची गरज आहे. 0:12:47.000,0:12:49.000 आणि मी म्हटलं, "पण हे बघ: 0:12:49.000,0:12:51.000 इथे काही कौटुंबिक प्रश्न, 0:12:51.000,0:12:53.000 लहानपणीच्या (शोषणाच्या) आठवणी हा प्रकार नाही." 0:12:53.000,0:12:55.000 (हशा) 0:12:55.000,0:12:58.000 "मला फक्त काही उपाय हवे आहेत." 0:12:58.000,0:13:02.000 (हशा) 0:13:02.000,0:13:05.000 (टाळ्या) 0:13:05.000,0:13:07.000 धन्यवाद. 0:13:09.000,0:13:12.000 आणि तिने मान डोलावली. 0:13:12.000,0:13:14.000 (हशा) 0:13:14.000,0:13:17.000 आणि मग मी म्हटलं, " हे वाईट आहे ना?" 0:13:17.000,0:13:20.000 आणि (त्यावर) ती म्हणाली, "हे चांगलं ही नाही आणि वाईटही." 0:13:20.000,0:13:22.000 (हशा) 0:13:22.000,0:13:24.000 "हे आहे हे असं आहे." 0:13:24.000,0:13:27.000 आणि मी म्हटलं, "अरे माझ्या देवा! हे फार तापदायक ठरणार असं दिसतंय." 0:13:27.000,0:13:30.000 (हशा) 0:13:30.000,0:13:32.000 आणि ते ठरलं ही आणि नाही ही. 0:13:32.000,0:13:35.000 आणि त्याला एक वर्षं लागलं. 0:13:35.000,0:13:37.000 आणि तुम्हाला माहित्येय की अशी काही लोकं असतात , 0:13:37.000,0:13:40.000 ज्यांना जेव्हा लक्षात येतं की अगतिकता आणि हळवेपणा गरजेचा आहे, 0:13:40.000,0:13:43.000 तेव्हा ते शरण जातात आणि (या गोष्टी) आपल्याशा करतात. 0:13:43.000,0:13:45.000 एक: मी ती नव्हे, 0:13:45.000,0:13:48.000 आणि दोन: मी असल्या लोकांशी मैत्री देखील करत नाही. 0:13:48.000,0:13:51.000 (हशा) 0:13:51.000,0:13:54.000 माझ्यासाठी ही वर्षभराची लढाई ठरली. 0:13:54.000,0:13:56.000 ती जणू कुस्तीच होती. 0:13:56.000,0:13:58.000 अगतिकता मला ढकलत होती आणि मी जोर लावून प्रतिकार करत होते. 0:13:58.000,0:14:01.000 मी कुस्ती हारले, 0:14:01.000,0:14:03.000 पण माझं आयुष्य परत जिंकले. 0:14:03.000,0:14:05.000 आणि मग मी पुन्हा संशोधनाकडे वळले 0:14:05.000,0:14:07.000 आणि पुढची दोन वर्ष हे समजून घेण्यात घालवली 0:14:07.000,0:14:10.000 की ती , सहृदयी लोकं 0:14:10.000,0:14:12.000 कोणते पर्याय निवडतात, 0:14:12.000,0:14:14.000 आणि ते 0:14:14.000,0:14:16.000 अगतिकतेचा कसा वापर करतात. 0:14:16.000,0:14:18.000 आपण अगतिकतेशी इतके का झगडत असतो? 0:14:18.000,0:14:21.000 अगतिकतेशी झगडणारी मी एकटीच आहे का? 0:14:21.000,0:14:23.000 नाही. 0:14:23.000,0:14:25.000 तर मी हे शिकले. 0:14:26.000,0:14:29.000 आपण अगतिकतेला बधीर करतो -- 0:14:29.000,0:14:31.000 जेव्हा आपण कशाची तरी वाट पहात असतो. 0:14:31.000,0:14:33.000 हे मजेशीर आहे, मी ट्विटर आणि फेसबुकवर विचारले 0:14:33.000,0:14:35.000 असे की, "तुम्ही अगतिकतेची व्याख्या कशी कराल? 0:14:35.000,0:14:37.000 तुम्हाला कशामुळे अगतिक वाटते?" 0:14:37.000,0:14:40.000 आणि दीड तासात मला दीडशे प्रतिसाद आले. 0:14:40.000,0:14:42.000 कारण मला हे जाणून घ्यायचं होतं की 0:14:42.000,0:14:44.000 लोकांना काय वाटतं. 0:14:45.000,0:14:47.000 माझ्या नवऱ्याला मदत मागणं 0:14:47.000,0:14:50.000 कारण मी आजारी आहे आणि आमचं नवीन लग्न झालंय; 0:14:50.000,0:14:53.000 नवऱ्याशी सेक्सला सुरुवात करणं; 0:14:53.000,0:14:55.000 बायकोशी सेक्सला सुरुवात करणं; 0:14:55.000,0:14:58.000 नकार पचवणं; कोणालातरी डेटसाठी विचारणं; 0:14:58.000,0:15:00.000 डॉक्टरच्या निदानाची वाट पाहणे; 0:15:00.000,0:15:03.000 नोकरी जाणे; लोकांना कामावरून काढून टाकणे -- 0:15:03.000,0:15:05.000 ह्या जगात आपण राहतो. 0:15:05.000,0:15:08.000 आपण एका अगतिक (करणाऱ्या)जगात राहतो. 0:15:08.000,0:15:10.000 आणि त्याच्याशी जुळवून घेण्याचा एक मार्ग म्हणजे 0:15:10.000,0:15:12.000 आपण अगतिकतेला दाबून टाकतो. 0:15:12.000,0:15:14.000 आणि मला वाटते याला पुरावा आहे -- 0:15:14.000,0:15:16.000 आणि हा पुरावा असण्याचं एकमेक कारण नव्हे, 0:15:16.000,0:15:18.000 माझ्या मते हे सर्वात मोठं कारण आहे -- 0:15:18.000,0:15:22.000 अमेरिकन इतिहासातली आपली सर्वाधिक कर्जात बुडलेली, 0:15:22.000,0:15:25.000 स्थूल, 0:15:25.000,0:15:28.000 व्यसनी आणि औषधं खाणारी 0:15:28.000,0:15:30.000 वयस्क अमेरिकन पिढी आहे. 0:15:33.000,0:15:36.000 आणि प्रॉब्लेम असा आहे -- आणि हे मी संशोधनातून शिकले -- 0:15:36.000,0:15:39.000 की तुम्ही भावनांना वेगवेगळया करून बधीर करू शकत नाही. 0:15:40.000,0:15:43.000 तुम्ही असं म्हणू शकत नाही की, ह्या साऱ्या वाईट गोष्टी आहेत. 0:15:43.000,0:15:45.000 ही अगतिकता, हे दुःख, ही शरम, 0:15:45.000,0:15:47.000 ही भीती, ही निराशा. 0:15:47.000,0:15:49.000 मला ह्या भावना जाणवायला नको आहेत. 0:15:49.000,0:15:52.000 मी दोन ग्लास बीयर पिणार आणि चिकन बिर्याणी खाणार. 0:15:52.000,0:15:54.000 (हशा) 0:15:54.000,0:15:56.000 मला ह्या भावना जाणवायला नको आहेत. 0:15:56.000,0:15:58.000 आणि मला माहित्येय की हे ओळखीचं हसू आहे. 0:15:58.000,0:16:01.000 मी तुमच्या आयुष्यांत घुसखोरी करून पोट भरते. 0:16:01.000,0:16:03.000 देवा! (हिला कसं कळलं?) 0:16:03.000,0:16:05.000 (हशा) 0:16:05.000,0:16:08.000 तुम्ही केवळ त्या दुःखद जाणीवा बधीर करू शकत नाही 0:16:08.000,0:16:10.000 त्या बरोबर आपल्या भावनाही बधीर होतात. 0:16:10.000,0:16:12.000 तुम्ही निवडकपणे असंवेदनशील होऊ शकत नाही. 0:16:12.000,0:16:15.000 म्हणून जेव्हा आपण त्या (दुःखद जाणीवा) दडपतो, 0:16:15.000,0:16:17.000 तेव्हा आपण आनंद दडपतो, 0:16:17.000,0:16:19.000 आपण कृतज्ञता दडपतो, 0:16:19.000,0:16:21.000 आपण सुख दडपतो. 0:16:21.000,0:16:24.000 मग आपण केविलवाणे होतो, 0:16:24.000,0:16:26.000 आणि अर्थ आणि उद्देश शोधू लागतो, 0:16:26.000,0:16:28.000 आणि मग आपल्याला अगतिक वाटते, 0:16:28.000,0:16:31.000 आणि मग आपण पुन्हा दोन ग्लास बीयर पितो आणि चिकन बिर्याणी हाणतो. 0:16:31.000,0:16:34.000 आणि एका दुष्टचक्राची सुरुवात होते. 0:16:36.000,0:16:39.000 एक गोष्ट ज्याचा आपण विचार करावा असं मला वाटतं 0:16:39.000,0:16:41.000 ती म्हणजे आपण का आणि कसे बधीर होतो. 0:16:41.000,0:16:44.000 आणि हे केवळ व्यसन असायला हवं असं नाही. 0:16:44.000,0:16:46.000 दुसरी एक गोष्ट आपण करतो 0:16:46.000,0:16:49.000 ती म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट नियमित करायला जातो. 0:16:50.000,0:16:53.000 धर्म ही एक विश्वास आणि चमत्कारावर असलेली श्रद्धा न राहता 0:16:53.000,0:16:55.000 एक पक्की गोष्ट झाली आहे. 0:16:55.000,0:16:58.000 मी बरोबर, तू चूक. गप्प बस. 0:16:58.000,0:17:00.000 विषय संपला. 0:17:00.000,0:17:02.000 अगदी पक्कं. 0:17:02.000,0:17:04.000 आपण जितके जास्त भितो, तितके अगतिक होतो, 0:17:04.000,0:17:06.000 आणि मग अजून जास्ती भितो. 0:17:06.000,0:17:08.000 आजचं राजकारण हे असं दिसतं. 0:17:08.000,0:17:10.000 आता कोणी चर्चा करताना दिसत नाही. 0:17:10.000,0:17:12.000 कोणताही संवाद नसतो. 0:17:12.000,0:17:14.000 असतात ते फक्त दोषारोप. 0:17:14.000,0:17:17.000 तुम्हाला माहित्येय संशोधनात आरोपाची व्याख्या कशी करतात? 0:17:17.000,0:17:20.000 दुःख आणि अस्वस्थतेला वाट मोकळी करून देण्याचा एक मार्ग. 0:17:21.000,0:17:23.000 आपण परिपूर्णतेचा ध्यास घेतो. 0:17:23.000,0:17:26.000 जर कोणाला आपलं आयुष्य असं दिसायला हवं असेल तर ते मला, 0:17:26.000,0:17:28.000 पण तसं होत नसतं. 0:17:28.000,0:17:30.000 कारण आपण काय करतो तर, आपल्या ढुंगणावरची चरबी 0:17:30.000,0:17:32.000 काढून आपल्या गालावर चढवायला जातो. 0:17:32.000,0:17:35.000 (हशा) 0:17:35.000,0:17:37.000 जे माझी इच्छा आहे की १०० वर्षानंतर 0:17:37.000,0:17:39.000 लोकं (जेव्हा) मागे वळून बघतील तेव्हा, "वाव." म्हणतील. 0:17:39.000,0:17:41.000 (हशा) 0:17:41.000,0:17:43.000 आणि सर्वात भयंकर म्हणजे आपण आपल्या मुलांना 0:17:43.000,0:17:45.000 परिपूर्ण बनवू पाहतो. 0:17:45.000,0:17:47.000 मी सांगते आपल्याला मुलांबद्दल काय वाटतं ते. 0:17:47.000,0:17:50.000 जेव्हा ती या जगात येतात तेव्हा संघर्ष करण्यासाठी सक्षम असतात. 0:17:50.000,0:17:53.000 आणि जेव्हा तुम्ही त्या परिपूर्ण बाळाला हातात घेता, 0:17:53.000,0:17:55.000 तुमचं काम हे म्हणणं नसतं की, "बघा तिच्याकडे, ती परिपूर्ण आहे. 0:17:55.000,0:17:57.000 माझं काम आहे तिला परिपूर्ण ठेवणं -- 0:17:57.000,0:18:00.000 हे बघणं की कशी ती ५वीत टेनिस टीम मध्ये निवडली जाईल आणि ७वीत गेल्यावर आय आय टी त." 0:18:00.000,0:18:02.000 हे आपलं काम नाहीये. 0:18:02.000,0:18:04.000 आपलं काम आहे (तिच्याकडे) पाहून म्हणणं की, 0:18:04.000,0:18:07.000 "माहित्येय? तू परिपूर्ण नाहीयेस, आणि तुला संघर्षासाठी घडवलंय, 0:18:07.000,0:18:09.000 पण प्रेमावर आणि आपलेपणावर तुझा हक्क आहे." 0:18:09.000,0:18:11.000 हे आपलं काम आहे. 0:18:11.000,0:18:13.000 मला अशी वाढवलेली मुलांची एक पिढी दाखवा, 0:18:13.000,0:18:16.000 आणि मला वाटतं आजचे आपले सगळे प्रश्न सुटतील. 0:18:16.000,0:18:20.000 आपण सोंग घेतो की आपल्या कृतीचा 0:18:20.000,0:18:23.000 इतरांवर काही परिणाम होत नाही. 0:18:23.000,0:18:25.000 आपण असे व्यक्तिगत आयुष्यात वागतो. 0:18:25.000,0:18:27.000 आणि व्यावसायिक पातळीवरही -- 0:18:27.000,0:18:29.000 मग ती आर्थिक मदत असो किंवा तेल गळती, 0:18:29.000,0:18:31.000 किंवा (वस्तू) माघारी बोलावणे -- 0:18:31.000,0:18:33.000 आपण दाखवतो की आपल्या कृतीमुळे 0:18:33.000,0:18:36.000 लोकांवर फार मोठा परिणाम होत नाहीये. 0:18:36.000,0:18:39.000 मी कंपन्यांना असं सांगेन की, हे काही तुमचा पहिला प्रदर्शनातला स्टॉल नाहीये. 0:18:40.000,0:18:42.000 आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही सच्चाईने आणि सचोटीने वागा 0:18:42.000,0:18:44.000 आणि म्हणा, "आम्ही क्षमा मागतो. 0:18:44.000,0:18:47.000 आम्ही सर्वं ठीक करू." 0:18:50.000,0:18:52.000 पण अजून एक मार्ग आहे, आणि तो सांगून मी थांबेन. 0:18:52.000,0:18:54.000 हे, जे मला सापडलंय: 0:18:54.000,0:18:56.000 स्वतःला पारदर्शक बनवा, 0:18:56.000,0:18:58.000 (लोकांना) आरपार बघू द्या, 0:18:58.000,0:19:01.000 तुमच्या अगतिकतेसकट (तुम्हाला) बघू द्या; 0:19:01.000,0:19:03.000 संपूर्ण हृदयापासून प्रेम करा, 0:19:03.000,0:19:05.000 जरी कशाचीच खात्री नसेल तरीही -- 0:19:05.000,0:19:07.000 आणि हे सर्वात अवघड आहे, 0:19:07.000,0:19:10.000 एक पालक म्हणून मी तुम्हाला सांगते, हे अत्यंत कठीण आहे -- 0:19:12.000,0:19:15.000 त्या क्षणी कृतज्ञ आणि आनंदी राहणं 0:19:15.000,0:19:17.000 जेव्हा भीती वाटत असते, 0:19:17.000,0:19:19.000 जेव्हा आपल्याला नवल वाटतं, "मी तुझ्यावर एवढं प्रेम करू शकेन का? 0:19:19.000,0:19:21.000 यावर इतका गाढ विश्वास ठेवू शकते का? 0:19:21.000,0:19:24.000 याबद्दल मी इतकी आग्रही असू शकते का?" 0:19:24.000,0:19:26.000 जरा क्षणभर थांबून, विपरीत कल्पनाविलास करण्याऐवजी, 0:19:26.000,0:19:29.000 असं म्हणणं, "मी किती आभारी आहे, 0:19:29.000,0:19:32.000 कारण मी इतकी/इतका अगतिक आहे याचाच अर्थ मी जिवंत आहे." 0:19:33.000,0:19:36.000 आणि शेवटचे आणि माझ्या मते सर्वात महत्वाचे, 0:19:36.000,0:19:39.000 मी पुरेशी आहे यावर विश्वास ठेवणे. 0:19:39.000,0:19:41.000 कारण जेव्हा आपण मी पुरेशी आहे, 0:19:41.000,0:19:44.000 या भावनेने काम सुरु करतो, 0:19:45.000,0:19:48.000 तेव्हा आपण आरडाओरड थांबवतो आणि ऐकायला सुरुवात करतो, 0:19:49.000,0:19:51.000 आपण आपल्या आजूबाजूच्यांशी अधिक दयाळू आणि सज्जनपणे वागतो, 0:19:51.000,0:19:54.000 आणि स्वतःशी ही. 0:19:54.000,0:19:56.000 मला एवढेच सांगायचे आहे. धन्यवाद. 0:19:56.000,0:19:59.000 (टाळ्या)