0:00:01.357,0:00:02.928 बराच काळ 0:00:02.952,0:00:06.086 मला दोन रहस्यं सतावत होती. 0:00:06.689,0:00:08.950 त्यांचा उलगडा होत नव्हता. 0:00:08.974,0:00:11.877 खरं तर, मला खोलात जाऊन ती सोडवायची [br]फार भीती वाटत होती. 0:00:12.349,0:00:15.896 पहिलं रहस्य सांगतो. [br]आजवरच्या माझ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात 0:00:15.920,0:00:18.991 मी पाहतो आहे, की इंग्लंड, अमेरिका 0:00:19.015,0:00:22.371 आणि इतर पाश्चात्य देशांमध्ये 0:00:22.395,0:00:25.085 गंभीर स्वरूपाचे नैराश्य आणि चिंताविकार 0:00:25.109,0:00:26.863 दरवर्षी वाढत चालले आहेत. 0:00:27.173,0:00:30.101 यामागचं कारण मला जाणून घ्यायचं होतं. 0:00:31.108,0:00:32.975 हे विकार आपल्याला का जडताहेत? 0:00:33.394,0:00:36.036 रोजचा दिनक्रम पार पाडणं अशक्य वाटणाऱ्यांची 0:00:36.060,0:00:39.314 संख्या दरवर्षी वाढत का जाते आहे? 0:00:39.743,0:00:43.300 हे समजून घेण्याची इच्छा मला वाटली, [br]यामागे एक खाजगी रहस्य आहे. 0:00:43.324,0:00:44.713 मला आठवतं, तरुणपणी मी 0:00:44.737,0:00:46.158 डॉक्टरांना म्हणालो होतो, 0:00:46.182,0:00:50.667 "मला वाटतं, की माझ्या अंगातून जणु [br]वेदना वाहते आहे. 0:00:51.237,0:00:52.633 तिच्यावर माझं नियंत्रण नाही. 0:00:52.657,0:00:54.942 तिच्यामागचं कारण मला ठाऊक नाही. 0:00:54.966,0:00:57.021 मला या वेदनेची खूप शरम वाटते आहे." 0:00:57.045,0:00:58.641 डॉक्टरांनी मला एक गोष्ट सांगितली. 0:00:58.665,0:01:00.678 त्यांचा हेतू चांगलाच होता. 0:01:00.702,0:01:02.394 त्यांनी सगळं फार सोपं करून टाकलं. 0:01:02.418,0:01:03.586 ते पूर्ण चुकीचं नव्हतं. 0:01:03.610,0:01:06.402 ते म्हणाले, "यामागची कारणं [br]वैद्यकशास्त्राला ठाऊक आहेत. 0:01:06.426,0:01:10.658 काही लोकांच्या डोक्यात निसर्गतःच [br]रासायनिक असंतुलन असतं. 0:01:10.682,0:01:12.103 तू त्यापैकीच एक. 0:01:12.127,0:01:14.111 आता इतकंच करायचं, काही औषधं घ्यायची. 0:01:14.135,0:01:16.499 त्यामुळे तुझं रासायनिक संतुलन ठीक होईल." 0:01:16.523,0:01:18.933 मग मी पॅक्सील किंवा सेरोक्साट घेऊ लागलो. 0:01:18.957,0:01:21.983 ही एकाच औषधाची निरनिराळ्या देशातली नावं. 0:01:22.007,0:01:24.490 मला बरं वाटू लागलं. मोठा आधार मिळाला. 0:01:24.514,0:01:25.925 पण थोड्याच दिवसांत 0:01:25.949,0:01:27.950 वेदना परत जाणवू लागली. 0:01:27.974,0:01:29.802 म्हणून औषधाची मात्रा वाढवण्यात आली. 0:01:29.826,0:01:33.037 तेरा वर्षं, मी जितकी मोठ्यात मोठी [br]मात्रा घेणं शक्य आहे, 0:01:33.061,0:01:35.077 तितकी घेत होतो. 0:01:35.402,0:01:38.871 यापैकी बराचसा काळ, आणि नंतरही 0:01:38.895,0:01:40.395 वेदना होतच होत्या. 0:01:40.419,0:01:43.395 मग मी स्वतःला विचारू लागलो, "हे असं का? 0:01:43.419,0:01:44.961 आजच्या संस्कृतीच्या समजानुसार 0:01:44.985,0:01:48.125 मला जे सांगण्यात आलं,[br]ते सर्व मी केलं आहे. 0:01:48.149,0:01:50.268 तरीही हा त्रास का?" 0:01:50.292,0:01:53.164 या दोन रहस्यांचा शोध घेण्यासाठी[br]आणि पुस्तकलेखनासाठी 0:01:53.188,0:01:54.596 माहिती मिळवण्यासाठी 0:01:54.620,0:01:57.125 मी जगभर फिरलो. 0:01:57.149,0:01:58.568 चाळीस हजार मैल प्रवास केला. 0:01:58.592,0:02:01.085 मला जगातल्या मोठमोठ्या तज्ज्ञांना [br]विचारायचं होतं, 0:02:01.109,0:02:03.276 नैराश्य आणि चिंताविकार कशामुळे होतात? 0:02:03.300,0:02:05.172 या विकारांवर मात कशी करायची? 0:02:05.196,0:02:07.820 या विकारांचा सामना करून[br]त्यातून मुक्त झालेल्या 0:02:07.844,0:02:09.956 लोकांनाही भेटायचं होतं. 0:02:09.980,0:02:11.466 या प्रवासात भेटलेल्या 0:02:11.490,0:02:14.045 विलक्षण लोकांकडून [br]मला बरंच काही शिकायला मिळालं. 0:02:14.069,0:02:17.045 मला सर्वात महत्त्वाचं समजलं ते असं: 0:02:17.069,0:02:20.104 नैराश्य आणि चिंताविकार यांची [br]नऊ वेगवेगळी कारणं आहेत. 0:02:20.128,0:02:23.835 त्यांचे शास्त्रीय पुरावे आहेत. 0:02:23.859,0:02:26.668 त्यापैकी दोन जीवशास्त्रीय आहेत. 0:02:26.692,0:02:29.375 या विकारांना बळी पडण्याचं प्रमाण [br]जनुकांवर अवलंबून असतं. 0:02:29.399,0:02:31.333 पण जनुकं आपलं भविष्य ठरवत नाहीत. 0:02:31.357,0:02:34.968 तसंच, नैराश्यामुळे मेंदूत घडून येणाऱ्या [br]जीवशास्त्रीय बदलांमुळे 0:02:34.992,0:02:36.690 त्यातून बाहेर पडणं कठीण होतं. 0:02:36.714,0:02:38.896 पण या विकारांची कारणं 0:02:38.920,0:02:40.761 म्हणून सिद्ध झालेल्या बऱ्याचशा घटकांचा 0:02:40.785,0:02:42.550 आपल्या जैविकतेशी संबंध नसतो. 0:02:43.520,0:02:45.734 त्यांचा संबंध असतो, आपल्या जीवनशैलीशी. 0:02:46.116,0:02:47.607 हे घटक समजून घेतल्यावर 0:02:47.631,0:02:50.727 सापडणारे निराळे उपाय, 0:02:50.751,0:02:52.299 रासायनिक नैराश्यरोधकांसमवेत 0:02:52.323,0:02:55.260 सुचवले गेले पाहिजेत. 0:02:55.284,0:02:57.077 उदाहरणार्थ, 0:02:57.101,0:03:00.549 तुम्हांला एकटेपणा वाटत असेल, तर [br]पुढे नैराश्य येण्याची शक्यता वाढते. 0:03:00.573,0:03:03.684 व्यवसायाच्या ठिकाणी [br]कामावर तुमचं नियंत्रण नसेल, 0:03:03.708,0:03:05.604 सांगितलेलं काम निमूट करावं लागत असेल, 0:03:05.628,0:03:07.517 तर नैराश्याची शक्यता वाढते. 0:03:07.541,0:03:10.025 तुम्ही बाहेर खुल्या निसर्गात [br]फारसे जात नसाल, 0:03:10.049,0:03:11.918 तर नैराश्याची शक्यता वाढते. 0:03:11.942,0:03:15.053 आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे.[br]या विकारांमागच्या 0:03:15.077,0:03:16.252 अनेक कारणांचा मिलाफ 0:03:16.276,0:03:18.339 त्या गोष्टीत दिसून येतो. 0:03:18.363,0:03:20.029 आपण सर्व जाणताच, की 0:03:20.053,0:03:22.712 प्रत्येकाला नैसर्गिक गरजा असतात. बरोबर? 0:03:22.736,0:03:23.910 हो, अगदी खरं. 0:03:23.934,0:03:26.513 अन्न, पाणी. 0:03:26.537,0:03:28.767 निवारा, स्वच्छ हवा. 0:03:28.791,0:03:30.585 या गोष्टी काढून घेतल्या, 0:03:30.609,0:03:32.902 तर आपले हाल होतील. 0:03:32.926,0:03:34.728 त्याचबरोबर 0:03:34.752,0:03:38.123 प्रत्येक माणसाला नैसर्गिकपणे [br]मानसिक गरजा असतात. 0:03:38.147,0:03:40.186 समाजाशी जोडलेलं असणं, ही गरज असते. 0:03:40.210,0:03:43.274 आयुष्याला अर्थ आणि हेतू असणं, ही गरज असते. 0:03:43.298,0:03:45.829 लोक आपल्याला ओळखतात, मानतात [br]ही भावना गरजेची असते. 0:03:45.853,0:03:48.410 आपलं भविष्य उज्वल आहे [br]असं वाटणं, ही गरज असते. 0:03:48.434,0:03:51.482 आजच्या आपल्या संस्कृतीत [br]अनेक चांगल्या गोष्टी आहेत. 0:03:51.506,0:03:53.666 अनेक गोष्टी भूतकाळापेक्षा चांगल्या आहेत. 0:03:53.690,0:03:55.011 या काळात जन्म होणं सुखाचं. 0:03:55.035,0:03:56.999 पण मूलभूत गंभीर मानसिक गरजा भागवण्याची 0:03:57.023,0:04:01.124 आपली क्षमता मात्र कमी कमी होत चालली आहे. 0:04:01.895,0:04:03.998 मानसिक विकारांचं प्रमाण वाढण्यामागचं 0:04:04.022,0:04:08.069 हे एकमेव नसलं, तरी [br]सर्वात महत्त्वाचं कारण आहे. 0:04:08.919,0:04:12.149 हे समजून घेणं मला फार कठीण गेलं. 0:04:12.173,0:04:14.879 मला माझ्या विचारांशी द्वंद्व करावं लागलं, 0:04:14.903,0:04:19.309 नैराश्य मेंदूत असतं हा विचार बदलून, 0:04:19.333,0:04:20.500 आपल्या जीवनशैलीसारखी 0:04:20.524,0:04:22.585 अनेक कारणं त्यामागे असतात[br]हे समजण्यासाठी. 0:04:22.609,0:04:24.974 हे मला नीटपणे कधी समजलं? 0:04:24.998,0:04:28.141 दक्षिण आफ्रिकेतल्या डॉ. डेरेक समरफील्ड[br]नावाच्या मनोविकारतज्ज्ञांची 0:04:28.165,0:04:29.966 मुलाखत घ्यायला गेलो, त्यावेळी. 0:04:29.990,0:04:31.141 ही एक थोर व्यक्ती आहे. 0:04:31.165,0:04:34.879 २००१ साली डॉ. समरफील्ड कंबोडियात होते. 0:04:34.903,0:04:38.196 त्या वर्षी कंबोडियात प्रथमच [br]रासायनिक नैराश्यरोधक औषधं 0:04:38.220,0:04:39.952 उपलब्ध झाली होती. 0:04:39.976,0:04:43.273 तिथल्या डॉक्टरांना ती ठाऊक नव्हती.[br]त्यांनी विचारलं, 0:04:43.297,0:04:44.888 "ही कसली औषधं?" [br]मग डॉ. समरफील्डनी 0:04:44.912,0:04:46.126 त्याविषयी माहिती दिली. 0:04:46.150,0:04:47.682 यावर ते डॉक्टर्स म्हणाले, 0:04:47.706,0:04:50.403 "यांची आम्हांला गरज नाही. [br]आमच्याकडे नैराश्यरोधक आहेत." 0:04:50.427,0:04:52.164 डॉ. समरफील्डनी विचारलं, "म्हणजे?" 0:04:52.188,0:04:55.427 त्यांना वाटलं, आता हे [br]निसर्गोपचाराविषयी सांगतील. 0:04:55.451,0:04:59.223 सेंट जॉन्स वॉर्ट, जिंगको बिलोबा वगैरे. 0:04:59.910,0:05:02.299 पण त्याऐवजी त्यांनी एक गोष्ट सांगितली. 0:05:02.800,0:05:06.379 त्यांच्या गावात एक शेतकरी होता. [br]तो भातशेती करत असे. 0:05:06.403,0:05:08.173 एके दिवशी त्याचा पाय पडला, तो नेमका 0:05:08.197,0:05:10.387 युद्धकाळात मातीत पेरलेल्या स्फोटकावर. 0:05:10.411,0:05:11.823 स्फोटामुळे त्याने पाय गमावला. 0:05:11.847,0:05:13.283 कृत्रिम पाय बसवल्यानंतर 0:05:13.307,0:05:16.078 काही काळाने तो पुन्हा [br]भाताच्या शेतात काम करू लागला. 0:05:16.102,0:05:18.634 पण कृत्रिम पाय सतत पाण्याखाली ठेवून [br]काम करणं 0:05:18.658,0:05:20.332 फार वेदनादायक असतं. 0:05:20.356,0:05:22.276 मला वाटतं, जिथे स्फोट झाला, 0:05:22.300,0:05:24.879 तिथेच पुन्हा जाऊन काम करणंही [br]त्याला कठीण गेलं असावं. 0:05:24.903,0:05:27.306 त्याला दिवसभर रडणं अनावर होऊ लागलं. 0:05:27.330,0:05:28.759 बिछान्यातून उठावंसं वाटेना. 0:05:28.783,0:05:31.666 नैराश्याची सर्व लक्षणं दिसू लागली. 0:05:32.013,0:05:33.378 कंबोडियन डॉक्टर म्हणाले, 0:05:33.402,0:05:35.688 "मग आम्ही त्याला नैराश्यरोधक दिलं." 0:05:35.712,0:05:38.347 डॉ. समरफील्डनी विचारलं, "कोणतं?" 0:05:38.371,0:05:41.180 ते डॉक्टर्स त्याला भेटायला गेले होते.[br]त्याच्याजवळ बसून 0:05:41.982,0:05:43.382 त्यांनी त्याचं म्हणणं ऐकलं. 0:05:44.464,0:05:47.011 त्यांना त्याच्या वेदनेमागचा अर्थ समजला. 0:05:47.035,0:05:49.956 नैराश्याच्या गर्तेत त्याला स्वतःला [br]ते समजणं कठीण होतं, 0:05:49.980,0:05:53.640 पण त्यामागची कारणं [br]त्याच्या आयुष्यात फार महत्त्वाची होती. 0:05:53.966,0:05:57.164 गावातल्या इतर लोकांशी बोलताना [br]त्यापैकी एका डॉक्टरांना सुचलं, 0:05:57.188,0:05:59.125 "आपण याला एक गाय दिली, 0:05:59.149,0:06:01.149 तर तो दुधाचा व्यवसाय करू शकेल. 0:06:01.173,0:06:04.268 मग त्याला भाताच्या शेतात जाऊन 0:06:04.292,0:06:06.799 ते त्रासदायक काम करावं लागणार नाही." 0:06:06.823,0:06:08.022 त्याला गाय देण्यात आली. 0:06:08.046,0:06:10.226 दोन आठवड्यांत त्याचं रडणं थांबलं. 0:06:10.250,0:06:12.162 महिन्याभरात तो नैराश्यातून बाहेर आला. 0:06:12.186,0:06:13.765 डॉ. समरफील्ड, 0:06:13.789,0:06:16.559 ही गाय म्हणजे नैराश्यरोधक, 0:06:16.583,0:06:18.050 हो ना? 0:06:18.074,0:06:19.225 (हशा) 0:06:19.249,0:06:22.302 (टाळ्या) 0:06:22.326,0:06:25.199 लहानपणापासून नैराश्याबद्दल [br]माझी जी समजूत आहे, 0:06:25.223,0:06:26.835 तीच तुमचीही असेल, तर 0:06:26.859,0:06:28.533 तुम्हांला हा एक बाष्कळ विनोद वाटेल. 0:06:28.557,0:06:30.581 "नैराश्यरोधक घ्यावं म्हणून गेलो, आणि 0:06:30.605,0:06:31.771 डॉक्टरांनी गाय दिली." 0:06:31.795,0:06:34.822 विज्ञानाशी संबंध नसलेल्या या प्रसंगावरून 0:06:34.846,0:06:37.823 कंबोडियन डॉक्टरांनी ही अटकळ बांधली. 0:06:37.847,0:06:41.132 गेली कित्येक वर्षं 0:06:41.156,0:06:43.243 जागतिक आरोग्य संस्था (WHO) 0:06:43.267,0:06:45.457 नेमकं हेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे. 0:06:45.481,0:06:47.973 तेही उत्कृष्ठ शास्त्रीय पुरावे देऊन. 0:06:48.576,0:06:50.505 नैराश्य येणं, 0:06:50.529,0:06:51.906 किंवा अति चिंता वाटणं 0:06:53.008,0:06:56.268 म्हणजे दुबळेपणा किंवा वेड लागणं नव्हे. 0:06:56.292,0:06:59.877 किंवा यंत्रासारखे तुमचे काही भाग बिघडलेत, [br]असंही नव्हे. 0:07:00.950,0:07:03.484 एक माणूस म्हणून [br]तुमच्या काही गरजा अपूर्ण आहेत, इतकंच. 0:07:03.919,0:07:07.459 कंबोडियन डॉक्टर आणि जागतिक आरोग्य संस्था 0:07:07.483,0:07:09.800 काय सांगत नाहीत, तेही पाहणं [br]इथे महत्त्वाचं आहे. 0:07:09.824,0:07:11.356 ते असं नाही म्हणाले, 0:07:11.380,0:07:14.181 "मित्रा, अरे जरा भानावर ये. 0:07:14.205,0:07:17.472 तुझा प्रश्न तूच समजून घे, आणि तूच सोडव." 0:07:17.851,0:07:19.843 उलट ते असं म्हणाले, की 0:07:19.867,0:07:23.391 "आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. [br]आपण सर्वजण मिळून 0:07:23.415,0:07:27.827 हा प्रश्न समजून घेऊ आणि सोडवू." 0:07:28.543,0:07:32.559 प्रत्येक नैराश्यग्रस्त व्यक्तीची [br]ही गरज असते, 0:07:32.583,0:07:35.828 ती पूर्ण व्हायला हवी. 0:07:35.852,0:07:38.839 म्हणूनच, २०१७ साली[br]जागतिक आरोग्य दिनाच्या निवेदनात 0:07:38.863,0:07:41.181 संयुक्त राष्ट्रसंघाचे 0:07:41.205,0:07:42.696 एक प्रमुख डॉक्टर म्हणाले, 0:07:42.720,0:07:45.537 "आपण रासायनिक असंतुलनाविषयी बोलणं [br]कमी करून, 0:07:45.561,0:07:48.618 त्याऐवजी जीवनशैलीतल्या असंतुलनाविषयी [br]बोलायला हवं." 0:07:48.920,0:07:50.893 औषधांमुळे काही लोकांना खरोखरच बरं वाटतं. 0:07:50.917,0:07:53.047 मलाही काही काळ बरं वाटलं होतं. 0:07:53.071,0:07:57.498 पण जीवशास्त्रापेक्षा खोल जाणाऱ्या 0:07:57.522,0:08:00.577 या समस्येवरचा उपायही [br]तितकाच खोलवर जाणारा हवा. 0:08:00.601,0:08:03.188 हे जेव्हा मी प्रथम ऐकलं, 0:08:03.212,0:08:04.895 त्यावेळी मला वाटलं होतं, 0:08:04.919,0:08:07.045 "मी शास्त्रीय पुरावे पाहिले आहेत. 0:08:07.069,0:08:08.641 पुष्कळ संशोधनं वाचली आहेत. 0:08:08.665,0:08:11.971 या विषयातल्या तज्ज्ञांशी बोललो आहे." 0:08:11.995,0:08:14.381 आणि तरीही मला समजत नव्हतं, [br]"हे करायचं कसं?" 0:08:14.405,0:08:16.318 आपल्या नैराश्याची कारणं बरेचदा 0:08:16.342,0:08:18.833 त्या कंबोडियन शेतकऱ्याच्या गोष्टीपेक्षा 0:08:18.857,0:08:20.154 जास्त गुंतागुंतीची असतात. 0:08:20.178,0:08:22.812 ती समजून घेण्याची सुरुवात तरी कुठून करावी? 0:08:22.836,0:08:26.085 पुस्तक लिहिण्यासाठी म्हणून 0:08:26.109,0:08:27.680 मी जगभर फिरलो, 0:08:27.704,0:08:30.299 तेव्हा हे समजून घेणारे लोक मला भेटत गेले. 0:08:30.323,0:08:32.775 सिडनी पासून सॅन फ्रान्सिस्को 0:08:32.799,0:08:33.971 आणि साओ पावलो पर्यंत. 0:08:33.995,0:08:36.061 हे लोक नैराश्य आणि चिंताविकाराची 0:08:36.085,0:08:38.432 सखोल कारणं समजून घेत होते 0:08:38.456,0:08:40.871 आणि आपल्या समूहाद्वारे [br]त्यावर उपाय करत होते. 0:08:40.895,0:08:43.576 मला भेटलेल्या सर्वच लोकांबद्दल [br] 0:08:43.600,0:08:45.076 मी इथे सांगू शकत नाही. 0:08:45.100,0:08:48.553 किंवा त्या नऊ कारणांबद्दलही [br]इथे बोलू शकत नाही. 0:08:48.577,0:08:51.059 कारण १० तासांचं TED व्याख्यान [br]द्यायची परवानगी नाही. 0:08:51.083,0:08:52.835 वाटल्यास आयोजकांजवळ तक्रार करा! 0:08:52.859,0:08:54.789 म्हणून मी त्यापैकी दोन कारणं 0:08:54.813,0:08:58.226 आणि दोन उपाय सांगणार आहे. 0:08:58.578,0:08:59.728 पहिलं: 0:09:00.285,0:09:03.293 मानवी इतिहासात जास्त एकटेपणा [br]आपल्याच पिढीला जाणवला आहे. 0:09:03.317,0:09:06.150 नुकतंच एका पाहणीत अमेरिकन लोकांना [br]विचारलं गेलं, 0:09:06.174,0:09:09.324 "आपली कोणाशीच जवळीक उरलेली नाही, [br]असं तुम्हांला वाटतं का?" 0:09:09.348,0:09:12.999 यावर ३९ टक्के लोकांनी [br]हे वर्णन आपल्याला लागू पडतं असं सांगितलं. 0:09:13.023,0:09:14.387 "कोणाशीच जवळीक नाही." 0:09:14.411,0:09:16.908 आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटेपणा मोजला असता, 0:09:16.932,0:09:19.490 ब्रिटन आणि युरोप [br]अमेरिकेच्या खालोखाल आहेत. 0:09:19.514,0:09:21.299 इथे कोणाला उगाच अभिमान वाटायला नको! 0:09:21.323,0:09:22.331 (हशा) 0:09:22.355,0:09:24.244 या विषयातल्या एका तज्ज्ञांशी 0:09:24.268,0:09:26.664 मी बराच काळ चर्चा केली. 0:09:26.688,0:09:28.942 त्या थोर माणसाचं नाव,[br]प्राध्यापक जॉन कासिओपो. 0:09:28.966,0:09:30.117 ते शिकागोत राहत असत. 0:09:30.141,0:09:32.964 त्यांच्या संशोधनाबद्दल [br]मी पुष्कळ चिंतन केलं. 0:09:32.988,0:09:35.293 प्राध्यापक कासिओपो विचारतात, 0:09:35.317,0:09:36.967 "आपण अस्तित्वात आहोत, ते कशामुळे? 0:09:36.991,0:09:38.944 आपण जिवंत का राहिलो आहोत?" 0:09:38.968,0:09:41.174 यामागचं मुख्य कारण असं, की 0:09:41.198,0:09:44.015 आफ्रिकेच्या सव्हाना प्रदेशातले आपले पूर्वज 0:09:44.039,0:09:45.759 एका गोष्टीत खूप हुशार होते. 0:09:46.287,0:09:49.577 भोवतालच्या वन्य श्वापदांपेक्षा [br]ते आकाराने मोठे नव्हते, 0:09:49.601,0:09:52.914 किंवा त्यांच्यापेक्षा जलद [br]धावूही शकत नव्हते. 0:09:52.938,0:09:55.652 पण ते जमाव करून एकत्र राहत होते, 0:09:55.676,0:09:57.276 एकमेकांना साह्य करत होते. 0:09:57.300,0:09:59.561 ही आपल्या मानवजातीची दैवी शक्ती आहे. 0:09:59.585,0:10:00.990 आपण समूहात राहतो. 0:10:01.014,0:10:03.490 मधमाशांची उत्क्रांती होऊन [br]त्या पोळ्यात राहू लागल्या, 0:10:03.514,0:10:05.746 तसा मनुष्यप्राणी जमातीत राहू लागला. 0:10:05.770,0:10:09.580 या जमातींची मोडतोड करणारी 0:10:10.492,0:10:11.959 आपलीच पहिली पिढी आहे. 0:10:12.484,0:10:14.551 यामुळे आपलं जीवन उध्वस्त होत आहे. 0:10:15.048,0:10:17.192 वास्तविक हे असं व्हायला नको. 0:10:17.216,0:10:19.850 माझ्या पुस्तकातली आणि माझ्या आयुष्यातलीही 0:10:19.874,0:10:21.969 एक मोठी व्यक्ती आहे, सॅम एव्हरिंग्टन. 0:10:21.993,0:10:24.731 लंडनच्या पूर्वेच्या [br]एका गरीब वस्तीतले हे डॉक्टर. 0:10:24.755,0:10:26.334 तिथे मी बराच काळ राहत होतो. 0:10:26.358,0:10:28.045 सॅम फार अस्वस्थ होते. 0:10:28.069,0:10:29.625 कारण त्यांचे अनेक रुग्ण 0:10:29.649,0:10:32.093 भयंकर नैराश्य आणि चिंताविकाराने [br]ग्रस्त होते. 0:10:32.117,0:10:34.839 माझ्यासारखंच डॉ. सॅमना देखील वाटतं,[br]की नैराश्यरोधकांमुळे 0:10:34.863,0:10:37.085 काही लोकांना थोडं बरं वाटू शकतं. 0:10:37.109,0:10:38.482 त्यांनी दोन गोष्टी पाहिल्या. 0:10:38.506,0:10:42.061 एक, त्यांचे रुग्ण बराच काळ त्रस्त होते. 0:10:42.085,0:10:45.823 यामागची कारणं स्पष्ट होती. [br]उदाहरणार्थ, एकटेपणा. 0:10:45.847,0:10:49.291 दोन, औषधांनी काही लोकांना [br]थोड्या प्रमाणात बरं वाटत असलं, 0:10:49.315,0:10:51.583 तरी अनेक वेळा औषधामुळे 0:10:51.607,0:10:53.140 मूळ प्रश्न सुटत नव्हता. 0:10:53.871,0:10:56.522 एके दिवशी, डॉ. सॅमनी [br]एक नवीन उपाय वापरायचं ठरवलं. 0:10:56.546,0:10:58.998 त्यांच्या दवाखान्यात एक महिला आली. 0:10:59.022,0:11:00.489 तिचं नाव लिसा कनिंगहॅम. 0:11:00.513,0:11:02.387 माझी तिच्याशी नंतर ओळख झाली. 0:11:02.411,0:11:06.495 भयानक नैराश्य आणि चिंताविकारामुळे [br]लिसा घरातून बाहेरच पडत नव्हती. 0:11:06.519,0:11:07.669 तब्बल सात वर्षं. 0:11:08.898,0:11:11.823 डॉ. सॅमनी तिला सांगितलं,[br]"आम्ही तुला औषधं तर देऊच, 0:11:11.847,0:11:13.677 पण त्याबरोबर 0:11:13.701,0:11:16.498 तू आणखी काहीतरी करायचं आहेस. 0:11:16.522,0:11:19.965 आठवड्यातून दोनदा इथे यायचं, 0:11:19.989,0:11:22.767 आणि इतर रुग्णांशी बोलायचं. 0:11:22.791,0:11:25.601 पण आपण किती दुर्दैवी, [br]अशा प्रकारचं काही बोलायचं नाही. 0:11:25.625,0:11:29.172 तर सगळ्यांनी मिळून [br]काहीतरी अर्थपूर्ण काम शोधून ते करायचं. 0:11:29.196,0:11:32.299 मग एकटेपणा वाटणार नाही, [br]आयुष्याला अर्थ नाही असं वाटणार नाही." 0:11:32.323,0:11:35.098 त्या रुग्णांना लिसा जेव्हा प्रथम भेटली, 0:11:35.122,0:11:37.378 तेव्हा तो ताण असह्य होऊन 0:11:37.402,0:11:39.323 तिला वांत्या होऊ लागल्या. 0:11:39.347,0:11:41.981 तेव्हा इतरांनी तिला सावरलं.[br]चर्चा सुरु झाली. 0:11:42.005,0:11:43.680 "आपण एकत्र येऊन काय करू शकतो?" 0:11:43.704,0:11:45.998 हे रुग्ण माझ्यासारखे, [br]लंडनच्या आतल्या भागातले. 0:11:46.022,0:11:48.070 त्यांना बागकामाची काहीच माहिती नव्हती. 0:11:48.094,0:11:50.339 "आपण बागकाम शिकूया का?" 0:11:50.363,0:11:52.529 दवाखान्याच्या मागेच 0:11:52.553,0:11:53.704 पडीक जागा होती. 0:11:53.728,0:11:55.610 "इथे बाग करूया का?" 0:11:55.634,0:11:57.809 त्यांनी लायब्ररीतून पुस्तकं आणली. 0:11:57.833,0:11:59.318 You Tube वर धडे घेतले. 0:11:59.342,0:12:01.501 मातीत हात मळवून घेतले. 0:12:01.844,0:12:04.887 ऋतुचक्र समजून घ्यायला सुरुवात केली. 0:12:04.911,0:12:06.241 अनेक पुराव्यांनुसार, 0:12:06.265,0:12:07.894 निसर्गाशी जवळीक करणं 0:12:07.918,0:12:09.894 हा नैराश्यावर एक चांगला उपाय आहे. 0:12:09.918,0:12:12.927 पण हा गट त्याहीपेक्षा [br]जास्त काही करत होता. 0:12:13.347,0:12:15.377 त्यांनी एक जमात तयार केली. 0:12:15.401,0:12:17.212 एक समूह तयार केला. 0:12:17.236,0:12:19.260 त्यांना एकमेकांविषयी आपुलकी वाटू लागली. 0:12:19.284,0:12:20.958 एखादा गैरहजर असला, 0:12:20.982,0:12:23.502 "काय झालं? ठीक आहेस ना?" [br]अशी चौकशी करू लागले. 0:12:23.526,0:12:26.137 त्याला कसला त्रास होत असेल [br]ते जाणून घेऊ लागले. 0:12:26.161,0:12:27.964 लिसा म्हणाली, 0:12:27.988,0:12:30.585 "जसजशी बाग बहरू लागली, 0:12:30.609,0:12:31.876 तसतसे आम्हीही बहरू लागलो!" 0:12:32.474,0:12:34.506 याला म्हणतात समाजोपचार. 0:12:34.530,0:12:36.045 हे युरोपमध्ये वाढत आहे. 0:12:36.069,0:12:38.370 हळूहळू गोळा होणाऱ्या पुराव्यांनुसार 0:12:38.394,0:12:41.274 नैराश्य आणि चिंताविकारात 0:12:41.298,0:12:43.276 खरोखरीच घट होत असल्याचं दिसून येत आहे. 0:12:43.300,0:12:47.021 एके दिवशी या बागेत असताना 0:12:47.045,0:12:49.526 माझ्या मनात एक विचार आला. 0:12:49.550,0:12:51.134 त्या सुंदर बागेत गेलो असताना 0:12:51.158,0:12:52.349 मला जे वाटलं, 0:12:52.373,0:12:56.244 त्यामागे ऑस्ट्रेलियन प्राध्यापक ह्यू मके [br]यांच्या विचारांची प्रेरणा आहे. 0:12:56.268,0:13:00.649 मला वाटलं, की आजच्या आपल्या संस्कृतीत[br]एखाद्याला उदास वाटत असेल, 0:13:00.673,0:13:03.737 तर आपण त्याला काय सांगतो? [br]तुम्ही सांगत असाल, मीही सांगितलं आहे.. 0:13:03.761,0:13:06.985 "तू स्वतः कोण आहेस ते जाणून घे.[br]स्वतःला पटेल तेच कर." 0:13:07.742,0:13:10.692 आणि माझ्या लक्षात आलं, की [br]त्याऐवजी आपण सांगायला हवं, 0:13:10.716,0:13:11.866 "स्वतःपुरतं पाहू नकोस. 0:13:12.306,0:13:13.639 तुझा एकट्याचा नव्हे, 0:13:14.218,0:13:16.427 समूहाचा विचार कर. 0:13:16.765,0:13:18.090 समूहाचा भाग हो." 0:13:18.114,0:13:21.820 (टाळ्या) 0:13:21.844,0:13:24.423 या विकारांवर उपाय म्हणून [br]आपण एकांडेपणाने राहून 0:13:24.447,0:13:27.598 आपल्या एकट्याच्या हातात असलेली [br]साधनं जास्तीत जास्त वापरत गेलो. 0:13:27.622,0:13:29.061 हे विकार बळावण्यात 0:13:29.085,0:13:31.125 हा समज थोडा कारणीभूत ठरला असावा. 0:13:31.149,0:13:33.902 स्वतःला महत्त्व देण्यापेक्षा [br]एखादा मोठा उद्देश हवा. 0:13:33.926,0:13:36.347 इथे नैराश्य आणि चिंताविकाराचं[br]आणखी एक कारण सापडतं, 0:13:36.371,0:13:39.268 ज्याविषयी मला आज बोलायचं होतं. 0:13:39.292,0:13:40.982 आपण सर्वजण जाणतो, की 0:13:41.006,0:13:44.752 आहारात चटपटीत पदार्थ वाढल्यामुळे [br]आपलं आरोग्य बिघडत चाललं आहे. 0:13:44.776,0:13:46.982 मी पौष्टिक आहार घेतो, असं नव्हे. 0:13:47.006,0:13:49.405 व्याख्यानापूर्वी मी मॅकडोनाल्ड मध्ये [br]खाऊन आलो. 0:13:49.429,0:13:52.942 तुम्हां सर्वांना TED ची पौष्टिक न्याहारी [br]खाताना पाहून मला लाज वाटली. 0:13:52.966,0:13:58.109 पोषणरहित अन्नामुळे जसं आपलं आरोग्य बिघडतं, 0:13:58.133,0:14:02.243 तसाच, काही निकृष्ट मूल्यांनी [br]मनाचा ताबा घेतल्यामुळे 0:14:02.267,0:14:03.745 आपलं मानसिक आरोग्य बिघडतं. 0:14:04.157,0:14:07.261 हजारो वर्षांपासून [br]तत्त्ववेत्ते सांगताहेत, की 0:14:07.285,0:14:11.873 पैसा, समाजातलं स्थान, दिखाऊपणा [br]यांना महत्त्व दिलं, 0:14:11.897,0:14:13.420 तर मानसिक आरोग्य ढासळेल. 0:14:13.444,0:14:15.511 असं शोपेनहावर म्हणाले होते. 0:14:15.535,0:14:17.307 नेमकं हेच नव्हे,पण अशाच अर्थाचं. 0:14:17.331,0:14:20.357 आश्चर्य म्हणजे, यावर [br]फारसं शास्त्रीय संशोधन झालं नव्हतं. 0:14:20.381,0:14:24.030 पण मला भेटलेली एक असामान्य व्यक्ती, [br]प्राध्यापक टिम कासर 0:14:24.054,0:14:26.347 हे इलिनॉयच्या नॉक्स कॉलेजमध्ये 0:14:26.371,0:14:28.934 गेली तीस वर्षं या विषयावर संशोधन करताहेत. 0:14:28.958,0:14:31.974 त्यांच्या संशोधनाने [br]काही महत्त्वाच्या गोष्टी सुचवल्या आहेत. 0:14:31.998,0:14:35.189 पहिली गोष्ट. 0:14:35.213,0:14:39.578 उत्तमोत्तम वस्तू विकत घेऊन [br]त्यांचं प्रदर्शन केल्याने 0:14:39.602,0:14:41.793 दुःखावर मात होऊन आनंद मिळेल [br]असं जितकं समजाल, 0:14:41.817,0:14:44.729 तितकं नैराश्य आणि चिंता पदरी पडतील. 0:14:44.753,0:14:46.046 दुसरी गोष्ट. 0:14:46.070,0:14:50.658 अशा समजांनी [br]आपल्या संपूर्ण समाजाचाच ताबा घेतला आहे. 0:14:50.682,0:14:52.095 मी आयुष्यभर पाहतो आहे, 0:14:52.119,0:14:56.312 जाहिरातबाजी, इंस्टाग्राम इत्यादि गोष्टी [br]कशा प्रभाव पाडतात. 0:14:56.871,0:14:58.244 मला वाटतं 0:14:58.268,0:15:04.029 आपण जन्मापासून मानसिक KFC खातो आहोत. 0:15:04.053,0:15:07.926 चुकीच्या ठिकाणी आनंद शोधतो आहोत. 0:15:07.950,0:15:10.720 आणि जसं चटपटीत अन्न [br]पोषणाची गरज भागवण्याऐवजी 0:15:10.744,0:15:13.042 उलट आपल्याला आजारी पाडतं, 0:15:13.066,0:15:16.208 तसंच निकृष्ट मूल्यं [br]आपल्या मानसिक गरजा न भागवता 0:15:16.232,0:15:18.874 आपल्याला निरोगी आयुष्यापासून दूर नेतात. 0:15:18.898,0:15:21.521 मी जेव्हा प्रथम प्रा. कासर यांना भेटून 0:15:21.545,0:15:23.022 हे जाणून घेत होतो, 0:15:23.046,0:15:25.633 तेव्हा माझ्या मनात [br]संमिश्र भावना उभ्या राहिल्या. 0:15:25.657,0:15:28.347 माझ्यासाठी हे एक आव्हान होतं. 0:15:28.371,0:15:31.633 कारण माझ्या स्वतःच्याच आयुष्यात मी बरेचदा[br]उदासीनतेचा सामना करण्यासाठी 0:15:31.657,0:15:36.922 एखादी बाह्य परिणाम करणारी [br]भपकेबाज गोष्ट करत आलो होतो. 0:15:37.441,0:15:40.131 आणि त्याचा काही उपयोग होत नव्हता, [br]हेही पाहत आलो होतो. 0:15:40.930,0:15:43.812 मला वाटलं, हे तर साहजिकच आहे. 0:15:43.836,0:15:45.581 अगदी रटाळ मुद्दा, हो ना? 0:15:45.605,0:15:46.930 आता मी तुम्हांला सांगतो, 0:15:46.954,0:15:49.097 मरणशय्येवर असताना,[br]आपल्याजवळ किती बूट आहेत, 0:15:49.121,0:15:52.437 किंवा किती री-ट्विट मिळाले होते [br]या गोष्टी तुम्हांला आठवणार नाहीत. 0:15:52.461,0:15:54.144 त्यावेळी आठवतील ते प्रेमाचे, 0:15:54.168,0:15:56.279 अर्थपूर्ण जगण्याचे आणि सुसंवादाचे क्षण. 0:15:56.303,0:15:58.248 हे वाक्य वापरून गुळगुळीत झालेलं आहे खरं. 0:15:58.272,0:16:00.621 मी प्रा. कासरना विचारलं, 0:16:00.645,0:16:02.998 "मला यात एक विचित्र दुटप्पीपणा दिसतो. [br]का बरं?" 0:16:03.022,0:16:06.829 ते म्हणाले, "कारण आपल्याला मनात कुठेतरी [br]या गोष्टी ठाऊक असतात. 0:16:06.853,0:16:09.228 पण या संस्कृतीत आपण त्या पाळत नाही." 0:16:09.252,0:16:11.331 या गोष्टी रटाळ वाटण्याइतपत ठाऊक आहेत. 0:16:11.355,0:16:12.633 पण आपण त्या पाळत नाही. 0:16:12.657,0:16:15.866 मी विचारलं, [br]"का? इतक्या महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक असून 0:16:15.890,0:16:17.176 आपण त्या पाळत का नाही?" 0:16:17.200,0:16:20.604 थोड्या वेळाने प्रा. कासर म्हणाले, 0:16:20.628,0:16:23.049 "कारण आपण एका यंत्रात राहतो. 0:16:23.073,0:16:26.806 आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींचा [br]आपल्याला विसर पाडणं हे त्याचं कार्य." 0:16:27.260,0:16:28.847 यावर मला खूप विचार करावा लागला. 0:16:28.871,0:16:30.276 "कारण आपण ज्या यंत्रात राहतो, 0:16:30.300,0:16:33.978 ते आपल्याला महत्त्वाच्या गोष्टीकडे [br]दुर्लक्ष करायला लावतं." 0:16:34.299,0:16:38.077 हे यंत्र मोडून टाकता येईल का, [br]हे प्रा. कासरना शोधून काढायचं होतं. 0:16:38.101,0:16:39.974 यावर त्यांनी पुष्कळ संशोधन केलं आहे. 0:16:39.998,0:16:41.553 इथे मी एक उदाहरण सांगतो. 0:16:41.577,0:16:45.077 तुम्हां सर्वांना विनंती: [br]आपल्या कुटुंब आणि मित्रांबरोबर करून पहा. 0:16:45.101,0:16:48.443 नेथन डंगन याने तरुण आणि प्रौढांचा [br]एक गट बोलावला. 0:16:48.467,0:16:52.680 काही दिवस त्यांच्या सभा घेतल्या. 0:16:52.704,0:16:54.467 यातला एक भाग असा होता: 0:16:54.491,0:16:57.791 आपल्या आयुष्यातला असा एखादा क्षण आठवा,[br]ज्यावेळी तुम्हांला खरोखर 0:16:57.815,0:17:00.561 आयुष्याचा अर्थ आणि हेतु गवसला असेल. 0:17:00.585,0:17:02.728 प्रत्येकाला हे निरनिराळं जाणवलं. 0:17:02.752,0:17:06.369 कोणाला आठवलं संगीत, कोणाला लेखन, मदतकार्य. 0:17:06.393,0:17:09.196 तुम्हां सर्वांनाही नक्कीच [br]काहीतरी जाणवलं असेल. 0:17:09.220,0:17:12.101 यातला दुसरा भाग असा होता:[br]प्रश्न विचारायला प्रवृत्त करणे. 0:17:12.125,0:17:14.887 "या महत्त्वाच्या गोष्टींना [br]जास्त वेळ कसा द्यावा? 0:17:14.911,0:17:17.595 आणि निरुपयोगी कचरा विकत घेऊन 0:17:17.619,0:17:20.569 त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून 0:17:20.593,0:17:23.315 लोकांना OMG म्हणायला लावणं 0:17:23.339,0:17:24.606 कसं टाळावं?" 0:17:24.958,0:17:26.601 नुसता या सभांना येण्याचादेखील 0:17:26.625,0:17:27.959 चांगला परिणाम दिसून आला. 0:17:27.983,0:17:31.093 हे चंगळवादाच्या व्यसनमुक्तीचे वर्ग, बरोबर? 0:17:31.807,0:17:34.760 अशा सभांना हजर राहून[br]एकमेकांचे विचार ऐकणं, 0:17:34.784,0:17:37.315 ते पाळण्याचा निश्चय करणं, [br]एकमेकांची चौकशी करणं 0:17:37.339,0:17:40.196 यामुळे या लोकांच्या विचारसरणीत [br]मोठा बदल घडून आला. 0:17:40.220,0:17:44.633 चुकीच्या गोष्टींत आनंद शोधायला लावून 0:17:44.657,0:17:47.291 नैराश्यात ढकलणाऱ्या संदेशांची वावटळ टाळून 0:17:47.315,0:17:50.656 ते नैराश्यातून बाहेर काढणाऱ्या 0:17:50.680,0:17:52.680 अर्थपूर्ण आणि पोषक विचारांकडे वळू लागले. 0:17:53.347,0:17:56.649 पण मी असे काही उपाय शोधले, [br]त्याबद्दल लिहिलं, 0:17:56.673,0:17:59.412 यात आज न सांगितलेलेही काही आहेत, 0:17:59.436,0:18:00.807 तरीसुद्धा माझ्या मनात येतं, 0:18:00.831,0:18:04.530 हे विचार सुचायला मला इतका वेळ का लागला? 0:18:04.554,0:18:06.570 कारण इतरांना समजावून सांगताना-- 0:18:06.594,0:18:09.038 त्यापैकी काही कठीण आहेत, सर्व नव्हेत. 0:18:09.062,0:18:12.306 ते सोपे वाटतात. [br]ते काही अवकाश विज्ञान नव्हे. 0:18:12.330,0:18:14.425 या गोष्टी आपल्याला मनात कुठेतरी [br]ठाऊक असतात. 0:18:14.449,0:18:17.086 मग त्या समजायला इतक्या कठीण का? 0:18:17.110,0:18:19.044 मला वाटतं, यामागे पुष्कळ कारणं आहेत. 0:18:19.475,0:18:23.744 यापैकी एक कारण असं, की [br]नैराश्य किंवा चिंताविकार म्हणजे नक्की काय, 0:18:23.768,0:18:27.188 याविषयीच्या आपल्या कल्पना बदलायला हव्यात. 0:18:27.776,0:18:29.958 काही खरीखुरी जैविक कारणंसुद्धा 0:18:29.982,0:18:31.715 या विकारांमागे असू शकतात. 0:18:32.117,0:18:35.871 आपण सगळं ठपका जैविक कारणांवरच ठेवतो. 0:18:35.895,0:18:37.141 असं मी बराच काळ करत होतो. 0:18:37.165,0:18:41.230 आपल्या संस्कृतीचा प्रभाव 0:18:41.254,0:18:45.111 मी आयुष्यभर पाहत आलो आहे. 0:18:45.135,0:18:48.172 या प्रभावामुळे आपण [br]निराश किंवा चिंताग्रस्त व्यक्तीला सांगतो, 0:18:48.196,0:18:50.498 "तुला होणाऱ्या वेदनांना काही अर्थ नाही. 0:18:50.522,0:18:51.958 फक्त थोडासा बिघाड झाला आहे. 0:18:51.982,0:18:54.451 संगणक प्रणालीत येतो तसा [br]काही व्यत्यय आला आहे. 0:18:54.475,0:18:57.142 तुझ्या डोक्यातली जुळणी थोडी बिघडली आहे." 0:18:58.061,0:19:01.168 पण नैराश्य म्हणजे बिघाड नव्हे हे समजलं, 0:19:01.192,0:19:05.257 तेव्हा माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. 0:19:06.620,0:19:07.770 तुमचं नैराश्य म्हणजे 0:19:08.684,0:19:10.691 तुम्हांला मिळालेला एक इशारा. 0:19:11.077,0:19:12.918 तो तुम्हांला काहीतरी सांगत असतो. 0:19:12.942,0:19:17.553 (टाळ्या) 0:19:17.577,0:19:19.966 निराश वाटण्यामागे काही कारणं असतात. 0:19:19.990,0:19:22.705 नैराश्याच्या गर्तेत ती समजणं कठीण असतं. 0:19:22.729,0:19:25.339 हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून जाणतो. 0:19:25.363,0:19:28.846 पण योग्य मदत मिळाली, तर [br]समस्या समजून घेऊन, 0:19:28.870,0:19:31.344 सर्वांनी मिळून त्या सोडवता येतात. 0:19:31.368,0:19:32.560 पण हे करण्याअगोदरची 0:19:32.584,0:19:34.322 पहिली पायरी म्हणजे 0:19:34.346,0:19:36.964 हे इशारे धुडकावून न लावणं. 0:19:36.988,0:19:41.180 त्यांना दुबळेपणा, वेड [br]किंवा जैविक कारण न समजणं. 0:19:41.204,0:19:43.139 काही थोड्या अपवादांमध्ये तसं असू शकतं. 0:19:43.163,0:19:46.789 हे इशारे आपण ऐकायला हवेत. 0:19:46.813,0:19:50.085 कारण आपण ऐकायलाच हवं असं काहीतरी [br]ते सांगत असतात. 0:19:50.514,0:19:55.537 आपण जेव्हा खरोखरीच हे इशारे ऐकून 0:19:55.561,0:19:59.576 त्यांचा योग्य तो मान राखायला लागू, 0:19:59.600,0:20:01.847 तेव्हाच आपल्याला दिसू लागतील 0:20:01.871,0:20:06.029 मुक्तता देणारे, सक्षम करणारे सखोल उपाय. 0:20:07.133,0:20:11.206 भोवताली सर्वत्र गायी थबकल्या आहेत! 0:20:11.585,0:20:12.766 धन्यवाद. 0:20:12.790,0:20:16.478 (टाळ्या)