1 00:00:01,357 --> 00:00:02,928 बराच काळ 2 00:00:02,952 --> 00:00:06,086 मला दोन रहस्यं सतावत होती. 3 00:00:06,689 --> 00:00:08,950 त्यांचा उलगडा होत नव्हता. 4 00:00:08,974 --> 00:00:11,877 खरं तर, मला खोलात जाऊन ती सोडवायची फार भीती वाटत होती. 5 00:00:12,349 --> 00:00:15,896 पहिलं रहस्य सांगतो. आजवरच्या माझ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात 6 00:00:15,920 --> 00:00:18,991 मी पाहतो आहे, की इंग्लंड, अमेरिका 7 00:00:19,015 --> 00:00:22,371 आणि इतर पाश्चात्य देशांमध्ये 8 00:00:22,395 --> 00:00:25,085 गंभीर स्वरूपाचे नैराश्य आणि चिंताविकार 9 00:00:25,109 --> 00:00:26,863 दरवर्षी वाढत चालले आहेत. 10 00:00:27,173 --> 00:00:30,101 यामागचं कारण मला जाणून घ्यायचं होतं. 11 00:00:31,108 --> 00:00:32,975 हे विकार आपल्याला का जडताहेत? 12 00:00:33,394 --> 00:00:36,036 रोजचा दिनक्रम पार पाडणं अशक्य वाटणाऱ्यांची 13 00:00:36,060 --> 00:00:39,314 संख्या दरवर्षी वाढत का जाते आहे? 14 00:00:39,743 --> 00:00:43,300 हे समजून घेण्याची इच्छा मला वाटली, यामागे एक खाजगी रहस्य आहे. 15 00:00:43,324 --> 00:00:44,713 मला आठवतं, तरुणपणी मी 16 00:00:44,737 --> 00:00:46,158 डॉक्टरांना म्हणालो होतो, 17 00:00:46,182 --> 00:00:50,667 "मला वाटतं, की माझ्या अंगातून जणु वेदना वाहते आहे. 18 00:00:51,237 --> 00:00:52,633 तिच्यावर माझं नियंत्रण नाही. 19 00:00:52,657 --> 00:00:54,942 तिच्यामागचं कारण मला ठाऊक नाही. 20 00:00:54,966 --> 00:00:57,021 मला या वेदनेची खूप शरम वाटते आहे." 21 00:00:57,045 --> 00:00:58,641 डॉक्टरांनी मला एक गोष्ट सांगितली. 22 00:00:58,665 --> 00:01:00,678 त्यांचा हेतू चांगलाच होता. 23 00:01:00,702 --> 00:01:02,394 त्यांनी सगळं फार सोपं करून टाकलं. 24 00:01:02,418 --> 00:01:03,586 ते पूर्ण चुकीचं नव्हतं. 25 00:01:03,610 --> 00:01:06,402 ते म्हणाले, "यामागची कारणं वैद्यकशास्त्राला ठाऊक आहेत. 26 00:01:06,426 --> 00:01:10,658 काही लोकांच्या डोक्यात निसर्गतःच रासायनिक असंतुलन असतं. 27 00:01:10,682 --> 00:01:12,103 तू त्यापैकीच एक. 28 00:01:12,127 --> 00:01:14,111 आता इतकंच करायचं, काही औषधं घ्यायची. 29 00:01:14,135 --> 00:01:16,499 त्यामुळे तुझं रासायनिक संतुलन ठीक होईल." 30 00:01:16,523 --> 00:01:18,933 मग मी पॅक्सील किंवा सेरोक्साट घेऊ लागलो. 31 00:01:18,957 --> 00:01:21,983 ही एकाच औषधाची निरनिराळ्या देशातली नावं. 32 00:01:22,007 --> 00:01:24,490 मला बरं वाटू लागलं. मोठा आधार मिळाला. 33 00:01:24,514 --> 00:01:25,925 पण थोड्याच दिवसांत 34 00:01:25,949 --> 00:01:27,950 वेदना परत जाणवू लागली. 35 00:01:27,974 --> 00:01:29,802 म्हणून औषधाची मात्रा वाढवण्यात आली. 36 00:01:29,826 --> 00:01:33,037 तेरा वर्षं, मी जितकी मोठ्यात मोठी मात्रा घेणं शक्य आहे, 37 00:01:33,061 --> 00:01:35,077 तितकी घेत होतो. 38 00:01:35,402 --> 00:01:38,871 यापैकी बराचसा काळ, आणि नंतरही 39 00:01:38,895 --> 00:01:40,395 वेदना होतच होत्या. 40 00:01:40,419 --> 00:01:43,395 मग मी स्वतःला विचारू लागलो, "हे असं का? 41 00:01:43,419 --> 00:01:44,961 आजच्या संस्कृतीच्या समजानुसार 42 00:01:44,985 --> 00:01:48,125 मला जे सांगण्यात आलं, ते सर्व मी केलं आहे. 43 00:01:48,149 --> 00:01:50,268 तरीही हा त्रास का?" 44 00:01:50,292 --> 00:01:53,164 या दोन रहस्यांचा शोध घेण्यासाठी आणि पुस्तकलेखनासाठी 45 00:01:53,188 --> 00:01:54,596 माहिती मिळवण्यासाठी 46 00:01:54,620 --> 00:01:57,125 मी जगभर फिरलो. 47 00:01:57,149 --> 00:01:58,568 चाळीस हजार मैल प्रवास केला. 48 00:01:58,592 --> 00:02:01,085 मला जगातल्या मोठमोठ्या तज्ज्ञांना विचारायचं होतं, 49 00:02:01,109 --> 00:02:03,276 नैराश्य आणि चिंताविकार कशामुळे होतात? 50 00:02:03,300 --> 00:02:05,172 या विकारांवर मात कशी करायची? 51 00:02:05,196 --> 00:02:07,820 या विकारांचा सामना करून त्यातून मुक्त झालेल्या 52 00:02:07,844 --> 00:02:09,956 लोकांनाही भेटायचं होतं. 53 00:02:09,980 --> 00:02:11,466 या प्रवासात भेटलेल्या 54 00:02:11,490 --> 00:02:14,045 विलक्षण लोकांकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. 55 00:02:14,069 --> 00:02:17,045 मला सर्वात महत्त्वाचं समजलं ते असं: 56 00:02:17,069 --> 00:02:20,104 नैराश्य आणि चिंताविकार यांची नऊ वेगवेगळी कारणं आहेत. 57 00:02:20,128 --> 00:02:23,835 त्यांचे शास्त्रीय पुरावे आहेत. 58 00:02:23,859 --> 00:02:26,668 त्यापैकी दोन जीवशास्त्रीय आहेत. 59 00:02:26,692 --> 00:02:29,375 या विकारांना बळी पडण्याचं प्रमाण जनुकांवर अवलंबून असतं. 60 00:02:29,399 --> 00:02:31,333 पण जनुकं आपलं भविष्य ठरवत नाहीत. 61 00:02:31,357 --> 00:02:34,968 तसंच, नैराश्यामुळे मेंदूत घडून येणाऱ्या जीवशास्त्रीय बदलांमुळे 62 00:02:34,992 --> 00:02:36,690 त्यातून बाहेर पडणं कठीण होतं. 63 00:02:36,714 --> 00:02:38,896 पण या विकारांची कारणं 64 00:02:38,920 --> 00:02:40,761 म्हणून सिद्ध झालेल्या बऱ्याचशा घटकांचा 65 00:02:40,785 --> 00:02:42,550 आपल्या जैविकतेशी संबंध नसतो. 66 00:02:43,520 --> 00:02:45,734 त्यांचा संबंध असतो, आपल्या जीवनशैलीशी. 67 00:02:46,116 --> 00:02:47,607 हे घटक समजून घेतल्यावर 68 00:02:47,631 --> 00:02:50,727 सापडणारे निराळे उपाय, 69 00:02:50,751 --> 00:02:52,299 रासायनिक नैराश्यरोधकांसमवेत 70 00:02:52,323 --> 00:02:55,260 सुचवले गेले पाहिजेत. 71 00:02:55,284 --> 00:02:57,077 उदाहरणार्थ, 72 00:02:57,101 --> 00:03:00,549 तुम्हांला एकटेपणा वाटत असेल, तर पुढे नैराश्य येण्याची शक्यता वाढते. 73 00:03:00,573 --> 00:03:03,684 व्यवसायाच्या ठिकाणी कामावर तुमचं नियंत्रण नसेल, 74 00:03:03,708 --> 00:03:05,604 सांगितलेलं काम निमूट करावं लागत असेल, 75 00:03:05,628 --> 00:03:07,517 तर नैराश्याची शक्यता वाढते. 76 00:03:07,541 --> 00:03:10,025 तुम्ही बाहेर खुल्या निसर्गात फारसे जात नसाल, 77 00:03:10,049 --> 00:03:11,918 तर नैराश्याची शक्यता वाढते. 78 00:03:11,942 --> 00:03:15,053 आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. या विकारांमागच्या 79 00:03:15,077 --> 00:03:16,252 अनेक कारणांचा मिलाफ 80 00:03:16,276 --> 00:03:18,339 त्या गोष्टीत दिसून येतो. 81 00:03:18,363 --> 00:03:20,029 आपण सर्व जाणताच, की 82 00:03:20,053 --> 00:03:22,712 प्रत्येकाला नैसर्गिक गरजा असतात. बरोबर? 83 00:03:22,736 --> 00:03:23,910 हो, अगदी खरं. 84 00:03:23,934 --> 00:03:26,513 अन्न, पाणी. 85 00:03:26,537 --> 00:03:28,767 निवारा, स्वच्छ हवा. 86 00:03:28,791 --> 00:03:30,585 या गोष्टी काढून घेतल्या, 87 00:03:30,609 --> 00:03:32,902 तर आपले हाल होतील. 88 00:03:32,926 --> 00:03:34,728 त्याचबरोबर 89 00:03:34,752 --> 00:03:38,123 प्रत्येक माणसाला नैसर्गिकपणे मानसिक गरजा असतात. 90 00:03:38,147 --> 00:03:40,186 समाजाशी जोडलेलं असणं, ही गरज असते. 91 00:03:40,210 --> 00:03:43,274 आयुष्याला अर्थ आणि हेतू असणं, ही गरज असते. 92 00:03:43,298 --> 00:03:45,829 लोक आपल्याला ओळखतात, मानतात ही भावना गरजेची असते. 93 00:03:45,853 --> 00:03:48,410 आपलं भविष्य उज्वल आहे असं वाटणं, ही गरज असते. 94 00:03:48,434 --> 00:03:51,482 आजच्या आपल्या संस्कृतीत अनेक चांगल्या गोष्टी आहेत. 95 00:03:51,506 --> 00:03:53,666 अनेक गोष्टी भूतकाळापेक्षा चांगल्या आहेत. 96 00:03:53,690 --> 00:03:55,011 या काळात जन्म होणं सुखाचं. 97 00:03:55,035 --> 00:03:56,999 पण मूलभूत गंभीर मानसिक गरजा भागवण्याची 98 00:03:57,023 --> 00:04:01,124 आपली क्षमता मात्र कमी कमी होत चालली आहे. 99 00:04:01,895 --> 00:04:03,998 मानसिक विकारांचं प्रमाण वाढण्यामागचं 100 00:04:04,022 --> 00:04:08,069 हे एकमेव नसलं, तरी सर्वात महत्त्वाचं कारण आहे. 101 00:04:08,919 --> 00:04:12,149 हे समजून घेणं मला फार कठीण गेलं. 102 00:04:12,173 --> 00:04:14,879 मला माझ्या विचारांशी द्वंद्व करावं लागलं, 103 00:04:14,903 --> 00:04:19,309 नैराश्य मेंदूत असतं हा विचार बदलून, 104 00:04:19,333 --> 00:04:20,500 आपल्या जीवनशैलीसारखी 105 00:04:20,524 --> 00:04:22,585 अनेक कारणं त्यामागे असतात हे समजण्यासाठी. 106 00:04:22,609 --> 00:04:24,974 हे मला नीटपणे कधी समजलं? 107 00:04:24,998 --> 00:04:28,141 दक्षिण आफ्रिकेतल्या डॉ. डेरेक समरफील्ड नावाच्या मनोविकारतज्ज्ञांची 108 00:04:28,165 --> 00:04:29,966 मुलाखत घ्यायला गेलो, त्यावेळी. 109 00:04:29,990 --> 00:04:31,141 ही एक थोर व्यक्ती आहे. 110 00:04:31,165 --> 00:04:34,879 २००१ साली डॉ. समरफील्ड कंबोडियात होते. 111 00:04:34,903 --> 00:04:38,196 त्या वर्षी कंबोडियात प्रथमच रासायनिक नैराश्यरोधक औषधं 112 00:04:38,220 --> 00:04:39,952 उपलब्ध झाली होती. 113 00:04:39,976 --> 00:04:43,273 तिथल्या डॉक्टरांना ती ठाऊक नव्हती. त्यांनी विचारलं, 114 00:04:43,297 --> 00:04:44,888 "ही कसली औषधं?" मग डॉ. समरफील्डनी 115 00:04:44,912 --> 00:04:46,126 त्याविषयी माहिती दिली. 116 00:04:46,150 --> 00:04:47,682 यावर ते डॉक्टर्स म्हणाले, 117 00:04:47,706 --> 00:04:50,403 "यांची आम्हांला गरज नाही. आमच्याकडे नैराश्यरोधक आहेत." 118 00:04:50,427 --> 00:04:52,164 डॉ. समरफील्डनी विचारलं, "म्हणजे?" 119 00:04:52,188 --> 00:04:55,427 त्यांना वाटलं, आता हे निसर्गोपचाराविषयी सांगतील. 120 00:04:55,451 --> 00:04:59,223 सेंट जॉन्स वॉर्ट, जिंगको बिलोबा वगैरे. 121 00:04:59,910 --> 00:05:02,299 पण त्याऐवजी त्यांनी एक गोष्ट सांगितली. 122 00:05:02,800 --> 00:05:06,379 त्यांच्या गावात एक शेतकरी होता. तो भातशेती करत असे. 123 00:05:06,403 --> 00:05:08,173 एके दिवशी त्याचा पाय पडला, तो नेमका 124 00:05:08,197 --> 00:05:10,387 युद्धकाळात मातीत पेरलेल्या स्फोटकावर. 125 00:05:10,411 --> 00:05:11,823 स्फोटामुळे त्याने पाय गमावला. 126 00:05:11,847 --> 00:05:13,283 कृत्रिम पाय बसवल्यानंतर 127 00:05:13,307 --> 00:05:16,078 काही काळाने तो पुन्हा भाताच्या शेतात काम करू लागला. 128 00:05:16,102 --> 00:05:18,634 पण कृत्रिम पाय सतत पाण्याखाली ठेवून काम करणं 129 00:05:18,658 --> 00:05:20,332 फार वेदनादायक असतं. 130 00:05:20,356 --> 00:05:22,276 मला वाटतं, जिथे स्फोट झाला, 131 00:05:22,300 --> 00:05:24,879 तिथेच पुन्हा जाऊन काम करणंही त्याला कठीण गेलं असावं. 132 00:05:24,903 --> 00:05:27,306 त्याला दिवसभर रडणं अनावर होऊ लागलं. 133 00:05:27,330 --> 00:05:28,759 बिछान्यातून उठावंसं वाटेना. 134 00:05:28,783 --> 00:05:31,666 नैराश्याची सर्व लक्षणं दिसू लागली. 135 00:05:32,013 --> 00:05:33,378 कंबोडियन डॉक्टर म्हणाले, 136 00:05:33,402 --> 00:05:35,688 "मग आम्ही त्याला नैराश्यरोधक दिलं." 137 00:05:35,712 --> 00:05:38,347 डॉ. समरफील्डनी विचारलं, "कोणतं?" 138 00:05:38,371 --> 00:05:41,180 ते डॉक्टर्स त्याला भेटायला गेले होते. त्याच्याजवळ बसून 139 00:05:41,982 --> 00:05:43,382 त्यांनी त्याचं म्हणणं ऐकलं. 140 00:05:44,464 --> 00:05:47,011 त्यांना त्याच्या वेदनेमागचा अर्थ समजला. 141 00:05:47,035 --> 00:05:49,956 नैराश्याच्या गर्तेत त्याला स्वतःला ते समजणं कठीण होतं, 142 00:05:49,980 --> 00:05:53,640 पण त्यामागची कारणं त्याच्या आयुष्यात फार महत्त्वाची होती. 143 00:05:53,966 --> 00:05:57,164 गावातल्या इतर लोकांशी बोलताना त्यापैकी एका डॉक्टरांना सुचलं, 144 00:05:57,188 --> 00:05:59,125 "आपण याला एक गाय दिली, 145 00:05:59,149 --> 00:06:01,149 तर तो दुधाचा व्यवसाय करू शकेल. 146 00:06:01,173 --> 00:06:04,268 मग त्याला भाताच्या शेतात जाऊन 147 00:06:04,292 --> 00:06:06,799 ते त्रासदायक काम करावं लागणार नाही." 148 00:06:06,823 --> 00:06:08,022 त्याला गाय देण्यात आली. 149 00:06:08,046 --> 00:06:10,226 दोन आठवड्यांत त्याचं रडणं थांबलं. 150 00:06:10,250 --> 00:06:12,162 महिन्याभरात तो नैराश्यातून बाहेर आला. 151 00:06:12,186 --> 00:06:13,765 डॉ. समरफील्ड, 152 00:06:13,789 --> 00:06:16,559 ही गाय म्हणजे नैराश्यरोधक, 153 00:06:16,583 --> 00:06:18,050 हो ना? 154 00:06:18,074 --> 00:06:19,225 (हशा) 155 00:06:19,249 --> 00:06:22,302 (टाळ्या) 156 00:06:22,326 --> 00:06:25,199 लहानपणापासून नैराश्याबद्दल माझी जी समजूत आहे, 157 00:06:25,223 --> 00:06:26,835 तीच तुमचीही असेल, तर 158 00:06:26,859 --> 00:06:28,533 तुम्हांला हा एक बाष्कळ विनोद वाटेल. 159 00:06:28,557 --> 00:06:30,581 "नैराश्यरोधक घ्यावं म्हणून गेलो, आणि 160 00:06:30,605 --> 00:06:31,771 डॉक्टरांनी गाय दिली." 161 00:06:31,795 --> 00:06:34,822 विज्ञानाशी संबंध नसलेल्या या प्रसंगावरून 162 00:06:34,846 --> 00:06:37,823 कंबोडियन डॉक्टरांनी ही अटकळ बांधली. 163 00:06:37,847 --> 00:06:41,132 गेली कित्येक वर्षं 164 00:06:41,156 --> 00:06:43,243 जागतिक आरोग्य संस्था (WHO) 165 00:06:43,267 --> 00:06:45,457 नेमकं हेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे. 166 00:06:45,481 --> 00:06:47,973 तेही उत्कृष्ठ शास्त्रीय पुरावे देऊन. 167 00:06:48,576 --> 00:06:50,505 नैराश्य येणं, 168 00:06:50,529 --> 00:06:51,906 किंवा अति चिंता वाटणं 169 00:06:53,008 --> 00:06:56,268 म्हणजे दुबळेपणा किंवा वेड लागणं नव्हे. 170 00:06:56,292 --> 00:06:59,877 किंवा यंत्रासारखे तुमचे काही भाग बिघडलेत, असंही नव्हे. 171 00:07:00,950 --> 00:07:03,484 एक माणूस म्हणून तुमच्या काही गरजा अपूर्ण आहेत, इतकंच. 172 00:07:03,919 --> 00:07:07,459 कंबोडियन डॉक्टर आणि जागतिक आरोग्य संस्था 173 00:07:07,483 --> 00:07:09,800 काय सांगत नाहीत, तेही पाहणं इथे महत्त्वाचं आहे. 174 00:07:09,824 --> 00:07:11,356 ते असं नाही म्हणाले, 175 00:07:11,380 --> 00:07:14,181 "मित्रा, अरे जरा भानावर ये. 176 00:07:14,205 --> 00:07:17,472 तुझा प्रश्न तूच समजून घे, आणि तूच सोडव." 177 00:07:17,851 --> 00:07:19,843 उलट ते असं म्हणाले, की 178 00:07:19,867 --> 00:07:23,391 "आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. आपण सर्वजण मिळून 179 00:07:23,415 --> 00:07:27,827 हा प्रश्न समजून घेऊ आणि सोडवू." 180 00:07:28,543 --> 00:07:32,559 प्रत्येक नैराश्यग्रस्त व्यक्तीची ही गरज असते, 181 00:07:32,583 --> 00:07:35,828 ती पूर्ण व्हायला हवी. 182 00:07:35,852 --> 00:07:38,839 म्हणूनच, २०१७ साली जागतिक आरोग्य दिनाच्या निवेदनात 183 00:07:38,863 --> 00:07:41,181 संयुक्त राष्ट्रसंघाचे 184 00:07:41,205 --> 00:07:42,696 एक प्रमुख डॉक्टर म्हणाले, 185 00:07:42,720 --> 00:07:45,537 "आपण रासायनिक असंतुलनाविषयी बोलणं कमी करून, 186 00:07:45,561 --> 00:07:48,618 त्याऐवजी जीवनशैलीतल्या असंतुलनाविषयी बोलायला हवं." 187 00:07:48,920 --> 00:07:50,893 औषधांमुळे काही लोकांना खरोखरच बरं वाटतं. 188 00:07:50,917 --> 00:07:53,047 मलाही काही काळ बरं वाटलं होतं. 189 00:07:53,071 --> 00:07:57,498 पण जीवशास्त्रापेक्षा खोल जाणाऱ्या 190 00:07:57,522 --> 00:08:00,577 या समस्येवरचा उपायही तितकाच खोलवर जाणारा हवा. 191 00:08:00,601 --> 00:08:03,188 हे जेव्हा मी प्रथम ऐकलं, 192 00:08:03,212 --> 00:08:04,895 त्यावेळी मला वाटलं होतं, 193 00:08:04,919 --> 00:08:07,045 "मी शास्त्रीय पुरावे पाहिले आहेत. 194 00:08:07,069 --> 00:08:08,641 पुष्कळ संशोधनं वाचली आहेत. 195 00:08:08,665 --> 00:08:11,971 या विषयातल्या तज्ज्ञांशी बोललो आहे." 196 00:08:11,995 --> 00:08:14,381 आणि तरीही मला समजत नव्हतं, "हे करायचं कसं?" 197 00:08:14,405 --> 00:08:16,318 आपल्या नैराश्याची कारणं बरेचदा 198 00:08:16,342 --> 00:08:18,833 त्या कंबोडियन शेतकऱ्याच्या गोष्टीपेक्षा 199 00:08:18,857 --> 00:08:20,154 जास्त गुंतागुंतीची असतात. 200 00:08:20,178 --> 00:08:22,812 ती समजून घेण्याची सुरुवात तरी कुठून करावी? 201 00:08:22,836 --> 00:08:26,085 पुस्तक लिहिण्यासाठी म्हणून 202 00:08:26,109 --> 00:08:27,680 मी जगभर फिरलो, 203 00:08:27,704 --> 00:08:30,299 तेव्हा हे समजून घेणारे लोक मला भेटत गेले. 204 00:08:30,323 --> 00:08:32,775 सिडनी पासून सॅन फ्रान्सिस्को 205 00:08:32,799 --> 00:08:33,971 आणि साओ पावलो पर्यंत. 206 00:08:33,995 --> 00:08:36,061 हे लोक नैराश्य आणि चिंताविकाराची 207 00:08:36,085 --> 00:08:38,432 सखोल कारणं समजून घेत होते 208 00:08:38,456 --> 00:08:40,871 आणि आपल्या समूहाद्वारे त्यावर उपाय करत होते. 209 00:08:40,895 --> 00:08:43,576 मला भेटलेल्या सर्वच लोकांबद्दल 210 00:08:43,600 --> 00:08:45,076 मी इथे सांगू शकत नाही. 211 00:08:45,100 --> 00:08:48,553 किंवा त्या नऊ कारणांबद्दलही इथे बोलू शकत नाही. 212 00:08:48,577 --> 00:08:51,059 कारण १० तासांचं TED व्याख्यान द्यायची परवानगी नाही. 213 00:08:51,083 --> 00:08:52,835 वाटल्यास आयोजकांजवळ तक्रार करा! 214 00:08:52,859 --> 00:08:54,789 म्हणून मी त्यापैकी दोन कारणं 215 00:08:54,813 --> 00:08:58,226 आणि दोन उपाय सांगणार आहे. 216 00:08:58,578 --> 00:08:59,728 पहिलं: 217 00:09:00,285 --> 00:09:03,293 मानवी इतिहासात जास्त एकटेपणा आपल्याच पिढीला जाणवला आहे. 218 00:09:03,317 --> 00:09:06,150 नुकतंच एका पाहणीत अमेरिकन लोकांना विचारलं गेलं, 219 00:09:06,174 --> 00:09:09,324 "आपली कोणाशीच जवळीक उरलेली नाही, असं तुम्हांला वाटतं का?" 220 00:09:09,348 --> 00:09:12,999 यावर ३९ टक्के लोकांनी हे वर्णन आपल्याला लागू पडतं असं सांगितलं. 221 00:09:13,023 --> 00:09:14,387 "कोणाशीच जवळीक नाही." 222 00:09:14,411 --> 00:09:16,908 आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटेपणा मोजला असता, 223 00:09:16,932 --> 00:09:19,490 ब्रिटन आणि युरोप अमेरिकेच्या खालोखाल आहेत. 224 00:09:19,514 --> 00:09:21,299 इथे कोणाला उगाच अभिमान वाटायला नको! 225 00:09:21,323 --> 00:09:22,331 (हशा) 226 00:09:22,355 --> 00:09:24,244 या विषयातल्या एका तज्ज्ञांशी 227 00:09:24,268 --> 00:09:26,664 मी बराच काळ चर्चा केली. 228 00:09:26,688 --> 00:09:28,942 त्या थोर माणसाचं नाव, प्राध्यापक जॉन कासिओपो. 229 00:09:28,966 --> 00:09:30,117 ते शिकागोत राहत असत. 230 00:09:30,141 --> 00:09:32,964 त्यांच्या संशोधनाबद्दल मी पुष्कळ चिंतन केलं. 231 00:09:32,988 --> 00:09:35,293 प्राध्यापक कासिओपो विचारतात, 232 00:09:35,317 --> 00:09:36,967 "आपण अस्तित्वात आहोत, ते कशामुळे? 233 00:09:36,991 --> 00:09:38,944 आपण जिवंत का राहिलो आहोत?" 234 00:09:38,968 --> 00:09:41,174 यामागचं मुख्य कारण असं, की 235 00:09:41,198 --> 00:09:44,015 आफ्रिकेच्या सव्हाना प्रदेशातले आपले पूर्वज 236 00:09:44,039 --> 00:09:45,759 एका गोष्टीत खूप हुशार होते. 237 00:09:46,287 --> 00:09:49,577 भोवतालच्या वन्य श्वापदांपेक्षा ते आकाराने मोठे नव्हते, 238 00:09:49,601 --> 00:09:52,914 किंवा त्यांच्यापेक्षा जलद धावूही शकत नव्हते. 239 00:09:52,938 --> 00:09:55,652 पण ते जमाव करून एकत्र राहत होते, 240 00:09:55,676 --> 00:09:57,276 एकमेकांना साह्य करत होते. 241 00:09:57,300 --> 00:09:59,561 ही आपल्या मानवजातीची दैवी शक्ती आहे. 242 00:09:59,585 --> 00:10:00,990 आपण समूहात राहतो. 243 00:10:01,014 --> 00:10:03,490 मधमाशांची उत्क्रांती होऊन त्या पोळ्यात राहू लागल्या, 244 00:10:03,514 --> 00:10:05,746 तसा मनुष्यप्राणी जमातीत राहू लागला. 245 00:10:05,770 --> 00:10:09,580 या जमातींची मोडतोड करणारी 246 00:10:10,492 --> 00:10:11,959 आपलीच पहिली पिढी आहे. 247 00:10:12,484 --> 00:10:14,551 यामुळे आपलं जीवन उध्वस्त होत आहे. 248 00:10:15,048 --> 00:10:17,192 वास्तविक हे असं व्हायला नको. 249 00:10:17,216 --> 00:10:19,850 माझ्या पुस्तकातली आणि माझ्या आयुष्यातलीही 250 00:10:19,874 --> 00:10:21,969 एक मोठी व्यक्ती आहे, सॅम एव्हरिंग्टन. 251 00:10:21,993 --> 00:10:24,731 लंडनच्या पूर्वेच्या एका गरीब वस्तीतले हे डॉक्टर. 252 00:10:24,755 --> 00:10:26,334 तिथे मी बराच काळ राहत होतो. 253 00:10:26,358 --> 00:10:28,045 सॅम फार अस्वस्थ होते. 254 00:10:28,069 --> 00:10:29,625 कारण त्यांचे अनेक रुग्ण 255 00:10:29,649 --> 00:10:32,093 भयंकर नैराश्य आणि चिंताविकाराने ग्रस्त होते. 256 00:10:32,117 --> 00:10:34,839 माझ्यासारखंच डॉ. सॅमना देखील वाटतं, की नैराश्यरोधकांमुळे 257 00:10:34,863 --> 00:10:37,085 काही लोकांना थोडं बरं वाटू शकतं. 258 00:10:37,109 --> 00:10:38,482 त्यांनी दोन गोष्टी पाहिल्या. 259 00:10:38,506 --> 00:10:42,061 एक, त्यांचे रुग्ण बराच काळ त्रस्त होते. 260 00:10:42,085 --> 00:10:45,823 यामागची कारणं स्पष्ट होती. उदाहरणार्थ, एकटेपणा. 261 00:10:45,847 --> 00:10:49,291 दोन, औषधांनी काही लोकांना थोड्या प्रमाणात बरं वाटत असलं, 262 00:10:49,315 --> 00:10:51,583 तरी अनेक वेळा औषधामुळे 263 00:10:51,607 --> 00:10:53,140 मूळ प्रश्न सुटत नव्हता. 264 00:10:53,871 --> 00:10:56,522 एके दिवशी, डॉ. सॅमनी एक नवीन उपाय वापरायचं ठरवलं. 265 00:10:56,546 --> 00:10:58,998 त्यांच्या दवाखान्यात एक महिला आली. 266 00:10:59,022 --> 00:11:00,489 तिचं नाव लिसा कनिंगहॅम. 267 00:11:00,513 --> 00:11:02,387 माझी तिच्याशी नंतर ओळख झाली. 268 00:11:02,411 --> 00:11:06,495 भयानक नैराश्य आणि चिंताविकारामुळे लिसा घरातून बाहेरच पडत नव्हती. 269 00:11:06,519 --> 00:11:07,669 तब्बल सात वर्षं. 270 00:11:08,898 --> 00:11:11,823 डॉ. सॅमनी तिला सांगितलं, "आम्ही तुला औषधं तर देऊच, 271 00:11:11,847 --> 00:11:13,677 पण त्याबरोबर 272 00:11:13,701 --> 00:11:16,498 तू आणखी काहीतरी करायचं आहेस. 273 00:11:16,522 --> 00:11:19,965 आठवड्यातून दोनदा इथे यायचं, 274 00:11:19,989 --> 00:11:22,767 आणि इतर रुग्णांशी बोलायचं. 275 00:11:22,791 --> 00:11:25,601 पण आपण किती दुर्दैवी, अशा प्रकारचं काही बोलायचं नाही. 276 00:11:25,625 --> 00:11:29,172 तर सगळ्यांनी मिळून काहीतरी अर्थपूर्ण काम शोधून ते करायचं. 277 00:11:29,196 --> 00:11:32,299 मग एकटेपणा वाटणार नाही, आयुष्याला अर्थ नाही असं वाटणार नाही." 278 00:11:32,323 --> 00:11:35,098 त्या रुग्णांना लिसा जेव्हा प्रथम भेटली, 279 00:11:35,122 --> 00:11:37,378 तेव्हा तो ताण असह्य होऊन 280 00:11:37,402 --> 00:11:39,323 तिला वांत्या होऊ लागल्या. 281 00:11:39,347 --> 00:11:41,981 तेव्हा इतरांनी तिला सावरलं. चर्चा सुरु झाली. 282 00:11:42,005 --> 00:11:43,680 "आपण एकत्र येऊन काय करू शकतो?" 283 00:11:43,704 --> 00:11:45,998 हे रुग्ण माझ्यासारखे, लंडनच्या आतल्या भागातले. 284 00:11:46,022 --> 00:11:48,070 त्यांना बागकामाची काहीच माहिती नव्हती. 285 00:11:48,094 --> 00:11:50,339 "आपण बागकाम शिकूया का?" 286 00:11:50,363 --> 00:11:52,529 दवाखान्याच्या मागेच 287 00:11:52,553 --> 00:11:53,704 पडीक जागा होती. 288 00:11:53,728 --> 00:11:55,610 "इथे बाग करूया का?" 289 00:11:55,634 --> 00:11:57,809 त्यांनी लायब्ररीतून पुस्तकं आणली. 290 00:11:57,833 --> 00:11:59,318 You Tube वर धडे घेतले. 291 00:11:59,342 --> 00:12:01,501 मातीत हात मळवून घेतले. 292 00:12:01,844 --> 00:12:04,887 ऋतुचक्र समजून घ्यायला सुरुवात केली. 293 00:12:04,911 --> 00:12:06,241 अनेक पुराव्यांनुसार, 294 00:12:06,265 --> 00:12:07,894 निसर्गाशी जवळीक करणं 295 00:12:07,918 --> 00:12:09,894 हा नैराश्यावर एक चांगला उपाय आहे. 296 00:12:09,918 --> 00:12:12,927 पण हा गट त्याहीपेक्षा जास्त काही करत होता. 297 00:12:13,347 --> 00:12:15,377 त्यांनी एक जमात तयार केली. 298 00:12:15,401 --> 00:12:17,212 एक समूह तयार केला. 299 00:12:17,236 --> 00:12:19,260 त्यांना एकमेकांविषयी आपुलकी वाटू लागली. 300 00:12:19,284 --> 00:12:20,958 एखादा गैरहजर असला, 301 00:12:20,982 --> 00:12:23,502 "काय झालं? ठीक आहेस ना?" अशी चौकशी करू लागले. 302 00:12:23,526 --> 00:12:26,137 त्याला कसला त्रास होत असेल ते जाणून घेऊ लागले. 303 00:12:26,161 --> 00:12:27,964 लिसा म्हणाली, 304 00:12:27,988 --> 00:12:30,585 "जसजशी बाग बहरू लागली, 305 00:12:30,609 --> 00:12:31,876 तसतसे आम्हीही बहरू लागलो!" 306 00:12:32,474 --> 00:12:34,506 याला म्हणतात समाजोपचार. 307 00:12:34,530 --> 00:12:36,045 हे युरोपमध्ये वाढत आहे. 308 00:12:36,069 --> 00:12:38,370 हळूहळू गोळा होणाऱ्या पुराव्यांनुसार 309 00:12:38,394 --> 00:12:41,274 नैराश्य आणि चिंताविकारात 310 00:12:41,298 --> 00:12:43,276 खरोखरीच घट होत असल्याचं दिसून येत आहे. 311 00:12:43,300 --> 00:12:47,021 एके दिवशी या बागेत असताना 312 00:12:47,045 --> 00:12:49,526 माझ्या मनात एक विचार आला. 313 00:12:49,550 --> 00:12:51,134 त्या सुंदर बागेत गेलो असताना 314 00:12:51,158 --> 00:12:52,349 मला जे वाटलं, 315 00:12:52,373 --> 00:12:56,244 त्यामागे ऑस्ट्रेलियन प्राध्यापक ह्यू मके यांच्या विचारांची प्रेरणा आहे. 316 00:12:56,268 --> 00:13:00,649 मला वाटलं, की आजच्या आपल्या संस्कृतीत एखाद्याला उदास वाटत असेल, 317 00:13:00,673 --> 00:13:03,737 तर आपण त्याला काय सांगतो? तुम्ही सांगत असाल, मीही सांगितलं आहे.. 318 00:13:03,761 --> 00:13:06,985 "तू स्वतः कोण आहेस ते जाणून घे. स्वतःला पटेल तेच कर." 319 00:13:07,742 --> 00:13:10,692 आणि माझ्या लक्षात आलं, की त्याऐवजी आपण सांगायला हवं, 320 00:13:10,716 --> 00:13:11,866 "स्वतःपुरतं पाहू नकोस. 321 00:13:12,306 --> 00:13:13,639 तुझा एकट्याचा नव्हे, 322 00:13:14,218 --> 00:13:16,427 समूहाचा विचार कर. 323 00:13:16,765 --> 00:13:18,090 समूहाचा भाग हो." 324 00:13:18,114 --> 00:13:21,820 (टाळ्या) 325 00:13:21,844 --> 00:13:24,423 या विकारांवर उपाय म्हणून आपण एकांडेपणाने राहून 326 00:13:24,447 --> 00:13:27,598 आपल्या एकट्याच्या हातात असलेली साधनं जास्तीत जास्त वापरत गेलो. 327 00:13:27,622 --> 00:13:29,061 हे विकार बळावण्यात 328 00:13:29,085 --> 00:13:31,125 हा समज थोडा कारणीभूत ठरला असावा. 329 00:13:31,149 --> 00:13:33,902 स्वतःला महत्त्व देण्यापेक्षा एखादा मोठा उद्देश हवा. 330 00:13:33,926 --> 00:13:36,347 इथे नैराश्य आणि चिंताविकाराचं आणखी एक कारण सापडतं, 331 00:13:36,371 --> 00:13:39,268 ज्याविषयी मला आज बोलायचं होतं. 332 00:13:39,292 --> 00:13:40,982 आपण सर्वजण जाणतो, की 333 00:13:41,006 --> 00:13:44,752 आहारात चटपटीत पदार्थ वाढल्यामुळे आपलं आरोग्य बिघडत चाललं आहे. 334 00:13:44,776 --> 00:13:46,982 मी पौष्टिक आहार घेतो, असं नव्हे. 335 00:13:47,006 --> 00:13:49,405 व्याख्यानापूर्वी मी मॅकडोनाल्ड मध्ये खाऊन आलो. 336 00:13:49,429 --> 00:13:52,942 तुम्हां सर्वांना TED ची पौष्टिक न्याहारी खाताना पाहून मला लाज वाटली. 337 00:13:52,966 --> 00:13:58,109 पोषणरहित अन्नामुळे जसं आपलं आरोग्य बिघडतं, 338 00:13:58,133 --> 00:14:02,243 तसाच, काही निकृष्ट मूल्यांनी मनाचा ताबा घेतल्यामुळे 339 00:14:02,267 --> 00:14:03,745 आपलं मानसिक आरोग्य बिघडतं. 340 00:14:04,157 --> 00:14:07,261 हजारो वर्षांपासून तत्त्ववेत्ते सांगताहेत, की 341 00:14:07,285 --> 00:14:11,873 पैसा, समाजातलं स्थान, दिखाऊपणा यांना महत्त्व दिलं, 342 00:14:11,897 --> 00:14:13,420 तर मानसिक आरोग्य ढासळेल. 343 00:14:13,444 --> 00:14:15,511 असं शोपेनहावर म्हणाले होते. 344 00:14:15,535 --> 00:14:17,307 नेमकं हेच नव्हे,पण अशाच अर्थाचं. 345 00:14:17,331 --> 00:14:20,357 आश्चर्य म्हणजे, यावर फारसं शास्त्रीय संशोधन झालं नव्हतं. 346 00:14:20,381 --> 00:14:24,030 पण मला भेटलेली एक असामान्य व्यक्ती, प्राध्यापक टिम कासर 347 00:14:24,054 --> 00:14:26,347 हे इलिनॉयच्या नॉक्स कॉलेजमध्ये 348 00:14:26,371 --> 00:14:28,934 गेली तीस वर्षं या विषयावर संशोधन करताहेत. 349 00:14:28,958 --> 00:14:31,974 त्यांच्या संशोधनाने काही महत्त्वाच्या गोष्टी सुचवल्या आहेत. 350 00:14:31,998 --> 00:14:35,189 पहिली गोष्ट. 351 00:14:35,213 --> 00:14:39,578 उत्तमोत्तम वस्तू विकत घेऊन त्यांचं प्रदर्शन केल्याने 352 00:14:39,602 --> 00:14:41,793 दुःखावर मात होऊन आनंद मिळेल असं जितकं समजाल, 353 00:14:41,817 --> 00:14:44,729 तितकं नैराश्य आणि चिंता पदरी पडतील. 354 00:14:44,753 --> 00:14:46,046 दुसरी गोष्ट. 355 00:14:46,070 --> 00:14:50,658 अशा समजांनी आपल्या संपूर्ण समाजाचाच ताबा घेतला आहे. 356 00:14:50,682 --> 00:14:52,095 मी आयुष्यभर पाहतो आहे, 357 00:14:52,119 --> 00:14:56,312 जाहिरातबाजी, इंस्टाग्राम इत्यादि गोष्टी कशा प्रभाव पाडतात. 358 00:14:56,871 --> 00:14:58,244 मला वाटतं 359 00:14:58,268 --> 00:15:04,029 आपण जन्मापासून मानसिक KFC खातो आहोत. 360 00:15:04,053 --> 00:15:07,926 चुकीच्या ठिकाणी आनंद शोधतो आहोत. 361 00:15:07,950 --> 00:15:10,720 आणि जसं चटपटीत अन्न पोषणाची गरज भागवण्याऐवजी 362 00:15:10,744 --> 00:15:13,042 उलट आपल्याला आजारी पाडतं, 363 00:15:13,066 --> 00:15:16,208 तसंच निकृष्ट मूल्यं आपल्या मानसिक गरजा न भागवता 364 00:15:16,232 --> 00:15:18,874 आपल्याला निरोगी आयुष्यापासून दूर नेतात. 365 00:15:18,898 --> 00:15:21,521 मी जेव्हा प्रथम प्रा. कासर यांना भेटून 366 00:15:21,545 --> 00:15:23,022 हे जाणून घेत होतो, 367 00:15:23,046 --> 00:15:25,633 तेव्हा माझ्या मनात संमिश्र भावना उभ्या राहिल्या. 368 00:15:25,657 --> 00:15:28,347 माझ्यासाठी हे एक आव्हान होतं. 369 00:15:28,371 --> 00:15:31,633 कारण माझ्या स्वतःच्याच आयुष्यात मी बरेचदा उदासीनतेचा सामना करण्यासाठी 370 00:15:31,657 --> 00:15:36,922 एखादी बाह्य परिणाम करणारी भपकेबाज गोष्ट करत आलो होतो. 371 00:15:37,441 --> 00:15:40,131 आणि त्याचा काही उपयोग होत नव्हता, हेही पाहत आलो होतो. 372 00:15:40,930 --> 00:15:43,812 मला वाटलं, हे तर साहजिकच आहे. 373 00:15:43,836 --> 00:15:45,581 अगदी रटाळ मुद्दा, हो ना? 374 00:15:45,605 --> 00:15:46,930 आता मी तुम्हांला सांगतो, 375 00:15:46,954 --> 00:15:49,097 मरणशय्येवर असताना, आपल्याजवळ किती बूट आहेत, 376 00:15:49,121 --> 00:15:52,437 किंवा किती री-ट्विट मिळाले होते या गोष्टी तुम्हांला आठवणार नाहीत. 377 00:15:52,461 --> 00:15:54,144 त्यावेळी आठवतील ते प्रेमाचे, 378 00:15:54,168 --> 00:15:56,279 अर्थपूर्ण जगण्याचे आणि सुसंवादाचे क्षण. 379 00:15:56,303 --> 00:15:58,248 हे वाक्य वापरून गुळगुळीत झालेलं आहे खरं. 380 00:15:58,272 --> 00:16:00,621 मी प्रा. कासरना विचारलं, 381 00:16:00,645 --> 00:16:02,998 "मला यात एक विचित्र दुटप्पीपणा दिसतो. का बरं?" 382 00:16:03,022 --> 00:16:06,829 ते म्हणाले, "कारण आपल्याला मनात कुठेतरी या गोष्टी ठाऊक असतात. 383 00:16:06,853 --> 00:16:09,228 पण या संस्कृतीत आपण त्या पाळत नाही." 384 00:16:09,252 --> 00:16:11,331 या गोष्टी रटाळ वाटण्याइतपत ठाऊक आहेत. 385 00:16:11,355 --> 00:16:12,633 पण आपण त्या पाळत नाही. 386 00:16:12,657 --> 00:16:15,866 मी विचारलं, "का? इतक्या महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक असून 387 00:16:15,890 --> 00:16:17,176 आपण त्या पाळत का नाही?" 388 00:16:17,200 --> 00:16:20,604 थोड्या वेळाने प्रा. कासर म्हणाले, 389 00:16:20,628 --> 00:16:23,049 "कारण आपण एका यंत्रात राहतो. 390 00:16:23,073 --> 00:16:26,806 आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींचा आपल्याला विसर पाडणं हे त्याचं कार्य." 391 00:16:27,260 --> 00:16:28,847 यावर मला खूप विचार करावा लागला. 392 00:16:28,871 --> 00:16:30,276 "कारण आपण ज्या यंत्रात राहतो, 393 00:16:30,300 --> 00:16:33,978 ते आपल्याला महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लावतं." 394 00:16:34,299 --> 00:16:38,077 हे यंत्र मोडून टाकता येईल का, हे प्रा. कासरना शोधून काढायचं होतं. 395 00:16:38,101 --> 00:16:39,974 यावर त्यांनी पुष्कळ संशोधन केलं आहे. 396 00:16:39,998 --> 00:16:41,553 इथे मी एक उदाहरण सांगतो. 397 00:16:41,577 --> 00:16:45,077 तुम्हां सर्वांना विनंती: आपल्या कुटुंब आणि मित्रांबरोबर करून पहा. 398 00:16:45,101 --> 00:16:48,443 नेथन डंगन याने तरुण आणि प्रौढांचा एक गट बोलावला. 399 00:16:48,467 --> 00:16:52,680 काही दिवस त्यांच्या सभा घेतल्या. 400 00:16:52,704 --> 00:16:54,467 यातला एक भाग असा होता: 401 00:16:54,491 --> 00:16:57,791 आपल्या आयुष्यातला असा एखादा क्षण आठवा, ज्यावेळी तुम्हांला खरोखर 402 00:16:57,815 --> 00:17:00,561 आयुष्याचा अर्थ आणि हेतु गवसला असेल. 403 00:17:00,585 --> 00:17:02,728 प्रत्येकाला हे निरनिराळं जाणवलं. 404 00:17:02,752 --> 00:17:06,369 कोणाला आठवलं संगीत, कोणाला लेखन, मदतकार्य. 405 00:17:06,393 --> 00:17:09,196 तुम्हां सर्वांनाही नक्कीच काहीतरी जाणवलं असेल. 406 00:17:09,220 --> 00:17:12,101 यातला दुसरा भाग असा होता: प्रश्न विचारायला प्रवृत्त करणे. 407 00:17:12,125 --> 00:17:14,887 "या महत्त्वाच्या गोष्टींना जास्त वेळ कसा द्यावा? 408 00:17:14,911 --> 00:17:17,595 आणि निरुपयोगी कचरा विकत घेऊन 409 00:17:17,619 --> 00:17:20,569 त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून 410 00:17:20,593 --> 00:17:23,315 लोकांना OMG म्हणायला लावणं 411 00:17:23,339 --> 00:17:24,606 कसं टाळावं?" 412 00:17:24,958 --> 00:17:26,601 नुसता या सभांना येण्याचादेखील 413 00:17:26,625 --> 00:17:27,959 चांगला परिणाम दिसून आला. 414 00:17:27,983 --> 00:17:31,093 हे चंगळवादाच्या व्यसनमुक्तीचे वर्ग, बरोबर? 415 00:17:31,807 --> 00:17:34,760 अशा सभांना हजर राहून एकमेकांचे विचार ऐकणं, 416 00:17:34,784 --> 00:17:37,315 ते पाळण्याचा निश्चय करणं, एकमेकांची चौकशी करणं 417 00:17:37,339 --> 00:17:40,196 यामुळे या लोकांच्या विचारसरणीत मोठा बदल घडून आला. 418 00:17:40,220 --> 00:17:44,633 चुकीच्या गोष्टींत आनंद शोधायला लावून 419 00:17:44,657 --> 00:17:47,291 नैराश्यात ढकलणाऱ्या संदेशांची वावटळ टाळून 420 00:17:47,315 --> 00:17:50,656 ते नैराश्यातून बाहेर काढणाऱ्या 421 00:17:50,680 --> 00:17:52,680 अर्थपूर्ण आणि पोषक विचारांकडे वळू लागले. 422 00:17:53,347 --> 00:17:56,649 पण मी असे काही उपाय शोधले, त्याबद्दल लिहिलं, 423 00:17:56,673 --> 00:17:59,412 यात आज न सांगितलेलेही काही आहेत, 424 00:17:59,436 --> 00:18:00,807 तरीसुद्धा माझ्या मनात येतं, 425 00:18:00,831 --> 00:18:04,530 हे विचार सुचायला मला इतका वेळ का लागला? 426 00:18:04,554 --> 00:18:06,570 कारण इतरांना समजावून सांगताना-- 427 00:18:06,594 --> 00:18:09,038 त्यापैकी काही कठीण आहेत, सर्व नव्हेत. 428 00:18:09,062 --> 00:18:12,306 ते सोपे वाटतात. ते काही अवकाश विज्ञान नव्हे. 429 00:18:12,330 --> 00:18:14,425 या गोष्टी आपल्याला मनात कुठेतरी ठाऊक असतात. 430 00:18:14,449 --> 00:18:17,086 मग त्या समजायला इतक्या कठीण का? 431 00:18:17,110 --> 00:18:19,044 मला वाटतं, यामागे पुष्कळ कारणं आहेत. 432 00:18:19,475 --> 00:18:23,744 यापैकी एक कारण असं, की नैराश्य किंवा चिंताविकार म्हणजे नक्की काय, 433 00:18:23,768 --> 00:18:27,188 याविषयीच्या आपल्या कल्पना बदलायला हव्यात. 434 00:18:27,776 --> 00:18:29,958 काही खरीखुरी जैविक कारणंसुद्धा 435 00:18:29,982 --> 00:18:31,715 या विकारांमागे असू शकतात. 436 00:18:32,117 --> 00:18:35,871 आपण सगळं ठपका जैविक कारणांवरच ठेवतो. 437 00:18:35,895 --> 00:18:37,141 असं मी बराच काळ करत होतो. 438 00:18:37,165 --> 00:18:41,230 आपल्या संस्कृतीचा प्रभाव 439 00:18:41,254 --> 00:18:45,111 मी आयुष्यभर पाहत आलो आहे. 440 00:18:45,135 --> 00:18:48,172 या प्रभावामुळे आपण निराश किंवा चिंताग्रस्त व्यक्तीला सांगतो, 441 00:18:48,196 --> 00:18:50,498 "तुला होणाऱ्या वेदनांना काही अर्थ नाही. 442 00:18:50,522 --> 00:18:51,958 फक्त थोडासा बिघाड झाला आहे. 443 00:18:51,982 --> 00:18:54,451 संगणक प्रणालीत येतो तसा काही व्यत्यय आला आहे. 444 00:18:54,475 --> 00:18:57,142 तुझ्या डोक्यातली जुळणी थोडी बिघडली आहे." 445 00:18:58,061 --> 00:19:01,168 पण नैराश्य म्हणजे बिघाड नव्हे हे समजलं, 446 00:19:01,192 --> 00:19:05,257 तेव्हा माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. 447 00:19:06,620 --> 00:19:07,770 तुमचं नैराश्य म्हणजे 448 00:19:08,684 --> 00:19:10,691 तुम्हांला मिळालेला एक इशारा. 449 00:19:11,077 --> 00:19:12,918 तो तुम्हांला काहीतरी सांगत असतो. 450 00:19:12,942 --> 00:19:17,553 (टाळ्या) 451 00:19:17,577 --> 00:19:19,966 निराश वाटण्यामागे काही कारणं असतात. 452 00:19:19,990 --> 00:19:22,705 नैराश्याच्या गर्तेत ती समजणं कठीण असतं. 453 00:19:22,729 --> 00:19:25,339 हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून जाणतो. 454 00:19:25,363 --> 00:19:28,846 पण योग्य मदत मिळाली, तर समस्या समजून घेऊन, 455 00:19:28,870 --> 00:19:31,344 सर्वांनी मिळून त्या सोडवता येतात. 456 00:19:31,368 --> 00:19:32,560 पण हे करण्याअगोदरची 457 00:19:32,584 --> 00:19:34,322 पहिली पायरी म्हणजे 458 00:19:34,346 --> 00:19:36,964 हे इशारे धुडकावून न लावणं. 459 00:19:36,988 --> 00:19:41,180 त्यांना दुबळेपणा, वेड किंवा जैविक कारण न समजणं. 460 00:19:41,204 --> 00:19:43,139 काही थोड्या अपवादांमध्ये तसं असू शकतं. 461 00:19:43,163 --> 00:19:46,789 हे इशारे आपण ऐकायला हवेत. 462 00:19:46,813 --> 00:19:50,085 कारण आपण ऐकायलाच हवं असं काहीतरी ते सांगत असतात. 463 00:19:50,514 --> 00:19:55,537 आपण जेव्हा खरोखरीच हे इशारे ऐकून 464 00:19:55,561 --> 00:19:59,576 त्यांचा योग्य तो मान राखायला लागू, 465 00:19:59,600 --> 00:20:01,847 तेव्हाच आपल्याला दिसू लागतील 466 00:20:01,871 --> 00:20:06,029 मुक्तता देणारे, सक्षम करणारे सखोल उपाय. 467 00:20:07,133 --> 00:20:11,206 भोवताली सर्वत्र गायी थबकल्या आहेत! 468 00:20:11,585 --> 00:20:12,766 धन्यवाद. 469 00:20:12,790 --> 00:20:16,478 (टाळ्या)