Return to Video

टीकेने खचून जाण्याचे कारण नाही.

  • 0:07 - 0:09
    बुटकी मुलगी म्हणून लहानाची मोठी होणे
  • 0:09 - 0:12
    कठीण होते कारण
    लोक नेहमीच माझ्यावर टीका करत,
  • 0:12 - 0:14
    लोकांनी माझ्यावर माझ्या क्षमतांबद्दल
    कधीही टीका केली नाही
  • 0:14 - 0:17
    त्यांनी नेहमीच माझ्या उंचीवर
    लक्ष केंद्रित केले.
  • 0:17 - 0:21
    माझे शिक्षक आणि नृत्य प्रशिक्षक
    मला सांगायचे की मी समोर असणे आवश्यक आहे
  • 0:21 - 0:22
    कारण मी सर्वात लहान होते.
  • 0:22 - 0:24
    आणि त्यामुळे मला मांडणीमध्ये पहिले
    उभे राहावे लागे.
  • 0:24 - 0:28
    कारण त्यांना बुटक्या लोकांपासून सुरु
    कारायचे असायचे.
  • 0:28 - 0:31
    माझ्या आजीनेच मला,
    स्वत: ला महत्व कसे द्यावे
  • 0:31 - 0:34
    आणि इतर लोकांच्या बोलण्याने कसे
    प्रभावित होऊ नये हे शिकवले
  • 0:34 - 0:38
    कोणत्याही नकारात्मक गोष्टीला कसे सकारात्मक
    गोष्टीमध्ये बदलायचे हे तिने मला शिकवले.
  • 0:38 - 0:40
    उदाहरणार्थ: एकजण माझ्या मैत्रिणीला जाड
  • 0:40 - 0:43
    आणि ती मार्शमेल्लोव सारखी दिसते असे बोलला
  • 0:43 - 0:46
    पण आता मी याविषयी या
    विचार करते,ती एक मार्शमॅलो आहे
  • 0:46 - 0:50
    कारण गरम कोको बनवण्यासाठी मार्शमेल्लोव
    वापरतात आणि गरम कोको कोणालाही उब देते
  • 0:50 - 0:52
    आणि हेच ती करतेः
    ती त्यांना उबदार ठेवते,
  • 0:52 - 0:57
    ती कोणालाही उत्साहित करण्यास तयार असते
    आणि तुम्हाला तिच्यासोबत कंटाळाही येत नाही
  • 0:57 - 1:00
    टीका तुम्हाला विविध भावनांचा अनुभव
    करून देऊ शकते
  • 1:00 - 1:01
    ती असुरक्षित अनुभव करून देऊ शकते.
  • 1:01 - 1:04
    ती पुरेसा चांगला नसलेला अनुभव करून देऊ शकते.
  • 1:04 - 1:06
    ती तुम्हाला तुम्ही कोण आहात
    आणि तुम्हाला कोण दर्शवते
  • 1:06 - 1:08
    याबद्दल अनिश्चितता अनुभव करून देऊ शकते
  • 1:08 - 1:10
    टीकेचा अर्थ काय होतो?
  • 1:10 - 1:14
    एखादा व्यक्ती किंवा
    त्याने केलेल्या चुका किंवा
  • 1:14 - 1:19
    त्यांची निदर्शनास आलेली दुष्कृत्ये
    त्यांच्या विषयी नापसंती दर्शविणे.
  • 1:19 - 1:22
    आत्ता, असे वाटेल की टीका झालेले
    मला आवडत नाही.
  • 1:22 - 1:25
    पण प्रत्यक्षात तसे नाही.
  • 1:25 - 1:26
    टीका ही चांगली गोष्ट असू शकते.
  • 1:26 - 1:27
    म्हणजे मला काय म्हणायचय?
  • 1:27 - 1:30
    टीका वाईटच असण्याची गरज नाही.
  • 1:30 - 1:34
    अशा प्रकारच्या टीकेला विधायक टीका म्हणतात.
  • 1:34 - 1:36
    हे ज्याच्याशी बोलले जात आहे
    त्यास समजण्यास मदत होते की
  • 1:36 - 1:40
    तुम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहात
    आणि त्यांना त्रास देण्यासाठी
  • 1:40 - 1:44
    प्रयत्न करत नाही आहात. उदाहरणार्थ, माझा
    मित्र “क्लोइचे" केस खरोखर वाईट दिसतात,
  • 1:44 - 1:48
    पण तीला वाटते की ते सर्वोत्तम दिसतात,
    सर्वांपेक्षा सुंदर.
  • 1:48 - 1:52
    मी तिला असे सांगणार नाही की ते तिला
    विजेचा झटका बसल्यासारखे दिसतात
  • 1:52 - 1:54
    आणि ते पक्षाच्या घरट्यासाखे दिसतात,
  • 1:54 - 1:57
    कारण यामुळे तिच्या भावना दुखावतील
    आणि तिला लाजिरवाणे वाटेल.
  • 1:57 - 2:00
    त्याऐवजी, कदाचित मी तिला सांगेन
    तिने काहीतरी सोपी केशरचना केली पाहिजे
  • 2:00 - 2:03
    किंवा विशिष्ट भागात ताणले पाहिजेत.
  • 2:03 - 2:05
    काहीवेळा आपले शब्द उपयुक्त असतात,
  • 2:05 - 2:08
    परंतु आपले भाव
    आणि स्वर हा असा एक मुद्दा आहे
  • 2:08 - 2:11
    ज्यामुळे पीडिताला जवळजवळ
    आपण हल्ला केल्याची भावना येते.
  • 2:11 - 2:14
    उदाहरणार्थ, माझा मित्र “झॅक”
    याचा ओंगळ वास येतो.
  • 2:14 - 2:18
    मी त्याला असे म्हणणार नाही की
    " हे जॅक,
  • 2:18 - 2:22
    मला असे वाटते कि जर तू दुर्गंधीनाशक
    वापरशील तर आम्ही सर्व तुझे कौतुक करू
  • 2:22 - 2:26
    कारण तुला माहितीये, वास येत आहे आणि तो
    बिलकुलच चांगला येत नाहीये.
  • 2:26 - 2:31
    आणि एक सुचवतो, कदाचित तुजतुझ्या आईकडून
    काही दुर्गंध नाशक घेऊ शकतोस.
  • 2:31 - 2:36
    हे त्याला चांगले वाटण्यासाठी मदत करणार नाही.
  • 2:36 - 2:40
    जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर वाईट
    किंवा नकारात्मक मार्गाने टीका करते तेव्हा,
  • 2:40 - 2:42
    तुम्ही स्वत: साठी सक्षमपणे राहणे आवश्यक आहे.
  • 2:42 - 2:46
    तुम्ही जे आहात ते राहण्यासाठी तुमच्यामध्ये
    आत्मविश्वास असणे गरजेचे आहे
  • 2:46 - 2:48
    पण आत्मविश्वासू राहणे
    ही काही सोपी गोष्ट नाही.
  • 2:48 - 2:51
    नकारात्मक टीके चा तुमच्यावर
    परिणाम होणार नाही, यासाठी
  • 2:51 - 2:55
    तुम्ही काहीतरी नकारात्मक सकारात्मकतेत
    बदलण्यात सक्षम असणे आवश्यक आहे.
  • 2:55 - 2:57
    जसे मला माझ्या आजीने शिकवले.
  • 2:57 - 3:01
    प्रथम, तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे
    की ह्यात काहीही वैयक्तिक नाही
  • 3:01 - 3:03
    आणि ती व्यक्ती फक्त
    त्यांचे तुमच्याबद्दल मत देत आहे
  • 3:03 - 3:06
    आणि असे सांगत नाहीत कि तुम्ही तसेच आहात
    जे त्यांनी सांगितले.
  • 3:06 - 3:07
    एकदा तुम्ही हे केल्यावर,
  • 3:07 - 3:09
    तूम्ही ते कधीही करू शकता.
  • 3:09 - 3:11
    उदाहरणार्थ, मी बुटकी आहे का? होय.
  • 3:11 - 3:13
    पण ते मला परिभाषित करते? नाही.
  • 3:13 - 3:15
    इथे बरेच फायदे आहेत
    मी बुटके असण्याचे.
  • 3:15 - 3:20
    मी एका अभिनय संस्थेत होते
    आणि ते सात वर्षाच्या भूमिकेसाठी निवड करत होते.
  • 3:20 - 3:22
    आणि म्हणून त्यांनी त्या वयोगटात पाहिले.
  • 3:22 - 3:25
    मी लहान असल्याने,
    आणि मी न अडखळता बोलण्यास सक्षम आहे,
  • 3:25 - 3:27
    म्हणून मला भूमिका मिळाली.
  • 3:27 - 3:31
    हा मी माझ्या वयोगटातील लोकांपेक्षा लहान
    असल्याचा फायदा.
  • 3:31 - 3:32
    विश्वास ठेवणे.
  • 3:32 - 3:35
    विश्वास ठेवणे हा आत्मविश्वासू बनण्याचा
    पहिला रास्ता आहे.
  • 3:35 - 3:39
    आत्ता, मी विश्वास न ठेवण्यापासून विश्वास
    ठेवण्याकडे कशी वळू?
  • 3:39 - 3:43
    छान,मी काय बोलत आहे याबद्दल थोडे
    अधिक समजून घेण्यासाठी इथे
  • 3:43 - 3:45
    माझ्या मित्राबद्दल एक गोष्ट कदाचित
    तुम्हाला मदत करेल
  • 3:45 - 3:49
    त्याला प्रसिद्धी आवडेल की नाही याची मला
    खात्री नाही म्हणून
  • 3:49 - 3:51
    आपण त्याचे नाव सीसी ठेवू.
    6 ऑक्टोबर रोजी,
  • 3:51 - 3:53
    सीएचपीच्या शाळेची कॉन्सर्ट होती,
  • 3:53 - 3:56
    विषय होता कार्लस्वाल्ड एअरवेज
  • 3:56 - 3:58
    चीन त्यांचे शे शेवटचे नृत्य सादर
    करणारच होता
  • 3:58 - 4:02
    तेव्हा सीसी पडद्यामागे फिरत होता कारण
    तो दबाव अनुभवत होता.
  • 4:02 - 4:04
    तो प्रत्येकाने समक्रमित सादरीकरण करावे
  • 4:04 - 4:06
    म्हणून मोठ्याने मोजणारा होता.
  • 4:06 - 4:08
    याचाच अर्थ तो अगदी मध्यभागी होता,
  • 4:08 - 4:11
    जेणेकरून त्याच्या बाजूचे सर्वजण
    त्याला ऐकू शकतील.
  • 4:11 - 4:12
    तो रडू लागला.
  • 4:12 - 4:16
    आम्ही त्याला, तोचं मध्यभागी उभा राहून
    सर्वांसाठी मोजणारा का आहे
  • 4:16 - 4:18
    याचे कारण सांगितले.
  • 4:18 - 4:21
    तो मापुढे आणि मध्यभागे का होता
    त्याचे एक कारण होते
  • 4:21 - 4:23
    ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास द्विगुणित झाला.
  • 4:23 - 4:26
    आम्ही त्याला विश्वास ठेवायला लावला
    आणि त्याने ठेवला.
  • 4:26 - 4:30
    सीसी काहीतरी साध्य करू शकला
    कारण त्याने विश्वास ठेवला.
  • 4:30 - 4:32
    दुसरी पायरी आहे आत्मा विश्वासू बनणे,
  • 4:32 - 4:36
    हे लक्षात घेतले पाहिजेकी तुम्ही हे कोणासही
    कोणतीही गोष्ट सिद्ध करण्यासाठी न करता
  • 4:36 - 4:41
    तुम्ही हे फक्त तुमचे अधिक विश्वासू रूप
    प्राप्त करण्यासाठी करत आहात.
  • 4:41 - 4:43
    टीकेला सामोरे जाणे हि इतकी देखील
    सोपी गोष्ट नाही
  • 4:43 - 4:48
    पण आपल्याला हे काबुल केले पाहिजे कि आपण
    दुसऱ्याला बोचेल असे बोलतो आणि चूक करतो.
  • 4:48 - 4:53
    अशा घटना कमी करण्यासाठी आपण नक्कीच
    आदरपूर्वक आणि विचारपूर्वक प्रयत्न करू शकतो.
  • 4:53 - 4:57
    आपल्याला आपण लोकांबरोबर कसे बोलतो
    याविषयीचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.
  • 4:57 - 5:00
    आपण काय बोलतो याविषयीचा न्हवे तर
    आपण कसे बोलतो.
  • 5:00 - 5:03
    एखाद्याला नकारात्मक टीका करून
    छिन्नभीन्न करण्यापेक्षा त्यांना
  • 5:03 - 5:05
    सकारात्मक टीकांद्वारे
    प्रेरित करण्यासाठी प्रयत्न करा.
  • 5:05 - 5:09
    स्वतः जवळ असलेल्या गोष्टींमध्ये आरामदायी
    राहण्यात काहीही चुकी नाहीये.
  • 5:09 - 5:11
    मला खात्री आहे मी करू शकते, तर
    तुम्ही सुद्धा करू शकता.
  • 5:11 - 5:13
    धन्यवाद.
Title:
टीकेने खचून जाण्याचे कारण नाही.
Description:

काही वर्षांपासून लोकांनी अयंदा बोकाबाच्या उंचीबद्दल त्रासदायक लहान टिप्पण्या द्यायचे,जोपर्यंत तिच्या आजीने तिला टीका कशाप्रकारे स्वीकारावी याविषयी सल्ला दिला न्हवता तोपर्यंत त्यांच्या या वक्तव्यामुळे ती निराश व्हायची. गोष्टी वैयक्तिकरित्या न घेण्याचा किंवा आपल्या संवेदनांबद्दल नवीन दृष्टीकोन शोधण्याचा सराव असला तरी टीकेमुळे आपण खचून जाऊ नये म्हणून बरेच मार्ग आहेत.या विनोदी चर्चेमध्ये, अयांदा आपल्या आत्मविश्वासाची काळजी घेण्याचा आपल्याला आग्रह करते आणि आपल्याला "आपल्या स्वत: ला आरामदायक वाटणाऱ्या वातावरणात राहण्यात काही चुकीचे नाही ." याची आठवण करून देते.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
05:19

Marathi subtitles

Revisions